< Jonas 2 >
1 Og Jona bad til Herren, sin Gud, frå buken åt fisken;
१नंतर माशाच्या पोटातून योनाने आपला देव परमेश्वर याची प्रार्थना केली
2 han sagde: «Eg ropa til Herren i mi naud, og han svara meg. Frå helheims buk ropa eg, og du høyrde mi røyst. (Sheol )
२तो म्हणाला, “मी आपल्या आपत्तीमध्ये परमेश्वरास हाक मारली, आणि त्याने मला उत्तर दिले; मी मृत्यूलोकाच्या पोटातून मदतीकरता हाक मारली! तू माझा आवाज ऐकलास. (Sheol )
3 Du kasta meg i djupet, midt i havet, og straumar kringsette meg, alle dine bylgjor og brot gjekk yver meg.
३तू मला समुद्रांच्या मध्यभागी खोल टाकले, आणि प्रवाहाने मला वेढले, तुझ्या सर्व उसळत्या लाटांचा कल्लोळ माझ्यावरून गेला.
4 Eg tenkte då: «Burt frå dine augo er eg støytt. Like vel, ditt heilage tempel skal eg atter få sjå.»
४आणि मी म्हणालो, ‘मी तुझ्या दृष्टीसमोरून टाकलेला आहे; तरी तुझ्या पवित्र मंदिराकडे मी पुन्हा डोळे लावीन?’
5 Vatni kringa seg um meg like til sjæli. Djupet kringsette meg; tang sveipte seg um hovudet mitt.
५जलांनी प्राण जाईपर्यंत मला झाकले; आणि डोहाने सर्वबाजूनी मला घेरले, समुद्रातील शेवाळाने माझ्या डोक्याला लपेटले.
6 Like til bergbotnarne sokk eg ned. Slåerne til jordi stengdest bak meg for alltid. Men du førde mitt liv upp or gravi, Herre, min Gud!
६मी पर्वतांच्या तळापर्यंत गेलो; पृथ्वीच्या अडसरांनी मला कायमचे कोंडून टाकले; तथापि माझ्या देवा परमेश्वरा, तू माझा जीव खड्डयातून वरती काढला आहे.
7 Då mi sjæl ormegtast i meg, kom eg Herren i hug, og mi bøn kom til deg i ditt heilage tempel.
७जेव्हा माझा जीव माझ्या ठायी व्याकुळ झाला; तेव्हा मी परमेश्वराचे स्मरण केले, आणि माझी प्रार्थना तुझ्या पवित्र मंदिरात पोहंचली.
8 Dei som tek vare på tome avgudar, gjeng frå si miskunn.
८जे निरर्थक मूर्तींकडे आपले चित्त लावतात, ते स्वतः आपल्या दयानिधीला नाकारतात.
9 Men med lovsongs tonar vil eg ofra til deg, det eg lova, vil eg halda. Hjå Herren er frelsa!»
९परंतु मी आभार मानण्याच्या वाणीने तुझ्याकडे यज्ञ अर्पण करीन; जो नवस मी केला आहे तो मी पूर्ण करीन, तारण परमेश्वराकडूनच आहे.”
10 Då baud Herren fisken, og han spydde Jona upp på land.
१०मग परमेश्वराने त्या मोठ्या माश्याला आज्ञा केली; तेव्हा त्याने योनाला कोरडया भूमीवर ओकून टाकले.