< اول سموئیل 22 >
داوود از جَت فرار کرده، به غار عدولام رفت و طولی نکشید که در آنجا برادران و سایر بستگانش به او ملحق شدند. | 1 |
१मग दावीद तेथून निघून अदुल्लाम गुहेत पळून गेला त्याचे भाऊ व त्याच्या बापाचे घरचे सर्व हे ऐकून तेथे खाली त्याच्याकडे गेले.
همچنین تمام کسانی که رنجدیده، قرضدار و ناراضی بودند نزد وی جمع شدند. تعداد آنها به چهارصد نفر میرسید و داوود رهبر آنها شد. | 2 |
२कोणी अडचणीत पडलेले कोणी कर्जदार व कोणी त्रासलेले असे सर्व त्याच्याकडे एकत्र मिळाले आणि तो त्यांचा सरदार झाला; सुमारे चारशे माणसे त्याच्याजवळ होती.
بعد داوود به مصفهٔ موآب رفته، به پادشاه موآب گفت: «خواهش میکنم اجازه دهید پدر و مادرم در اینجا با شما زندگی کنند تا ببینم خدا برای من چه خواهد کرد.» | 3 |
३दावीद तेथून मवाबातील मिस्पा येथे जाऊन मवाबाच्या राजाला म्हणाला, “मी तुला विनंती करतो परमेश्वर माझ्यासाठी काय करील हे मला कळेल तोपर्यंत माझ्या आई-वडीलांना तुझ्याजवळ येऊन राहू दे.”
پس آنها را نزد پادشاه موآب برد. در تمام مدتی که داوود در مخفیگاه زندگی میکرد، آنها در موآب به سر میبردند. | 4 |
४मग त्याने त्यांना मवाबाच्या राजाकडे आणले आणि दावीद गडात वस्तीस होता तोपर्यंत ते त्याच्याजवळ राहिले.
روزی جاد نبی نزد داوود آمده، به او گفت: «از مخفیگاه بیرون بیا و به سرزمین یهودا برگرد.» پس داوود به جنگل حارث رفت. | 5 |
५मग गाद भविष्यवादी दावीदाला म्हणाला, “गडात राहू नको तर तू निघून यहूदा देशात जा.” तेव्हा दावीद निघून हरेथ रानात आला.
یک روز شائول بر تپهای در جِبعه زیر درخت بلوطی نشسته و نیزهاش در دستش بود و افرادش در اطراف او ایستاده بودند. به او خبر دادند که داوود و افرادش پیدا شدهاند. | 6 |
६दावीद व त्याच्याबरोबरची माणसे यांचा शोध लागला असे शौलाने ऐकले. शौल तर रामातल्या गिब्यात एशेल झाडाखाली बसला होता; त्याचा भाला त्याच्या हातात होता व त्याचे सर्व चाकर उभे होते.
شائول به افرادش گفت: «ای مردان بنیامین گوش دهید! آیا فکر میکنید پسر یَسا مزارع و تاکستانها به شما خواهد داد و همهٔ شما را افسران سپاه خود خواهد ساخت؟ | 7 |
७तेव्हा शौल आपल्याजवळ जे आपले चाकर उभे होते त्यांना म्हणाला, “अहो बन्यामिनी लोकांनो ऐका हा इशायाचा मुलगा तुम्हा प्रत्येकाला शेते व द्राक्षमळे देणार आहे काय? तो तुम्हा सर्वांना हजाराचे व शंभराचे सरदार करणार आहे काय?
آیا برای این چیزهاست که شما بر ضد من توطئه کردهاید؟ چرا هیچکدام از شما به من نگفتید که پسرم با پسر یَسا پیمان بسته است؟ کسی از شما به فکر من نیست و به من نمیگوید که خدمتگزار من داوود به ترغیب پسرم قصد کشتن مرا دارد!» | 8 |
८म्हणून तुम्ही सगळे माझ्यावर फितुरी करीत आहा आणि माझा मुलगा इशायाच्या मुलाशी करार करतो तेव्हा मला कोणी कळवीत नाही आणि तुम्हातला कोणी माझ्यासाठी दुखीत होत नाही आणि माझ्या मुलाने माझ्या चाकराला आजच्यासारखे माझ्यासाठी टपून बसायला चेतवले आहे हे कोणी मला कळवीत नाही.”
آنگاه دوآغ ادومی که در کنار افراد شائول ایستاده بود چنین گفت: «وقتی من در نوب بودم، پسر یَسا را دیدم که با اخیملک کاهن صحبت میکرد. اخیملک دعا کرد تا خواست خداوند را برای داوود بداند. بعد به او خوراک داد و شمشیر جُلیات فلسطینی را نیز در اختیارش گذاشت.» | 9 |
९मग दवेग अदोमी जो शौलाच्या चाकरांसोबत उभा होता, त्याने उत्तर देऊन म्हटले, “मी इशायाच्या मुलाला नोब येथे अहीटूबाचा मुलगा अहीमलेख याच्याकडे येताना पाहिले;
१०त्याने त्याच्यासाठी परमेश्वरास विचारले व त्यास अन्न दिले आणि गल्याथ पलिष्टी याची तलवार त्यास दिली.”
شائول فوری اخیملک کاهن و بستگانش را که کاهنان نوب بودند احضار نمود. وقتی آمدند شائول گفت: «ای اخیملک، پسر اخیتوب، گوش کن!» اخیملک گفت: «بله قربان، گوش به فرمانم.» | 11 |
११तेव्हा राजाने अहीटूबाचा मुलगा अहीमलेख याजक याला व त्याच्या वडिलाच्या सर्व घराण्यातले जे याजक नोब येथे होते त्यांना बोलवायला माणसे पाठवली आणि ते सर्व राजाकडे आले.
