< مزامیر 14 >

برای سالار مغنیان. مزمور داود احمق در دل خود می‌گوید که خدایی نیست. کارهای خود را فاسد و مکروه ساخته‌اند و نیکوکاری نیست. ۱ 1
मुख्य गायकासाठी; दाविदाचे स्तोत्र. मूर्ख आपल्या हृदयात म्हणतो, “देव नाही.” ते भ्रष्ट झाले आहेत आणि त्यांनी घृणास्पद अशी पापे केली आहेत. चांगले करणारा कोणीच नाही.
خداوند ازآسمان بربنی آدم نظر انداخت تا ببیند که آیا فهیم و طالب خدایی هست؟ ۲ 2
परमेश्वर स्वर्गातून खाली मनुष्य संतानास पाहतो की, कोणी एखादा तरी समजणारा आणि त्याच्यामागे चालणारा आहे काय?
همه روگردانیده، با هم فاسد شده‌اند. نیکوکاری نیست یکی هم نی. ۳ 3
प्रत्येकजण बहकून गेला आहे, ते सर्व गलिच्छ झाले आहेत. सत्कर्म करणारा कोणीही नाही, एकही नाही.
آیا همه گناهکاران بی‌معرفت هستند که قوم مرا می‌خورند چنانکه نان می‌خورند؟ و خداوندرا نمی خوانند؟ ۴ 4
जे अन्याय करतात त्यांना काहीच ज्ञान नाही काय? ते भाकरी खातात तसे माझ्या लोकांस खातात; ते परमेश्वरास हाक मारत नाहीत?
آنگاه ترس بر ایشان مستولی شد، زیرا خدادر طبقه عادلان است. ۵ 5
परंतु ते भीतीने थरथर कापतील, कारण देव न्यायींच्या सभेत आहे.
مشورت مسکین را خجل می‌سازید چونکه خداوند ملجای اوست. ۶ 6
तुम्ही गरीब मनुष्याचा अपमान करू इच्छित आहात, तरी परमेश्वर त्याचा आश्रय आहे.
کاش که نجات اسرائیل از صهیون ظاهرمی شد! چون خداوند اسیری قوم خویش رابرگرداند، یعقوب وجد خواهد نمود و اسرائیل شادمان خواهد گردید. ۷ 7
अहा! सियोनातून इस्राएलाचे तारण आले तर किती बरे होईल! जेव्हा परमेश्वर त्याच्या लोकांस दास्यातून सोडवेल, तेव्हा याकोब आनंदी होईल आणि इस्राएल हर्ष करेल.

< مزامیر 14 >