< نحمیا 13 >

در آن روز، کتاب موسی را به سمع قوم خواندند و در آن نوشته‌ای یافت شد که عمونیان و موآبیان تا به ابد به جماعت خدا داخل نشوند. ۱ 1
त्यादिवशी मोशेचे पुस्तक सर्व लोकांस ऐकू जाईल अशाप्रकारे मोठ्याने वाचले गेले. त्या पुस्तकात त्यांना हा नियम लिहिलेला आढळला: कोणत्याही अम्मोनी आणि मवाबी व्यक्तीला देवाच्या लोकांमध्ये कधीही मिसळता येणार नाही.
چونکه ایشان بنی‌اسرائیل را به نان و آب استقبال نکردند، بلکه بلعام را به ضد ایشان اجیرنمودند تا ایشان را لعنت نماید اما خدای ما لعنت را به برکت تبدیل نمود. ۲ 2
या लोकांनी इस्राएली लोकांस अन्न आणि पाणी दिले नव्हते. परंतु बलामाने इस्राएलींना शाप द्यावा म्हणून त्यांनी त्यास पैसेही देले होते. पण आपल्या देवाने त्या शापाचे आशीर्वादात रूपांतर केले.
پس چون تورات راشنیدند، تمامی گروه مختلف را از میان اسرائیل جدا کردند. ۳ 3
हा नियम ऐकताच विदेशी लोकांस इस्राएलातून वेगळे करण्यात आले.
و قبل از این الیاشیب کاهن که بر حجره های خانه خدای ما تعیین شده بود، با طوبیا قرابتی داشت. ۴ 4
यापूर्वीच याजक एल्याशीबाला मंदिराच्या भांडारावर नेमण्यात आले. तो तोबीयाचा नातलग होता. एल्याशीबाने तोबीयासाठी एक मोठे भांडार तयार केले होते जेथे पूर्वी धान्यार्पणे, धूप, मंदिरातील पात्रे व इतर वस्तू ठेवल्या जात.
و برای او حجره بزرگ ترتیب داده بودکه در آن قبل از آن هدایای آردی و بخور وظروف را و عشر گندم و شراب و روغن را که فریضه لاویان و مغنیان و دربانان بود و هدایای افراشتنی کاهنان را می‌گذاشتند. ۵ 5
जे लेवी, गायक व द्वारपाल यांच्यासाठी लागणारा धान्याचा दशामांश, नवीन द्राक्षरस, ऊद, पात्रे आणि तेल या समर्पित अंशांची अर्पणे तेथे ठेवली जात.
و در همه آن وقت، من در اورشلیم نبودم زیرا در سال سی ودوم ارتحشستا پادشاه بابل، نزد پادشاه رفتم و بعداز ایامی چند از پادشاه رخصت خواستم. ۶ 6
परंतु हे घडताना मी यरूशलेमेमध्ये नव्हतो. बाबेलचा राजा अर्तहशश्त याच्या कारकिर्दीच्या बत्तिसाव्या वर्षी मी बाबेलला गेलो होतो. नंतर मी राजाकडे रजा मागितली,
وچون به اورشلیم رسیدم، از عمل زشتی که الیاشیب درباره طوبیا کرده بود، از اینکه حجره‌ای برایش در صحن خانه خدا ترتیب نموده بود، آگاه شدم. ۷ 7
आणि मी यरूशलेमेला परतलो. एल्याशीबाच्या अनिष्ट वर्तनाची बातमी मला कळाली. देवाच्या मंदिरात एल्याशीबाने तोबीयाला खोली दिलेली होती.
و این امر به نظر من بسیار ناپسند آمده، پس تمامی اسباب خانه طوبیا را از حجره بیرون ریختم. ۸ 8
मला खूप राग आला आणि तोबीयाचे सगळे सामान मी खोलीबाहेर फेकून दिले.
و امر فرمودم که حجره را تطهیر نمایندو ظروف خانه خدا و هدایا و بخور را در آن بازآوردم. ۹ 9
त्या खोल्या शुद्ध करून घ्यायची मी आज्ञा दिली आणि देवाच्या मंदिरातील पात्रे, वस्तू, अन्नार्पणे, ऊद वगैरे मी पूर्ववत तिथे ठेवले.
