< تثنیه 7 >
چون یهوه، خدایت، تو را به زمینی که برای تصرفش به آنجا میروی درآورد، وامتهای بسیار را که حتیان و جرجاشیان و اموریان و کنعانیان و فرزیان و حویان و یبوسیان، هفت امت بزرگتر و عظیم تر از تو باشند، از پیش تواخراج نماید. | ۱ 1 |
१जो देश वतन करून घ्यायला तुम्ही निघाला आहात तेथे तुमचा देव परमेश्वर तुम्हास नेईल. आणि हित्ती, गिर्गाशी, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी, यबूसी अशा तुमच्यापेक्षा मोठ्या आणि बलाढ्य अशा सात राष्ट्रांना तुमच्यासमोरून घालवून देईल.
و چون یهوه خدایت، ایشان را بهدست تو تسلیم نماید، و تو ایشان را مغلوب سازی، آنگاه ایشان را بالکل هلاک کن، و با ایشان عهد مبند و بر ایشان ترحم منما. | ۲ 2 |
२तुमचा देव परमेश्वर त्यांना तुमच्या अधिपत्याखाली आणेल आणि तुम्ही त्यांचा पराभव कराल तेव्हा तुम्ही त्यांचा समूळ विध्वंस करा. त्यांच्याशी कुठलाही करार करु नका. त्यांना दया दाखवू नका.
و با ایشان مصاهرت منما؛ دختر خود را به پسر ایشان مده، و دختر ایشان را برای پسر خود مگیر. | ۳ 3 |
३त्यांच्याशी सोयरीक जुळवू नका. आपल्या मुली त्यांना देऊ नका. त्याच्या मुली आपल्या मुलांना करून घेऊ नका.
زیراکه اولاد تو را از متابعت من برخواهند گردانید، تاخدایان غیر را عبادت نمایند، و غضب خداوندبرشما افروخته شده، شما را بزودی هلاک خواهد ساخت. | ۴ 4 |
४कारण ते लोक तुमच्या मुलांना माझ्यापासून विचलीत करतील. त्यामुळे तुमची मुले अन्य दैवतांचे भजन पूजन करतील. अशाने परमेश्वराचा तुमच्यावर कोप होईल व तो तात्काळ तुमचा नाश करील. खोट्या देवांचा नाश करा
بلکه با ایشان چنین عمل نمایید؛ مذبحهای ایشان را منهدم سازید، وتمثالهای ایشان را بشکنید و اشیریم ایشان را قطع نمایید، و بتهای تراشیده ایشان را به آتش بسوزانید. | ۵ 5 |
५त्या देशात तुम्ही असे करा. त्यांच्या वेद्या पाडून टाका. त्यांचे स्मारकस्तंभ फोडून टाका. अशेरा दैवताचे स्तंभ उपटून टाका, मूर्ती जाळून टाका.
زیرا که تو برای یهوه، خدایت، قوم مقدس هستی. یهوه خدایت تو را برگزیده است تااز جمیع قومهایی که بر روی زمیناند، قوم مخصوص برای خود او باشی. | ۶ 6 |
६कारण तुम्ही तुमचा देव परमेश्वराची पवित्र प्रजा आहात. जगाच्या पाठीवरील सर्व लोकांमधून त्याने आपली खास प्रजा म्हणून तुमचीच निवड केली आहे.
خداوند دل خود را با شما نبست و شما رابرنگزید از این سبب که از سایر قومها کثیرتربودید، زیرا که شما از همه قومها قلیلتر بودید. | ۷ 7 |
७परमेश्वराने प्रेमाने तुम्हासच का निवडले? तुम्ही एखाद्या मोठ्या राष्ट्रातील होता म्हणून नव्हे. उलट तुम्ही संख्येने सगळ्यात कमी होता.
لیکن از این جهت که خداوند شما را دوست میداشت، و میخواست قسم خود را که برای پدران شما خورده بود، بجا آورد، پس خداوند شما را با دست قوی بیرون آورد، و از خانه بندگی از دست فرعون، پادشاه مصر، فدیه داد. | ۸ 8 |
८पण सर्व सामर्थ्यानिशी तुम्हास दास्यातून मुक्त करून परमेश्वराने तुम्हास मिसर देशाबाहेर आणले, फारो राजाच्या अंमलातून सुटका केली. याचे कारण हेच की तुमच्यावर त्याचे प्रेम आहे आणि तुमची पूर्वजांना दिलेले वचन त्यास पाळायचे होते.
