< Salmenes 48 >

1 Ein song, ein salme; av Korahs born. Stor er Herren og høglova i vår Guds by, på hans heilage fjell.
कोरहाच्या पुत्राचे स्तोत्रगीत. आमच्या देवाच्या नगरात, त्याच्या पवित्र पर्वतावर, परमेश्वर थोर आणि परमस्तुत्य आहे.
2 Fager i si høgd, ein fagnad for all jordi er Sions fjell, utkanten av nordheimen, staden til den store kongen.
सियोन डोंगर, जो थोर राजाची नगरी आहे, पृथ्वीच्या बाजूस आहे, त्याचे सौंदर्य उच्चतेवर, सर्व पृथ्वीवर आनंद आणते.
3 Gud er i hans hallar kjend som ei fast borg.
देवाने तिच्या राजमहालांमध्ये आपणास आश्रयदुर्ग असे प्रगट केले आहे.
4 For sjå, kongarne kom saman og drog fram i lag.
कारण, पाहा, राजे एकत्र येत आहेत, ते एकत्र येऊन चढाई करून आले.
5 Dei såg - so vart dei forfærde, dei vart vitskræmde, flydde i bråhast.
त्यांनी पाहिले आणि ते विस्मित झाले. ते निराश झाले आणि पळत सुटले.
6 Ein skjelv greip deim der, ei bivring som hjå ei barnsjuk kvinna.
भयाने त्यांना गाठले, भीतीने त्यांचा थरकाप झाला. प्रसवणाऱ्या स्रीच्या वेदनांप्रमाणे त्यांना वेदना लागल्या.
7 Med austanvind bryt du sund Tarsis-skip.
पूर्वेकडच्या वाऱ्याने तू तार्शीशाची जहाजे मोडलीस.
8 Liksom me hev høyrt, so hev me no set det i Herren, allhers drotts by, i vår Guds by, Gud gjer honom fast til æveleg tid. (Sela)
होय, आम्ही ती गोष्ट ऐकली पण आम्ही ते सर्वशक्तिमान परमेश्वराच्या नगरात, आमच्या देवाच्या नगरात घडत असलेले पाहिले. देव ते शहर सदैव सामर्थ्यवान बनवतो.
9 Me grundar på din nåde, Gud, midt i ditt tempel.
देवा, आम्ही तुझ्या मंदिरात तुझ्या प्रेमदयेचा विचार करतो.
10 Som ditt namn, Gud, so er din pris alt til endarne av jordi; di høgre hand er full av rettferd.
१०देवा, जसे तुझे नाव आहे, तशी तुझी किर्ती पृथ्वीच्या शेवटापर्यंत आहे.
11 Sionsfjellet gled seg, Juda døtter fagnar seg yver dine domar.
११तुझ्या न्याय कृत्यांमुळे, सियोन पर्वत आनंद करो, यहूदाची कन्या हर्ष करोत.
12 Gakk ikring Sion, far rundt um henne, tel hennar tårn!
१२सियोने भोवती फिरा, शहर बघा, तिचे बुरुज मोजा.
13 Legg merke til hennar vollar, gakk igjenom hennar hallar, so de kann fortelja um det til den komande ætt.
१३उंच भिंती बघा, सियोनेच्या राजवाड्याचे वर्णन करा. नंतर तुम्ही पुढच्या पिढीला त्याबद्दल सांगू शकाल.
14 For denne Gud er vår Gud æveleg og alltid; han skal føra oss ut yver dauden.
१४कारण हा देव, आमचा देव, सदासर्वकाळ आहे. तो सर्वकाळ आमचा मार्गदर्शक होईल.

< Salmenes 48 >