< 4 Mosebok 16 >
1 Korah, son åt Jishar Kahatsson av Levi-ætti, og Datan og Abiram, sønerne hans Eliab, og On Peletsson av Rubens-ætti tok til å yppa seg mot Moses,
१कोरह इसहारचा मुलगा, इसहार कहाथचा मुलगा आणि कहाथ लेवीचा मुलगा, दाथान आणि अबीराम भाऊ होते आणि ती अलीयाबाची मुले होती. ओन पेलेथचा मुलगा होता. दाथान, अबीराम आणि ओन रऊबेन वंशातील होते. यांनी काही माणसे जमवली.
2 og saman med dei tvo hundrad og femti av dei øvste i Israels-lyden, som var kåra til tingmenner, og hadde eit godt namn.
२या चार मनुष्यांनी इस्राएलातून अडीचशे माणसे एकत्र जमविली आणि ते मोशेविरूद्ध उठले. ते लोकांनी निवडलेले नेते होते, हे सर्व लोकांस माहीत होते.
3 Dei slo seg i hop mot Moses og Aron, og sagde til deim: «No lyt det vera nok! Heile lyden er heilag, alle saman, og Herren er midt imillom deim; kvi vil då de all tid halda dykk gildare enn Herrens lyd?»
३ते मोशेविरूद्ध व अहरोनाविरूद्ध एकत्र समुहाने आले. ते त्यांना म्हणाले, “तुम्ही फारच अधिकार दाखवता आता पुरे झाले! इस्राएलाचे इतर लोकसुद्धा पवित्र आहेत. त्यांच्यात अजूनही परमेश्वर राहतो. तुम्ही परमेश्वराच्या इतर लोकांपेक्षा स्वत: ला अधिक महत्वाचे समजत आहात.”
4 Då Moses høyrde det, kasta han seg ned på jordi.
४जेव्हा मोशेने ते ऐकले, तो पालथा पडला.
5 Og han tala til Korah og heile flokken hans, og sagde: «I morgon vil Herren syna kven som er hans folk, og kven som er heilag og kann koma inn til honom, og dei som han då vel, skal få koma inn til honom.
५मग मोशे कोरह व त्याच्या सर्व अनुयायांना म्हणाला, “उद्या सकाळी परमेश्वर कोण खरोखर त्याचा मनुष्य आहे ते दाखवील. कोण खरा पवित्र आहे ते परमेश्वर दाखवील आणि परमेश्वर त्या मनुष्यास त्याच्याजवळ आणिल. परमेश्वर त्या मनुष्याची निवड करील आणि त्यास स्वत: जवळ आणिल.
6 Gjer no so, du Korah og heile flokken din: Tak i morgon med dykk glodfat,
६म्हणून कोरह तू आणि तुझ्या गटाने धुपाटणे आणा.
7 og hav eld i deim, og legg røykjelse på elden for Herrens åsyn, og den som Herren vel, han skal vera heilag. Lat so det vera nok, de Levi-søner!»
७उद्या अग्नी आणि धूप काही खास भांड्यात ठेवा. नंतर ती भांडी परमेश्वरासमोर आणा. खरोखरच जो पवित्र असेल त्याची परमेश्वर निवड करील. लेवीच्या वंशजांनो तुम्ही फार पुढे गेलात. तुम्ही चूक केलीत.”
8 Og endå sagde Moses til Korah: «Høyr no, de Levi-søner!
८मोशे कोरहाला आणखी म्हणाला, “लेवीच्या वंशजांनो तुम्ही माझे ऐका
9 Er de ikkje nøgde med at Israels Gud hev skilt dykk ut frå Israels-lyden, so de skulde vera næmare honom og greida arbeidet i Herrens hus, og ganga lyden til handa?
९तुमची निवड इस्राएलच्या देवाने केली आहे आणि तुम्हास खास दर्जा दिला आहे म्हणून तुम्ही आनंदी असायला हवे. तुम्ही इस्राएलच्या इतर लोकांपेक्षा वेगळे आहात. परमेश्वराने तुम्हास खास कामासाठी, इस्राएल लोकांस परमेश्वराची भक्ती करायला मदत व्हावी म्हणून त्याच्या पवित्र निवासमंडपात त्याच्याजवळ आणले. हे पुरेसे नाही का?
