< اشعیا 2 >

کلامی که اشعیا ابن آموص درباره یهودا واورشلیم دید. ۱ 1
यरूशलेम व यहूदा याविषयीच्या गोष्टी दृष्टांताद्वारे आमोज याचा मुलगा यशया यास प्राप्त झाल्या.
و در ایام آخر واقع خواهد شد که کوه خانه خداوند برقله کوهها ثابت خواهد شد و فوق تلهابرافراشته خواهد گردید و جمیع امت‌ها بسوی آن روان خواهند شد. ۲ 2
शेवटल्या दिवसात, परमेश्वराचे डोंगरावरील मंदिर, पर्वताच्या सर्वात उंच जागी स्थापण्यात येईल, आणि ते डोंगरावर उंच होईल; व सर्व राष्ट्रे त्याकडे लोटतील.
و قوم های بسیار عزیمت کرده، خواهند گفت: «بیایید تا به کوه خداوند و به خانه خدای یعقوب برآییم تا طریق های خویش را به ما تعلیم دهد و به راههای وی سلوک نماییم.» زیرا که شریعت از صهیون و کلام خداوند از اورشلیم صادر خواهد شد. ۳ 3
“चला, आपण वर परमेश्वराच्या डोंगरावर जाऊ, याकोबाच्या देवाच्या मंदिरात जाऊ, म्हणजे तो आम्हास त्याचे मार्ग शिकवील व आपण त्याच्या मार्गात चालू” असे पुष्कळ लोक म्हणतील. कारण सियोनेतून धर्मशास्त्र व यरूशलेमेतून देवाचे वचन बाहेर येईल.
و اوامت‌ها را داوری خواهد نمود و قوم های بسیاری را تنبیه خواهد کرد و ایشان شمشیرهای خود رابرای گاوآهن و نیزه های خویش را برای اره هاخواهند شکست و امتی بر امتی شمشیر نخواهدکشید و بار دیگر جنگ را نخواهند آموخت. ۴ 4
तो राष्ट्रांमध्ये न्याय करील व अनेक लोकांबद्दल निर्णय देईल, ते आपल्या तलवारी मोडून त्याचे फाळ बनवतील व आपल्या भाल्यांचे कोयते करतील, यानंतर राष्ट्र राष्ट्रांवर तलवार उगारणार नाही किंवा युद्धकला सुद्धा अवगत करणार नाही.
‌ای خاندان یعقوب بیایید تا در نور خداوند سلوک نماییم. ۵ 5
याकोबाच्या घराण्या, ये, आणि आपण परमेश्वराच्या प्रकाशात चालू.
زیرا قوم خود یعنی خاندان یعقوب را ترک کرده‌ای، چونکه از رسوم مشرقی مملو و مانندفلسطینیان فالگیر شده‌اند و با پسران غربا دست زده‌اند، ۶ 6
कारण तू तुझ्या लोकांचा म्हणजे याकोबाच्या घराण्याचा त्याग केला आहेस, कारण ते पूर्वेकडील लोकांच्या चालीरितीने भरले आहेत आणि ते पलिष्ट्याप्रमाणे शकुन पाहणारे आहेत, व ते परदेशी लोकांच्या पुत्रांबरोबर हातमिळवणी करतात.
و زمین ایشان از نقره و طلا پر شده وخزاین ایشان را انتهایی نیست، و زمین ایشان ازاسبان پر است و ارابه های ایشان را انتهایی نیست؛ ۷ 7
त्यांची भूमी चांदी व सोन्याने भरगच्च झाली आहे; त्यांच्या श्रीमंतीला सीमा राहिलेली नाही, त्यांची भूमी घोडे व रथ यांनी भरलेली असून त्यासही सीमा उरलेली नाही.
و زمین ایشان از بتها پر است؛ صنعت دستهای خویش را که به انگشتهای خود ساخته‌اند سجده می‌نمایند. ۸ 8
तसेच त्यांची संपूर्ण भूमी मूर्तींनी भरलेली आहे; ते स्वहस्ते बनविलेल्या कलाकृतीची, स्वतःच्या बोटांनी बनविलेल्या गोष्टीची पूजा करतात.
و مردم خم شده و مردان پست می‌شوند. لهذا ایشان را نخواهی آمرزید. ۹ 9
ते लोक पाया पडतील, आणि वैयक्तिक खाली पडतील; म्हणून त्यांचा स्विकार करू नका.
از ترس خداوند و از کبریای جلال وی به صخره داخل شده، خویشتن را در خاک پنهان کن. ۱۰ 10
१०खडकाळ जागी जा व परमेश्वराच्या भयापासून व त्याच्या वैभवी गौरवापासून जमिनीत लप.
