< دوم پادشاهان 21 >
مَنَسی دوازده ساله بود که پادشاه یهودا شد و پنجاه و پنج سال در اورشلیم سلطنت نمود. (اسم مادرش حفصیبه بود.) | 1 |
१मनश्शे राज्य करु लागला तेव्हा तो बारा वर्षांचा होता. त्याने यरूशलेमेवर पंचावन्न वर्षे, राज्य केले. त्याच्या आईचे नाव हेफसीबा.
او از اعمال زشت قومهای بتپرستی که خداوند آنها را از کنعان بیرون رانده بود، پیروی میکرد و نسبت به خداوند گناه میورزید. | 2 |
२परमेश्वराने जे करु नका म्हणून सांगितले तेच त्याने केले. इतर राष्ट्रे करत तसे अमंगळ आचरण मनश्शेने केले (आणि इस्राएली आले त्यावेळी याच राष्ट्रांना परमेश्वराने तेथून हुसकून लावले होते.)
مَنَسی معبدهای بالای تپهها را که پدرش حِزِقیا خراب کرده بود، دوباره بنا نمود، مذبحهایی برای بعل درست کرد و بت شرمآور اشیره را همانطور که اَخاب، پادشاه اسرائیل درست کرده بود، دوباره ساخت. مَنَسی آفتاب و ماه و ستارگان را پرستش میکرد و برای آنها مذبحهایی ساخت و آنها را در حیاط خانهٔ خداوند قرار داد، یعنی در همان خانه و در اورشلیم که خداوند برای نام خود برگزیده بود. | 3 |
३हिज्कीयाने नष्ट केलेली उंचस्थानावरील पूजास्थळे मनश्शेने पुन्हा बांधली, तसेच त्याने बआलदेवतेसाठी वेदी बांधली आणि इस्राएलचा राजा अहाब याच्याप्रमाणे अशेरा देवीचे स्तंभ उभारले. मनश्शे नक्षत्रांची ही पूजा करत असे.
४आणि ज्याविषयी परमेश्वराने सांगितले होते की, “मी आपले नाव यरूशलेमेत ठेवीन,” तेथे परमेश्वराच्या घरात मनश्शेने वेद्या बांधल्या.
५या खेरीज परमेश्वराच्या मंदिराच्या दोन्ही चौकांत मनश्शेने आकाशातील नक्षत्रांसाठी वेद्या बांधल्या.
مَنَسی پسر خود را به عنوان قربانی سوزانید. او جادوگری و فالگیری میکرد و با احضارکنندگان ارواح و جادوگران مشورت مینمود. او با این کارهای شرارتآمیز، خداوند را به خشم آورد. | 6 |
६आपल्या मुलाचाच बली देऊन मनश्शेने त्यास वेदीवर जाळले. जादूटोणा, मंत्रतंत्र, भूतवैद्य यांच्यामार्फत भविष्य जाणून घ्यायचा मनश्शेला नाद होता. परमेश्वराने जे जे गैर म्हणून सांगितले ते ते मनश्शे करत गेला. त्याने परमेश्वराचा कोप झाला.
او حتی بت شرمآور اشیره را در خانهٔ خداوند بر پا نمود، یعنی در همان مکانی که خداوند راجع به آن به داوود و سلیمان گفته بود: «نام خود را تا به ابد بر این خانه و بر اورشلیم، شهری که از میان شهرهای قبایل اسرائیل برای خود انتخاب کردهام، خواهم نهاد. | 7 |
७मनश्शेने अशेराचा कोरीव पुतळा करून तो मंदिरात ठेवला. या मंदिराविषयी दावीद आणि दाविदाचा मुलगा शलमोन यांना परमेश्वर म्हणाला होता, “इस्राएलमधील सर्व वंशातून, या नगरांमधून मी यरूशलेमची निवड केली आहे. यरूशलेममधील मंदिरात मी माझे नाव कायमचे ठेवीन.