10 Han hev teke deg og alle brørne dine, Levi-sønerne, innåt seg, og no trår de etter preste-embættet og?
१०परमेश्वराने लेवीच्या वंशजांना याजकांच्या मदतीसाठी जवळ आणले. परंतु आता तुम्हीच याजक होण्याची वेळ प्रयत्न करीत आहात.
11 Det er mot Herren de hev slege dykk i hop, du og heile flokken din; for kva er Aron? Kann det vera verdt å setja seg upp i mot honom?»
११तुम्ही आणि तुमचे अनुयायी एकत्र आलात आणि परमेश्वराच्या विरूद्ध गेलात. अहरोनाने काही चूक केली का? नाही. मग तुम्ही अहरोनाविरूद्ध का तक्रार करीत आहात.”
12 So sende Moses bod etter Datan og Abiram, sønerne hans Eliab; men dei svara: «Me kjem ikkje!
१२नंतर मोशेने दाथान, अबीराम, या अलीयाबाच्या मुलांना बोलावले पण ते दोघे म्हणाले, आम्ही येणार नाही.
13 Er det ikkje nok at du lokka oss burt frå eit land som fløymer med mjølk og honning, so me skulde døy i øydemarki? Vil du no attpå råda og rikja yver oss?
१३तू आम्हास रानात जिवे मारावे म्हणून दूध व मध वाहण्याच्या देशातून काढून वर आणले आहेस हे काय थोडे आहे. आणि आता आमच्यावर तुझी अधिक सत्ता आहे हे तुला दाखवायचे आहे.
14 Ikkje heller hev du ført oss til eit land som fløymer med mjølk og honning, og gjeve oss åkrar og aldehagar til eiga! Trur du då du kann synkverva desse mennerne? Me kjem ikkje!»
१४आणखी तू आम्हास दूध व मध वाहण्याच्या देशात आणले नाही आणि आम्हास शेताचे व द्राक्षमळ्याचे वतन दिले नाही. आता तू पोकळ वचने देऊन आमचे डोळे आंधळे करीत आहेस काय? आम्ही तुझ्याकडे येणार नाही.
15 Då vart Moses brennande harm, og han sagde til Herren: «Ansa ikkje offeret deira! Ikkje so mykje som eit asen hev eg teke frå deim, og ingen av deim hev eg gjort noko til meins.»
१५म्हणून मोशेला खूप राग आला. तो परमेश्वरास म्हणाला, “मी या लोकांच्या बाबतीत काहीही वाईट केले नाही. मी त्यांच्याकडून एक गाढव देखील घेतले नाही! आणि मी कोणाचेही वाईट केले नाही.
16 So sagde han til Korah: «Møt no fram for Herrens åsyn i morgon, du og heile flokken din! Aron skal og møta fram,
१६नंतर मोशे कोरहाला म्हणाला, उद्या तू आणि तुझे अनुयायी परमेश्वरापुढे उभे राहतील. तिथे तू अहरोन आणि तुझे अनुयायी असतील.
17 og de skal taka kvar sitt glodfat og leggja røykjelse på deim, og bera deim fram for Herrens åsyn, tvo hundrad og femti glodfat, og du og Aron skal og taka kvar sitt glodfat.»
१७तुम्ही प्रत्येकाने एक भांडे आणावे त्यामध्ये धूप टाकावा आणि ते परमेश्वरास द्यावे. नेत्यांसाठी अडीचशे भांडी असतील आणि एकेक भांडे तुझ्यासाठी व अहरोनासाठी असेल.”
18 So tok dei kvar sitt glodfat, og hadde eld i deim, og lagde røykjelse på og stod i møtetjelddøri, og det same gjorde Moses og Aron;
१८म्हणून प्रत्येकाने भांडे आणले आणि त्यामध्ये उद धूप जाळला, नंतर ते दर्शनमंडपाच्या दारात उभे राहिले. मोशे आणि अहरोनसुद्धा तिथे उभे राहिले.
19 og Korah samla heile lyden imot dei framanfor møtetjelddøri. Då synte Herrens herlegdom seg for heile lyden.
