< 2 Samuel 1 >

1 Saul var dåen, og David var attkomen frå sigeren yver Amalek og hadde halde seg i Siklag tvo dagar.
शौलाच्या मृत्यूनंतर, अमालेक्यांचा संहार करून दावीद सिकलाग नगरात येऊन दोन दिवस राहिल्यानंतर,
2 Då hende det seg tridje dagen at han fekk sjå ein mann kom springande frå Sauls-lægret med sundrivne klæde og mold på hovudet. Då han kom burtåt David, fall han å gruve til jordi.
तिसऱ्या दिवशी, तेथे एक तरुण सैनिक आला. तो शौलाच्या छावणीतील होता. त्याचे कपडे फाटलेले आणि डोके धुळीने माखलेले होते. त्याने सरळ दावीदाजवळ येऊन लोटांगण घातले.
3 David spurde honom: «Kvar kjem du ifrå?» Han svara: «Eg hev kome meg undan frå Israels-lægret.»
दावीदाने त्यास विचारले, “तू कोठून आलास?” आपण नुकतेच इस्राएलांच्या छावणीतून आल्याचे त्याने सांगितले.
4 «Kor hev det gjenge?» spurde David, «seg meg det!» Han svara: «Folket rømde frå striden, mange av herfolket fall og døydde; Saul og Jonatan, son hans, er døydde og.»
तेव्हा दावीद त्यास म्हणाला, “मग युध्दात कोणाची सरशी झाली ते सांग बरे. तो म्हणाला, लोकांनी लढाईतून पळ काढला. बरेच जण युध्दात मरण पावले व शौल आणि त्याचा मुलगा योनाथान दोघेही प्राणाला मुकले.”
5 David spurde sveinen som kom med tidendi: «Kor veit du at Saul og Jonatan, son hans, er daude?»
दावीद त्या तरुणाला म्हणाला, “शौल व त्याचा पुत्र योनाथान हेही मरण पावले आहेत हे तुला कसे कळले?”
6 Då svara tidendsveinen: «Av eit hende høvde eg til å koma upp på Gilboafjellet og fekk sjå Saul studde seg til spjotet sitt, medan stridsvognerne og hestfolket sette inn på honom.
यावर तो तरुण सैनिक म्हणाला, “योगायोगाने मी गिलबोवाच्या डोंगरावरच होतो. तिथे शौल आपल्या भाल्यावर पडलेला मला दिसला. पलिष्ट्यांचे रथ आणि घोडेस्वार त्याच्या अगदी नजीक येऊन ठेपले होते.
7 Han vende seg og såg meg, og ropte på meg, og eg svara ja;
शौलाने मागे वळून पाहिले तेव्हा त्यास मी दिसलो त्याने मला बोलावले आणि मी त्याच्याजवळ गेलो.
8 Han spurde meg kven eg var; eg svara eg var ein amalekit.
त्याने माझी चौकशी केली मी अमालेकी असल्याचे त्यास सांगितले.
9 So bad han meg: «Kom hit og drep meg! eg hev fenge baneridi, alt med det endå er liv i meg.»
तेव्हा शौल म्हणाला, ‘मला अत्यंत दुखापत झाली आहे. तेव्हा मला मारून टाक. कारण मी मरणाच्या दाराशी उभा आहे.’
10 Eg gjekk då fram og gav honom banestyngen. Eg skyna han kunde ikkje liva når han stupte. Eg tok so hovudgullet og ein armring av honom og bar hit til deg, herre!»
१०त्याची जखमी अवस्था पाहता तो वाचणार नाही हे दिसतच होते, तेव्हा मी त्याचा वध केला. मग त्याचा मुकुट आणि दंडावरचे आभूषण काढून घेतले. स्वामी महाराज, त्याच वस्तू येथे तुमच्यासाठी मी आणल्या आहेत.”
11 Då tok David og reiv sund klædi sine. Sameleis gjorde alle fylgjesveinarne hans.
११हे ऐकून दावीदाला इतके दुःख झाले की त्या भरात त्याने आपले कपडे फाडले. त्याच्या सोबतच्या लोकांनीही त्याच्या सारखेच केले.
12 Dei øya og gret og fasta alt til kvelden, for di Saul og Jonatan, son hans, og Herrens folk og Israels ætt hadde falle for sverd.
१२दुःखाने त्यांनी आक्रोश केला. संध्याकाळपर्यंत त्यांनी काही खाल्ले नाही. शौल, त्याचा मुलगा योनाथान त्याचप्रमाणे परमेश्वराचे लोक म्हणजे इस्राएलाचे लोक युद्धात मृत्युमुखी पडले याबद्दल त्यांनी शोक केला.
13 David spurde tiendsveinen: «Kvar er du ifrå?» Han svara: «Framandmanns son, amalekit er eg.»
१३शौलाच्या मृत्युची बातमी आणणाऱ्या त्या तरुण सैनिकाला दावीदाने विचारले, “तू कुठला?” यावर तो म्हणाला, “मी अमालेकी असून एका परदेशी मनुष्याचा मुलगा आहे.”