و فهمیدم که حصه های لاویان را به ایشان نمی دادند و از این جهت، هر کدام از لاویان ومغنیانی که مشغول خدمت می‌بودند، به مزرعه های خویش فرار کرده بودند. ۱۰ 10
१०लोकांनी लेव्यांना त्यांचा वाटा दिलेला नाही हे ही मला कळले. त्यामुळे लेवी आणि गायक मंदीर सोडून आपापल्या शेतांवर कामाला गेले होते.
پس باسروران مشاجره نموده، گفتم چرا درباره خانه خدا غفلت می‌نمایند. و ایشان را جمع کرده، درجایهای ایشان برقرار نمودم. ۱۱ 11
११म्हणून मी आधिकाऱ्यांना विचारले की “देवाच्या मंदीराकडे दुर्लक्ष का झाले आहे?” मग मी सर्व लेव्यांना बोलवून घेतले आणि मंदिरातील आपापल्या जागी आपापल्या कामावर जायला सांगितले.
و جمیع یهودیان، عشر گندم و عصیر انگور و روغن را درخزانه‌ها آوردند. ۱۲ 12
१२त्यानंतर यहूदातील सर्व लोकांनी पिकाचा एक दशांश वाटा, नवीन द्राक्षरस आणि तेल मंदिरात आणले. या सगळया गोष्टी कोठारात ठेवण्यात आल्या.
و شلمیای کاهن و صادوق کاتب و فدایا را که از لاویان بود، بر خزانه هاگماشتم و به پهلوی ایشان، حانان بن زکور بن متنیارا، زیرا که مردم ایشان را امین می‌پنداشتند و کارایشان این بود که حصه های برادران خود را به ایشان بدهند. ۱۳ 13
१३कोठारांवर या मनुष्यांना मी नेमलेः शलेम्या हा याजक, सादोक शिक्षक, आणि पदाया नावाचा लेवी. मत्तन्याचा पुत्र जक्कूर याचा पुत्र हानान याला त्यांचा मदतनीस म्हणून नेमले. ते विश्वासू होते. आपल्या नातलगांना नेहमी लागणाऱ्या वस्तूंचे वाटप करणे हे त्यांचे काम होते.
‌ای خدایم مرا درباره این کار بیاد آور وحسناتی را که برای خانه خدای خود و وظایف آن کرده‌ام محو مساز. ۱۴ 14
१४देवा, मी केलेल्या या गोष्टींचे स्मरण असू दे. माझ्या देवाचे मंदिर आणि तिथली सेवेसाठी मी जी चांगली कामे केली आहेत ती पुसून टाकू नकोस.
در آن روزها، در یهودا بعضی را دیدم که چرخشتها را در روز سبت می‌فشردند و بافه هامی آوردند و الاغها را بار می‌کردند و شراب وانگور و انجیر و هر گونه حمل را نیز در روز سبت به اورشلیم می‌آوردند. پس ایشان را به‌سبب فروختن ماکولات در آن روز تهدید نمودم. ۱۵ 15
१५यहूदात त्या काळात मी शब्बाथ दिवशी लोकांस द्राक्षरसासाठी द्राक्षे तुडवताना पाहिले. धान्य आणून ते गाढवांवर लादताना मी पाहिले आणि द्राक्षरस, द्राक्षे, अंजीर आणि इतर बऱ्याच जड वस्तू शब्बाथ दिवशी यरूशलेमेमध्ये आणत होते. तेव्हा मी त्यांना विरोध केला कारण केला शब्बाथ दिवशी ते अन्नधान्याची विक्री करीत होते.
وبعضی از اهل صور که در آنجا ساکن بودند، ماهی و هرگونه بضاعت می‌آوردند و در روز سبت، به بنی یهودا و اهل اورشلیم می‌فروختند. ۱۶ 16
१६सोरे नगरातील काही लोक यरूशलेमामध्ये राहत होते आणि ते मासे आणि सर्व प्रकारच्या वस्तू शब्बाथ दिवशी यरूशलेमेमध्ये यहूदी व इतर लोकांस आणून विकत.