१९कोरहानेसुद्धा त्याच्याविरुध्द दर्शनमंडपाच्या दारापाशी सर्व लोक जमा केले. नंतर प्रत्येकाला परमेश्वराचे तेज दिसले.
20 Og Herren tala til Moses og Aron, og sagde:
२०परमेश्वर मोशेला आणि अहरोनाला म्हणाला,
21 «Skil dykk frå denne lyden, so skal eg gjera ende på deim, so fort som ein blunkar med auga.»
२१या लोकांपासून दूर जा. मला आता त्यांचा नाश करायचा आहे.
22 Men dei kasta seg på kne, og sagde: «Allvelduge Gud, du som råder yver alle manneliv, vert du vill på heile lyden, for di ein mann syndar?»
२२पण मोशे आणि अहरोन जमिनीवर पालथे पडले आणि ओरडले, हे देवा सर्व देहधारी आत्म्यांच्या, देवा! फक्त एका मनुष्याने पाप केले आहे! म्हणून सर्व मंडळीवर रागावू नकोस.
23 Og Herren svara Moses:
२३नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला,
24 «Seg til folket at dei skal hava seg burt frå bustaden åt Korah og Datan og Abiram og frå alt som derikring er!»
२४सर्व लोकांस कोरह, दाथान, व अबीराम यांच्या तंबूपासून दूर जायला सांग.
25 So reiste Moses seg upp og gjekk burt til Datan og Abiram, og Israels hovdingar fylgde honom.
२५मोशे उभा राहिला आणि दाथान व अबीराम यांच्याकडे गेला. इस्राएलचे सर्व वडिलधारी त्यांच्यामागे गेले.
26 Og han tala til folket, og sagde: «Gakk burt frå husi åt desse gudlause mennerne, og kom ikkje innåt noko som høyrer deim til; elles kjem de og til å lida for alle synderne deira!»
२६मोशेने सर्व लोकांस बजावले, या दुष्टांच्या तंबू पासून दूर जा. त्यांच्या कोणत्याही वस्तुला हात लावू नका. जर तुम्ही हात लावला तर त्यांच्या पापामुळे तुमचाही नाश होईल.
27 Då flutte dei seg burt frå buderne åt Korah og Datan og Abiram og alt som var ikring um. Men Datan og Abiram kom ut og stod i buddøri med konorne sine og borni, både store og små.
२७म्हणून लोक कोरह, दाथान व अबीराम यांच्या तंबू पासून दूर गेले. दाथान आणि अबीराम त्यांच्या तंबूकडे गेले. ते त्यांच्या तंबू बाहेर आपल्या स्त्रिया, मुले आणि लहाण्या मुलांबरोबर उभे राहिले.
28 Og Moses sagde: «Dette skal de hava til merke på at Herren hev sendt meg til å gjera alle desse verki, og at det ikkje er av meg sjølv eg gjer det:
२८नंतर मोशे म्हणाला, “परमेश्वराने मला मी तुम्हास सांगितलेल्या गोष्टी करायला पाठवले आहे या बद्दलचा पुरावा मी तुम्हास दाखवीन. या गोष्टी करण्याची कल्पना माझी नव्हती हेही मी तुम्हास दाखवीन.
29 dersom desse døyr på same vis som anna folk, og møter lagnaden som alle andre menneskje, so hev Herren ikkje sendt meg;
२९हे इथले लोक मरतील. पण ते जर सामान्य रीतीने मरण पावले जशी माणसे नेहमी मरतात, तर त्यावरून असे दिसेल की परमेश्वराने मला खरेच पाठवले नाही.
30 men dersom Herren let henda noko som aldri fyrr hev hendt, dersom jordi let upp gapet sitt, og gløyper deim og alt som deira er, so dei fer livande ned i helheimen, so veit de at desse mennerne hev spotta Herren.» (Sheol )
३०पण जर परमेश्वराने या लोकांस वेगळ्या नव्या रीतीने मारले. तर तुम्हास कळेल की त्यांनी परमेश्वराविरूद्ध पाप केले होते. हा पुरावा आहे. धरती दुभागेल आणि त्या लोकांस आपल्या पोटात घेईल. ते जिवंतपणीच त्यांच्या कबरेत जातील. आणि त्यांची सर्व चीजवस्तू त्यांच्याबरोबर जाईल.” (Sheol )
31 Ikkje fyrr hadde han sagt dei ordi, so rivna grunnen under føterne deira;
३१जेव्हा मोशेचे बोलणे संपले तेव्हा त्या लोकांच्या पायाखालची जमीन दुभागली.
