< دوم پادشاهان 18 >
و در سال سوم هوشع بن ایله، پادشاه اسرائیل، حزقیا ابن آحاز، پادشاه یهوداآغاز سلطنت نمود. | ۱ 1 |
१आणि एलाचा मुलगा होशे, जो इस्राएलाचा राजा, याच्या तिसऱ्या वर्षी यहूदाचा राजा आहाज याचा मुलगा हिज्कीया राज्य करू लागला.
او بیست و پنج ساله بود که پادشاه شد و بیست و نه سال در اورشلیم سلطنت کرد و اسم مادرش ابی، دختر زکریا بود. | ۲ 2 |
२हिज्कीया पंचवीस वर्षाचा होता जेव्हा तो राज्य करू लागला. आणि त्याने यरूशलेमामध्ये एकोणतीस वर्षे राज्य केले. याच्या आईचे नाव अबी. ही जखऱ्याची मुलगी होती.
و آنچه در نظر خداوند پسند بود، موافق هرچه پدرش داود کرده بود، به عمل آورد. | ۳ 3 |
३परमेश्वराच्या दृष्टीने जे चांगले ते तो करीत असे, आपला पूर्वज दावीद करीत असे त्याप्रमाणे हिज्कीयाही सर्वकाही करत असे.
او مکان های بلندرا برداشت و تماثیل را شکست و اشیره را قطع نمود و مار برنجین را که موسی ساخته بود، خردکرد زیرا که بنیاسرائیل تا آن زمان برایش بخورمی سوزانیدند. و او آن را نحشتان نامید. | ۴ 4 |
४त्याने उंचस्थानावरील पूजास्थळे नष्ट करून टाकली. तसेच स्मृतीस्तंभ, आणि अशेराचे खांबही तोडून टाकले. त्याने मोशेने केलेल्या पितळी सापाचे तुकडे केले कारण त्या दिवसांमध्ये इस्राएलाचे लोक त्यास धूप जाळत असत. ते त्यास “नहुश्तान” असे म्हणत.
او بریهوه، خدای اسرائیل توکل نمود و بعد از او ازجمیع پادشاهان یهودا کسی مثل او نبود و نه ازآنانی که قبل از او بودند. | ۵ 5 |
५इस्राएलचा देव परमेश्वर ह्यांच्यावर हिज्कीयाने भरवसा ठेवला होता, म्हणून त्याच्यासारखा राजा यहूदाच्या राजांमध्ये त्याच्याआधी किंवा त्याच्यानंतरही झाला नाही.
و به خداوند چسپیده، از پیروی او انحراف نورزید و اوامری را که خداوند به موسیامر فرموده بود، نگاه داشت. | ۶ 6 |
६तो परमेश्वरास धरून राहिला. त्यास अनुसरण्याचे त्याने सोडले नाही परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञांचे त्याने पालन केले.
وخداوند با او میبود و به هر طرفی که رو مینمود، فیروز میشد و بر پادشاه آشور عاصی شده، او راخدمت ننمود. | ۷ 7 |
७म्हणून परमेश्वर त्याच्यासोबत होता, आणि जिकडे तो जाई तिथे त्याची उन्नती होई. त्याने अश्शूरच्या राजाविरुध्द बंड केले व त्यांची सेवा केली नाही.
او فلسطینیان را تا غزه وحدودش و از برجهای دیده بانان تا شهرهای حصاردار شکست داد. | ۸ 8 |
८त्याने गज्जा आणि त्याच्या सीमेपर्यंत पलिष्ट्यांचा पराभव केला. त्याने पहारेकऱ्यांच्या बुरूजा पासून तटबंदीच्या नगरापर्यंत त्यांना मारले.
و در سال چهارم حزقیا پادشاه که سال هفتم هوشع بن ایله، پادشاه اسرائیل بود، شلمناسر، پادشاه آشور به سامره برآمده، آن رامحاصره کرد. | ۹ 9 |
९आणि हिज्कीया राजाच्या चौथ्या वर्षी, म्हणजे इस्राएलाचा राजा, एलाचा मुलगा होशे ह्याच्या सातव्या वर्षी, असे झाले की अश्शूराचा राजा शल्मनेसर हा शोमरोनावर चढून आला व त्यास वेढा घातला.
و در آخر سال سوم در سال ششم حزقیا آن را گرفتند، یعنی در سال نهم هوشع، پادشاه اسرائیل، سامره گرفته شد. | ۱۰ 10 |
१०तीन वर्षांच्या अखेरीस त्याने ते घेतले. यहूदाचा राजा हिज्कीया याच्या सहाव्या वर्षी हे झाले. अर्थातच इस्राएलचा राजा एलाचा मुलगा होशे याच्या नवव्या वर्षी त्यांनी शोमरोन घेतले.
وپادشاه آشور، اسرائیل را به آشور کوچانیده، ایشان را در حلح و خابور، نهر جوزان، و درشهرهای مادیان برده، سکونت داد. | ۱۱ 11 |
११मग अश्शूरच्या राजाने इस्राएल लोकांस कैद करून अश्शूरला नेले. त्यांना त्याने हलहा येथे, गोजानमधील हाबोर नदीजवळ आणि माद्य नगरांमध्ये ठेवले.
از این جهت که آواز یهوه، خدای خود را نشنیده بودندو از عهد او و هرچه موسی، بنده خداوند، امرفرموده بود، تجاوز نمودند و آن را اطاعت نکردندو به عمل نیاوردند. | ۱۲ 12 |
१२त्यांनी असे केले कारण इस्राएल लोकांनी परमेश्वर त्यांचा देव, ह्याचा शब्द पाळला नाही. तर त्याच्या कराराचा भंग केला, म्हणजे परमेश्वराचा सेवक मोशे याने जे आज्ञापिलेले होते ते त्यांनी जुमानले नाही व त्याची शिकवण ऐकली नाही.
و در سال چهاردهم حزقیا پادشاه، سنحاریب، پادشاه آشور بر تمامی شهرهای حصاردار یهودا برآمده، آنها را تسخیر نمود. | ۱۳ 13 |
१३हिज्कीया राजा ह्याच्या चौदाव्या वर्षी, अश्शूरचा राजा सन्हेरीब याने यहूदातील सर्व तटबंदी नगरांवर हल्ला चढवून त्यांचा ताबा घेतला.
وحزقیا پادشاه یهودا نزد پادشاه آشور به لاکیش فرستاده، گفت: «خطا کردم. از من برگرد و آنچه راکه بر من بگذاری، ادا خواهم کرد.» پس پادشاه آشور سیصد وزنه نقره و سی وزنه طلا بر حزقیاپادشاه یهودا گذاشت. | ۱۴ 14 |
१४तेव्हा यहूदाचा राजा हिज्कीया याने अश्शूराच्या राजाला लाखीश येथे निरोप पाठवला की, “माझ्याकडून अपराध झाला आहे, तर आता माझ्या पासून निघून जा. तू जे माझ्यावर लादशील ते मी सहन करीन.” यावर अश्शूराच्या राजाने यहूदाचा राजा हिज्कीया याला तिनशे किक्कार चांदी व तीस किक्कार सोने अशी खंडणी मागितली.
و حزقیا تمامی نقرهای را که در خانه خداوند و در خزانه های خانه پادشاه یافت شد، داد. | ۱۵ 15 |
१५तेव्हा हिज्कीयाने परमेश्वराच्या घरात व राजाच्या राजवाड्यातील भांडारात असणारी सर्व चांदी त्यास दिली.
در آن وقت حزقیا طلارا از درهای هیکل خداوند و از ستونهایی که حزقیا، پادشاه یهودا آنها را به طلا پوشانیده بودکنده، آن را به پادشاه آشور داد. | ۱۶ 16 |
१६मग हिज्कीयाने परमेश्वराच्या मंदिराचे दरवाजे आणि सोन्याच्या पल्याने मढवलेले खांब काढून घेतले आणि अश्शूरच्या राजाला हे सोने दिले.
و پادشاه آشور، ترتان و ربساریس وربشاقی را از لاکیش نزد حزقیای پادشاه به اورشلیم با موکب عظیم فرستاد. و ایشان برآمده، به اورشلیم رسیدند و چون برآمدند، رفتند و نزدقنات برکه فوقانی که بهسر راه مزرعه گازر است، ایستادند. | ۱۷ 17 |
१७पण अश्शूरच्या राजाने तर्तान व रब-सारीस व रब-शाके यांना मोठ्या सैन्यासोबत लाखीशाहून यरूशलेमामध्ये हिज्कीया राजा कडे पाठवले. तेव्हा ते यरूशलेमेस चढून आले, आणि वरच्या तलावाच्या पाटाजवळ परिटाच्या शेताच्या रस्त्यावर उभे राहिले.
و چون پادشاه را خواندند، الیاقیم بن حلقیا که ناظر خانه بود و شبنای کاتب و یوآخ بن آساف وقایع نگار، نزد ایشان بیرون آمدند. | ۱۸ 18 |
१८त्यांनी राजाला निरोप पाठवला तेव्हा, हिल्कीयाचा मुलगा एल्याकीम जो घरावरचा कारभारी, व शेबना चिटणीस आणि नोंदणी लेखक व आसाफचा मुलगा यवाह हे त्यांना भेटावयास पुढे आले.
و ربشاقی به ایشان گفت: «به حزقیا بگویید: سلطان عظیم، پادشاه آشور چنین میگوید: این اعتماد شما که بر آن توکل مینمایی، چیست؟ | ۱۹ 19 |
१९तेव्हा रबशाके त्यांना म्हणाला, “अश्शूराचा महान राजा हिज्कीयास काय म्हणतो हे सांगा; तुझ्या आत्मविश्वासाविषयी कसली शिष्टता बाळगतोस?
تو سخن میگویی، اما مشورت و قوت جنگ تو، محض سخن باطل است. الان کیست که بر اوتوکل نمودهای که بر من عاصی شدهای. | ۲۰ 20 |
२०तू म्हणतोस, लढाईसाठी पुरेशी मसलत आणि सामर्थ्य तुझ्याजवळ आहेत, परंतू ते केवळ पोकळ व अर्थहीन शब्द आहेत. आता तू कोणावर भरवसा ठेवतोस. माझ्याविरूद्ध बंड करण्यासाठी तुला कोणी धैर्य दिले आहे?
اینک حال بر عصای این نی خرد شده، یعنی بر مصرتوکل مینمایی که اگر کسی بر آن تکیه کند، بهدستش فرو رفته، آن را مجروح میسازد. همچنان است فرعون، پادشاه مصر برای همگانی که بر وی توکل مینمایند. | ۲۱ 21 |
२१पाहा, तू ठेचलेल्या बोरूच्या काठीवर म्हणजे मिसर देशावर भरवसा ठेवतोस, अशा काठीवर कोणी मनुष्य विसंबून राहिला तर ती मोडून पडेल व हातात रुतेल. जे कोणी मिसराचा राजा फारो ह्यावर विश्वास ठेवतात त्या सर्वांना तो तसाच आहे.
و اگر مرا گویید که بر یهوه، خدای خود توکل داریم، آیا او آن نیست که حزقیا مکان های بلند و مذبح های او را برداشته است و به یهودا و اورشلیم گفته که پیش این مذبح در اورشلیم سجده نمایید؟ | ۲۲ 22 |
२२तू कदाचित् असे म्हणशील, आम्ही परमेश्वर देवावर भरवसा ठेवतो. पण हिज्कीयाने परमेश्वराची उंचस्थाने आणि वेद्या काढून टाकल्या आणि यहूदा व यरूशलेमेला म्हटले की, फक्त यरूशलेममधील याच वेदीपुढे आराधना करावी तोच तो आहे की नाही?
پس حال با آقایم، پادشاه آشور شرط ببند و من دو هزار اسب به تومی دهم. اگر از جانب خود سواران بر آنها توانی گذاشت! | ۲۳ 23 |
२३तर आता अश्शूराचा राजा माझा धनी याच्यावतीने, तुझ्याकडे घोड्यांवर स्वार व्हायला माणसे असतील तर तुला दोन हजार घोडे देण्याचा चांगला प्रस्ताव मांडतो.
پس چگونه روی یک پاشا ازکوچکترین بندگان آقایم را خواهی برگردانید و برمصر به جهت ارابهها و سواران توکل داری؟ | ۲۴ 24 |
२४माझ्या स्वामीच्या सर्वात कनिष्ठ सेवकाचा देखील तू पराभव करु शकणार का? रथ आणि घोडेस्वार यांच्यासाठी तू मिसरवर अवलंबून आहेस.
وآیا من الان بیاذن خداوند بر این مکان به جهت خرابی آن برآمدهام، خداوند مرا گفته است بر این زمین برآی و آن را خراب کن.» | ۲۵ 25 |
२५मी यरूशलेमचा संहार करायला चाल करून आलोय, तो काही परमेश्वराचा पाठिंबा असल्याशिवाय आलो काय? परमेश्वर मला म्हणाला, या देशावर स्वारी करून त्याचा पूर्ण पाडाव कर.”
آنگاه الیاقیم بن حلقیا و شبنا و یوآخ به ربشاقی گفتند: «تمنا اینکه با بندگانت به زبان ارامی گفتگو نمایی که آن را میفهمیم و با ما به زبان یهود در گوش مردمی که بر حصارند، گفتگومنمای.» | ۲۶ 26 |
२६तेव्हा हिल्कीयाचा मुलगा एल्याकीम, शेबना आणि यवाह हे सेनापतीला म्हणाले, “तू आपल्या सेवकाशी अरामी भाषेत बोल. आम्हास ती भाषा कळते. आमच्याशी यहूदी भाषेत बोलू नको. कारण तटबंदीवरील लोक आपले बोलणे ऐकतील.”
ربشاقی به ایشان گفت: «آیا آقایم مرانزد آقایت و تو فرستاده است تا این سخنان رابگویم؟ مگر مرا نزد مردانی که بر حصارنشستهاند، نفرستاده، تا ایشان با شما نجاست خود را بخوردند و بول خود را بنوشند؟» | ۲۷ 27 |
२७पण रब-शाके त्यांना म्हणाला, “प्रभूने काही मला फक्त तुझ्याशी आणि तुझ्या राजाशी बोलायला पाठवलेले नाही, तटबंदीवरील लोकांशीही मी बोलतो आहे. तुमच्याबरोबरच त्यांनाही स्वत: चे मलमूत्र चाटायची वेळ येणार आहे.”
پس ربشاقی ایستاد و به آواز بلند به زبان یهود صدا زد و خطاب کرده، گفت: «کلام سلطان عظیم، پادشاه آشور را بشنوید. | ۲۸ 28 |
२८मग रब-शाके यहूदी भाषेत मोठ्याने ओरडून म्हणाला, “अश्शूराचा थोर राजा काय म्हणतो ते ऐका”
پادشاه چنین میگوید: حزقیا شما را فریب ندهد زیرا که اوشما را نمی تواند از دست وی برهاند. | ۲۹ 29 |
२९राजा असे म्हणतो, हिज्कीयाच्या भूलथापांना बळी पडू नका. माझ्यापासून तो तुम्हास वाचवू शकणार नाही.
و حزقیاشما را بر یهوه مطمئن نسازد و نگوید که یهوه، البته ما را خواهد رهانید و این شهر بهدست پادشاه آشور تسلیم نخواهد شد. | ۳۰ 30 |
३०तो म्हणतो परमेश्वरावर विसंबून राहू नका. हिज्कीया तुम्हास सांगतो, परमेश्वर आपल्याला वाचवील. अश्शूराचा राजा आपल्या शहराचा पराभव करु शकणार नाही.
به حزقیاگوش مدهید زیرا که پادشاه آشور چنین میگوید: با من صلح کنید و نزد من بیرون آیید تا هرکس ازمو خود و هرکس از انجیر خویش بخورد وهرکس از آب چشمه خود بنوشد. | ۳۱ 31 |
३१पण हिज्कीयाचे ऐकू नका. “कारण अश्शूराचा राजा म्हणतो माझ्याशी तह करा आणि माझ्याकडे या. तसे केलेत तर आपापल्या द्राक्षवेलीवरची, अंजिराच्या झाडावरची फळे तुम्हास खायला मिळतील. स्वत: च्या विहिरीचे पाणी प्यायला मिळेल.
تا بیایم وشما را به زمین مانند زمین خودتان بیاورم، یعنی به زمین غله و شیره و زمین نان و تاکستانها و زمین زیتونهای نیکو و عسل تا زنده بمانید و نمیرید. پس به حزقیا گوش مدهید زیرا که شما را فریب میدهد و میگوید: یهوه ما را خواهد رهانید. | ۳۲ 32 |
३२पुढे मी तुमच्या देशासारख्याच दुसऱ्या देशात, धान्याचा व द्राक्षरसाचा देश, अन्नाचा व द्राक्षीच्या मळ्याचा देश, जैतून तेलाचा व मधाचा देश यामध्ये मी तुम्हास घेऊन जाईपर्यंत तुम्ही असे वागा. तरच तुम्ही जगाल; मरणार नाही. आणि हिज्कीयाचे ऐकू नका. तो तुमचे हृदयपरिवर्तन करु पाहत आहे, ‘परमेश्वर आपल्याला वाचवेल’ असे तो म्हणतो.
آیا هیچکدام از خدایان امتها، هیچ وقت زمین خود را از دست پادشاه آشور رهانیده است؟ | ۳۳ 33 |
३३इतर दैवतांनी आपले देश अश्शूराच्या राजाच्या तावडीतून सोडवले आहेत असे अजून झाले आहे काय? कधीच नाही.
خدایان حمات و ارفاد کجایند؟ و خدایان سفروایم و هینع و عوا کجا؟ و آیا سامره را ازدست من رهانیدهاند؟ | ۳۴ 34 |
३४कुठे आहेत हमाथ आणि अर्पद यांची दैवतं? सफरवाईम, हेना, इव्वा यांची दैवते कुठे गेले? त्यांनी शोमरोनचे माझ्यापासून रक्षण केले का?
از جمیع خدایان این زمینها کدامند که زمین خویش را از دست من نجات دادهاند تا یهوه، اورشلیم را از دست من نجات دهد؟» | ۳۵ 35 |
३५इतर राष्ट्राच्या दैवतांनी आपापली भूमी माझ्यापासून सुरक्षित ठेवली का? नाही माझ्याकडून परमेश्वर यरूशलेम वाचवणार का?”
اما قوم سکوت نموده، به او هیچ جواب ندادند زیرا که پادشاه امر فرموده بود و گفته بود که او را جواب ندهید. | ۳۶ 36 |
३६पण लोक गप्पच होते. ते सेनापतीला काहीही बोलले नाहीत. कारण “त्यांनी काहीही उत्तर द्याचये नाही” अशी राजा हिज्कीयाची त्यांना आज्ञा होती.
پس الیاقیم بن حلقیا که ناظر خانه بود و شبنه کاتب و یوآخ بن آساف وقایع نگار با جامه دریده نزد حزقیا آمدند وسخنان ربشاقی را به او بازگفتند. | ۳۷ 37 |
३७हिल्कीयाचा मुलगा एल्याकीम, जो राजवाड्याचा कारभारी, व चिटणीस शेबना आणि आसाफचा मुलगा यवाह हा नोंदी करणारा होता हे शोकाकुल होऊन आपली वस्त्रे फाडून हिज्कीयाकडे आले. अश्शूराचा सेनापती रब-शाके काय म्हणाला ते त्यांनी हिज्कीयाला सांगितले.