< حزقیال 22 >
و کلام خداوند بر من نازل شده، گفت: | ۱ 1 |
१मग परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे येऊन म्हणाला,
«ای پسر انسان آیا داوری خواهی نمود؟ آیا بر شهر خونریز داوری خواهی نمود؟ پس آن را از همه رجاساتش آگاه ساز. | ۲ 2 |
२मग हे मानवाच्या मुला, तू न्याय करशील का? शहराच्या रक्ताचा न्याय तू करतो काय? त्याच्या सर्व घृणास्पद कामाची माहिती तुला आहे.
و بگوخداوند یهوه چنین میفرماید: ای شهری که خون را در میان خودت میریزی تا اجل توبرسد! ای که بتها را به ضد خود ساخته، خویشتن را نجس نمودهای! | ۳ 3 |
३मग तू म्हणावे परमेश्वर देव असे म्हणत आहे, असे दिवस येत आहेत की, या शहराच्या मध्य भागात रक्तपात करण्यात आला आहे. शहराने स्वतःला मूर्तीने अपवित्र केले आहे.
بهسبب خونی که ریختهای مجرم شدهای و بهسبب بتهایی که ساختهای نجس گردیدهای. لهذا اجل خویش را نزدیک آورده، به انتهای سالهای خود رسیدهای. لهذا تورا نزد امتها عار و نزد جمیع کشورها مسخره گردانیدهام. | ۴ 4 |
४तू सांडलेल्या रक्त्तासाठी तू दोषी आहेस आणि तू अपवित्र मूर्ती तयार केल्या आहेस, तू आपला काळ जवळ आणला आहेस. यास्तव मी तुझी खरड पट्टी राष्ट्रात काढेल व भूमीवर तुझा उपहास प्रत्येक डोळ्या समोर करेन.
ای پلید نام! وای پر فتنه! آنانی که به تو نزدیک و آنانی که از تو دورند بر تو سخریه خواهند نمود. | ۵ 5 |
५जे जवळ आहे व दूर आहे त्या दोघांचाही उपहास केला जाईल. तू शहराला अपवित्र केले आहेस, पूर्णपणे गोंधळलेले असे तुला नावलौकीक प्राप्त झाले आहे.
اینک سروران اسرائیل، هر کس به قدر قوت خویش مرتکب خونریزی در میان تومی بودند. | ۶ 6 |
६पहा, इस्राएलाच्या शास्त्यानो तुमच्या स्वबळाने रक्तपात केला आहे.
پدر و مادر را در میان تو اهانت نمودند. و غریبان را در میان تو مظلوم ساختند وبر یتیمان و بیوهزنان در میان تو ستم نمودند. | ۷ 7 |
७त्यांनी आपल्या आईबापांचा अनादर केला आहे. व त्यांनी तुमच्यामध्ये विदेशांच्या कारवाया केल्या आहे. तुमच्यातील विधवा आणि अनाथांना त्यांनी तुमच्या वाईट वागणुक दिली आहे.
وتو مقدس های مرا خوار شمرده، سبت های مرابی عصمت نمودی. | ۸ 8 |
८तू माझ्या पवित्र वस्तुंना तुच्छ लेखल्या आहेस व माझ्या शब्बाथाचा अनादर केला आहे.
و بعضی در میان تو به جهت ریختن خون، نمامی مینمودند. و بر کوهها درمیان تو غذا میخوردند. و در میان تو مرتکب قباحت میشدند. | ۹ 9 |
९बदनामी कारक पुरुषांनी क्रमाने येऊन रक्त ओतले व उंच स्थानी जाऊन भोजन केले, व त्यांनी माझ्या पुढे दुष्टपणा केला आहे.
و عورت پدران را در میان تو منکشف میساختند. و زنان حایض را در میان توبی عصمت مینمودند. | ۱۰ 10 |
१०तुझ्याकडे तुझ्या बापाची नग्नता उघड झाली आहे त्यांनी ऋतूमती अशुद्धतेत स्त्रिला भ्रष्ट केले आहे.
یکی در میان تو با زن همسایه خود عمل زشت نمود. و دیگری عروس خویش را به جور بیعصمت کرد. و دیگری خواهرش، یعنی دختر پدر خود را ذلیل ساخت. | ۱۱ 11 |
११ज्या पुरुषांनी आपल्या शेजाऱ्याच्या पत्नीशी घृणास्पद वर्तन केले आहे. ज्या पुरुषाने आपल्या सुनेला लज्जास्पद अशुद्ध केले; असा पुरुष ज्याने आपल्या वडिलाच्या मुलीला बहिणीला भ्रष्ट केले ते सर्व कृत्ये तुझ्यामध्ये झालेले आहे.
