< میکا 1 >
کلام خداوند که بر میکاه مورشتی در ایام یوتام و آحاز و حزقیا، پادشاهان یهودانازل شد و آن را درباره سامره و اورشلیم دید. | ۱ 1 |
१परमेश्वराचे वचन जे मीखा मोरेष्टी याजकडे, योथाम, आहाज व हिज्कीया ह्यांच्या दिवसात त्याच्याकडे आले, जे वचन शोमरोन व यरूशलेम यांच्याविषयी होते, ते असे.
ای جمیع قومها بشنوید وای زمین و هرچه در آن است گوش بدهید، و خداوند یهوه یعنی خداوند از هیکل قدسش بر شما شاهد باشد. | ۲ 2 |
२सर्व लोकांनो ऐका, पृथ्वी व ते सर्व जे तुझ्यात आहेत, तुम्ही ऐका! प्रभू परमेश्वर, त्याच्या पवित्र मंदिरातून तुमच्याविरुध्द साक्षीदार होवो.
زیرا اینک خداوند از مکان خود بیرون میآید ونزول نموده، بر مکان های بلند زمین میخرامد. | ۳ 3 |
३पाहा, परमेश्वर त्याच्या स्थानातून बाहेर येत आहे. तो खाली येणार व पृथ्वीवरील उच्चस्थानावर चालणार.
و کوهها زیر او گداخته میشود و وادیها منشق میگردد، مثل موم پیش آتش و مثل آب که به نشیب ریخته شود. | ۴ 4 |
४विस्तवाजवळ ठेवल्यास मेण वितळते, तसे त्याच्या पायाखाली पर्वत वितळतील, दऱ्या दुभंगतील, आणि उंच टेकड्यावरून वाहणाऱ्या पाण्याप्रमाणे ते वाहू लागतील.
این همه بهسبب عصیان یعقوب و گناه خاندان اسرائیل است. عصیان یعقوب چیست؟ آیا سامره نیست؟ و مکان های بلند یهودا چیست؟ آیا اورشلیم نمی باشد؟ | ۵ 5 |
५ह्याला सर्वांचे कारण याकोबचे पाप, तसेच इस्राएलाच्या घराण्याची दुष्कर्मे आहेत. याकोबाच्या बंड खोरीचे कारण काय? त्यास कारणीभूत शोमरोनच आहे की नाही? यहूदाची उंचस्थाने कोणती आहेत? ती यरूशलेमच आहेत की नाही?
پس سامره را به توده سنگ صحرا و مکان غرس نمودن موها مبدل خواهم ساخت و سنگهایش رابه دره ریخته، بنیادش را منکشف خواهم نمود. | ۶ 6 |
६“म्हणून मी शोमरोनला शेतातल्या ढिगाप्रमाणे करीन, ती द्राक्षमळे लावण्याच्या जागेप्रमाणे होईल.” मी तिचे दगड दरीत ढकलून देईन, आणि तिचे पाये उघडे करीन.
و همه بتهای تراشیده شده آن خرد و همه مزدهایش به آتش سوخته خواهد شد و همه تماثیلش را خراب خواهم کرد زیرا که از مزدفاحشه آنها را جمع کرد و به مزد فاحشه خواهدبرگشت. | ۷ 7 |
७तिच्या सर्व मूर्तीं ठेचून तुकडे तुकडे केले जातील. तिच्या कोरीव मूर्ती आगीमध्ये भस्मसात केल्या जातील. तिच्या सर्व खोट्या दैवतांच्या मूर्तींचा मी नाश करीन, कारण तिने वेश्येच्या कमाईने त्या मिळवल्या आहेत, म्हणून वेश्येच्या वेतनास त्या परत जातील.