१२तेव्हा शौलाने म्हटले, “अहीटूबाच्या मुला आता ऐक.” तो म्हणाला, “माझ्या प्रभू मी येथे आहे.”
شائول گفت: «چرا تو و پسر یَسا علیه من توطئه چیدهاید؟ چرا خوراک و شمشیر به او دادی و برای او از خدا هدایت خواستی؟ او بر ضد من برخاسته است و در کمین من میباشد تا مرا بکشد.» | 13 |
१३शौल त्यास म्हणाला, “तू आणि इशायाचा मुलगा अशा तुम्ही दोघांनी माझ्यावर फितुरी केली तू त्यास भाकर व तलवार दिली आणि त्याच्यासाठी देवापाशी विचारले यासाठी की, त्याने आजच्यासारखे माझ्यावर उठून माझ्यासाठी टपून बसावे?”
اخیملک پاسخ داد: «اما ای پادشاه، آیا در بین همهٔ خدمتگزارانتان شخصی وفادارتر از داوود که داماد شماست یافت میشود؟ او فرماندهٔ گارد سلطنتی و مورد احترام درباریان است! | 14 |
१४तेव्हा अहीमलेखाने राजाला उत्तर देऊन म्हटले, “तुझ्या सर्व चाकरांमध्ये दावीदासारखा कोण विश्वासू आहे? तो राजाचा जावई आहे व एकांती तुझ्याजवळ मसलतीला येत असतो व तुझ्या घरात प्रतिष्ठीत आहे.
دعای من برای او چیز تازهای نیست. غلامت و خاندانش را در این مورد مقصر ندانید، زیرا اطلاعی از چگونگی امر نداشتم.» | 15 |
१५आजच मी त्याच्यासाठी परमेश्वरास विचारू लागलो काय? असे करणे माझ्यापासून दूर असो; राजाने आपल्या दासास किंवा माझ्या वडिलाच्या घराण्यातील कोणाला अपराध लावू नये कारण या सर्वांतले अधिक उणे काहीच तुझ्या दासास ठाऊक नाही.”
پادشاه فریاد زد: «ای اخیملک، تو و تمام خاندانت باید کشته شوید!» | 16 |
१६राजा म्हणाला, “अहीमलेखा, तुला खचित मरण पावले पाहिजे; तुला व तुझ्या वडिलाच्या घराण्यातील सर्वांना मरण पावले पाहिजे”
آنگاه به گارد محافظ خود گفت: «تمام این کاهنان خداوند را بکشید، زیرا همهٔ آنها با داوود همدست هستند. آنها میدانستند که داوود از دست من گریخته است، ولی چیزی به من نگفتند!» اما سربازان جرأت نکردند دست خود را به خون کاهنان خداوند آلوده کنند. | 17 |
१७मग राजा आपणाजवळ जे शिपाई उभे होते त्यांना म्हणाला, “परमेश्वराच्या याजकांच्या अंगावर जाऊन त्यांना मारा कारण त्यांनीही दावीदाचा पक्ष धरला आहे; आणि तो पळाला असे त्यांना कळले असता त्यांनी मला कळवले नाही.” परंतु राजाचे चाकर परमेश्वराच्या याजकांवर तुटून पडायला आपले हात पुढे करीनात.
پادشاه به دوآغ ادومی گفت: «تو این کار را انجام بده.» دوآغ برخاست و همه را کشت. قربانیان، هشتاد و پنج نفر بودند و لباسهای رسمی کاهنان را بر تن داشتند. | 18 |
१८मग राजाने दवेगाला म्हटले, “तू याजकांच्या अंगावर चालून जा. तेव्हा दवेग अदोमी याजकांच्या अंगावर जाऊन तुटून पडला.” त्या दिवशी त्याने तागाचे एफोद नेसलेल्या पंच्याऐंशी मनुष्यांना जिवे मारले.
سپس به دستور شائول به نوب، شهر کاهنان رفته، تمام مردان، زنان، اطفال شیرخواره، و حتی گاوها، الاغها و گوسفندها را از بین برد. | 19 |
१९त्याने याजकांचे नोब नगर याचा तलवारीच्या धारेने नाश केला; पुरुष स्त्रिया बालके व तान्ही बाळे, आणि गुरे, आणि गाढवे आणि मेंढरे ही त्याने तलवारीच्या धारेने जिवे मारली.
فقط اَبیّاتار، یکی از پسران اخیملک جان به در برد و نزد داوود فرار کرد. | 20 |
२०तेव्हा अहीटूबाचा मुलगा अहीमलेख याचा अब्याथार नांवाचा एक मुलगा सुटून दावीदाकडे पळून गेला.
او به داوود خبر داد که شائول کاهنان خداوند را کشته است. | 21 |
२१शौलाने परमेश्वराच्या याजकांना जिवे मारले हे अब्याथाराने दावीदाला कळवले.
داوود گفت: «وقتی دوآغ را در آنجا دیدم فهمیدم به شائول خبر میدهد. در حقیقت من باعث کشته شدن خاندان پدرت شدم. | 22 |
२२तेव्हा दावीदाने अब्याथाराला म्हटले, “दवेग अदोमी येथे होता, त्याच दिवशी मला समजले की, तो शौलाला खचित सांगेल. मी तुझ्या वडिलाच्या घराण्याच्या सर्व मनुष्यांस मरणास कारण झालो आहे.
حال، پیش من بمان و نترس. هر که قصد کشتن تو را دارد، دنبال من هم هست. تو پیش من در امان خواهی بود.» | 23 |
२३माझ्याजवळ राहा भिऊ नको; कारण जो मला जिवे मारायला पाहतो तोच तुला जिवे मारायला पाहतो आहे. पण माझ्याजवळ तुझे रक्षण होईल.”