< Salmenes 24 >
1 Av David, ein salme. Jordi høyrer Herren til - og alt det som fyller henne, jordriket og dei som bur i det.
१दाविदाचे स्तोत्र. भूमी आणि तिच्यावरील परिपूर्णता परमेश्वराची आहे. जग आणि त्यातील सर्व राहणारे परमेश्वराचे आहेत.
2 For han hev grunnlagt henne på havi og grunnfest henne på strøymande vatn.
२कारण त्याने समुद्रावर तिचा पाया घातला, आणि जलांवर त्याने ती स्थापली.
3 Kven skal stiga upp på Herrens fjell, og kven skal standa på hans heilage stad?
३परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल? परमेश्वराच्या पवित्र मंदिरात कोण उभा राहू शकतो?
4 Den som hev skuldlause hender og reint hjarta, som ikkje hev vendt sin hug til lygn og ikkje svore med svik.
४ज्याचे हात निर्मळ आहेत, ज्यांचे हृदय शुद्ध आहे, ज्याने आपला जीव खोटेपणाकडे उंचावला नाही, आणि ज्याने दुष्टपणाने शपथ वाहिली नाही.
5 Han skal bera velsigning med frå Herren og rettferd frå Gud, sin frelsar.
५तो परमेश्वराकडून आशीर्वाद प्राप्त करेल, आणि त्यालाच त्याच्या तारणाऱ्या देवापासून न्यायीपण मिळेल.
6 Dette er deira ætt som spør etter honom, dei som søkjer di åsyn, Jakobs born. (Sela)
६हिच पिढी त्यास शोधणारी आहे, जी याकोबाच्या देवाचे मुख शोधते.
7 De portar, lyft upp dykkar hovud! ja lyft dykk upp, de ævelege dører, so kongen den herlege kann koma inn!
७अहो! वेशींनो, आपले मस्तक उंच करा. पुर्वकालीन द्वारांनो, उंच व्हा, म्हणजे गौरवशाली राजा आत येईल.
8 Kven er kongen den herlege? Herren sterk og veldug, Herren veldug i strid.
८गौरवशाली राजा कोण आहे? तोच परमेश्वर, सामर्थ्यशाली आणि थोर आहे.
9 De portar, lyft upp dykkar hovud! ja lyft dykk upp, de ævelege dører, so kongen den herlege kann koma inn!
९वेशींनो, तुमची मस्तके उंच करा. सर्वकाळच्या दरवाजांनो, तुम्ही उंच व्हा, म्हणजे गौरवशाली राजा आत येईल.
10 Kven er då kongen den herlege? Herren, allhers drott; han er kongen den herlege. (Sela)
१०तो गौरवशाली राजा कोण आहे? सेनाधीश परमेश्वरच तो राजा आहे, तोच तो गौरवशाली राजा आहे.