32 jordi let upp gapet sitt, og gløypte deim og husi deira og alt folket hans Korah og alt det dei åtte.
३२धरतीने जणू आपले तोंड उघडून त्यांना गिळून टाकले. कोरहाची सगळी माणसे, त्याचे संपूर्ण घराणे आणि त्यांची सर्व चीजवस्तू त्यांच्याबरोबर जमिनीत गेली.
33 Dei for livande ned i helheimen med alt som deira var, jordi gøymde deim, og dei kvarv burt or lyden. (Sheol )
३३ते लोक जिवंतपणी कबरेत गेले आणि त्यांची सगळी चीजवस्तूही त्यांच्याबरोबर गेली. नंतर जमीन पूर्ववत झाली. ते नष्ट झाले-लोकांतुन नाहीसे झाले. (Sheol )
34 Og heile Israel, som stod rundt ikring, rømde då dei høyrde skriket deira; dei var rædde jordi skulde gløypa deim med.
३४इस्राएल लोकांनी नाश होत असलेल्या लोकांचे आक्रोश ऐकले म्हणून ते सर्व सैरावैरा धावू लागले आणि म्हणाले, पृथ्वी आपल्यालासुद्धा गिळून टाकील.
35 So for det eld ut frå Herren, og brende upp dei tvo hundrad og femti mennerne som hadde bore fram røykjelse.
३५नंतर परमेश्वराकडून अग्नी आला. त्याने धूप जाळणाऱ्या अडीचशे लोकांचा नाश केला.
36 Då tala Herren til Moses, og sagde:
३६परमेश्वर मोशेशी पुन्हा बोलला व म्हणाला
37 «Seg til Eleazar, son åt Aron, øvstepresten, at han skal taka upp glodfati som ligg att der elden hev fare, og strå glørne vidt utyver! For heilage er dei,
३७याजक अहरोन याचा मुलगा एलाजार याला धुपाटणी अग्नीतून काढ कारण ती पवित्र आहेत आणि तो अग्नी पसरावयाला सांग.
38 glodfati åt desse mennerne som laut lata livet for syndi si; de skal hamra dei ut til plator, og klæda altaret med deim. Dei hev vorte framborne for Herrens åsyn; difor er dei heilage, og skal vera eit varsl for Israels-borni.»
३८लोकांनी माझ्याविरूद्ध पाप केले आणि त्यांच्या पापामुळे त्यांना प्राण गमवावे लागले. पण धुपाटणी भांडी अजूनही पवित्र आहेत. ही भांडी पवित्र आहेत कारण ती परमेश्वरास अर्पण केली होती. भांडी ठोकून त्याचा पत्रा कर. या पत्र्याचा उपयोग वेदी झाकायला कर. इस्राएलाच्या सर्व लोकांस हा ताकीद दिल्याचा इशारा असेल.
39 Og Eleazar, presten, gjorde som Moses hadde sagt honom frå Herren: han tok koparfati som dei hadde bore fram dei mennerne som brann upp, og smedarne hamra plator av deim til å klæda altaret med,
३९म्हणून याजक एलाजाराने लोकांनी आणलेली काशाची सर्व भांडी गोळा केली. ते सगळे लोक जळून गेले पण त्यांची भांडी मात्र होती. नंतर एलाजाराने काही मनुष्यांना भांडी ठोकून त्यांचा पत्रा करायला सांगितले. नंतर त्याने धातूचा पत्रा वेदीवर ठोकला व वेदी मढवली.
40 so Israels-borni skulde koma i hug at ingen framand, ingen som ikkje er av Arons ætt, må ganga fram og brenna røykjelse for Herrens åsyn; elles kjem han til å fara same ferdi som Korah og hans flokk.
