< 3 Mosebok 10 >

1 Men tvo av Arons-sønerne, Nadab og Abihu, tok kvar sitt glodfat og hadde gløder i, og lagde røykjelse på gløderne, og bar framand eld fram for Herrens åsyn, det som han hadde forbode deim.
मग अहरोनाचे, पुत्र नादाब, व अबीहू ह्यानी आपआपली धुपाटणी घेतली व त्यामध्ये अग्नी पेटवला व त्यामध्ये धुप घालून तो अशास्त्र अग्नी परमेश्वरासमोर नेला, असा अग्नी परमेश्वरासमोर नेण्याची आज्ञा नव्हती;
2 Då for det eld ut frå Herren og tynte deim, og dei døydde for Herrens åsyn.
म्हणून परमेश्वरासमोरुन अग्नी निघाला व त्याने त्यांना भस्म केले; ते परमेश्वरासमोर मरण पावले.
3 Og Moses sagde med Aron: «Dette var det Herren meinte då han sagde: «Min heilagdom eg syner på deim som er meg næst, og alt folket let eg mitt velde lysa fram.»» Og Aron tagde.
मग मोशे अहरोनाला म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, ‘जे याजक माझ्याजवळ येतील. त्यांनी माझा मान राखलाच पाहिजे, मी पवित्र आहे हे त्यांना व सर्व लोकांस समजलेच पाहिजे. तेव्हा अहरोन, नादाब व अबीहू ह्यांच्या विषयी काहीही न बोलता गप्प राहिला.’”
4 Men Moses ropa på Misjael og Elsafan, sønerne hans Uzziel, som var farbror åt Aron, og sagde med deim: «Kom hit, og ber frendarne dykkar burt frå heilagdomen og ut or lægret!»
अहरोनाचा चुलता उज्जियेल ह्याला मिशाएल व एलसाफान असे दोन पुत्र होते. मोशे त्या मुलांना म्हणाला, “या पवित्रस्थानाच्या भागाकडे जा व तुमच्या बांधवांची प्रेते पवित्र स्थानासमोरून उचलून छावणीबाहेर घेऊन जा.”
5 So kom dei, og gjorde som Moses sagde, og bar deim ut or lægret i kjolarne deira.
तेव्हा मोशेने सांगितल्याप्रमाणे मिशाएल व एलसाफान यांनी त्यांना उचलून छावणीबाहेर नेले; त्यावेळी परमेश्वराची सेवा करताना घालावयाचे विणलेले विशेष अंगरखे नादाब व अबीहू ह्यांच्या अंगात अद्याप तसेच होते.
6 Og Moses sagde til Aron og til Eleazar og Itamar, sønerne hans: «De skal ikkje ganga med uflitt hår og ikkje riva sund klædi dykkar; for då kjem de til å missa livet, og han vert vreid på heile lyden. Men brørne dykkar, heile Israels-ætti, må gråta yver den elden som Herren sende.
मोशेने अहरोन व त्याचे पुत्र एलाजार व इथामार यांना सांगितले, “तुम्ही तुमचे केस मोकळे सोडू नका तर ते विंचरा, आणि तुमची वस्त्रे फाडू नका! तुमचे दु: ख दाखवू नका! म्हणजे मग तुम्ही मारले जाणार नाही आणि परमेश्वराचा राग सर्व मंडळीवर भडकणार नाही; सर्व इस्राएल घराणे तुमचे बांधव आहेत; नादाब व अबीहू ह्याना परमेश्वराने अग्नीने भस्म केल्याबद्दल त्यांनी शोक करावा;
7 Og frå møtetjelddøri må de ikkje røyva dykk, so sant de ikkje vil missa livet; for Herrens salvingsolje er på dykk.» Og dei gjorde som Moses sagde.
पण तुम्ही दर्शनमंडपाच्या बाहेर जाऊ नये; जर बाहेर जाल तर मराल! कारण परमेश्वराच्या अभिषेकाच्या तेलाने तुमचा अभिषेक झाला आहे.” तेव्हा अहरोन, एलाजार व इथामार ह्यांनी मोशेची आज्ञा मानली.
8 Og Herren tala til Aron, og sagde:
मग परमेश्वर अहरोनाला म्हणाला,
9 «Vin eller nokon sterk drykk må du og sønerne dine ikkje drikka, når de gjeng inn i møtetjeldet; for då kjem de til å missa livet. Det skal vera ei æveleg lov for deg og etterkomarane dine,
“जेव्हा तू व तुझे पुत्र तुम्ही दर्शनमंडपामध्ये जाल तेव्हा तुमच्यापैकी कोणीही द्राक्षरस किंवा मद्य पिऊ नये; प्याल तर मराल! हा तुमच्यासाठी पिढ्यानपिढया कायमचा विधि आहे.
10 so de kann skilja millom heilagt og vanheilagt og millom ureint og reint,
१०तुम्ही परमेश्वराच्या दृष्टीने पवित्र व सामान्य तसेच शुद्ध व अशुद्ध ह्यामधील भेद जाणावा;
11 og læra Israels-folket alle dei bodi som Herren hev late Moses kunngjera for deim».
