< Salmenes 146 >
1 Halleluja! Mi sjæl, lova Herren!
१परमेश्वराची स्तुती करा. हे माझ्या जिवा, परमेश्वराची स्तुती कर.
2 Eg vil lova Herren so lenge eg liver, syngja lov for min Gud medan eg er til.
२मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत परमेश्वराची स्तुती करीन. मला अस्तित्व आहे तोपर्यंत मी माझ्या देवाची स्तवने गाईन.
3 Set ikkje lit til hovdingar, til ein menneskjeson som ikkje kann hjelpa.
३अधिपतींवर किंवा ज्याच्याठायी तारण नाही, अशा त्या मनुष्यजातीवर भरवसा ठेवू नका.
4 Fer hans ande ut, so vender han attende til si jord, den dagen er det ute med hans tankar.
४जेव्हा त्याचा श्वास थांबतो, तो मातीस परत जातो; त्यादिवशी त्याच्या योजनेचाही शेवट होतो.
5 Sæl er den som hev Jakobs Gud til hjelp, som vonar på Herren, sin Gud!
५ज्याच्या मदतीला याकोबाचा देव आहे, ज्याची आशा आपला देव परमेश्वर यावर आहे, तो आशीर्वादित आहे.
6 han som hev skapa himmel og jord, havet og alt som i deim er, han som er trufast til æveleg tid,
६परमेश्वराने स्वर्ग आणि पृथ्वी, समुद्र आणि त्यातील सर्वकाही निर्माण केले, तो सदासर्वकाळ आपले सत्य पाळतो.
7 han som gjev dei nedtyngde rett, han som gjev dei hungrige brød. Herren løyser dei bundne.
७तो जाचलेल्यांचा न्यायनिवाडा करतो, आणि तो भुकेल्यांना अन्न देतो. परमेश्वर बंदिवानास मुक्त करतो.
8 Herren opnar augo på dei blinde, Herren reiser dei nedbøygde, Herren elskar dei rettferdige,
८परमेश्वर आंधळ्यांचे डोळे उघडतो; परमेश्वर वाकलेल्यांना उभे करतो. परमेश्वर नितीमान लोकांवर प्रेम करतो.
9 Herren varar dei framande, farlause og enkjor held han uppe, men han villar vegen for dei ugudlege.
९परमेश्वर आपल्या देशात परक्यांचे रक्षण करतो. तो पितृहीनांना व विधवा यांना आधार देतो. परंतु तो वाईटांचा विरोध करतो.
10 Herren skal vera konge æveleg, din Gud, Sion, frå ætt til ætt. Halleluja!
१०परमेश्वर सर्वकाळ राज्य करतो, हे सीयोने, तुझा देव पिढ्यानपिढ्या राज्य करीतो. परमेश्वराची स्तुती करा.