< دوم تواریخ 4 >

سلیمان پادشاه یک مذبح مفرغین ساخت به طول بیست ذراع، عرض بیست ذراع و بلندی ده ذراع. 1
शलमोनाने पितळेची वेदी बनवली. तीची लांबी तीस हात, रूंदी तीस हात व उंची दहा हात होती.
سپس یک حوض گرد از مفرغ درست کرد که عمق آن پنج ذراع، قطرش ده ذراع و محیطش سی ذراع بود. 2
त्याने ओतीव पितळेचे एक गंगाळदेखील केले. हे गोल असून त्याचा व्यास दहा हात होता. त्याची उंची पाच हात आणि त्याचा कडेचा परीघ तीस हात होता.
بر کناره‌های لبهٔ حوض دو ردیف نقشهایی به شکل گاو (در هر ذراع ده نقش) قرار داشتند. این نقشها با خود حوض قالبگیری شده بود. 3
प्रत्येकी एक हाताच्या अंतरावर या गंगाळाच्या खालच्या कडेला सर्वत्र दहा दहा बैलांच्या चित्रकृती घडवलेल्या होत्या. गंगाळ घडवतानाच एकसंध तुकड्यातून ते बनवले होते.
این حوض بر پشت دوازده مجسمهٔ گاو قرار داشت. سر گاوها به طرف بیرون بود: سه گاو رو به شمال، سه گاو رو به جنوب، سه گاو رو به مغرب و سه گاو رو به مشرق. 4
बारा घडीव बैलांनी हे प्रशस्त गंगाळ तोललेले होते. तीन पुर्वभीमुख होते, तीन उत्तराभिमुख तीन पश्चिमाभिमुख, तीन दक्षिणभिमुख व गंगाळ त्यांच्यावर होते सर्व बैलांचा पार्श्व भाग आतील बाजूकडे होता.
ضخامت دیوارهٔ حوض به پهنای کف دست بود. لبهٔ آن به شکل جام بود و مانند گلبرگ سوسن به طرف بیرون باز می‌شد. گنجایش آن بیش از شصت هزار لیتر بود. 5
या पितळी गंगाळाची जाडी हाता एवढी असून, त्याचे गोलाकार तोंड उमललेल्या कमलपुष्पासारखे होते. त्यामध्ये तीन हजार बुधले पाणी मावू शकत होते.
ده حوضچه نیز ساخته شد پنج عدد در طرف شمال خانهٔ خدا و پنج عدد در طرف جنوب آن. از آب این حوضچه‌ها برای شستن قطعه‌های بدن حیوان قربانی که می‌بایست روی مذبح سوزانده شود استفاده می‌شد. کاهنان برای شستن خود از آب حوضچه‌ها استفاده نمی‌کردند، بلکه با آب حوض خود را می‌شستند. 6
याखेरीज शलमोनाने दहा तस्ते बनवली. ती त्याने या गंगाळाच्या उजव्या बाजूला पाच आणि डाव्या बाजूला पाच अशी बसवली. होमार्पणात द्यावयाच्या वस्तू धुवून घेण्यासाठी ही दहा तस्ते होती. पण मुख्य पितळी गंगाळ मात्र याजकांच्या वापरासाठी, होते.
ده چراغدان طلا مطابق طرح، ساخته شد و در خانهٔ خدا قرار گرفت. چراغدانها را در دو دستهٔ پنج‌تایی روبروی هم، به طرف شمال و جنوب، نهادند. 7
शलमोनाने सोन्याचे दहा दिपस्तंभही त्यांच्या विधीनुसार बनविले, आणि मंदिरात डावीकडे पाच व उजवीकडे पाच असे ठेवले.
همچنین ده میز ساختند و پنج عدد از آنها را در طرف شمال و پنج عدد دیگر را در سمت جنوب خانهٔ خدا قرار دادند. صد کاسهٔ طلا نیز درست کردند. 8
तसेच दहा मेज बनवून पाच डावीकडे आणि पाच उजवीकडे अशा पद्धतीने ठेवले. शिवाय सोन्याचे शंभर वाडगे बनवले.
سپس یک حیاط داخلی برای کاهنان و یک حیاط بیرونی ساخته شد و درهای بین آنها را با مفرغ پوشانیدند. 9
याखेरीज शलमोनाने याजकांसाठी एक दालन व एक प्रशस्त दालन आणि दरवाजे केले. दालनांत उघडणारे दरवाजे मढवण्यासाठी पितळ वापरले.
حوض در گوشهٔ جنوب شرقی خانهٔ خدا بود. 10
१०एवढे झाल्यावर आग्नेयला दिशेस मंदिराच्या उजवीकडे त्याने ते मोठे पितळी गंगाळ ठेवले.