و در میان تو به جهت ریختن خون رشوه خوردند و سود و ربح گرفتند. و تو مال همسایه خود را به زور غصب کردی و مرا فراموش نمودی. قول خداوند یهوه این است. | ۱۲ 12 |
१२असा पुरुष रक्तपात करण्यासाठी लाच घेतो, तू अति प्रमाणात व्याज घेतो, तू तुझ्या कामाने शेजाऱ्याचे नुकसान केले आहेस, आणि तू मला विसरला आहेस. असे परमेश्वर देव जाहीर करतो.
لهذا هان من بهسبب حرص تو که مرتکب آن شدهای و بهسبب خونی که در میان خودت ریختهای، دستهای خود را بهم میزنم. | ۱۳ 13 |
१३यास्तव तू केलेल्या अनादराच्या कामावर मी आपला हात उगारीन आणि तुझ्यामध्ये जो रक्तपात झाला आहे.
پس در ایامی که من به تو مکافات رسانم آیا دلت قوی و دستهایت محکم خواهد بود؟ من که یهوه هستم تکلم نمودم و بعمل خواهم آورد. | ۱۴ 14 |
१४जेव्हा मी तुझ्याशी करार केला आहे तेव्हा तुझे मन आणि तुझा हात बळकट कर असे परमेश्वर देव जाहीर करतो व ते मी करेनच.
و تو را در میان امت هاپراکنده و در میان کشورها متفرق ساخته، نجاسات تو را از میانت نابود خواهم ساخت. | ۱۵ 15 |
१५मी तुमची देशातून दाणादाण करेल व भूमीतून नाहीसे करेन, मी तुम्हास तुमच्या अशुद्धतेतून शुध्द करेन.
وبه نظر امتها بیعصمت خواهی شد و خواهی دانست که من یهوه هستم.» | ۱۶ 16 |
१६मग तुम्ही राष्ट्राच्या देखत अशुद्ध व्हाल. मग तुम्हास कळेल मी परमेश्वर देव आहे.
و کلام خداوند بر من نازل شده، گفت: | ۱۷ 17 |
१७पुन्हा परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला.
«ای پسر انسان خاندان اسرائیل نزد من دردشدهاند و جمیع ایشان مس و روی و آهن و سرب در میان کوره و درد نقره شدهاند. | ۱۸ 18 |
१८मानवाच्या मुला, इस्राएलाचे घराणे मला धातुच्या गाळाप्रमाणे झाले आहे. त्यामध्ये उरलेले पितळ, कथील, आणि लोखंड, शिसे आहे, ते भट्टीतल्या चांदीचा गाळ आहे.
بنابراین خداوند یهوه چنین میگوید: چونکه همگی شمادرد شدهاید، لهذا من شما را در میان اورشلیم جمع خواهم نمود. | ۱۹ 19 |
१९यास्तव परमेश्वर देव हे म्हणतो, कारण तुम्ही उरलेला गाळ झाला आहात. यास्तव पाहा! मी तुम्हास यरूशलेमेत एकत्र करीन.
چنانکه نقره و مس و آهن و سرب و روی را در میان کوره جمع کرده، آتش بر آنها میدمند تا گداخته شود، همچنان من شمارا در غضب و حدت خشم خویش جمع کرده، در آن خواهم نهاد و شما را خواهم گداخت. | ۲۰ 20 |
२०चांदी, पितळ, लोखंड, कथील, शिसे गोळा करून जसे तुम्हा मध्ये त्यांच्यात भट्टीत टाकले जाते तसे मी तुम्हास वितळवीन. यासाठी मी तुला माझ्या क्रोधाच्या अग्नीने एकत्र करीन, मी त्यांना भट्टीत वितळून टाकीन, तुम्हास त्यामध्ये ओतणी करेन.
وشما را جمع کرده، آتش غضب خود را بر شماخواهم دمید که در میانش گداخته شوید. | ۲۱ 21 |
२१म्हणजे मी तुमच्यात माझ्या क्रोधाच्या अग्नीने त्यांच्यावर ओतणी करेन.
چنانکه نقره در میان کوره گداخته میشود، همچنان شما در میانش گداخته خواهید شد وخواهید دانست که من یهوه حدت خشم خویش را بر شما ریختهام.» | ۲۲ 22 |
२२जसे चांदीला भट्टीत अग्नीने वितळवले जाते, तसा तू त्यांच्यात वितळविला जाशील मग तुला कळेल मी परमेश्वर देवाने तुझ्या विरुध्द त्वेषाची ओतणी केली आहे.