پس بدان که یهوه، خدای تو، اوست خدا، خدای امین که عهد و رحمت خود را با آنانی که او را دوست میدارند و اوامر او را بجا میآورند تا هزار پشت نگاه میدارد. | ۹ 9 |
९तेव्हा लक्षात ठेवा तुमचा देव परमेश्वर हाच एक देव आहे. त्यावर विश्वास ठेवा. तो आपला करार पाळतो. त्याच्यावर प्रेम करणाऱ्या आणि त्याच्या आज्ञा पाळणाऱ्या लोकांवर व त्यांच्या पुढच्या हजारो पिढ्यांवर तो दया करतो.
و آنانی را که او را دشمن دارند، بر روی ایشان مکافات رسانیده، ایشان را هلاک میسازد. و به هرکه او را دشمن دارد، تاخیرننموده، او را بر رویش مکافات خواهد رسانید. | ۱۰ 10 |
१०पण त्याचा द्वेष करणाऱ्यांना तो शासन करतो. तो त्यांचा नाश करील. त्याचा द्वेष करणाऱ्यांना शासन करण्यास तो विलंब करणार नाही.
پس اوامر و فرایض و احکامی را که من امروزبه جهت عمل نمودن به تو امر میفرمایم نگاه دار. | ۱۱ 11 |
११तेव्हा ज्या आज्ञा व विधी, नियम आज मी सांगितले त्यांचे काळजीपूर्वक पालन करा.
پس اگر این احکام را بشنوید و آنها را نگاه داشته، بجا آورید، آنگاه یهوه خدایت عهد ورحمت را که برای پدرانت قسم خورده است، باتو نگاه خواهد داشت. | ۱۲ 12 |
१२मग असे होईल की, तुम्ही हे विधी ऐकले, पाळले, व आचरले तर त्यामुळे तुमचा देव परमेश्वर याने तुमच्या पुर्वजांशी शपथपूर्वक केलेला करार व प्रेमदया तो तुमच्यावरही राखील.
و تو را دوست داشته، برکت خواهد داد، و خواهد افزود، و میوه بطن توو میوه زمین تو را و غله و شیره و روغن تو را ونتاج رمه تو را و بچه های گله تو را، در زمینی که برای پدرانت قسم خورد که به تو بدهد، برکت خواهد داد. | ۱۳ 13 |
१३तो तुमच्यावर प्रेम करील, तुम्हास आशीर्वाद देईल. तुमच्या राष्ट्राची तो वाढ करील. तो तुमच्या मुलाबाळांना आर्शीवाद देईल. तुमची शेते पिके तो आशीर्वादीत करील. तो तुम्हास धान्य, नवीन द्राक्षरस व तेल देईल. तुमची गुरेढोरे व शेरडेमेंढरे ह्यांना तो आशीर्वाद देईल. तुमच्या पूर्वजांना वचन दिलेल्या प्रदेशात हे सर्व आशीर्वाद तो तुम्हास देईल.
از همه قومها مبارک تر خواهی شد، و در میان شما و بهایم شما، نر یا ماده، نازادنخواهد بود. | ۱۴ 14 |
१४इतरांपेक्षा तुम्ही जास्त आशीर्वादीत व्हाल. प्रत्येक दांपत्याला मुले आणि मुली होतील. गाई वासरांना जन्म देतील.
و خداوند هر بیماری را از تو دورخواهد کرد، و هیچکدام از مرضهای بد مصر راکه میدانی، برتو عارض نخواهد گردانید، بلکه برتمامی دشمنانت آنها را خواهد آورد. | ۱۵ 15 |
१५परमेश्वर सर्व आजार काढून टाकील. मिसर देशात तुम्हास माहीत असलेली कोणतीही भयंकर रोगराई इथे होणार नाही. हे रोग परमेश्वर तुमच्या शत्रूंवर आणील.
وتمامی قومها را که یهوه بدست تو تسلیم میکندهلاک ساخته، چشم تو برآنها ترحم ننماید، وخدایان ایشان را عبادت منما، مبادا برای تو دام باشد. | ۱۶ 16 |
१६तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्या हाती सोपवलेल्या सर्वांचा तुम्ही पराभव करून विध्वंस करा. त्यांच्याबाबतीत वाईट वाटून घेऊ नका. त्यांच्या दैवतांची सेवा करु नका. कारण ती दैवते म्हणजे तुम्हास अडकवणारा सापळा आहे. त्याने तुमच्या आयुष्याचा नाश होईल.
و اگر در دلت گویی که این قومها از من زیادهاند، چگونه توانم ایشان را اخراج نمایم؟ | ۱۷ 17 |
१७ही राष्ट्रे आपल्यापेक्षा बलवान आहेत, त्यांना आम्ही कसे घालवून देऊ असा विचारही मनात आणू नका.