چشمان بلند انسان پست و تکبر مردان خم خواهد شد و در آن روز خداوند به تنهایی متعال خواهد بود. ۱۱ 11
११न्यायाच्या त्या दिवशी गर्विष्ठ मनुष्याची दृष्टी नीच केली जाईल, व त्याचा गर्व खाली करण्यात येईल, आणि फक्त परमेश्वराचेच नाव उंचावले जाईल.
زیرا که برای یهوه صبایوت روزی است که بر هرچیز بلند و عالی خواهد آمد و برهرچیز مرتفع، و آنها پست خواهد شد؛ ۱۲ 12
१२कारण सेनाधीश परमेश्वराचा दिवस, प्रत्येक गर्विष्ठ व उंचावलेला यांच्या विरोधात, प्रत्येक उन्मत्त व्यक्तीच्या विरोधात येईल व तो नमविला जाईल.
و برهمه سروهای آزاد بلند و رفیع لبنان و بر تمامی بلوطهای باشان؛ ۱۳ 13
१३आणि लबानोनातील देवदारूची सर्व उंच झाडे, आणि बाशानातील सर्व अल्लोनाची झाडे यांच्या विरोधात,
و بر همه کوههای عالی و برجمیع تلهای بلند؛ ۱۴ 14
१४आणि सर्व उंच पर्वत व उंचावलेल्या टेकड्या यांच्या विरोधात,
و بر هربرج مرتفع و بر هرحصار منیع؛ ۱۵ 15
१५आणि प्रत्येक उंच बुरुज व प्रत्येक अभेद्य भिंत यांच्याविरोधात,
و برهمه کشتیهای ترشیش وبرهمه مصنوعات مرغوب؛ ۱۶ 16
१६आणि तार्शीशातील सर्व जहाजे व समुद्र पर्यटन करणाऱ्या सर्व सुंदर नौका यांच्याविरोधात येईल.
و کبریای انسان خم شود و تکبر مردان پست خواهد شد. و در آن روز خداوند به تنهایی متعال خواهد بود، ۱۷ 17
१७त्या दिवशी मनुष्याचा गर्व उतरवला जाईल, त्याचा ताठा गळून पडेल; फक्त परमेश्वरच उंचावला जाईल.
وبتها بالکل تلف خواهند شد. ۱۸ 18
१८सर्व मूर्ती पूर्णपणे नष्ट होतील.
و ایشان به مغاره های صخره‌ها و حفره های خاک داخل خواهند شد، به‌سبب ترس خداوند وکبریای جلال وی هنگامی که او برخیزد تا زمین را متزلزل سازد. ۱۹ 19
१९परमेश्वर जेव्हा पृथीवर हाहाकार करण्यास उठेल तेव्हा परमेश्वराच्या भयामुळे व त्याच्या तेजाच्या भव्यतेमुळे लोक खडकातील गुहेत व जमिनीतील भगदाडात शिरतील.
در آن روز مردمان، بتهای نقره و بتهای طلای خود را که برای عبادت خویش ساخته‌اند، نزد موش کوران و خفاشها خواهندانداخت، ۲۰ 20
२०त्या दिवशी लोक त्यांच्या चांदीच्या व सोन्याच्या मूर्ती ज्या त्यांनी त्यांची पूजा करावयास बनविल्या त्या दूर फेकून देतील, ते त्या मूर्ती दूरवर उंदरांजवळ व वटवाघूळ यांच्याकडे फेकून देतील.
تا به مغاره های صخره‌ها و شکافهای سنگ خارا داخل شوند، به‌سبب ترس خداوند و کبریای جلال وی هنگامی که او برخیزد تا زمین را متزلزل سازد. ۲۱ 21
२१जेव्हा परमेश्वर पृथ्वीला घाबरून सोडण्यास उठेल, तेव्हा परमेश्वराच्या भयावह कृतीमुळे व त्याच्या तेजामुळे लोक खडकाच्या गुहेत व जीर्ण होऊन फुटलेल्या खडकाच्या कपारीत शिरतील.
شما از انسانی که نفس او دربینی‌اش می‌باشد دست برکشید زیرا که او به چه چیز محسوب می‌شود؟ ۲۲ 22
२२ज्याचे जीवन नाकपुड्यातील श्वासात आहे, त्या मनुष्यावर विश्वास ठेवण्याचे थांबवा, कारण त्यास काय जमेस धरायचे?

< اشعیا 2 >