< 2 Korintierne 11 >

1 Gjev de vilde tola ein grand dårskap av meg! Jau, de skal tola meg.
माझी इच्छा आहे की, तुम्ही माझा थोडासा मूर्खपणा माझ्यासाठी सहन करावा. पण तो तुम्ही सहन करीतच आहात.
2 For eg er åbryen på dykk med Guds åbryskap. For eg trulova dykk med ein mann, so eg kunde framstella ei rein møy for Kristus.
कारण मी देवाच्या आवेशाने तुम्हाविषयी आवेशी आहे, मी एका पतीबरोबर तुमची मागणी केली आहे, अशा हेतूने की, तुम्हास शुद्ध कुमारी असे ख्रिस्ताला सादर करावे.
3 Men eg ottast for, at liksom ormen dåra Eva med si svikråd, soleis skal og dykkar tankar verta skadde og snudde burt frå den einfalde truskapen mot Kristus.
पण मला भीती वाटते की जसे हव्वेला सर्पाने कपट करून फसवले तसे तुमचे विचार कसे तरी बिघडून ती ख्रिस्ताची शुद्ध भक्ती व सरळपण ह्यापासून भ्रष्ट होतील.
4 For um det kjem ein og forkynner ein annan Jesus, som me ikkje hev forkynt, eller de fær ein framand ande, som de ikkje fyrr hev fenge, eller eit framandt evangelium, som de ikkje fyrr hev motteke, so vil de tola det godt!
कारण, जर कोणीही येऊन, आम्ही ज्याची घोषणा केली नाही अशी दुसर्‍या येशूची घोषणा केली किंवा तुम्हास मिळाला नव्हता असा दुसरा आत्मा तुम्ही स्वीकारता किंवा तुम्ही स्वीकारले नाही असे दुसरे शुभवर्तमान तुम्ही स्वीकारता तर तुम्ही त्यांचे सहन करता.
5 For eg tenkjer at eg ikkje i nokon ting er mindre mann enn dei ovstore apostlarne;
पण मला वाटते मी अतिश्रेष्ठ प्रेषितांपेक्षा कुठल्या प्रकारे कमी नाही.
6 men um eg enn er ulærd i talen, er eg det då ikkje i kunnskapen; me hev tvert imot alltid synt dykk honom i alle stykke.
आणि मी भाषण करण्यात अशिक्षित असलो तरी ज्ञानात नाही. आम्ही हे तुम्हास सर्व गोष्टीत, सर्व प्रकारे, प्रकट केले.
7 Eller gjorde eg synd, då eg audmykte meg sjølv so de kunde verta upphøgde, med di eg forkynte dykk Guds evangelium for inkje?
तुम्ही उंच व्हावे म्हणून मी आपणाला नीच केले म्हणजे मी देवाचे शुभवर्तमान तुम्हास फुकट सांगितले यामध्ये मी पाप केले काय?
8 Andre kyrkjelydar hev eg skattlagt, med di eg tok løn til dykkar tenesta, og då eg var hjå dykk og noko vanta meg, var eg ingen til tyngsla;
तुमची सेवा करण्यासाठी मी दुसऱ्या मंडळ्यांकडून वेतन घेऊन त्यांना लुटले.
9 for når eg vanta noko, hjelpte brørne som kom frå Makedonia, og i alt vara eg meg for å falla dykk til tyngsla.
आणि मी तुम्हाजवळ होतो तेव्हा मला कमी पडले असतानाही मी कोणाला भार असा झालो नाही कारण मासेदोनियाहून जे बंधू आले त्यांनी माझी गरज पुरविली आणि सर्व गोष्टीत मी तुम्हास ओझे होऊ नये म्हणून मी स्वतःस ठेवले आणि यापुढेही ठेवीन.
10 So visst som Kristi sanning er i meg, so skal denne ros ikkje takast frå meg i Akaia-bygderne!
१०ख्रिस्ताचे सत्य माझ्यामध्ये आहे म्हणून मी सांगतो की, अखया प्रांतात कोणीही माझ्या आभिमानास विरोध करणार नाही.