حورام سطلها، خاک‌اندازها و کاسه‌های مربوط به قربانیها را هم ساخت. سرانجام حورام این کارهای مربوط به خانهٔ خدا را که سلیمان پادشاه برای او تعیین کرده بود، به پایان رسانید. اشیایی که او ساخت عبارت بودند از: 11
११हिराम या कारागिराने हंडे, फावडी व शिंपडण्यासाठी वाडगे बनवले. देवाच्या मंदीराचे जे काम त्यास शलमोनासाठी करायचे होते ते त्याने पूर्ण केले.
دو ستون، دو سر ستون کاسه مانند برای ستونها، دو رشته زنجیر روی سر ستونها، چهارصد انار مفرغین برای دو رشته زنجیر (یعنی برای هر رشته زنجیر سر ستون، دویست انار که در دو ردیف قرار داشتند)، میزها و حوضچه‌های روی آنها، حوض بزرگ با دوازده گاو مفرغین زیر آن، سطلها، خاک‌اندازها و چنگکهای مخصوصِ آویزان کردن گوشت قربانیها. حورام، این صنعتگر ماهر، تمام اشیاء خانهٔ خداوند را از مفرغ صیقلی برای سلیمان پادشاه ساخت. 12
१२दोन स्तंभ, स्तंभावरचे कळस, त्यावरील जाळ्यांची दोन सुशोभने हे काम हिरामने केले होते.
13
१३त्या जाळीदार आच्छादनांवरील चारशे शोभिवंत डाळिंबे हिरामनेच केली होती. प्रत्येक जाळीवर डाळिंबाच्या दोन ओळी होत्या. स्तंभावरचे कळस या जाळ्यांनी आच्छादलेले होते.
14
१४तिवया आणि तिवयांवरची गंगाळी त्याने घडवली होती.
15
१५मोठे पितळी गंगाळ आणि त्यास आधार देणारे बारा बैल हिरामनेच केले.
16
१६शलमोनासाठी हिरामाने हंडे, फावडी, मांस खाण्यासाठी काटे इत्यादी परमेश्वराच्या मंदिरातली उपकरणे केली त्यासाठी लखलखीत, उजळ पितळ वापरलेले होते.
به دستور سلیمان این اشیاء در دشت اردن که بین سوکوت و صرده قرار داشت قالبریزی شده بود. 17
१७या सर्व गोष्टीसाठी शलमोनाने आधी चिकणमातीचे साचे बनविले. त्यासाठी सुक्कोथ आणि सरेदा यांच्यामधली, यार्देन खोऱ्यातली माती वापरली.
مقدار مفرغین که استعمال شد، بی‌اندازه زیاد بود و نمی‌شد آن را وزن کرد! 18
१८शलमोनाने मोठ्या प्रमाणात ही भांडी बनवीली. त्यासाठी लागलेल्या पितळाचे वजन कोणालाच समजले नाही.
در ضمن به دستور سلیمان وسایلی از طلای خالص برای خانهٔ خدا ساخته شد. این وسایل عبارت بودند از: مذبح، میز نان حضور، 19
१९याखेरीज आणखी काही गोष्टी शलमोनाने देवाच्या मंदिरासाठी केल्या. सोन्याची वेदी, व समर्पित भाकर ठेवण्याची मेजे ही केली.
چراغدانها با نقشهای گل و چراغهای روی آنها که مطابق طرح می‌بایست روبروی قدس‌الاقداس قرار می‌گرفت، انبرکها، 20
२०सोन्याचे दीपवृक्ष आणि दिवे करवून घेतले. आतल्या सर्वांत पवित्र गाभाऱ्याच्या समोर योजना केल्याप्रमाणे लावण्यासाठी हे दिवे होते.
21
२१याव्यतिरिक्त फुले, दिवे आणि निखारे उचलण्याचे चिमटे शुद्ध सोन्याचे होते.
انبرها، کاسه‌ها، قاشقها و آتشدانها. در ضمن درهای خانهٔ خدا یعنی درهای اصلی و درهای قدس‌الاقداس نیز از طلای خالص بود. 22
२२कातऱ्या, वाडगी, कटोरे, चमचे, धुप जाळावयाची पात्रे शलमोनाने शुद्ध सोन्याची बनवीली त्याचप्रमाणे मंदिराची दरवाजे, अत्यंत पवित्र अशा गाभाऱ्यातली दरवाजे, आणि मुख्य दालनाचे दरवाजे हे ही सोन्याचे होते.

< دوم تواریخ 4 >