< دوم پادشاهان 11 >
وقتی عتلیا مادر اخزیا (پادشاه یهودا) شنید که پسرش مرده است، دستور قتل عام تمام اعضای خاندان سلطنتی را صادر کرد. | 1 |
१अहज्याची आई अथल्या हिने आपला मुलगा मरण पावला हे पाहिल्यावर, ती उठली आणि सर्व राजसंतानाची हत्या केली.
تنها کسی که جان به در برد یوآش پسر کوچک اخزیا بود، زیرا یهوشبع عمهٔ یوآش، که دختر یهورام پادشاه و خواهر ناتنی اخزیا بود، او را نجات داد. یهوشبع طفل را از میان سایر فرزندان پادشاه که در انتظار مرگ بودند دزدیده، او را با دایهاش در خانهٔ خداوند در اتاقی پنهان کرد. | 2 |
२पण यहोशेबा, ही राजा योरामाची मुलगी आणि अहज्याची बहीण. योवाश हा राजाच्या अनेक मुलांपैकी एक. इतर मुलांची हत्या होत असताना यहोशेबाने योवाशाला बाजूला घेतले आणि आपल्या झोपायच्या खोलीत लपवून ठेवले. तिने योवाश आणि त्याची दाई यांना लपवले. यहोशेबा आणि ती दाई यांनी योवाशाला अथल्याच्या तावडीतून सोडवले म्हणून तो मारला गेला नाही.
در تمام مدت شش سالی که عتلیا در مقام ملکه فرمانروایی میکرد یوآش زیر نظر عمهاش در خانهٔ خداوند پنهان ماند. | 3 |
३योवाश आणि यहोशेबा परमेश्वराच्या मंदिरात सहा वर्षे लपून राहिले. आणि यहूदावर अथल्याचे राज्य होते.
در هفتمین سال سلطنت ملکه عتلیا، یهویاداع کاهن فرستاد و فرماندهان، کریتیان و نگهبانان دربار را به خانهٔ خداوند دعوت کرد. در آنجا آنها را قسم داد که نقشهٔ او را به کسی نگویند؛ آنگاه یوآش، پسر اخزیا را به آنها نشان داد. | 4 |
४सातव्या वर्षी महायाजक यहोयादाने अधिकाऱ्यांना त्यांच्या हुजरे आणि पहारेकरी यांच्यासुद्धा बोलावून घेतले. आणि त्यांना आपल्याबरोबर परमेश्वराच्या मंदिरात नेले. यहोयादाने त्यांच्याशी शपथ व करार करून घेऊन, मग योवाश या राजपुत्राला त्यांच्यापुढे आणले.
سپس این دستورها را به آنها داد: «یک سوم شما که روز شَبّات مشغول انجام وظیفه هستید، باید از کاخ سلطنتی حفاظت کنید، | 5 |
५यहोयादाने त्यांना एक आज्ञा केली. तो म्हणाला, “तुम्हास आता मी सांगतो तसे करायचे आहे. प्रत्येक शब्बाथला तुमच्यापैकी एकतृतीयांश लोकांनी आत यायचे. राजाचे त्याच्या घरात तुम्ही संरक्षण करायचे.
یک سوم دیگر جلوی دروازهٔ”سور“و یک سوم بقیه جلوی دروازهٔ دیگر پشت سر محافظین بایستید تا کسی وارد خانهٔ خدا نشود. | 6 |
६आणि दुसरे एकतृतीयांश लोकांच्या गटाने सूर वेशीवर थांबायचे आणि तिसऱ्या एकतृतीयांश गटाने पहारेकऱ्यांच्या मागे राहायचे.
دو دسته از شما که روز شَبّات سر خدمت نیستید، باید در خانهٔ خداوند کشیک بدهید | 7 |
७आणि शब्बाथ दिवसास जे सेवा करत नाही, असे दोन गट परमेश्वराच्या मंदिराचे रक्षण करतील आणि राजा योवाशाला संरक्षण देतील.
