< لاویان 20 >
و خداوند موسی را خطاب کرده، گفت: | ۱ 1 |
१परमेश्वर मोशेला म्हणाला,
«بنیاسرائیل را بگو: هر کسی ازبنیاسرائیل یا از غریبانی که در اسرائیل ماوا گزینند، که از ذریت خود به مولک بدهد، البته کشته شود؛ قوم زمین او را با سنگ سنگسار کنند. | ۲ 2 |
२“तू इस्राएल लोकांस आणखी असे सांग की, इस्राएलांपैकी किंवा इस्राएल लोकांमध्ये राहणाऱ्या परकियांपैकी कोणी आपल्या मुलाबाळांतून एखादे मूल मोलख दैवतास अर्पील तर त्या मनुष्यास जिवे मारावे! आपल्या देशाच्या लोकांनी त्यास धोंडमार करावा!”
و من روی خود را به ضد آن شخص خواهم گردانید، و او را از میان قومش منقطع خواهم ساخت، زیرا که از ذریت خود به مولک داده است، تا مکان مقدس مرا نجس سازد، و نام قدوس مرا بیحرمت کند. | ۳ 3 |
३मीही त्या मनुष्याच्या विरूद्ध होईन! आणि त्यास आपल्या लोकांतून बाहेर टाकीन! कारण त्याने आपले मूल मोलख दैवतास अर्पून माझे पवित्रस्थान भ्रष्ट केले व माझ्या पवित्र नावाला कलंक लावला!
و اگر قوم زمین چشمان خود را از آن شخص بپوشانند، وقتی که از ذریت خود به مولک داده باشد، و او را نکشند، | ۴ 4 |
४मोलख दैवताला आपले मूल अर्पिण्याकडे देशाचे इतर सामान्य लोक डोळेझाक करून त्यास जिवे मारणार नाहीत.
آنگاه من روی خود را به ضد آن شخص وخاندانش خواهم گردانید، و او را و همه کسانی راکه در عقب او زناکار شده، درپیروی مولک زناکردهاند، از میان قوم ایشان منقطع خواهم ساخت. | ۵ 5 |
५तर मी त्या मनुष्याच्या व त्याच्या कुटुंबाच्या विरूद्ध होईन! आणि त्यास व मजवर अविश्वास दाखवून जो कोणी व्यभिचारी मतीने मोलख दैवताच्या नादी लागून त्यांच्यामागे जातील त्यांना आपल्या लोकांतून बाहेर टाकीन!
و کسیکه به سوی صاحبان اجنه وجادوگران توجه نماید، تا در عقب ایشان زنا کند، من روی خود را به ضد آن شخص خواهم گردانید، و او را از میان قومش منقطع خواهم ساخت. | ۶ 6 |
६जो मनुष्य व्यभिचारी मतीने सल्लामसलत विचारण्यास पंचाक्षऱ्याकडे व चेटक्याकडे जातो तो माझ्याशी विश्वासघात करीत आहे मी त्याच्या विरूद्ध होईन व त्यास आपल्या लोकांतून बाहेर टाकीन.
پس خود را تقدیس نمایید و مقدس باشید، زیرا من یهوه خدای شما هستم. | ۷ 7 |
७म्हणून शुद्ध व्हा! आपणास पवित्र करा! कारण मी तुमचा देव परमेश्वर आहे!
وفرایض مرا نگاه داشته، آنها را بجا آورید. من یهوه هستم که شما را تقدیس مینمایم. | ۸ 8 |
८तुम्ही माझ्या नियमांची आठवण ठेवून ते पाळा; मीच तुम्हास पवित्र करणारा परमेश्वर आहे!
و هر کسیکه پدر یا مادر خود را لعنت کند، البته کشته شود، چونکه پدر و مادر خود را لعنت کرده است، خونش بر خود او خواهد بود. | ۹ 9 |
९जो मनुष्य आपल्या बापाला किंवा आपल्या आईला शिव्याशाप देईल त्यास अवश्य जिवे मारावे त्याने आपल्या बापाला व आपल्या आईला शिव्याशाप दिला आहे म्हणून त्याच्या रक्तपाताची जबाबदारी त्याच्याच माथी राहील.
و کسیکه با زن دیگری زنا کند یعنی هرکه با زن همسایه خود زنانماید، زانی و زانیه البته کشته شوند. | ۱۰ 10 |
१०जो मनुष्य आपल्या शेजाऱ्याच्या पत्नीपाशी जातो तो मनुष्य व ती स्त्री, ते दोघेही व्यभिचाराच्या पापाचे अपराधी आहेत; त्या दोघांना अवश्य जिवे मारावे.