اگر قوم اسرائیل از دستورهایی که من بهوسیلۀ خادمم موسی به آنها دادهام پیروی نمایند، بار دیگر هرگز ایشان را از این سرزمین که به اجداد ایشان دادم، بیرون نخواهم راند.» | 8 |
८इस्राएल लोकांस या भूमीतून बाहेर पडावे लागू नये याची मी दक्षता घेईल. माझ्या सर्व आज्ञा तसेच मोशेची शिकवण त्यांनी तंतोतंत पाळली, तर त्यांची इथेच या भूमीत वस्ती राहील.”
اما ایشان نه فقط از خداوند اطاعت نکردند، بلکه بدتر از قومهایی که خداوند آنها را از کنعان بیرون رانده بود، رفتار نمودند زیرا مَنَسی ایشان را گمراه نموده بود. | 9 |
९पण लोकांनी परमेश्वराचे ऐकले नाही. इस्राएल लोक इथे येण्यापूर्वी कनानमधील राष्ट्रांनी जी वाईट वर्तणूक केली त्यापेक्षाही मनश्शेचे वर्तन निंद्य होते. इस्राएल लोक या भूमीत आले तेव्हा त्या राष्ट्रांना परमेश्वराने नष्ट केले होते.
پس خداوند بهوسیلۀ خدمتگزاران خود، انبیا چنین فرمود: | 10 |
१०तेव्हा परमेश्वराने आपल्या सेवक संदेष्ट्यांना हे सांगायला सांगितले,
«چون مَنَسی، پادشاه یهودا این اعمال قبیح را انجام داده و حتی بدتر از اموریهایی که در گذشته در این سرزمین ساکن بودند، رفتار نموده و مردم یهودا را به بتپرستی کشانیده است؛ | 11 |
११“यहूद्यांचा राजा मनश्शे याने अत्यंत निंद्य कृत्ये केली आहेत. त्याच्या आधीच्या अमोऱ्यापेक्षाही याचे वागणे भयंकर आहे. त्याच्या त्या मूर्तीपुढे त्याने यहूदालाही पाप करायला लावले आहे.
من نیز بر اورشلیم و یهودا چنان بلایی نازل خواهم کرد که هر که آن را بشنود وحشت کند. | 12 |
१२तेव्हा इस्राएलाचा परमेश्वर म्हणतो, ‘यरूशलेम आणि यहूदा यांना मी आता अशा संकटाच्या खाईत लोटीन की ते ऐकूनच लोकांस धक्का बसेल.
همان بلایی را سر اورشلیم میآورم که بر سر سامره و خاندان اَخاب آوردم. اورشلیم را از لوث وجود ساکنانش پاک میکنم، درست همانطور که ظرف را پاک کرده، میشویند و آن را وارونه میگذارند تا خشک شود. | 13 |
१३शोमरोनचे मापनसूत्र आणि अहाबाच्या घराण्याचा ओळंबा मी यरूशलेमेवर धरीन. थाळी घासूनपुसून पालथी करून ठेवावी तशी मी यरूशलेमची गत करीन.
بازماندگان قوم را نیز ترک خواهم گفت و ایشان را به دست دشمن خواهم سپرد تا آنها را غارت کنند، | 14 |
१४मी आपल्या वतनांतल्या राहिलेल्यांचा त्याग करून त्यांना त्यांच्या शत्रूच्या ताब्यात देईन. ते त्यांना युध्दातील लुटीप्रमाणे व भक्ष्य असे होतील.
زیرا ایشان نسبت به من گناه ورزیدهاند و از روزی که اجدادشان را از مصر بیرون آوردم تا به امروز مرا خشمگین نمودهاند.» | 15 |
१५मी जे जे करु नका म्हणून बजावले ते ते त्यांनी केले त्याचे हे फळ होय. यांचे पूर्वज मिसरमधून बाहेर पडले, त्या दिवसापासूनच यांनी मला संताप आणला आहे.
