< 2 Mosebok 5 >

1 Sidan gjekk Moses og Aron fram for Farao og sagde: «So segjer Herren, Israels Gud: «Lat folket mitt fara, so dei kann halda høgtid for meg i øydemarki!»»
या गोष्टी घडल्यानंतर, मोशे व अहरोन फारोकडे गेले व त्यास म्हणाले, “इस्राएली लोकांचा देव परमेश्वर म्हणतो, माझ्या लोकांनी माझ्यासाठी रानात उत्सव करावा म्हणून त्यांना जाऊ दे.”
2 Då sagde Farao: «Kva er det for ein «Herre» som eg skal lyda, og lata Israel fara? Eg kjenner ikkje den «Herren», og eg vil ikkje lata Israel fara heller.»
फारो म्हणाला, “हा परमेश्वर कोण आहे? मी त्याचा शब्द का ऐकावा आणि इस्राएलाला जाऊ द्यावे? मी त्या परमेश्वरास ओळखत नाही. म्हणून इस्राएलाला मी जाऊ देणार नाही.”
3 «Hebræarguden hev møtt oss!» svara dei. «Gode, gjev oss lov å fara tri dagsleider ut i øydemarki og ofra til Herren, vår Gud, so han ikkje skal koma yver oss med sott eller sverd!»
मग अहरोन व मोशे म्हणाले, “इब्री लोकांचा देव आम्हांशी बोलला आहे. म्हणून आम्हांला रानात तीन दिवसाच्या वाटेवर जाऊ द्यावे आणि तेथे आमचा देव परमेश्वर याल यज्ञार्पण करू द्यावे अशी आम्ही आपणाला विनंती करतो. आणि आम्ही जर असे केले नाही तर तो मरीने किंवा तलवारीने आमच्यावर तुटून पडेल.”
4 Då sagde egyptarkongen til deim: «Moses og Aron, kvi hefter de folket burt frå det dei hev å gjera? Gakk til arbeidet dykkar!
परंतु मिसराचा राजा फारो त्यांना म्हणाला, “हे मोशे, हे अहरोना, तुम्ही लोकांस काम सोडून जायला का लावता? तुम्ही आपल्या कामावर माघारी चालते व्हा.
5 De ser kor mykje folk her er i landet no, » sagde Farao, «og so vil de lokka deim til å leggja ned arbeidet sitt!»
फारो त्यांना असेही म्हणाला, येथे आता आमच्या देशात खूप इब्री आहेत आणि तुम्ही त्यांना काम करण्यापासून थांबवत आहात.”
6 Og same dagen sagde Farao det til futarne og formennerne for arbeidsfolket:
त्याच दिवशी फारोने मुकादमांना व नायकांना आज्ञा दिली.
7 «Heretter skal de ikkje gjeva folket halm til mursteinen, som de fyrr hev gjort. Dei skal sjølve ganga og sanka seg halm.
तो त्यांना म्हणाला, “तुम्ही लोकांस विटा बनवण्याकरिता आजपर्यंत सतत गवत दिलेले आहे. परंतु आता त्यांना लागणारे गवत त्यांना स्वत: शोधून आणायला सांगा.
8 Men like mykje murstein skal de krevja av deim no som fyrr; de skal ikkje slå av på talet. For dei er late; difor skrik dei og segjer: «Me vil av og ofra til Guden vår.»
तरी पूर्वी इतक्याच विटा त्यांनी बनवल्या पाहिजेत. त्यामध्ये काही कमी करून स्वीकारू नका. कारण ते आळशी झाले आहेत. म्हणूनच ते ओरड करून म्हणतात, आम्हांला जाण्याची परवानगी दे आणि आमच्या देवाला यज्ञ करू दे.
9 Legg tyngre arbeid på kararne, so dei hev nok å gjera, og ikkje fer etter lygjerødor!»
तेव्हा त्यांच्यावर अधिक काम लादून त्यांना सतत कामात ठेवा. म्हणजे मग खोट्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाहीत.”
10 So gjekk futarne og arbeidsformennerne ut, og sagde til folket: «So segjer Farao: «Eg gjev dykk ikkje halm lenger.
१०म्हणून लोकांचे मुकादम व नायक लोकांकडे जाऊन म्हणाले, “फारो असे म्हणतो, तुम्हास विटा बनवण्यासाठी लागणारे गवत देणार नाही.
11 Gakk sjølve og finn dykk halm kvar de kann! Men i arbeidet dykkar fær de ikkje noko avslag.»»
११तेव्हा तुम्हास लागणारे गवत तुम्ही स्वत: च आणले पाहिजे. तुमचे काम काही कमी होणार नाही.”