و کسیکه با زن پدر خود بخوابد، و عورت پدر خود راکشف نماید، هر دو البته کشته شوند. خون ایشان بر خود ایشان است. | ۱۱ 11 |
११जो आपल्या वडिलाच्या पत्नीपाशी जातो तो आपल्या बापाची लाज उघडी करतो! तो मनुष्य व त्याच्या बापाची पत्नी त्या दोघांनाही अवश्य जिवे मारावे; त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील.
و اگر کسی با عروس خودبخوابد، هر دو ایشان البته کشته شوند. فاحشگی کردهاند خون ایشان بر خود ایشان است. | ۱۲ 12 |
१२एखादा पुरुष आपल्या सुनेशी शारीरिक संबंध ठेवेल तर त्या दोघांनाही अवश्य जिवे मारावे; त्यांनी शरीरसंबंधाचे भयंकर पाप केले आहे! त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील.
و اگرمردی با مردی مثل با زن بخوابد هر دو فجورکردهاند. هر دو ایشان البته کشته شوند. خون ایشان بر خود ایشان است. | ۱۳ 13 |
१३एखाद्या पुरुषाने स्त्रीगमनाप्रमाणे पुरुषगमन केले तर ते भयंकर पाप त्या दोघांनी केले आहे म्हणून त्या दोघांनाही अवश्य जिवे मारावे; त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्याच्याच माथी राहील.
و اگر کسی زنی ومادرش را بگیرد، این قباحت است. او و ایشان به آتش سوخته شوند، تا در میان شما قباحتی نباشد. | ۱۴ 14 |
१४कोणा पुरुषाने एखादी स्त्री व तिची मुलगी या दोघींबरोबर विवाह केला तर तो अतिदुष्टपणा होय. त्या पुरुषाला व त्या दोन्ही स्त्रीयांना अग्नीत जाळून टाकावे! तुमच्यामध्ये असे अतिदुष्टपणाचे पाप होऊ देऊ नये!
و مردی که با بهیمهای جماع کند، البته کشته شود و آن بهیمه را نیز بکشید. | ۱۵ 15 |
१५कोणा पुरुषाने पशूगमन केले तर त्यास अवश्य जिवे मारावे आणि त्या पशूलाही मारुन टाकावे.
و زنی که به بهیمهای نزدیک شود تا با آن جماع کند، آن زن و بهیمه را بکش. البته کشته شوند خون آنها برخود آنهاست. | ۱۶ 16 |
१६कोणी स्त्री पशूगमन करील तर त्या स्त्रीला व त्या पशूला जिवे मारावे; त्यांना अवश्य मारुन टाकावे; त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील.
و کسیکه خواهر خود را خواه دختر پدرش خواه دختر مادرش باشد بگیرد، وعورت او را ببیند و او عورت وی را ببیند، این رسوایی است. درپیش چشمان پسران قوم خودمنقطع شوند، چون که عورت خواهر خود راکشف کرده است. متحمل گناه خود خواهد بود. | ۱۷ 17 |
१७कोणी आपल्या बहिणीला, मग ती त्याच्या बापाची मुलगी असो किंवा त्याच्या आईची मुलगी असो, आपली पत्नी करून घेईल व ती दोघे शरीरसंबंध करतील तर ते लाजीरवाणे कर्म आहे! त्या दोघांना आपल्या भाऊबंदादेखत शिक्षा व्हावी! त्यांना आपल्या लोकांतून बाहेर टाकावे. त्याने आपल्या बहिणीबरोबर केलेल्या वाईट कर्माबद्दल शिक्षा भोगावी.
و کسیکه با زن حایض بخوابد و عورت او راکشف نماید، او چشمه او را کشف کرده است واو چشمه خون خود را کشف نموده است، هردوی ایشان از میان قوم خود منقطع خواهند شد. | ۱۸ 18 |
१८ऋतुमती स्त्रीशी कोणी पुरुषाने शरीरसंबंध केला तर तो पुरुष व ती स्त्री या दोघांनाही त्यांच्या लोकांतून बाहेर टाकावे; कारण त्यांने तिच्या रक्ताचा झरा उघडा करून पाप केले आहे.