و کلام خداوند بر من نازل شده، گفت: | ۲۳ 23 |
२३परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि मला म्हणाला,
«ای پسر انسان او را بگو: تو زمینی هستی که طاهر نخواهی شد. و باران در روز غضب بر تونخواهد بارید. | ۲۴ 24 |
२४‘मानवाच्या मूला’ तिला सांग तू अशी भूमी आहेस जी अजून शुध्द झाली नाही, क्रोधाच्या दिवसात पाऊस पडणार नाही.
فتنه انبیای آن در میانش میباشد. ایشان مثل شیر غران که شکار رامی درد، جانها را میخورند. و گنجها و نفایس رامی برند. و بیوهزنان را در میانش زیاد میسازند. | ۲۵ 25 |
२५तुझ्यामध्ये असलेल्या संदेष्टयांच्या विरुध्द कारस्थान तुझ्यात आहे, जसा गर्जना करणारा सिंह आपल्या भक्षाला फाडून टाकतो, ते जीवन संपवून टाकतो आणि त्याने तिच्यात अनेकांना विधवा बनवले.
کاهنانش به شریعت من مخالفت ورزیده، موقوفات مرا حلال میسازند. و در میان مقدس وغیر مقدس تمیز نمی دهند و در میان نجس وطاهر فرق نمی گذارند. و چشمان خود را ازسبت های من میپوشانند و من در میان ایشان بیحرمت گردیدهام. | ۲۶ 26 |
२६तिचे याजक माझ्या नियमांच्या विरुध्द दंगल माजवतात; ते माझ्या पवित्र वस्तुबद्दल अनादर दाखवतात, ते पवित्र वस्तू आणि अपवित्रतेची तुलना करीत नाही. त्यांनी आपले डोळे माझ्या शब्बाथावरुन बंद केले आहेत. यास्तव त्यांच्यात माझा अनादर झाला आहे.
سرورانش مانند گرگان درنده خون میریزند و جانها را هلاک مینمایندتا سود ناحق ببرند. | ۲۷ 27 |
२७त्यांच्या राज कुमारी या लांडग्या प्रमाणे बळी घेणारे व रक्तपात करणारे आहेत. आपल्या हिंसाचारासाठी ते जीवाचा घात करतात.
و انبیایش ایشان را به گل ملاط اندود نموده، رویاهای باطل میبینند وبرای ایشان تفال دروغ زده، میگویند که خداوندیهوه چنین گفته است با آنکه یهوه تکلم ننموده. | ۲۸ 28 |
२८आणि त्यांचे द्रष्टे चुना लावलेल्या भिंतीसारखे आहेत ते खोटा दृष्टांत बघतात आणि खोटा शकुन सांगतात व परमेश्वर बोलला नसताही प्रभू परमेश्वर बोलला असे म्हणतात.
و قوم زمین به شدت ظلم نموده و مال یکدیگررا غصب کردهاند. و بر فقیران و مسکینان جفانموده، غریبان را به بیانصافی مظلوم ساختهاند. | ۲۹ 29 |
२९भूमितील लोक पिळवणुकीने दबून गेले आहेत आणि डाका टाकून लुटून टाकतील व ते गरीब, गरजूंना वाईट वागणुक देतात तसेच विदेशांना अन्यायाने दाबून टाकतात.
و من در میان ایشان کسی را طلبیدم که دیوار رابنا نماید و برای زمین به حضور من در شکاف بایستد تا آن را خراب ننمایم، اما کسی را نیافتم. | ۳۰ 30 |
३०मग मी मानवाचा शोध घेतला जो बुरुज बांधून घेईल आणि जो माझ्या पुढे उभा राहील ती भूमिला भित असेल ज्याचा विध्वंस मी करणार नाही.
پس خداوند یهوه میگوید: خشم خود را برایشان ریختهام و ایشان را به آتش غضب خویش هلاک ساخته، طریق ایشان را بر سر ایشان واردآوردهام.» | ۳۱ 31 |
३१मग मी माझ्या संतापाची ओतणी त्यांच्यावर करीन, मी माझ्या संतापाच्या अग्नीने त्यांना संपवून टाकीन आणि त्यांचा मार्ग त्यांच्या डोळ्यापुढे सिध्द करेन. असे परमेश्वर देव जाहीर करत आहे.