४०परमेश्वराने मोशेला जशी आज्ञा केली होती तसेच त्याने केले. अहरोनाच्या वंशातीलच कोणीतरी परमेश्वरासमोर धूप जाळू शकतो, दुसऱ्या कोणी परमेश्वरासमोर धूप जाळला तर तो कोरह आणि त्याच्या अनुयायांप्रमाणे मरेल. हे इस्राएल लोकांनी लक्षात ठेवायची ही एक खूण होती.
41 Dagen etter mukka heile Israels-lyden mot Moses og Aron, og sagde: «Det er de som hev drepe Herrens folk!»
४१दुसऱ्या दिवशी इस्राएलच्या सर्व लोकांनी मोशे आणि अहरोनाविरूद्ध तक्रार केली. ते म्हणाले, तुम्ही परमेश्वराची माणसे मारली.
42 og ålmugen tok til å samla seg mot deim. Moses og Aron vende seg mot møtetjeldet; då såg dei at skyi låg yver tjeldet, og herlegdomen åt Herren skein fram.
४२मोशे आणि अहरोन दर्शनमंडपाच्या दारात उभे होते. लोक मोशे आणि अहरोन विरूद्ध तक्रार करायला एकत्र जमले. पण जेव्हा त्यांनी दर्शनमंडपाकडे पाहिले तेव्हा ढगांनी त्यास झाकून टाकले आणि तिथे परमेश्वराचे तेज दिसू लागले.
43 So gjekk dei fram for møtetjeldet,
४३हे पाहून मोशे आणि अहरोन दर्शनमंडपाच्या पुढच्या भागात आले.
44 Og Herren tala til Moses, og sagde:
४४मग परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
45 «Sjå til å koma dykk burt frå denne hopen, so skal eg tyna dei i ein augneblink!» Då kasta dei seg på kne,
४५त्या लोकांपासून दूर जा म्हणजे मी त्यांचा नाश करीन ताबोडतोब. मोशे आणि अहरोन यांनी त्यांचे चेहरे जमिनीपर्यंत लववून दंडवत घातले.
46 og Moses sagde til Aron: «Tak glodfatet; legg i gløder frå altaret, og hav røykjelse uppå, og skunda deg so burt til lyden med det, og gjer soning for deim! For Herren hev slept harmen sin laus - sotti er komi!»
४६नंतर मोशे अहरोनाला म्हणाला, तुझे तांब्याचे भांडे आणि थोडासा अग्नी वेदीवरुन घे. नंतर त्यावर धूप टाक. लवकर मंडळीकडे घेऊन जा आणि त्यांच्यासाठी प्रायश्चित कर. कारण. परमेश्वराचा कोप भडकला आहे; मरी सुरू झाली आहे.
47 Aron gjorde som Moses sagde, og tok glodfatet og sprang midt inn i flokken; sotti hadde då alt teke til å herja millom folket. So lagde han røykjelsen på gløderne, og bad ei soningsbøn for folket,
४७म्हणून अहरोनाने मोशेने जे सांगितले ते केले. अहरोनाने अग्नी व धूप घेतला आणि मग तो मंडळीमध्ये धावत गेला. परंतु लोकात मरीची लागण झाली होती आणि त्याने धूप घालून लोकांसाठी प्रायश्चित केले.
48 med han stod der millom daude og livande. Då stana sotti;
४८अहरोन मरण पावलेल्या आणि अजून जिवंत असलेल्या लोकांच्या मध्ये जाऊन उभा राहिला, अहरोनाने लोकांस पवित्र करण्यासाठी प्रायश्चित केले आणि मरी तिथेच थांबली.
49 men det var fjortan tusund og sju hundrad som døydde i den sotti, umfram deim som miste livet for Korahs skuld.
४९पण त्या मरीमुळे चौदा हजार सातशे लोक मरण पावले. यामध्ये कोरहामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचा समावेश नाही.
50 Då sotti hadde gjeve seg, gjekk Aron attende til Moses, til møtetjelddøri.
५०भयानक मरी थांबली आणि अहरोन परत दर्शनमंडपाच्या दाराशी असलेल्या मोशेकडे गेला.