پس با بزرگان یهودا مشاجره نمودم و به ایشان گفتم: «این چه عمل زشت است که شمامی کنید و روز سبت را بی‌حرمت می‌نمایید؟ ۱۷ 17
१७यहूदातील पुढाऱ्यांना मी विरोध केला त्यांना मी म्हणालो, “तुम्ही फार वाईट गोष्ट करून शब्बाथाला अपवित्र करीत आहात.
آیا پدران شما چنین نکردند و آیا خدای ما تمامی این بلا را بر ما و بر این شهر وارد نیاورد؟ وشما سبت را بی‌حرمت نموده، غضب را براسرائیل زیاد می‌کنید.» ۱۸ 18
१८तुमच्या पूर्वजांनी याच गोष्टी केल्या आहेत ना? म्हणूनच देवाने आपल्यावर आणि आपल्या नगरावर अरिष्ट आणले आहे ना? शब्बाथ दिवस अपवित्र करून तुम्ही इस्राएलावर आणखी संकटे आणावयास पाहता.”
و هنگامی که دروازه های اورشلیم قبل از سبت سایه می‌افکند، امر فرمودم که دروازه‌ها را ببندند و قدغن کردم که آنها را تا بعد از سبت نگشایند و بعضی از خادمان خود را بر دروازه‌ها قرار دادم که هیچ بار در روزسبت آورده نشود. ۱۹ 19
१९प्रत्येक शब्बाथ दिवसापूर्वी रात्री अंधार पडल्यानंतर यरूशलेमेच्या वेशी कडेकोट बंद कराव्यात आणि शब्बाथ दिवस होऊन गेल्याखेरीज त्यांचे दरवाजे उघडायचे नाहीत असा आदेश दिला. माझे काही चाकर मी वेशीवर उभे केले ते यासाठी की, शब्बाथ दिवशी कोणताही माल यरूशलेमेमध्ये येणार नाही.
پس سوداگران و فروشندگان هرگونه بضاعت، یک دو دفعه بیرون از اورشلیم شب رابسر بردند. ۲۰ 20
२०एकदोन वेळेला व्यापाऱ्यांना आणि सर्व प्रकारचा माल विकणाऱ्या विक्रेत्यांना यरूशलेमेबाहेर रात्री रहावे लागले.
اما من ایشان را تهدید کرده، گفتم: «شما چرا نزد دیوار شب را بسر می‌برید؟ اگر باردیگر چنین کنید، دست بر شما می‌اندازم.» پس ازآنوقت دیگر در روز سبت نیامدند. ۲۱ 21
२१मी त्यांना दरडावून म्हणालो, “कोटाच्या भिंतीलगत रात्री मुक्काम का करता? पुन्हा तुम्ही तसे केल्यास तुम्हास पकडण्यात येईल.” तेव्हापासून ते पुन्हा शब्बाथ दिवशी आले नाहीत.
و لاویان را امر فرمودم که خویشتن راتطهیر نمایند و آمده، دروازه‌ها را نگاهبانی کنندتا روز سبت تقدیس شود. ای خدایم این را نیزبرای من بیاد آور و برحسب کثرت رحمت خود، بر من ترحم فرما. ۲۲ 22
२२मग मी लेवींना त्यांच्या शुद्धीकरणाची आज्ञा दिली आणि येऊन त्यांना वेशींची राखण करण्यास सांगितले. त्यामुळे शब्बाथ दिवसाचे पावित्र्य राखले जाईल. माझ्या देवा या कृत्यांसाठी माझी आठवण ठेव आणि मजवर दया कर कारण तुझ्या कराराचा विश्वासूपणा माझ्यावर आहे.
در آن روزها نیز بعضی یهودیان را دیدم، که زنان از اشدودیان و عمونیان و موآبیان گرفته بودند. ۲۳ 23
२३त्या काळात माझ्या असेही लक्षात आले की काही यहूदी लोकांनी अश्दोदी, अम्मोनी आणि मवाबी स्रियांशी लग्ने केली होती.