و اسلحه به دست، پادشاه را احاطه کنید و هر جا میرود از او محافظت نمایید. هر که خواست به پادشاه نزدیک شود، او را بکشید.» | 8 |
८राजा योवाश बाहेर जाईल व आत येईल, तिथे सतत तुम्ही त्याच्याबरोबर राहिले पाहिजे. तुम्ही त्याच्याभोवती कडे करावे व प्रत्येक पहारेकऱ्याच्या हातात शस्त्र असेल आणि कोणीही आपल्या फार जवळ आल्यास तुम्ही त्यास मारुन टाकावे.”
پس فرماندهان مطابق دستورهای یهویاداع کاهن عمل کردند. ایشان نگهبانانی را که روز شَبّات سر خدمت میرفتند و نیز نگهبانانی را که در آن روز سر خدمت نبودند احضار کرده، نزد یهویاداع آوردند. | 9 |
९याजक यहोयादाने ज्या ज्या आज्ञा दिल्या त्या सर्वांचे त्या शताधीपतींनी पालन केले. प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या मनुष्यांना बरोबर घेतले. जी शब्बाथात आत येणारी होती आणि जी शब्बाथात बाहेर जाणारी होती हे सर्व लोक यहोयादाकडे गेले.
یهویاداع آنها را با نیزهها و سپرهای خانهٔ خداوند که متعلق به داوود پادشاه بود، مسلح کرد. | 10 |
१०याजक यहोयादाने शेकडो भाले आणि ढाली अधिकाऱ्यांच्या हवाली केल्या. दावीद राजाची परमेश्वराच्या मंदिरात ठेवलेली शस्त्रे ती हीच.
نگهبانان مسلح اطراف پادشاه مستقر شدند. آنها صفی تشکیل دادند که از ضلع جنوبی معبد تا ضلع شمالی و دورتادور مذبح کشیده میشد. | 11 |
११मंदिराच्या डाव्या टोकापासून उजव्या टोकापर्यंत हे रखवालदार हातात आपापली शस्त्रे घेऊन उभे राहिले. ते वेदी आणि मंदिर यांच्याभोवती तसेच राजा मंदिरात येई तेव्हा त्याच्या भोवती उभे राहत.
آنگاه یهویاداع یوآش را بیرون آورد و تاج را بر سرش نهاد و نسخهای از تورات را به او داد و او را تدهین کرده، به پادشاهی منصوب نمود. سپس همه دست زدند و فریاد برآوردند: «زنده باد پادشاه!» | 12 |
१२मग यहोयादाने योवाशाला बाहेर काढले. त्यास त्यांनी मुकुट घातला आणि आज्ञापट दिला. मग त्यांनी त्यास राजा करून त्याचा अभिषेक केला व टाळ्या वाजवून त्यांनी “राजा चिरायू होवो” म्हणून जयघोष केला.
ملکه عتلیا وقتی صدای نگهبانان و مردم را شنید، با عجله به طرف خانهٔ خداوند که مردم در آنجا جمع شده بودند، دوید. | 13 |
१३हुजऱ्यांचा आणि लोकांचा हा गलबला राणी अथल्याच्या कानावर गेला. तेव्हा ती परमेश्वराच्या मंदिरापाशी गेली.
در آنجا پادشاه جدید را دید که برحسب آیین تاجگذاری، در کنار ستون ایستاده است و فرماندهان و شیپورچیها اطراف او را گرفتهاند و شیپور میزنند و همه شادی میکنند. عتلیا با دیدن این منظره لباس خود را پاره کرد و فریاد برآورد: «خیانت! خیانت!» | 14 |
१४राजाची रीतीप्रमाणे स्तंभाजवळ उभे रहायची जी जागा तिथे अथल्याने राजाला उभे असलेले पाहिले. नेते आणि लोक कर्णे वाजवीत आहेत हे ही तिने पाहिले. लोकांस खूप आनंद झालेला आहे हे तिच्या लक्षात आले. कर्ण्यांचा आवाज ऐकून तिने नाराजी प्रदर्शित करण्याकरता आपली वस्त्रे फाडली आणि ती “फितुरी! फितुरी!” म्हणून ओरडू लागली.