مَنَسی علاوه بر این که اهالی یهودا را به بتپرستی کشانده، باعث شد آنها نسبت به خداوند گناه ورزند، افراد بیگناه بیشماری را نیز کشت و اورشلیم را با خون آنها رنگین ساخت. | 16 |
१६शिवाय मनश्शेने अनेक निरपराध्यांची हत्या केली. संपूर्ण यरूशलेम त्याने रक्तलांछित केले. यहूद्यांना त्याने जी पापे करायला लावली ती वेगळीच. परमेश्वराने जे करु नका म्हणून सांगितले ते मनश्शेने यहूदाला करायला लावले.”
شرح بقیهٔ رویدادهای دوران سلطنت مَنَسی و اعمال گناهآلود او در کتاب تاریخ پادشاهان یهودا نوشته شده است. | 17 |
१७मनश्शेची पापे आणि इतर कृत्ये यहूदाच्या राजांचा इतिहास, या पुस्तकात लिहिलेली आहेत.
وقتی مَنَسی مرد او را در باغ کاخ خودش که عوزا نام داشت دفن کردند و پسرش آمون به جای وی پادشاه شد. | 18 |
१८मनश्शे मरण पावला आणि त्याचे आपल्या पूर्वजांच्या शेजारी दफन झाले. आपल्या घराच्या बगीच्यात त्यास पुरले. या बागेचे नाव “उज्जाची बाग” त्याच्या जागी त्याचा मुलगा आमोन राज्य करु लागला.
آمون بیست و دو ساله بود که پادشاه یهودا شد و دو سال در اورشلیم سلطنت کرد. (مادرش مِشُلِمِت، دختر حاروص از اهالی یطبه بود.) | 19 |
१९आमोन राज्य करु लागला तेव्हा बावीस वर्षांचा होता. त्याने यरूशलेमेवर दोन वर्षे राज्य केले. याच्या आईचे नाव मशुल्लेमेथ ही यटबा येथील हारुस याची मुलगी.
او نیز مانند پدرش مَنَسی نسبت به خداوند گناه ورزید. | 20 |
२०आपले वडिल मनश्शे यांच्याप्रमाणेच आमोननेही परमेश्वराच्या दृष्टीने गैर कृत्ये केली.
آمون از تمام راههای بد پدرش پیروی مینمود و بتهای پدرش را میپرستید. | 21 |
२१तो आपल्या वडिलांसारखाच होता. वडिलांनी ज्या देवतांची पूजाअर्चा केली त्यांचीच पूजा आमोननेही आरंभली.
او از خداوند، خدای اجدادش برگشت و به دستورهای خداوند عمل نکرد. | 22 |
२२आपल्या पूर्वजांचा परमेश्वर देव याचा मार्ग त्याने सोडला आणि परमेश्वराच्या इच्छेविरुध्द वागला.
سرانجام افرادش بر ضد او توطئه چیدند و او را در کاخ سلطنتیاش به قتل رساندند. | 23 |
२३आमोनच्या सेवकांनी त्याच्याविरुध्द कट करून त्याच्या घरातच राजाला ठार केले.
مردم قاتلان آمون را کشتند و پسرش یوشیا را به جای او بر تخت سلطنت نشاندند. | 24 |
२४आणि ज्यांनी आमोनशी फितुरी केली, त्या सेवकांना देशातील लोकांनी जिवे मारले. मग आमोनचा मुलगा योशीया याला लोकांनी राजा केले.
شرح بقیه رویدادهای دوران سلطنت آمون در کتاب تاریخ پادشاهان یهودا ثبت گردیده است. | 25 |
२५आमोनने जी इतर कृत्ये केली ती सर्व “यहूदाच्या राजांचा इतिहास” या पुस्तकात लिहून ठेवलेली आहेत.
او را در آرامگاه باغ عوزا دفن کردند و پسرش یوشیا به جای او پادشاه شد. | 26 |
२६उज्जाच्या बागेत आमोनचे दफन करण्यात आले. आमोनचा मुलगा योशीया राजा झाला.