12 Då spreidde folket seg utyver heile Egyptarland, og sanka helma til å bruka i staden for halmen.
१२म्हणून मग लोक गवत शोधण्याकरता सर्व मिसर देशभर पांगले.
13 Men futarne dreiv på og sagde: «Gjer arbeidet dykkar ferdigt, fullt dagsverk til kvar dag, som då de hadde halm for hand!»
१३त्यांच्यावर नेमलेले मुकादम त्यांच्याकडून अधिक काम करवून घेऊन पूर्वी इतक्याच विटा तयार करण्याकरता त्यांच्यामागे सतत तगादा लावत.
14 Og arbeidsformennerne som futarne åt Farao hadde sett yver Israels-folket, fekk hogg, og futarne sagde: «Kvi hev de ikkje gjort ifrå dykk ålaget dykkar anten i går eller i dag, som de fyrr gjorde?»
१४मिसराच्या मुकादमांनी इस्राएली लोकांवर नायक नेमले होते. त्यांना फारोच्या मुकादमांनी मार देऊन विचारले की, “तुम्ही पूर्वी जेवढ्या विटा बनवत होता तेवढ्या आता का बनवत नाही?”
15 Då gjekk arbeidsformennerne til Farao, og kjærde seg for honom og sagde: «Kvi fer du soleis med tenarane dine?
१५मग इस्राएली नायक तक्रार घेऊन फारोकडे गेले व म्हणाले, “आम्ही जे तुमचे सेवक त्या आमच्याशी तुम्ही अशा प्रकारे का वागत आहा?
16 Halm fær me ikkje, og like vel segjer dei til oss: «Gjer murstein!» Og so fær me hogg, endå det er dine folk som hev skuldi.»
१६तुम्ही आम्हांला गवत देत नाही, परंतु पूर्वी इतक्याच विटा बनवण्याचा हुकूम करता, आणि आता आपल्या दासांना मार मिळत आहे. पण सारा दोष आपल्या लोकांचा आहे.”
17 Men han sagde: «Late er de, late! Difor segjer de: «Me vil av og ofra til Herren!»
१७फारो म्हणाला, “तुम्ही आळशी आहात, म्हणूनच तुम्ही म्हणता, आम्हांला परमेश्वरास यज्ञ करायला जाऊ देण्याची परवानगी दे.
18 Gakk no av og arbeid! Og halm fær de ikkje, men mursteinen skal de greida, talet fullt!»
१८आता आपल्या कामावर माघारी जा. तुम्हास गवत काही मिळायचे नाही, परंतु पूर्वीप्रमानेच विटा तुम्ही केल्या पाहिजेत.
19 Arbeidsformennerne vart ille ved, då dei fekk høyra dei ordi: «De fær ikkje noko avslag på mursteinen dykkar, fullt dagsverk til kvar dag!»
१९आपण संकटात आहोत हे इस्राएली नायकांना समजले. कारण पूर्वी इतक्याच विटा व रोजचे काम त्यांना शक्य नव्हते.”
20 Då dei kom ut att frå Farao, møtte dei Moses og Aron, som stod og venta på deim.
२०फारोच्या भेटीनंतर परत जाताना त्यांना वाटेत मोशे व अहरोन भेटले;
21 Då sagde dei med deim: «Herren setje augo på dykk, og late dykk få like for di de hev gjort Farao og mennerne hans hatige på oss, og gjeve deim sverdet i handi til å drepa oss med!»
२१तेव्हा ते मोशे व अहरोन ह्यांना म्हणाले, “परमेश्वर तुम्हांकडे पाहो व तुम्हास शिक्षा करो. कारण फारो व त्याचे सेवक यांच्या दृष्टीने तुम्ही आम्हांला अपमानकारक केले आहे. आम्हांला मारून टाकण्यासाठी तुम्ही त्यांच्या हातात जणू तलवारच दिली आहे.”
22 Og Moses vende seg atter til Herren og sagde: «Herre, kvi fer du so ille med dette folket? Kvi hev du då sendt meg?
२२मग मोशेने परमेश्वराकडे परत जाऊन प्रार्थना करून म्हटले, “प्रभू, तू या लोकांस का त्रास देत आहेस? पहिली गोष्ट म्हणजे तू मला का पाठवलेस?
23 For alt ifrå den stund eg gjekk fram for Farao og tala i ditt namn, hev han ikkje gjort anna enn vondt mot dette folket, og du hev ikkje hjelpt folket ditt ein grand.»
२३मी तुझ्या नावाने बोलण्यासाठी फारोकडे आलो, तेव्हापासून तो या लोकांस त्रास देत आहे. आणि तू आपल्या लोकांस मुक्त तर मुळीच केले नाहीस.”

< 2 Mosebok 5 >