یهویاداع به فرماندهان دستور داد: «او را از اینجا بیرون ببرید. در خانهٔ خداوند او را نکشید. هر کس سعی کند عتلیا را نجات دهد بیدرنگ کشته خواهد شد.» | 15 |
१५हुजऱ्यांवरील अधिकाऱ्यांना याजक यहोयादाने आज्ञा दिली, “अथल्याला मंदिराच्या आवाराबाहेर काढावे. तिच्या अनुयायांचा तलवारीने वध करावा. मात्र परमेश्वराच्या मंदिरात तो करु नये.”
پس عتلیا را به اسطبل کاخ سلطنتی کشانده، او را در آنجا کشتند. | 16 |
१६मग तिला जाण्यासाठी त्यांनी वाट केली व राज मंदीराकडे घोडे ज्या दारातून आत येत असत त्या दाराने तिला बाहेर काढून तिचा त्यांनी वध केला.
یهویاداع کاهن از پادشاه و مردم خواست تا با خداوند عهد ببندند که قوم خداوند باشند. پیمان دیگری نیز بین پادشاه و ملتش بسته شد. | 17 |
१७यहोयादाने नंतर परमेश्वर, राजा आणि लोक यांच्यात करार केला. राजा आणि लोक या दोघांवरही परमेश्वराची सत्ता आहे, असे त्या करारात होते. यहोयादाने या खेरीज राजा आणि लोक यांच्यातही एक करार केला. राजाची लोकांबाबत असलेली कर्तव्ये त्यामध्ये होती. तसेच लोकांनी राजाचे आज्ञापालन आणि अनुयायित्व करावे असे त्यामध्ये म्हटले होते.
آنگاه همه به بتخانهٔ بعل رفتند و آن را واژگون ساختند و مذبحها و مجسمهها را خراب کردند و متان، کاهن بت بعل را در مقابل مذبحها کشتند. یهویاداع نگهبانانی در خانهٔ خداوند گماشت، | 18 |
१८यानंतर लोक बाल या देवतेच्या देवळात गेले. त्यांनी बआलाच्या मूर्तीची तसेच तेथील वेद्यांची नासधूस, मोडतोड केली. त्यांचे तुकडे तुकडे केले बालाचा याजक मत्तान याला वेद्यांसमोरच लोकांनी ठार केले. याजक यहोयाद याने परमेश्वराच्या मंदिरावर पहारेकरी नेमले.
و خود با فرماندهان، کریتیان، نگهبانان دربار و تمام قوم، پادشاه را از خانهٔ خداوند تا کاخ سلطنتی مشایعت کرد. آنها از دروازهٔ نگهبانان وارد کاخ شدند و یوآش بر تخت سلطنتی نشست. | 19 |
१९सर्व लोकांस घेऊन तो परमेश्वराच्या मंदिराकडून राजाच्या निवासस्थानी गेला. राजाचे विशेष हुजरे, सुरक्षा सैनिक आणि अधिकारी राजाबरोबर होते. त्यांच्यापाठोपाठ बाकीचे लोक गेले. राजमहालाच्या प्रवेशद्वारापर्यंत ते गेले. राजा योवाश मग सिंहासनावर बसला.
همهٔ مردم از این موضوع خوشحال بودند. بعد از مرگ عتلیا، در شهر آرامش برقرار گردید. | 20 |
२०लोक आनंदात होते आणि नगरात शांतता नांदत होती. राणी अथल्याला राजाच्या महालात तलवारीने मारले.
یوآش هفت ساله بود که پادشاه یهودا شد. | 21 |
२१योवाश राजा झाला तेव्हा सात वर्षांचा होता.