< Jobs 31 >
1 Med augo hev eg gjort ei pakt; eg skal’kje skygna etter møy.
१“मी माझ्या डोळ्यांशी करार केला आहे, मग मी अभिलाषेने कसे एखाद्या कुमारीकडे बघू?
2 Kva gav meg elles Gud der uppe? Kva arv gav Allvald frå det høge?
२वरून देवाकडून कोणता वाटा मिळणार आहे, कोणता वारसा सर्वशक्तिमान उच्च देवाकडून प्राप्त होणार?
3 Kjem ikkje udådsmann i naud? Og illgjersmenn i ulukka?
३मी असा विचार आपत्ती ही अनितीमानांसाठी आहे, आणि अनर्थ हा दृष्टपणा करणाऱ्यांसाठी आहे.
4 Ser ikkje han på mine vegar? Tel ikkje han kvart stig eg gjeng?
४देव माझे सर्व मार्ग पाहत नाही का? आणि माझे सर्व पाऊल मोजत नाही का?
5 Dersom eg fram med fals hev fare, og foten sprunge etter svik
५जर मी असत्याने चाललो असेल, जर माझ्या पाऊलांनी कपट करण्याची घाई केली असेल,
6 - Gud vege meg på rettferds vegt, so han kann sjå eg skuldlaus er! -
६मला समपातळीच्या तराजूने तोलून द्या म्हणजे देवाला माझ्या प्रामाणिकपणा कळून येईल.
7 Veik mine stig frå vegen av, hev hjarta etter augo gjenge, var det ein flekk på mine hender,
७मी जर योग्य मार्गापासून दूर गेलो असेन, जर माझे मन माझ्या डोळ्यामागे जात असेल, जर माझ्या हातांस अशुद्धतेचा दाग चिकटला असेल.
8 so gjev ein annan et mitt såd, og riv mi planting upp med rot!
८तर मी पेरलेले दुसरा खावो, खरोखर माझ्या शेतातील पीक उपटून टाकले जावो.
9 Let eg min hug av kvinna dåra, sneik eg til grannens dør meg fram,
९जर माझे मन दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षित झाले असेल, जर मी आपल्या शेजाऱ्याच्या दाराकडे त्याच्या पत्नीची वाट बघत थांबलो असेल.
10 so lat mitt viv åt andre mala, og andre yver ho seg bøygje!
१०तर माझी पत्नी दुसऱ्या मनुष्यासाठी दळण करो, आणि दुसरी माणसे तिच्यावर खाली धुकतो.
11 For dette er ei skjemdarferd, eit brot som dom og straff fortener,
११कारण ते भयकर दुष्टपणाचे कृत्य होईल; खरोखर या न्यायधिशांनी शिक्षा करावी असे हे दुष्टकृत्य आहे.
12 ein eld som eta vil til avgrunns og øydeleggja all mi eiga.
१२लैंगिक पाप माझ्या सर्वस्वाचा नाश करील. सर्वस्वाचा होम करणारी ती आग आहे.
13 Vanvyrd’ eg retten åt min træl og trælkvinna i trætta med deim?
१३माझ्या स्त्री व पुरूष चाकरांनी माझ्या विरुध्द वादविवाद केला असेल, तेव्हा मी न्यायाने वागण्याचे मान्य केले नाही,
14 - Kva gjord’ eg då, når Gud reis upp? Kva svara eg, når han meg klaga?
१४तर मी जेव्हा देवासमोर जाईन तेव्हा मी काय करु? देवाने माझ्या वागण्याचा जाब विचारला तर मी काय उत्तर देऊ?
15 Dei er som meg i morsliv skapte; ein forma oss i moderfang -
१५ज्याने मला गर्भात निर्माण केले त्यानेच त्यांना घडवले नाही का? त्यानेच आपल्या सर्वांची गर्भात निर्मिती केली नाही का?
16 Um eg sagde nei når arming bad, og let enkja gråtande gå burt,
१६मी गरीबांना त्यांच्या ईच्छेपासून रोखले असेल. किंवा मी जर विधवांना रडवण्यास त्यांचे डोळे शिणवले असेल.
17 hev eg mitt brød åleine ete, so farlaus inkje fekk ein bit,
१७आणि जर मी माझ्या अन्नाचे सेवन एकट्याने केले असेल, आणि मी पोरक्यांना नेहमी अन्न दिले नसेल,
18 - nei, far for han eg var frå yngdi, frå morsliv var eg hennar førar -
१८(त्याऐवजी माझ्या तारूण्यापासून माझ्याबरोबर पोरके बापाकडे जसे मुले वाढतात तसे वाढले आहेत) आणि मी विधवांची काळजी लहाणपणापासुन वाहीली आहे.
19 Såg eg ein stakar utan klæde, ein fatig utan yverplagg,
१९जेव्हा मला कपडे नाहीत म्हणून दु: खी होणारे लोक दिसले किंवा कोट नसलेले गरीब लोक दिसले.
20 og so hans lender ei meg signa, og ei mi saueull han vermde,
२०त्यांनी मला अंत: करणापासून कधी आशीर्वाद दिले नाही कारण त्यांना मी माझ्या मेंढ्यांची लोकर त्यांना उबदार ठेवण्यासाठी वापरली नाही.
