< افسسیان 5 >

پس چون فرزندان عزیز به خدا اقتدا کنید. ۱ 1
तर मग देवाच्या प्रिय मुलांसारखे अनुकरण करणारे व्हा,
و در محبت رفتار نمایید، چنانکه مسیح هم ما را محبت نمود و خویشتن را برای ما به خداهدیه و قربانی برای عطر خوشبوی گذرانید. ۲ 2
आणि ख्रिस्तानेही जशी आपल्यावर प्रीती केली आणि देवाला संतुष्ट करणारा सुवास मिळावा म्हणून, आपल्यासाठी ‘अर्पण व बलिदान’ असे स्वतःला दिले, तसे तुम्ही प्रीतीत चाला.
اما زنا و هر ناپاکی و طمع در میان شما هرگزمذکور هم نشود، چنانکه مقدسین را می‌شاید. ۳ 3
जारकर्म, कोणत्याही प्रकारची अशुद्धता किंवा अधाशीपणा याचे तुमच्यामध्ये नाव व विचार येऊ नये, हे पवित्र जनासांठी योग्य नाही.
ونه قباحت و بیهوده‌گویی و چرب زبانی که اینها شایسته نیست بلکه شکرگزاری. ۴ 4
तसेच कोणतेही लाजिरवाणे भाषण, मूर्खपणाचे बोलणे किंवा घाणेरडे विनोद तुमच्यात असू नयेत. ते योग्य नाही. परंतु त्याऐवजी उपकारस्तुती असावी.
زیرا این را یقین می‌دانید که هیچ زانی یا ناپاک یا طماع که بت‌پرست باشد، میراثی در ملکوت مسیح و خداندارد. ۵ 5
कारण तुम्ही हे समजा की, जो कोणी मनुष्य जारकर्मी, अशुद्ध किंवा लोभी म्हणजे मूर्तीपुजक आहे त्यास ख्रिस्ताच्या व देवाच्या राज्यात वतन नाही.
هیچ‌کس شما را به سخنان باطل فریب ندهد، زیرا که به‌سبب اینها غضب خدا بر ابنای معصیت نازل می‌شود. ۶ 6
पोकळ भाषणाने कोणी तुम्हास फसवू नये कारण या कारणामुळे आज्ञा मोडणाऱ्या मुलांवर देवाचा क्रोध येणार आहे.
پس با ایشان شریک مباشید. ۷ 7
म्हणून त्यांचे भागीदार होऊ नका.
زیرا که پیشتر ظلمت بودید، لیکن الحال درخداوند نور می‌باشید. پس چون فرزندان نوررفتار کنید. ۸ 8
कारण एकेकाळी तुम्ही पूर्णपणे अंधारात होता पण आता तुम्ही प्रभूच्या प्रकाशात आहात. तर आता प्रकाशात चालणाऱ्या लेकरांसारखे व्हा.
زیرا که میوه نور در کمال، نیکویی وعدالت و راستی است. ۹ 9
कारण प्रकाशाची फळे चांगुलपणा, नीतिमत्त्व आणि सत्यात दिसून येतात.
و تحقیق نمایید که پسندیده خداوند چیست. ۱۰ 10
१०प्रभूला कशाने संतोष होईल हे पारखून घ्या.
و در اعمال بی‌ثمرظلمت شریک مباشید بلکه آنها را مذمت کنید، ۱۱ 11
११आणि अंधाराची जी निष्फळ कार्ये आहेत त्याचे भागीदार होऊ नका. त्याऐवजी, ती उघडकीस आणा.
زیرا کارهایی که ایشان در خفا می‌کنند، حتی ذکر آنها هم قبیح است. ۱۲ 12
१२कारण ज्या गुप्त गोष्टी त्यांनी केल्या आहेत, त्याविषयीचे वर्णन करणेदेखील लज्जास्पद आहे.
لیکن هرچیزی که مذمت شود، از نور ظاهر می‌گردد، زیرا که هرچه ظاهر می‌شود نور است. ۱۳ 13
१३सर्वकाही प्रकाशाद्वारे उघड होते.
بنابراین می‌گوید‌ای تو که خوابیده‌ای، بیدار شده، از مردگان برخیز تامسیح بر تو درخشد. ۱۴ 14
१४कारण त्या सर्वावर तो प्रकाश चमकतो म्हणून असे म्हणले आहे “हे झोपलेल्या जागा हो, आणि मरण पावलेल्यातून ऊठ, आणि ख्रिस्त तुझ्यावर प्रकाशेल.”
پس باخبر باشید که چگونه به دقت رفتارنمایید، نه چون جاهلان بلکه چون حکیمان. ۱۵ 15
१५म्हणून, तुम्ही कसे जगता, याविषयी काळजीपूर्वक असा. मूर्ख लोकांसारखे होऊ नका, तर शहाण्या लोकांसारखे व्हा.
ووقت را دریابید زیرا این‌روزها شریر است. ۱۶ 16
१६वेळेचा चांगला उपयोग करा कारण ज्या दिवसात तुम्ही राहत आहात ते वाईट आहेत.
ازاین جهت بی‌فهم مباشید، بلکه بفهمید که اراده خداوند چیست. ۱۷ 17
१७म्हणून मूर्खासारखे वागू नका, तर उलट परमेश्वराची इच्छा काय आहे ते समजून घ्या.