11 Kvifor då? av di eg ikkje elskar dykk? Det veit Gud!
११आणि का? कारण मी तुम्हावर प्रिती करीत नाही काय? देव जाणतो की, मी तुमच्यावर प्रीती करतो.
12 Men det eg gjer, det vil eg og gjera sidan, so eg kann avskjera deim tilhøve, som søkjer tilhøve, so dei må verta funne liksom me i det som dei rosar seg av.
१२आणि मी जे करतो ते मी करीत राहीन यासाठी की, जे कारण पाहिजे आहे ते मी त्यांच्यासाठी ठेवू नये. ते त्यांना ह्यासाठी हवे आहे की, ते ज्या कामात अभिमान मिरवतात त्यामध्ये ते आमच्यासारखे दिसावेत.
13 For desse er falske apostlar, svikfulle arbeidarar, som skaper seg til liksom dei var Kristi apostlar.
१३कारण असे लोक खोटे प्रेषित आहेत, ते फसविणारे कामगार आहेत, ख्रिस्ताच्या प्रेषितांचे सोंग घेणारी अशी आहेत.
14 Og det er ikkje underlegt, for Satan sjølv skaper seg um til ein ljosengel;
१४आणि यामध्ये आश्चर्य नाही कारण सैतानदेखील तेजस्वी दूताचे रुप धारण करतो.
15 difor er det ikkje noko stort um hans tenarar og skaper seg um til rettferds tenarar; men deira ende skal høva til deira verk.
१५म्हणून त्याचे सेवकही जर न्यायीपणाच्या सेवकाचे रुप धारण करतात त्यामुळे त्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, त्यांचा शेवट त्यांच्या कार्याप्रमाणे होईल.
16 Atter segjer eg: Ingen halde meg for å vera uvitug, men um de gjer det, so tak då imot meg, um og som ein uvitug, so eg og må kunna rosa meg ein grand!
१६मी पुन्हा म्हणतोः कोणीही मला मूढ समजू नये, पण जर तुम्ही समजता तर जसा मूढाचा तसा माझा स्वीकार करा. यासाठी की मी थोडासा अभिमान बाळगीन.
17 Det eg her talar, talar eg ikkje etter Herrens vilje, men liksom i dårskap i denne tillitsame ros.
१७मी हे बोलत आहे ते प्रभूला अनुसरून बोलत नाही. तर या अभिमानाच्या धीटपणाने, जणू मूर्खासारखे बोलतो.
18 Sidan mange rosar etter kjøtet, so vil eg og rosa meg.
१८जसे बरेच लोक दैहिक गोष्टीविषयी अभिमान मिरवतात, तसा मी पण अभिमान मिरवीन.
19 For de toler gjerne uvitingarne, de som er so kloke.
१९तुम्ही शहाणे असल्याने मूढांचे आनंदाने सहन करता!
20 For de toler det, um nokon gjer dykk til trælar, um nokon et dykk upp, um nokon fangar dykk, um nokon upphøgjer seg yver dykk, um nokon slær dykk i andlitet.
२०वस्तुतः जे कोणी तुम्हास दास करते किंवा छळ करते किंवा तुमचा गैरफायदा घेते किंवा स्वतः पुढे येण्याचा प्रयत्न करते किंवा तुमच्या तोंडावर मारते तरी तुम्ही त्यांचे सहन करता.
21 Med skam segjer eg det, av di me hev vore veike; men det som nokon er djerv i - eg talar i dårskap - det er eg og djerv i.
२१स्वतःला हिणवून मी हे बोलतो, तरी ज्या बाबतीत कोणी धीट असेल, तिच्यात मीही धीट आहे (हे मी मूढपणाने बोलतो).
22 Er dei hebræarar? eg og. Er dei israelitar? eg og. Er dei Abrahams ætt? eg og.
२२ते इब्री आहेत काय? मीही आहे. ते इस्राएली आहेत काय? मीहि आहे. ते अब्राहामाचे संतान आहेत काय? मीहि आहे.