21 hev eg mot farlaus handi lyft, av di eg medhald fekk i retten:
२१माझे समर्थक शहराच्या दरवाजाजवळ जवळ पाहून जर मी पोरक्यावर हात उगारत असेल
22 Let herdi mi or led då losna, og armen brotna frå sitt bein!
२२मी जर कधी असे केले तर माझा हात माझ्या खांद्यांपासून निखळून जावो आणि माझा हात माझ्या खांद्याच्या सांध्यातून तुटून पडो.
23 For eg var ovleg rædd Guds straff, eg magtlaus stod framfor hans velde.
२३परंतु यापैकी मला देवाच्या शिक्षेची भीती वाटते, म्हणून मी यापैकी कोणतीही गोष्ट करत नाही.
24 Um eg mi lit til gullet sette, og voni til det fine gull,
२४जर मी सोन्याला माझी आशा केले, ‘तू माझी आशा आहेस असे’ मी शुध्द सोन्याला कधीच म्हटले नाही.
25 Gledde eg meg ved auka rikdom, og alt eg vann meg med mi hand,
२५मी श्रीमंत होतो पण मला त्याचा अभिमान नव्हता. मी खूप पैसे कमावले पण मी सुखी झालो नाही.
26 såg eg på ljoset når det stråla, på månen der han skreid i glans,
२६जर मी चमकत्या सूर्याला पहिले, किंवा चंद्र त्याच्या तेजात चालतांना पाहून,
27 vart hjarta mitt i løyndom dåra, so kyss på hand til deim eg sende,
२७माझे मन गुप्तपणे आकर्षित होऊन त्यांची पूजा करण्या करीता मी माझ्या हाताचे चुंबन घेतले असते तर
28 so var det og straffande brot, då neitta eg min Gud der uppe.
२८ते सुध्दा शिक्षा करण्यासारखेच पाप आहे. कारण ते सर्वशक्तिमान देवाचा विश्वासघात केल्यासारखे झाले असते.
29 Hev eg meg gledt ved uvens uferd, og jubla når han kom i skade,
२९माझ्या शत्रूंचा पाडाव झाल्याचा मला कधीच आनंद वाटला नाही. किंवा माझ्या शत्रूंवर संकट कोसळल्यामुळे मी त्यांना कधी हसलो नाही.
30 - men eg let ikkje munnen synda og banna honom ifrå livet -
३०(खरोखर, माझ्या शत्रूंना शाप देऊन आणि त्यांच्या मरणाची इच्छा करून मी माझ्या तोंडाला कधी पाप करायला लावले नाही.)
31 hev ei mitt husfolk stendigt sagt: «Kven gjekk vel svolten frå hans bord?»
३१मी अपरिचितांना अन्न देतो, असा कोण आहे ज्याने ईयोबाचे अन्न खाल्ले नाही?
32 - Eg let’kje framand natta ute; for ferdamann eg opna døri -
३२परदेशी लोकांस रात्रीच्या वेळी शहरातील चौकात झोपायला लागू नये म्हणून मी त्यांना माझ्या घरी बोलावतो.
33 hev eg som Adam dult mi synd, og løynt mi misgjerd i min barm,
३३इतर लोक त्यांचे पाप लपविण्याचा प्रयत्न करतात परंतु मी माझा अपराध लपविण्याचा कधीच प्रयत्न केला नाही.
34 di eg var rædd den store hop og ottast spott frå ættefrendar, so stilt eg heldt meg innum dører?
३४कारण मला लोकांची भीती आहे, मला परिवाराच्या तिरस्काराची भीती वाटते. म्हणून मी शांत आहे आणि घराबाहेर जात नाही.
35 Å, vilde nokon høyra på meg! Sjå her er underskrifti mi, lat berre Allvald svara meg! Fekk eg den skrift min motpart skreiv,
३५अहो, माझे कुणीतरी ऐकावे असे मला वाटते. पाहा, मला माझी बाजू मांडू द्या, सर्वशक्तिमान देवाने मला उत्तर द्यावे अशी माझी इच्छा आहे. त्याच्या दृष्टीने मी काय चूक केली ती त्याने लिहून काढावी असे मला वाटते.
36 den skulde eg på oksli bera og binda på meg som ein krans
३६खरेच, मी ती खूण माझ्या गळ्याभोवती घालेन. मी ती राजमुकुटाप्रमाणे माझ्या मस्तकावर ठेवेन.
37 eg melde honom kvart mitt stig, og som ein hovding møta honom.
३७त्याने जर असे केले तर मी जे काही केले त्याचे स्पष्टीकरण देऊ शकेन. एखाद्या पुढाऱ्याप्रमाणे माझे मस्तक उंच करून मी त्याकडे येऊ शकेन.
38 Dersom min åker klagar meg, og um plogforerne lyt gråta,
३८मी दुसऱ्याकडून त्याची जमीन हिसकावून घेतली नाही. माझी जमीन चोरुन घेतली आहे असा आरोप माझ्यावर कोणीही करु शकणार नाही.
39 åt eg hans grøda ubetalt, tok livet eg av eigarmannen:
३९जर मी पिकाच्या धन्यास मोबदला न देता ते खाल्ले असेल व त्याच्या मृत्युला कारणीभूत झालो असेल,
40 Lat då for kveite klunger gro, og ugras der eg sådde bygg!» Her endar Jobs tale.
४०तर माझ्या शेतात गहू आणि सातू या ऐवजी काटे आणि गवत उगवू दे ईयोबचे शब्द इथे संपले.”