به این سبب ماتم گرفته، ولوله خواهم نمود و برهنه و عریان راه خواهم رفت و مثل شغالها ماتم خواهم گرفت و مانند شتر مرغها نوحه گری خواهم نمود. | ۸ 8 |
८या कारणास्तव मी विलाप व आकांत करीन. मी अनवाणी व वस्त्राशिवाय फिरेन. मी कोल्ह्याप्रमाणे मोठ्याने आकांत करीन आणि घुबडाप्रमाणे शोक करीन.
زیرا که جراحت های وی علاج پذیر نیست چونکه به یهودا رسیده و به دروازه های قوم من یعنی به اورشلیم داخل گردیده است. | ۹ 9 |
९कारण तिच्या जखमा बऱ्या न होणाऱ्या आहेत. कारण त्या यहूदापर्यंत आल्या आहेत, आणि तो माझ्या मनुष्यांच्या वेशीपर्यंत, यरूशलेमपर्यंत पोहोचला आहे.
در جت خبر مرسانید و هرگز گریه منمایید. در خانه عفره، در غبار خویشتن راغلطانیدم. | ۱۰ 10 |
१०गथमध्ये हे सांगू नका; अजिबात रडू नका. बेथ-ले-अफ्रामध्ये मी धुळीत लोळलो.
ای ساکنه شافیر عریان و خجل شده، بگذر. ساکنه صانان بیرون نمی آید. ماتم بیت ایصل مکانش را از شما میگیرد. | ۱۱ 11 |
११शाफीरमध्ये राहणारे लोकहो, तुम्ही नग्न आणि लज्जित होऊन निघून जा. सनानिवासी बाहेर निघून येत नाही, बेथ-एसलासचा शोक करेल, कारण त्यांचे संरक्षण काढून घेण्यात आले आहे.
زیرا که ساکنه ماروت به جهت نیکویی درد زه میکشد، چونکه بلا از جانب خداوند به دروازه اورشلیم فرود آمده است. | ۱۲ 12 |
१२मारोथमधील लोक उत्सुकतेने चांगल्या बातमीची वाट पाहत आहेत, कारण परमेश्वराकडून संकट खाली यरूशलेमेच्या वेशीपर्यंत आले आहे.
ای ساکنه لاکیش اسب تندرورا به ارابه ببند. او ابتدای گناه دختر صهیون بود، چونکه عصیان اسرائیل در تو یافت شده است. | ۱۳ 13 |
१३लाखीशात राहणारे, रथाला चपळ घोडा जुंप, लाखीश, तूच, सियोनेच्या कन्येला पापाची सुरूवात अशी होती. कारण इस्राएलाचे अपराध तुझ्यांत सापडले होते.
بنابراین طلاق نامهای به مورشت جت خواهی داد. خانه های اکذیب، چشمه فریبنده برای پادشاهان اسرائیل خواهد بود. | ۱۴ 14 |
१४म्हणून तू गथांतल्या मोरेश-गथला निरोपाचे नजराणे देशील; अकजीबची घरे इस्राएलाच्या राजाला निराश करतील.
ای ساکنه مریشه بار دیگر مالکی بر تو خواهم آورد. جلال اسرائیل تا به عدلام خواهد آمد. | ۱۵ 15 |
१५मारेशामध्ये राहणाऱ्या लोकांनो, मी तुझा वारीस तुझ्याकडे आणीन, जे तुमचा ताबा घेतील. इस्राएलचे पुढारी अदुल्लामला येतील.
خویشتن را برای فرزندان نازنین خود گر ساز وموی خود را بتراش. گری سر خود را مثل کرکس زیاد کن زیرا که ایشان از نزد تو به اسیری رفتهاند. | ۱۶ 16 |
१६म्हणून तू आपले केस काप व मुंडन कर. कारण तुम्हास प्रिय असलेल्या मुलांसाठी तुम्ही शोक कराल. गरुडा प्रमाणे तुम्ही स्वत: च्या डोक्याचे मुंडन करा. कारण तुमच्या मुलांना तुमच्यापासून दूर नेले जाईल.