११याप्रकारे परमेश्वराने मोशेद्वारे नेमून दिलेले सर्व विधीनियम अहरोनाने सर्व इस्राएल लोकांस शिकवावे.”
12 Sidan sagde Moses til Aron og til Eleazar og Itamar, deim av sønerne hans som var i live: «Tak det som er att av dei grjonofferi det hev bore fram for Herren, og et det usyrte frammed altaret; for det er høgheilagt.
१२मग मोशे अहरोनाला आणि एलाजार व इथामार या हयात असलेल्या त्याच्या मुलांना म्हणाला, परमेश्वराच्या अर्पणापैकी उरलेले अन्नार्पण घ्या व ते वेदीपाशी खमीराशिवाय खा, कारण ते परमपवित्र आहे;
13 De skal eta det på ein heilag stad; det er det som du og sønerne dine hev rett til av offergåvorne åt Herren; for so hev Herren sagt med meg.
१३परमेश्वरासाठी अर्पिलेल्या अर्पणाचा तो भाग आहे आणि मी दिलेल्या विधीनियमांच्या शिकवणुकीप्रमाणे तो भाग तुझा व तुझ्या मुलांच्या हक्काचा आहे; परंतु तो तुम्ही पवित्र जागी खावा.
14 Og svingebringa og lyftelåret skal de og eta på ein rein stad, du og sønerne og døtterne dine med deg; for det er den luten som er gjeven deg og borni dine av takkofferi frå Israels-folket.
१४“त्याप्रमाणे तू, तुझी मुले व तुझ्या मुली ह्यांनी, ओवाळलेला ऊर व मागचा पाय स्वच्छ ठिकाणी खावा; कारण इस्राएल लोकांनी केलेल्या शांत्यर्पणाच्या यज्ञापैकी तुला तो हक्क म्हणून दिला आहे.
15 Både lyftelåret og svingebringa skal dei bera fram i hop med offerfeittet, og svinga det att og fram for Herrens åsyn; sidan skal det høyra deg og borni dine til, og vera retten dykkar æveleg og alltid, soleis som Herren hev sagt.»
१५ओवाळणीचा ऊर व समर्पणाची मांडी ही चरबीच्या हव्याबरोबर ओवाळणीचे अर्पण म्हणून लोकांनी परमेश्वरासमोर ओवाळण्यासाठी आणावी; ओवाळून झाल्यावर परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे हा भाग तुझा व तुझ्या मुलाबाळांचा कायमच्या हक्काचा आहे.”
16 Då Moses tok til å spyrja etter syndofferbukken, fekk han vita at han var uppbrend. Då vart han harm på Eleazar og Itamar, deim som var att av sønerne hans Aron, og han sagde:
१६मोशेने पापार्पणाच्या बकऱ्याची बारकाईने विचारपूस केली असता तो जाळून टाकल्याचे त्यास कळाले; तेव्हा अहरोनाचे पुत्र एलाजार व इथामार ह्यांच्यावर मोशे भयंकर रागावला; तो म्हणाला,
17 «Kvi hev de ikkje ete syndofferet på den heilage staden? De veit då det er høgheilagt, og han hev gjeve dykk det på den måten at de skal taka burt syndeskuldi frå lyden og gjera soning for deim hjå Herren.
१७“तुम्ही पापार्पणाच्या बलीचे मांस पवित्रस्थानी खावयास पाहिजे होते; कारण ते परमपवित्र आहे! तुम्ही ते परमेश्वरासमोर का खाल्ले नाही? मंडळीचा अन्याय वाहून त्यांच्यासाठी परमेश्वरासमोर प्रायश्चित करावे म्हणून परमेश्वराने ते तुम्हास दिले होते;
18 Blodet vart ikkje bore innar i heilagdomen; difor skulde de ha ete offerkjøtet på den heilage staden, som eg sagde dykk.»
१८त्याचे रक्त पवित्रस्थानात आणण्यात आले नव्हते; माझ्या आज्ञेप्रमाणे तुम्ही त्याचे मांस पवित्र जागी बसून अवश्य खावयाचे होते.”
19 Då svara Aron: «Du veit at dei i dag hev bore fram syndofferet og brennofferet sitt for Herrens åsyn, og endå hev slik ei ulukka hendt meg. Um eg no hadde ete syndoffer i dag, trur du då Herren hadde tykt vel um det?»
१९परंतु अहरोन मोशेला म्हणाला, “पाहा, आज त्यांनी आपले पापार्पण व होमार्पण परमेश्वरासमोर अर्पण केले, आणि तरी आज माझ्यावर कशी संकटे आली आहेत हे तू जाणतोस; तेव्हा आज मी पापबली खाल्ला असता तर परमेश्वरास ते आवडले असते, असे तुला वाटते काय? नाही ना!”
20 Då Moses høyrde det, tykte han det var rett.
२०मोशेने हे ऐकले, तेव्हा त्याचे समाधान झाले.

< 3 Mosebok 10 >