< مزامیر 143 >

مزمور داود ای خداوند دعای مرا بشنو و به تضرع من گوش بده! در امانت وعدالت خویش مرا اجابت فرما! ۱ 1
दाविदाचे स्तोत्र हे परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक; माझ्या विनवणीकडे कान दे. तू आपल्या विश्वासाने आणि न्यायीपणाने मला उत्तर दे.
و بر بنده خودبه محاکمه برمیا. زیرا زنده‌ای نیست که به حضورتو عادل شمرده شود. ۲ 2
तू आपल्या सेवकाबरोबर न्यायनिवाड्यात प्रवेश करू नकोस. कारण तुझ्या दृष्टीने कोणीही नितीमान नाही.
زیرا که دشمن بر جان من جفا کرده، حیات مرا به زمین کوبیده است و مرا درظلمت ساکن گردانیده، مثل آنانی که مدتی مرده باشند. ۳ 3
शत्रू माझ्या जिवाचा पाठलाग करीत आहेत; त्यांनी माझे जीवन धुळीस मिळवले आहे; पुरातन काळच्या मेलेल्यासारखे त्याने मला अंधकाराच्या स्थळी राहण्यास लाविले आहे.
پس روح من در من مدهوش شده، و دلم در اندرونم متحیر گردیده است. ۴ 4
माझ्याठायी माझा आत्मा व्याकुळ झाला आहे; माझे हृदय घाबरे झाले आहे.
ایام قدیم را به یاد می‌آورم. در همه اعمال توتفکر نموده، در کارهای دست تو تامل می‌کنم. ۵ 5
मी पूर्वीचे दिवस आठवतो; मी तुझ्या सर्व कृत्यांवर मनन करतो; तुझ्या हाताने सिद्धीस नेलेल्या कामावर विचार करतो.
دستهای خود را بسوی تو دراز می‌کنم. جان من مثل زمین خشک، تشنه تو است، سلاه. ۶ 6
मी प्रार्थनेत आपले हात तुझ्यापुढे पसरतो; शुष्क भूमीप्रमाणे माझा जीव तुझ्यासाठी तहानेला झाला आहे.
‌ای خداوند، بزودی مرا اجابت فرما زیرا روح من کاهیده شده است. روی خود را از من مپوشان، مبادا مثل فروروندگان به هاویه بشوم. ۷ 7
हे परमेश्वरा, त्वरा करून मला उत्तर दे कारण माझा आत्मा क्षीण झाला आहे. माझ्यापासून तू आपले मुख लपवू नकोस, किंवा लपवशील तर मी गर्तेत उतरणाऱ्यांसारखा होईन.
بامدادان رحمت خود را به من بشنوان زیرا که بر تو توکل دارم. طریقی را که برآن بروم، مرا بیاموز زیرا نزدتو جان خود را برمی افرازم. ۸ 8
सकाळी मला तुझ्या वात्सल्याचे शब्द ऐकू दे, कारण मी तुझ्यावर भरवसा ठेवला आहे. ज्या मार्गाने मी चालावे तो मला दाखव, कारण मी आपला जीव तुझ्याकडे उंचावतो.
‌ای خداوند مرا از دشمنانم برهان زیرا که نزدتو پناه برده‌ام. ۹ 9
हे परमेश्वरा, माझ्या शत्रूपासून माझे रक्षण कर. मी लपण्यासाठी तुझ्याकडे धाव घेतो.
مرا تعلیم ده تا اراده تو را بجاآورم زیرا خدای من تو هستی. روح مهربان تو مرادر زمین هموار هدایت بنماید. ۱۰ 10
१०मला तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास शिकव, कारण तू माझा देव आहेस. तुझा चांगला आत्मा मला सरळपणाच्या देशात नेवो.
به‌خاطر نام خود‌ای خداوند مرا زنده ساز. به‌خاطر عدالت خویش جان مرا از تنگی برهان. ۱۱ 11
११हे परमेश्वरा, तुझ्या नावाकरता मला सजीव कर. तुझ्या न्यायीपणाने माझा जीव संकटातून वर काढ.
و به‌خاطر رحمت خود، دشمنانم را منقطع ساز. و همه مخالفان جان مرا هلاک کن زیرا که من بنده توهستم. ۱۲ 12
१२तू आपल्या दयेने माझ्या शत्रूंचा नायनाट कर; आणि माझ्या जीवनातील सर्व शत्रूंचा नाश कर, कारण मी तुझा दास आहे.

< مزامیر 143 >