از ایشان مترس بلکه آنچه را یهوه خدایت بافرعون و جمیع مصریان کرد، نیکو بیاد آور. | ۱۸ 18 |
१८त्यांची मुळीच भीती बाळगू नका. आपल्या परमेश्वर देवाने फारोचे आणि मिसर देशाचे काय केले ते आठवा.
یعنی تجربه های عظیمی را که چشمانت دیده است، و آیات و معجزات و دست قوی و بازوی دراز را که یهوه، خدایت، تو را به آنها بیرون آورد. پس یهوه، خدایت، با همه قومهایی که از آنهامی ترسی، چنین خواهد کرد. | ۱۹ 19 |
१९त्यांच्यावर कशी भयंकर संकटे आणली, काय चमत्कार केले हे तुम्ही पाहिलेले आहे. तुम्हास मिसर देशा बाहेर काढतानाचे त्याचे प्रताप व सामर्थ्य तुम्हास माहीत आहेत. ज्या लोकांची तुम्हास भीती वाटत आहे त्यांच्याविरुध्द तुमचा देव परमेश्वर असेच सामर्थ्य वापरील.
و یهوه خدایت نیز زنبورها در میان ایشان خواهد فرستاد، تاباقی ماندگان و پنهان شدگان ایشان از حضور توهلاک شوند. | ۲۰ 20 |
२०याव्यतिरिक्त, जे तुमच्या तावडीतून निसटतील, लपून बसतील त्यांच्या मागावर परमेश्वर आपला देव गांधीलमाश्या पाठवील. त्यामुळे त्यांचाही नाश होईल.
از ایشان مترس زیرا یهوه خدایت که در میان توست، خدای عظیم و مهیب است. | ۲۱ 21 |
२१तेव्हा त्यांना घाबरु नका. कारण परमेश्वर आपला देव तुमच्याबरोबर आहे. तो महान आणि भययोग्य देव आहे.
و یهوه، خدایت، این قومها را از حضورتو به تدریج اخراج خواهد نمود، ایشان را بزودی نمی توانی تلف نمایی مبادا وحوش صحرا برتوزیاد شوند. | ۲۲ 22 |
२२त्या राष्ट्रांना आपला देव परमेश्वर हळूहळू घालवून देईल. त्यांचा तुम्ही एकाच वेळी विध्वंस करणार नाही. कारण तसे झाले तर वन्यपशूंची संख्या फार वाढेल व ते तुम्हास त्रास देतील.
لیکن یهوه خدایت، ایشان را بهدست تو تسلیم خواهد کرد، و ایشان را به اضطراب عظیمی پریشان خواهد نمود تا هلاک شوند. | ۲۳ 23 |
२३पण त्या राष्ट्रांचा बिमोड करण्यात तुमचा देव परमेश्वर तुम्हास साहाय्य करील. युद्धात त्यांच्यात गोंधळ माजवील आणि शेवटी त्यांचा नाश होईल.
و ملوک ایشان را بدست تو تسلیم خواهد نمود، تا نام ایشان را از زیر آسمان محوسازی، و کسی یارای مقاومت با تو نخواهدداشت تا ایشان را هلاک سازی. | ۲۴ 24 |
२४परमेश्वराच्या मदतीने तुम्ही त्यांच्या राजांचा पराभव कराल, त्यांना ठार कराल आणि जगाच्या आठवणीतूनही ते पुसले जातील. कोणीही तुम्हास अडवू शकणार नाही. तुम्ही सर्वांचा विध्वंस कराल!
و تمثالهای خدایان ایشان را به آتش بسوزانید، به نقره وطلایی که بر آنهاست، طمع مورز، و برای خودمگیر، مبادا از آنها به دام گرفتار شوی، چونکه نزد یهوه، خدای تو، مکروه است. | ۲۵ 25 |
२५त्यांच्या दैवतांच्या मूर्ती तुम्ही आगीत टाकून जाळून टाका. त्या मूर्तीवरच्या चांदीसोन्याचा मोह धरू नका, ते घेऊ नका, कारण तो सापळाच आहे, त्याने तुमचे आयुष्य बरबाद होईल. आपला देव परमेश्वर याला त्यांचा वीट आहे.
و چیزمکروه را به خانه خود میاور، مبادا مثل آن حرام شوی، از آن نهایت نفرت و کراهت دار چونکه حرام است. | ۲۶ 26 |
२६त्या अमंगळ, हानिकारक मूर्ती तुम्ही घरीही आणू नका. त्यांचा अव्हेर कर, कारण ती नाशास पात्र ठरलेली वस्तू आहे.