23 Er dei Kristi tenarar? - eg talar som ein galen mann -: eg er det endå meir. Eg hev havt større stræv, fenge fleire slag, vore oftare i fengsel, ofte i livsfåre.
२३ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय? मी अधिक प्रमाणात आहे (मी हे वेडगळासारखे बोलतो) मी पुष्कळ कठीण काम केले आहे. सारखा तुरुंगात जात होतो, बेसुमार फटके खाल्ले, पुष्कळ वेळा मरणाला सामोरे गेलो, म्हणून मीही अधिक आहे.
24 Av jødarne hev eg fem gonger fenge fyrti slag so nær som eitt.
२४पाच वेळेला यहूद्यांकडून मला चाबकाचे एकोणचाळीस फटके बसले.
25 Tri gonger vart eg hudflengd, ein gong steina, tri gonger leid eg skipbrot; eg hev vore eit døger i djupet.
२५तीन वेळा काठीने मारण्यात आले, एकदा मला दगडमार करण्यात आला, तीन वेळा माझे जहाज फुटले, खुल्या समुद्रात मी एक रात्र व दिवस घालविला.
26 Ofte var eg på ferder, i fårar i elvar, i fårar millom røvarar, i fårar millom landsmenner, i fårar millom heidningar, i fårar i by, i fårar i øydemark, i fårar på hav, i fårar millom falske brør,
२६मी सातत्याने फिरत होतो, नदीच्या प्रवासात धोका होता. लुटारुंकडून धोका होता. माझ्या स्वतःच्या देशबांधवांकडून धोका होता. परराष्ट्रीय लोकांकडून, शहरांमध्ये धोका होता. डोंगराळ प्रदेशात धोका होता. समुद्रातील धोके होते, विश्वास ठेवणाऱ्या खोटया बंधूंकडून आलेले धोके होते.
27 i strev og møda, ofte i nattevoka, i svolt og torste, ofte fastande, frosen og naken;
२७मी कष्ट केले आणि घाम गाळला व पुष्कळ वेळा जागरण केले. मला भूक व तहान माहीत आहे. पुष्कळ वेळा मी उपाशी राहिलो, थंडीत उघडा असा मी राहिलो,
28 umfram alt det andre hev eg endå det daglege tillaup, umsuti for alle kyrkjelydarne.
२८या सर्व गोष्टीशिवाय दररोज माझ्यावर येणार दबाव म्हणजे सर्व मंडळ्यांविषयीची चिंता.
29 Kven er veik utan at eg vert veik? Kven vert avstygd utan at det brenn i meg?
२९कोण दुर्बळ झाला असता तर मी दुर्बळ होत नाही काय? कोण दुसऱ्याला पापात पाडण्यास कारण होतो आणि मला संताप होत नाही?
30 Um eg endeleg skal rosa meg, so vil eg rosa meg av det som høyrer mi vanmagt til.
३०जर मला अभिमान बाळगायचा असेल तर मी आपल्या दुर्बलतेच्या गोष्टीविषयी अभिमान बाळगीन.
31 Gud og vår Herre Jesu Kristi Fader, som er velsigna i all æva, han veit at eg ikkje lyg! (aiōn g165)
३१देव आणि प्रभू येशूचा पिता, ज्याची अनंतकाळपर्यंत स्तुती केली पाहिजे, तो हे जाणतो की मी खोटे बोलत नाही. (aiōn g165)
32 I Damaskus let kong Aretas’ landshovding vakta damaskenarbyen, då han vilde gripa meg;
३२दिमिष्क नगरात अरीतास राजाने नेमलेल्या अधिकाऱ्याने मला अटक करण्यासाठी दिमिष्ककरांच्या नगरावर पहारा दिला होता.
33 og gjenom ein glugg i muren vart eg fira ned i ei korg og slapp ut or hans hender.
३३पण मला टोपलीत बसवून गावकुसाच्या खिडकीतून खाली सोडण्यात आले आणि त्याच्या हातून मी निसटलो.

< 2 Korintierne 11 >