و نصف کلام پسران ایشان، در زبان اشدود می‌بود و به زبان یهود نمی توانستند به خوبی تکلم نمایند، بلکه به زبان این قوم و آن قوم. ۲۴ 24
२४आणि त्यांची मुले अश्दोदी भाषा अर्धवट बोलत परंतु त्यांना यहूदी भाषा येत नव्हती, पण इतर लोकांच्या भाषेपैकी एक भाषा ते बोलत. ते आपआपल्या जातीची मिश्र भाषा बोलत होते.
بنابراین با ایشان مشاجره نموده، ایشان را ملامت کردم و بعضی از ایشان را زدم و موی ایشان را کندم و ایشان را به خدا قسم داده، گفتم: «دختران خود را به پسران آنها مدهید و دختران آنها را به جهت پسران خود و به جهت خویشتن مگیرید. ۲۵ 25
२५आणि मी त्यांच्याशी वाद केला आणि त्यांना शाप दिला. आणि काहींना मारहाण करून त्यांचे केस उपटले. त्यांना देवाची शपथ घ्यायला लावून, म्हणालो, “तुम्ही आपल्या कन्या त्यांच्या पुत्रांना देऊ नका आणि आपल्या पुत्रांना किंवा आपणांला त्यांच्या कन्या पत्नी करून घेऊ नका.
آیا سلیمان پادشاه اسرائیل در همین امر گناه نورزید با آنکه در امت های بسیارپادشاهی مثل او نبود؟ و اگر‌چه او محبوب خدای خود می‌بود و خدا او را به پادشاهی تمامی اسرائیل نصب کرده بود، زنان بیگانه او را نیزمرتکب گناه ساختند. ۲۶ 26
२६अशा विवाहांमुळेच शलमोनाच्या हातून पाप झाले. पुष्कळ राष्ट्रात त्याच्यासारखा कोणी राजा नव्हता. तो आपल्या देवाला प्रिय होता आणि देवाने सर्व इस्राएलावर त्यास राजा केले. पण अन्य जातीच्या स्त्रियांनी त्यालाही पापात पाडले.
پس آیا ما به شما گوش خواهیم گرفت که مرتکب این شرارت عظیم بشویم و زنان بیگانه گرفته، به خدای خویش خیانت ورزیم؟» ۲۷ 27
२७तुमचे ऐकून आम्ही हे घोर पातक करावे काय? परक्या स्त्रियांशी लग्न करून आपल्या देवाविरूद्ध विश्वासघातकी कृत्य करावे काय?”
و یکی از پسران یهویاداع بن الیاشیب رئیس کهنه، داماد سنبلط حورونی بود. پس او رااز نزد خود راندم. ۲۸ 28
२८योयादा हा मुख्य याजक एल्याशीब याचा पुत्र, योयादाचा एक पुत्र होरोनाच्या सनबल्लटचा जावई होता. यासाठी त्यास मी माझ्यासमोरून हाकून लावले.
‌ای خدای من ایشان را بیاد آور، زیرا که کهانت و عهد کهانت و لاویان را بی‌عصمت کرده‌اند. ۲۹ 29
२९हे माझ्या देवा, त्यांनी याजकपणाला अपवित्र केले आहे. याजकपणाचा आणि लेवीपणाचा करार त्यांनी मोडला आहे म्हणून त्यांची आठवण कर.
پس من ایشان را از هر چیز بیگانه طاهرساختم و وظایف کاهنان و لاویان را برقرارنمودم که هر کس بر خدمت خود حاضر شود. ۳۰ 30
३०याप्रमाणे मी त्यांना सर्व परकीयांपासून शुद्ध केले आणि लेवी व याजक यांना त्यांची कामे आणि जबाबदाऱ्या ठरवून दिल्या.
و هدایای هیزم، در زمان معین و نوبرها رانیز. ای خدای من مرا به نیکویی بیاد آور. ۳۱ 31
३१लाकडाचे अर्पण व प्रथमफळ आणण्याची वेळ मी ठरवून दिली. हे माझ्या देवा, माझ्या हितासाठी, माझी आठवण कर.

< نحمیا 13 >