و عورت خواهر مادرت یا خواهر پدرت راکشف مکن؛ آن کس خویش خود را عریان ساخته است. ایشان متحمل گناه خود خواهند بود. | ۱۹ 19 |
१९आपली मावशी किंवा आपली आत्या ह्याच्याशी शारीरिक संबंध ठेवू नयेत व तसे करणाऱ्याने त्याच्या जवळच्या आप्ताची काया उघडी केली आहे त्यांनी आपल्या दुष्कर्माबद्दल शिक्षा भोगावी.
وکسیکه با زن عموی خود بخوابد، عورت عموی خود را کشف کرده است. متحمل گناه خودخواهند بود. بیکس خواهند بود. | ۲۰ 20 |
२०कोणी आपल्या चुलतीशी शारीरिक संबंध ठेवेल तर त्याने आपल्या चुलत्याची लाज उघडी केली असे होईल; ते आपल्या पापाची शिक्षा भोगतील व संतती न होता मरतील.
و کسیکه زن برادر خود را بگیرد، این نجاست است. عورت برادر خود را کشف کرده است. بیکس خواهندبود. | ۲۱ 21 |
२१आपल्या भावजयीशी शारीरिक संबंध ठेवणे हे पापी कृत्य आहे; जो कोणी असे करील त्याने आपल्या भावाची लाज उघडी केली असे होईल! त्यांना संतती होणार नाही.
«پس جمیع فرایض مرا و جمیع احکام مرانگاه داشته، آنها را بجا آورید، تا زمینی که من شمارا به آنجا میآورم تا در آن ساکن شوید، شما راقی نکند. | ۲۲ 22 |
२२म्हणून तुम्ही माझे सर्व विधी व माझे सर्व नियम यांची आठवण ठेवून ते पाळावे म्हणजे ज्या देशात मी तुम्हास घेऊन जात आहे त्यामध्ये तुमची वस्ती होईल; तो देश तुमचा त्याग करणार नाही.
و به رسوم قومهایی که من آنها را ازپیش شما بیرون میکنم رفتار ننمایید، زیرا که جمیع این کارها را کردند پس ایشان را مکروه داشتم. | ۲۳ 23 |
२३ज्या राष्ट्रांना मी तुमच्या पुढून घालवून देत आहे त्यांनी असली सर्व पापी कृत्ये केली म्हणून मला त्यांचा वीट आला! तुम्ही त्यांच्या रीतीरीवाजाप्रमाणे चालू नका.
و به شما گفتم شما وارث این زمین خواهید بود ومن آن را به شما خواهم داد و وارث آن بشوید، زمینی که به شیر و شهد جاری است. من یهوه خدای شما هستم که شما را از امتهاامتیاز کردهام. | ۲۴ 24 |
२४मी तुम्हास सांगितले आहे की त्यांचा देश तुमचे वतन होईल! तो मी तुमच्या ताब्यात देत आहे. त्यामध्ये दुधामधाचे प्रवाह वाहात आहेत; इतर राष्ट्रापासून वेगळे करून मी तुम्हास माझे विशेष लोक म्हणून चालविले आहे. मी तुमचा देव परमेश्वर आहे!
پس در میان بهایم طاهر و نجس، و در میان مرغان نجس و طاهر امتیاز کنید، وجانهای خود را به بهیمه یا مرغ یا به هیچچیزی که بر زمین میخزد مکروه مسازید، که آنها رابرای شما جدا کردهام تا نجس باشند. | ۲۵ 25 |
२५म्हणून तुम्ही शुद्ध व अशुद्ध पशू आणि शुद्ध व अशुद्ध पक्षी ह्याच्यातील भेद पाळावा, आणि जे पशू, पक्षी व जमिनीवर रांगणारे प्राणी मी अशुद्ध ठरविले आहेत ते तुम्ही खाऊ नये.
و برای من مقدس باشید زیرا که من یهوه قدوس هستم، وشما را از امتها امتیاز کردهام تا از آن من باشید. | ۲۶ 26 |
२६तुम्ही माझेच असावे म्हणून मी तुम्हास इतर राष्ट्रापासून वेगळे केले आहे; तुम्ही माझ्याकरिता पवित्र व्हावे! कारण मी तुमचा परमेश्वर आहे आणि मी पवित्र आहे!
مرد و زنی که صاحب اجنه یا جادوگر باشد، البته کشته شوند؛ ایشان را به سنگ سنگسار کنید. خون ایشان بر خود ایشان است.» | ۲۷ 27 |
२७कोणी पंचाक्षरी किंवा चेटकी करणारा असला, मग तो पुरुष असो किंवा स्त्री असो, त्यांना अवश्य जिवे मारावे; लोकांनी त्यांना धोंडमार करावा; त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील.