< اول تواریخ 9 >

و تمامي اسرائيل بر حسب نسب نامه هاي خود شمرده شدند، و اينک در کتاب پادشاهان اسرائيل مکتوب اند و يهودا به سبب خيانت خود به بابل اسيري رفتند. ۱ 1
इस्राएलाच्या सर्व लोकांची नोंद वंशावळीप्रमाणे केलेली आहे. इस्राएलाच्या राजाच्या पुस्तकात ती लिहिलेली आहे. त्यांच्या पापामुळे यहूदाच्या लोकांस बाबेल येथे कैद करून नेण्यात आले.
و کساني که اول در مُلکها و شهرهاي ايشان سکونت داشتند، اسرائيليان و کاهنان و لاويان و نَتينيم بودند. ۲ 2
त्यापैकी जे सगळ्यात आधी आपल्या, नगरात येऊन राहिले ते म्हणजे इस्राएल लोक याजक, लेवी आणि मंदिरातील कामकरी वर्ग.
و در اورشليم بعضي از بني يهودا واز بني بنيامين و از بني افرايم و مَنَّسي ساکن بودند. ۳ 3
यरूशलेमामध्ये राहणाऱ्या यहूदा, बन्यामीन, एफ्राईम आणि मनश्शे घराण्यातील लोक राहत होते.
عوتاي ابن عمَّيهُود بن عُمرِي ابن اِمرِي ابن باني از بني فارَص بن يهودا. ۴ 4
ऊथय हा अम्मीहूदचा पुत्र. अम्मीहूद हा अम्रीचा पुत्र. अम्री इम्रीचा पुत्र. इम्री बानीचा पुत्र. बानी पेरेसच्या वंशजांपैकी. पेरेस हा यहूदाचा पुत्र.
و از شيلونيان نخست زاده اش عسايا و پسران او. ۵ 5
यरूशलेमामध्ये राहणारे शिलोनी लोक असे, ज्येष्ठ पुत्र असाया आणि त्याचे पुत्र.
و از بني زارَح يعُوئيل و براران ايشان ششصد و نود نفر. ۶ 6
यरूशलेममधील जेरह चे वंशज म्हणजे यऊवेल आणि त्याचे एकंदर सहाशे नव्वद भाऊबंद.
و از بني بنيامين سَلُّو ابن مَشُلاّمِ بن هُودُويا ابن هَسنُوآه. ۷ 7
बन्यामीन घराण्यातील लोक: सल्लू हा मशुल्लामचा पुत्र. मशुल्लाम होदव्याचा पुत्र. होदवा हस्सनुवाचा पुत्र.
و يبنِيا ابن يرُوحام و اِيلَة بن عُزِّي ابن مِکرِي و مَشُلاّم بن شَفَطيا بن رَاؤئيل بن يبنِيا. ۸ 8
इबनया हा यरोहामाचा पुत्र. एला उज्जीचा पुत्र. उज्जी मिख्रीचा पुत्र. मशुल्लाम शफाट्याचा पुत्र. शफाट्या रगुवेलचा पुत्र रगुवेल इबनीया याचा पुत्र.
و برادران ايشان بر حسب انساب ايشان نه صد و پنجاه و شش نفر. جميع اينها رؤساي اجداد بر حسب خاندانهاي آباي ايشان بودند. ۹ 9
त्याचे नातेवाइक वंशावळीच्या यादीत लिहिले ते एकंदर नऊशें छपन्न होते. हे सर्व आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते.
و از کاهنان، يدَعيا و يهُوياريب و ياکين، ۱۰ 10
१०यरूशलेममधील याजक यदया, यहोयारीब, याखीन, अजऱ्या.
عَزَريا ابن حِلقيا ابن مَشُلاّم بن صادوق بن مَرايوت بن اَخيطُوب رئيس خانه خدا، ۱۱ 11
११अजऱ्या हा हिल्कीयाचा पुत्र. हिल्कीया मशुल्लामचा पुत्र. मशुल्लाम सादोकाचा. सादोक मरायोथचा आणि मरायोथ अहीटूबचा पुत्र. अहीटूब हा देवाच्या मंदिरावरील प्रमुख अधिकारी होता.
و عَدايا ابن يرُوحام بن فَشحُور بن مَلکيا و مَعَساي ابن عَديئيل بن يحزيره بن مَشُلاّم بن مَشِليمِيت بن اِمّير. ۱۲ 12
१२यरोहामाचा पुत्र अदाया होता. यहोराम हा पशहूरचा पुत्र. पशहूर मल्कीयाचा, आणि अदीएलचा पुत्र मसय. अदीएल यहजेराचा पुत्र, यहजेरा मशुल्लामचा पुत्र, मशुल्लेम मशिल्लेमीथचा, मशिल्लेमीथ इम्मेराचा पुत्र.
و برادران ايشان که رؤساي خاندان آباي ايشان بودند، هزار و هفتصد شصت نفر که مردان رشيد به جهت عمل خدمت خانه خدا بودند. ۱۳ 13
१३असे एकंदर एक हजार सातशे साठ याजक होते. ते आपापल्या घराण्यांचे मुख्य होते. देवाच्या मंदिरातील सेवेच्या कामात फार प्रवीण होते.
و از لاويان شَمَعيا ابن حَشُّوب بن عَزريقام بن حَشَبيا از بني مَراري. ۱۴ 14
१४यरूशलेममधील लेवी घराण्यातले लोक हश्शूबचा पुत्र शमाया. हश्शूब अज्रीकामचा पुत्र. अज्रीकाम हशब्याचा पुत्र. हशब्या हा मरारीच्या वंशातला.
و بَقبَقَّر و حارَش و جَلال و مَتَنيا ابن ميکا ابن زِکرِي ابن آساف. ۱۵ 15
१५याखेरीज बकूबकर, हेरेश, गालाल आणि मतन्या हे ही यरूशलेमामध्ये राहत होते. मत्तन्या मीखाचा पुत्र. मीखा जिख्रीचा पुत्र. जिख्री आसाफचा पुत्र.
و عَوبَديا ابن شَمَعيا ابن جَلال و بن يدُوتُون و بَرخِيا ابن آسا ابن اَلقانَه که در دهات نَطُوفاتيان ساکن بود. ۱۶ 16
१६ओबद्या शमाया याचा पुत्र. शमाया गालालचा पुत्र. गालाल यदूथूनचा पुत्र. याखेरीज आसा याचा पुत्र बरेख्या हाही तेथे राहत होता. आसा एलकानाचा पुत्र. हा नटोफाथी लोकांच्या जवळच्या छोट्या गावांमध्ये राहत होता.
و در بانان، شَلُّوم و عَقُّوب و طَلمُون و اَخِيمان و برادران ايشان. و شَلُّوم رئيس بود. ۱۷ 17
१७यरूशलेममधील द्वाररक्षक शल्लूम, अक्कूब, तल्मोन, अहीमान आणि त्यांचे नातलग. शल्लूम हा त्यांच्यावरचा मुख्य.
و ايشان تا الآن بر دروازه شرقي پادشاه (مي باشند) و در بانانِ فرقه بني لاوي بودند. ۱۸ 18
१८हे लोक आता राजाच्या पूर्वेकडच्या प्रवेशद्वारापाशी उभे असतात. हे लेवीच्या वंशातले होते.
و شَلُّوم بن قُورِي ابن اَبيآ ساف بن قُورَح و برادرانش از خاندان پدرش يعني بني قُورَح که ناظران عمل خدمت و مستحفظان دروازه هاي خيمه بودند و پدران ايشان ناظران اُردوي خداوند و مستحفظان مدخل آن بودند. ۱۹ 19
१९शल्लूम हा कोरे याचा पुत्र. कोरे हा एब्यासाफचा पुत्र. एब्यासाफ कोरहचा पुत्र. शल्लूम आणि त्याचे भाऊबंद हे द्वारपाल होते. ते कोरहाच्या वंशातले होते. निवासमंडपाच्या द्वाररक्षणाचे काम त्यांच्याकडे होते. आपल्या पूर्वजांप्रमाणेच ते परमेश्वराच्या छावणीवर कामदार असून व्दारपालाचे काम पार पाडत होते.
و فينَحاس بن اَلعازار، سابق رئيس ايشان بود. و خداوند با وي مي بود. ۲۰ 20
२०पूर्वी फिनहास द्वारपालाचा प्रमुख होता. फिनहास हा एलाजाराचा पुत्र. परमेश्वर त्याच्या बरोबर होता.
و زکريا ابن مَشَلَمِيا دربان دروازه خيمه اجتماع بود. ۲۱ 21
२१मशेलेम्या याचा पुत्र जखऱ्या “दर्शनमंडपाचा” द्वारपाल होता.
و جميع ايناني که براي درباني دروازه ها منتخب شدند، دويست دوازده نفر بودند و ايشان در دهات خود بر حسب نسب نامه هاي خود شمرده شدند که داود و سموئيلِ رائي ايشان را بر وظيفه هاي ايشان گماشته بودند. ۲۲ 22
२२निवासमंडपाचे रक्षण करणारे असे एकंदर दोनशे बारा निवडक द्वाररक्षक होते. आपापल्या गावांच्या वंशावळ्यांमध्ये त्यांची नावे लिहिलेली आहेत. त्यांचा विश्वासूपणा पाहून दावीद आणि शमुवेल संदेष्टा यांनी त्यांची नेमणूक केली होती
پس ايشان و پسران ايشان بر دروازه هاي خانه خداوند و خانه خيمه براي نگهباني آن گماشته شدند. ۲۳ 23
२३परमेश्वराच्या मंदिराच्या, निवासमंडपाच्या प्रवेशद्वारांवर राखण करण्याची जबाबदारी या द्वारपालांची आणि त्यांच्या वंशजांची होती.
و دربانان به هر چهار طرف يعني مشرق و مغرب و شمال و جنوب بودند. ۲۴ 24
२४पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशी चार दिशांना प्रवेशद्वारे होती.
و برادران ايشان که در دهات خود بودند، هر هفت روز نوبت به نوبت با ايشان مي آمدند. ۲۵ 25
२५आसपासच्या गावांमध्ये राहणारे द्वारपालांचे नातेवाईक वेळोवेळी त्यांच्या मदतीला येत. आले की सलग सात दिवस मदतीला राहत.
زيرا چهار رئيس دربانان که لاويان بودند، منصب خاصّ داشتند و ناظرانِ حجره ها و خزانه هاي خانه خدا بودند. ۲۶ 26
२६या सर्व द्वारपालांचे नायकत्व चार लेवी द्वारपालांकडे होते. देवाच्या मंदिरातील खोल्या आणि खजिना यांची जपणूक करण्याचे काम त्यांचे होते.
و به اطراف خانه خدا منزل داشتند زيرا که نگاه بانيش بر ايشان بود، و باز کردن آن هر صبح بر ايشان بود. ۲۷ 27
२७देवाच्या मंदिरावर पहारा करण्यासाठी ते रात्रभर त्यासभोवती जागे राहत. दररोज सकाळी मंदिराचे दरवाजे उघडण्याचे काम त्यांच्याकडे होते.
و بعضي از ايشان بر آلات خدمت مأمور بودند، چونکه آنها را به شماره مي آوردند و به شماره بيرون مي بردند. ۲۸ 28
२८त्यांच्यातले काहीजण मंदिरात उपयोगात येणाऱ्या पात्रांची देखभाल करत. ती पात्रे बाहेर काढताना आणि पुन्हा आत ठेवताना ते ती मोजून ठेवत असत.
از ايشان بر اسباب و جميع آلات قدس و آردِ نرم و شراب و روغن و بخور و عطريات مأمور بودند. ۲۹ 29
२९आणि त्यांच्यांतले काहीजण सामानावर व पवित्रस्थानाच्या सर्व पीठ, द्राक्षरस, तेल, धूप, सुवासिक द्रव्य आणि साधनांची काळजी घेण्यास यावर नेमलेले होते.
و بعضي از پسران کاهنان، عطريات خوشبو را ترکيب مي کردند. ۳۰ 30
३०याजकांचे काही पुत्र सुवासिक द्रव्याचे मिश्रण करण्याचे काम करत असत.
و مَتَّتيا که از جمله لاويان و نخست زاده شَلُّوم قُورَحي بود، بر عمل مطبوخات گماشته شده بود. ۳۱ 31
३१लेव्यातला एक मत्तिथ्या, जो शल्लूम कोरही याचा थोरला पुत्र होता. अर्पणाच्या भाकरी तयार करण्याऱ्यांचा प्रमुख होता.
و بعضي از برادران ايشان از پسران قَهاتيان، بر نان تَقدِمه مأمور بودند تا آن را در هر روز سبت مهيا سازند. ۳۲ 32
३२कहाथीच्या वंशातील त्यांचे काही भाऊ, प्रत्येक शब्बाथवारी समक्षतेच्या भाकरी तयार करण्याऱ्यांचे प्रमुख होते.
و مغنيان از رؤساي خاندان آباي لاويان در حجره ها سکونت داشتند و از کار ديگر فارغ بودند زيرا که روز و شب در کار خود مشغول مي بودند. ۳۳ 33
३३लेव्यांच्या घराण्यांचे प्रमुख गायक होते ते मंदिरातील खोल्यांत राहत होते. कारण जेव्हा ते कामातून मोकळे होत असत, त्यांना रात्रंदिवस आपले नेमून दिलेले काम करावे लागत असे.
اينان رؤساي خاندان آباي لاويان و بر حسب انساب خود رئيس بودند و در اورشليم سکونت داشتند. ۳۴ 34
३४हे लेव्यांच्या घराण्यांतील प्रमुख होते, जशी त्यांची वंशावळ्यांमध्ये नोंद केली होती. ते यरूशलेमात राहत होते.
و در جِبعُون، پدر جِبعُون، يعوئيل سکونت داشت و اسم زنش مَعکَه بود. ۳۵ 35
३५गिबोनाचा पिता ईयेल गिबोनात राहत होते. त्याच्या पत्नीचे नाव माका होते.
و نخست زاده اش عَبدون بود، پس صور و قَيس و بَعل و نير و ناداب، ۳۶ 36
३६ईयेल्याच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव अब्दोन. सूर, कीश, बाल, नेर आणि नादाब त्याची आणखी पुत्र,
و جَدُور و اَخِيو و زَکريا و مِقلُوت؛ ۳۷ 37
३७गदोर, अह्यो, जखऱ्या आणि मिकलोथ ही त्याचीच अपत्ये.
و مِقلُوت شِمآم را آورد و ايشان نيز با برادران خود در اورشليم در مقابل برادران ايشان ساکن بودند. ۳۸ 38
३८मिकलोथ शिमामाचा पिता होता. तेसुध्दा यरूशलेमेमध्ये आपल्या भाऊबंदाजवळच राहत होते.
و نير قَيس را آورد و قَيس شاؤل را آورد و شاؤل يهُوناتان و مَلکيشوع و ابيناداب و اَشبَعل را آورد. ۳۹ 39
३९नेर हा कीशाचा पिता होता. कीश शौलाचा पिता होता. शौल योनाथान, मलकीशुवा, अबीनादाब आणि एश्बालाचा पिता होता.
و پسر يهُوناتان، مَريب بَعل بود و مَريب بَعل ميکا را آورد. ۴۰ 40
४०मरीब्बाल हा योनाथानाचा पुत्र. मीखा हा मरीब्बालाचा पुत्र.
و پسر ميکا، فيتون و مالَک و تَحريع و آحاز بودند. ۴۱ 41
४१पीथोन, मेलेख आणि तरहेया हे मीखाचे पुत्र.
و آحاز يعرَه را آورد و يعره عَلمَت و عَزمُوت و زِمرِي را آورد و زِمرِي موصا را آورد. ۴۲ 42
४२आहाज याराचा पिता होता. यारा आलेमेथ, अजमावेथ आणि जिम्री यांचा पिता होता. जिम्रीन मोसाचा पिता होता.
و موصا بِنعا را آورد و پسرش رفايا و پسرش اَلعاسَه و پسرش آصيل. ۴۳ 43
४३मोसा बिनाचा पिता होता. बिना रफायाचा पिता होता. रफाया एलासाचा पिता होता. एलासा आसेलाचा पिता होता.
و آصيل را شش پسر بود و اين است نامهاي ايشان: عَزرِيقام و بُکرُو و اسمَعيل و شَعَريا و عُوبَديا و حانان اينها پسران آصيل مي باشند. ۴۴ 44
४४आसेलाला सहा पुत्र झाले. त्यांची नावे अज्रीकाम, बोखरु, इश्माएल, शाऱ्या, ओबद्या आणि हानान. ही आसेलाची अपत्ये होती.

< اول تواریخ 9 >