و مست شراب مشوید که درآن فجور است، بلکه از روح پر شوید. ۱۸ 18
१८आणि द्राक्षरस पिऊन झिंगल्यासारखे राहू नका; त्यामुळे तो नाशाकडे जातो, परंतु उलट पवित्र आत्म्याने पूर्णपणे भरले जा,
و بایکدیگر به مزامیر و تسبیحات و سرودهای روحانی گفتگو کنید و در دلهای خود به خداوندبسرایید و ترنم نمایید. ۱۹ 19
१९सर्व प्रकारची स्तोत्रे, गीते आणि आत्मिक गीतांनी त्याची स्तुती करा. एकमेकाबरोबर सुसंवाद साधा, गीत गा आणि आपल्या अंतःकरणाने परमेश्वराची स्तुती करा.
و پیوسته بجهت هرچیز خدا و پدر را به نام خداوند ما عیسی مسیح شکر کنید. ۲۰ 20
२०आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात देव जो आपला पिता आहे त्याचे सर्व गोष्टीबद्दल नेहमी उपकार माना.
همدیگر را در خدا ترسی اطاعت کنید. ۲۱ 21
२१ख्रिस्ताच्या भयात राहून एकमेकांचा आदर करून स्वतःला नम्रपणे त्याच्या अधीन करा.
‌ای زنان، شوهران خود را اطاعت کنیدچنانکه خداوند را. ۲۲ 22
२२पत्नींनो, जशा तुम्ही प्रभूच्या अधीन होता, तशा आपल्या पतीच्या अधीन असा.
زیرا که شوهر سر زن است چنانکه مسیح نیز سر کلیسا و او نجات‌دهنده بدن است. ۲۳ 23
२३कारण ख्रिस्त जसा मंडळीचे मस्तक आहे, तसा पती पत्नीचे मस्तक आहे आणि ख्रिस्त विश्वास ठेवणाऱ्या शरीराचा तारणारा आहे.
لیکن همچنانکه کلیسا مطیع مسیح است، همچنین زنان نیز شوهران خود را در هرامری باشند. ۲۴ 24
२४ज्याप्रमाणे मंडळी ख्रिस्ताला शरण जाते, त्याचप्रमाणे पत्नीने प्रत्येक बाबतीत आपल्या पतीच्या अधीन असावे.
‌ای شوهران زنان خود را محبت نمایید، چنانکه مسیح هم کلیسا را محبت نمود وخویشتن را برای آن داد. ۲۵ 25
२५पतीनो, ज्याप्रमाणे ख्रिस्त मंडळीवर प्रीती करतो, तशी तुम्ही आपल्या पत्नीवर निस्वार्थी प्रीती करा. त्याने तिच्यासाठी स्वतःला दिले,
تا آن را به غسل آب بوسیله کلام طاهر ساخته، تقدیس نماید، ۲۶ 26
२६यासाठी की, त्याने तिला देवाच्या वचनरुपी पाण्याने धुऊन स्वच्छ करून पवित्र करावे.
تاکلیسای مجید را به نزد خود حاضر سازد که لکه وچین یا هیچ‌چیز مثل آن نداشته باشد، بلکه تامقدس و بی‌عیب باشد. ۲۷ 27
२७यासाठी की, तो मंडळीला स्वतःसाठी गौरवी वधू म्हणून सादर करील, तिला कोणताही डाग नसेल किंवा सुरकुती किंवा कोणत्याही प्रकारची अपूर्णता नसेल तर ती पवित्र व निर्दोष असेल.
به همین طور، بایدمردان زنان خویش را مثل بدن خود محبت نمایند زیرا هرکه زوجه خود را محبت نماید، خویشتن را محبت می‌نماید. ۲۸ 28
२८याप्रकारे पतींनी सुद्धा आपल्या पत्नीवर असेच प्रेम करावे, जसे ते स्वतःच्या शरीरावर प्रेम करतात, जो कोणी त्याच्या स्वतःच्या पत्नीवर प्रेम करतो, तो स्वतःवर प्रेम करतो.
زیرا هیچ‌کس هرگز جسم خود را دشمن نداشته است بلکه آن راتربیت و نوازش می‌کند، چنانکه خداوند نیزکلیسا را. ۲۹ 29
२९कारण आतापर्यंत कोणीही आपल्या शरीराचा द्वेष केला नाही. उलट तो त्याचे पोषण करतो, त्याची काळजी घेतो. ज्याप्रमाणे ख्रिस्त मंडळीचे पोषण करतो व काळजी घेतो.
زانرو که اعضای بدن وی می‌باشیم، از جسم و از استخوانهای او. ۳۰ 30
३०कारण आपण त्याच्या शरीराचे अवयव आहोत.
از اینجاست که مرد پدر و مادر را رها کرده، با زوجه خویش خواهد پیوست و آن دو یکتن خواهند بود. ۳۱ 31
३१“म्हणून याकारणास्तव पुरूष त्याचे वडील व आई यांना सोडील व त्याच्या पत्नीशी जडून राहील आणि ते दोघे एकदेह होतील.”
این سر، عظیم است، لیکن من درباره مسیح و کلیساسخن می‌گویم. ۳۲ 32
३२हे गुढ सत्य फार महत्त्वाचे आहे आणि मी हे सांगत आहे की ते ख्रिस्त व मंडळीला लागू पडते.
خلاصه هریکی از شما نیز زن خود را مثل نفس خود محبت بنماید و زن شوهر خود را باید احترام نمود. ۳۳ 33
३३तरीही, तुमच्यातील प्रत्येकाने त्याच्या स्वतःच्या पत्नीवर प्रेम केले पाहिजे व पत्नीनेही पतीचा मान राखला पाहिजे.

< افسسیان 5 >