14 Då sagde David med honom: «Kor våga du leggja hand på den som Herren hev salva, og drepe honom?»
१४दावीदाने त्यास विचारले, “परमेश्वराने निवडलेल्या राजाचा वध करताना तुला भीती कशी वाटली नाही?”
15 Og David ropa på ein av sveinarne sine og sagde: «Hit, og hogg honom ned!» Og han gav honom banehogg.
१५मग दावीदाने आपल्या एका तरुण सेवकाला बोलावून त्या अमालेक्याचा वध करण्यास फर्मावले. त्याप्रमाणे त्या इस्राएली तरूणाने अमालेक्याला मारले.
16 «Ditt blod kome yver ditt hovud, » sagde David; «din eigen munn vitna mot deg då du sagde: «Eg hev drepe honom som Herren hadde salva.»»
१६दावीद त्यास म्हणाला, “तुझ्या मृत्यूला तूच जबाबदार आहेस. परमेश्वराच्या अभिषिक्त राजाला आपण मारले असे तू बोलून चुकला आहेस तू अपराधी आहेस. याची तूच आपल्या तोंडाने साक्ष दिली आहेस.”
17 David kvad eit syrgjekvæde yver Saul og Jonatan, son hans
१७शौल आणि त्याचा पुत्र योनाथान यांना उद्देशून दावीदाने एक विलापगीत म्हटले.
18 han baud dei skulde læra Juda-borni «Kvædet um bogen», det finst uppskrive i boki åt den rettvise:
१८त्याने यहूद्यांना एक शोकगीत शिकवायला सांगितले हे शोकगीत धनुर्विलाप या नावाने ओळखले जाते. याशारच्या पुस्तकात हे गीत लिहिलेले आहे.
19 Israels prydnad! drepen ligg du på haugarne dine! Ai ei! falne er kjemporne dine!
१९“हे इस्राएला, तुझे सौंदर्य तुझ्या डोंगरावर नष्ट झाले. पाहा, हे शूर कसे धारातीर्थी पडले!
20 Gjet det ikkje i Gat! Lat deim ikkje gleda seg i Askalons-gatorne, so ikkje filistardøtter skal frygda seg og døtter av u-umskorne fegnast!
२०ही बातमी गथमध्ये सांगू नका. अष्कलोनच्या रस्त्यांवर जाहीर करू नका. नाही तर, पलिष्ट्यांच्या त्या कन्या आनंदीत होतील. नाहीतर बेसुंत्याच्या त्या मुलींना आनंद होईल.
21 Og Gilboafjell! gjev dogg og regn ei må falla på dykk! og ingen åke gro med offergåvor! Der kasta kjemporne skjoldarne frå seg. Skjolden åt Saul - aldri med olje han meir vert smurd!
२१गिलबोवाच्या डोंगरावर पाऊस किंवा दव न पडो! तिथल्या शेतातून अर्पण करण्यापुरतेही काही न उगवो! कारण शूरांच्या ढालींना तिथे गंज चढला. शौलाची ढाल तेल-पाण्यावाचून तशीच पडली.
22 Av bøygde aldri Jonatans boge frå blod åt falne, frå feitta åt kjempor. Og aldri kom sverdet hans Saul kom att med ugjort!
२२योनाथानाच्या धनुष्याने आपल्या वाटच्या शत्रुंचे पारिपत्य केले. शौलाच्या तलवारीने ही आपले बळी घेतले. रक्ताचे पाट वाहवून त्यांनी लोकांस वधिले, बलाढ्यांची हत्या केली.
23 Saul og Jonatan, elska og ljuvlege, uskiljande både i liv og daude! snøggare var dei enn ørnar, sterkare var dei enn løvor.
२३शौल आणि योनाथान यांनी आयुष्यभर परस्परांवर प्रेम केले. एकमेकांना आनंद दिला मृत्यूनेही त्यांची ताटातूट केली नाही. गरुडांहून ते वेगवान आणि सिंहापेक्षा बलवान् होते!
24 Israels døtter! Gråt for Saul, han som klædde dykk i yndeleg skarlak, han som prydde med gull dykkar klæde!
२४इस्राएली कन्यांनो, शौलासाठी शोक करा. किरमिजी वस्त्रे त्याने तुम्हास दिली वस्त्रांवरचे सोन्याचे जरीकाम त्याने दिले.
25 Ai ei! kjemporne fall i striden! Jonatan, drepen ligg han på haugarne dine!
२५युध्दात शूर पुरुष कामी आले. गिलबोवाच्या डोंगरावर योनाथानाला मरण आले.
26 Sårt eg deg syrgjer, Jonatan, bror min! Utifrå yndeleg var du for meg. Kjærleiken din kjærare var meg enn kvende-elsk.
२६बंधू योनाथान, मी अतिशय दुःखी असून तुझ्यासाठी फार अस्वस्थ आहे. तुझ्या सहवासाचा लाभ मला मिळाला. स्त्रियांच्या प्रेमापेक्षाही तुझे माझ्यावरील प्रेम अधिक होते.
27 Ai ei! at kjempor fall, og båe strids-sverdi øyddest!
२७या युध्दात पराक्रमी पुरुषांचे पतन झाले त्यांची शस्त्रे नष्ट झाली.”

< 2 Samuel 1 >