< 1 Tessalonikerne 5 >
1 Men um tiderne og stunderne treng de, brør, ikkje til at me skriv til dykk;
१बंधूनो, काळ व समय ह्यांविषयी तुम्हास काही लिहिण्याची गरज नाही.
2 for de veit sjølve grant at Herrens dag kjem som ein tjuv um natti.
२कारण तुम्हा स्वतःला पक्के माहीत आहे की जसा रात्री चोर येतो, तसाच प्रभूचा दिवस येतो.
3 Når dei segjer: «Fred og ingen f re!» då kjem ein brå undergang yver deim, liksom føderidi yver den som er med barn, og dei skal slett ikkje sleppa undan.
३“शांती आहे, सुरक्षितता आहे” असे ते म्हणतात, तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अचानक वेदना सुरु होतात त्याप्रमाणे त्यांचा अचानक नाश होईल आणि ते निभावणारच नाहीत.
4 Men de, brør, er ikkje i myrkret, so dagen skulde koma på dykk som ein tjuv;
४बंधुनो, त्या दिवसाने चोरासारखा तुम्हास गाठावे असे तुम्ही अंधारात नाही.
5 for de er alle born av ljoset og born av dagen; me høyrer ikkje natti eller myrkret til.
५कारण तुम्ही सगळे प्रकाशाची प्रजा व दिवसाची प्रजा आहात; आपण रात्रीचे व अंधाराचे नाही.
6 Lat oss difor ikkje sova som dei andre, men lat oss vaka og vera ædrue!
६ह्यावरून आपण इतरांप्रमाणे झोप घेवू नये, तर जागे व सावध रहावे.
7 For dei som søv, dei søv um natti, og dei som drikk seg drukne, dei er drukne um natti;
७झोप घेणारे रात्री झोप घेतात आणि झिंगणारे रात्रीचे झिंगतात.
8 men me som høyrer dagen til, lat oss vera ædrue, klædde med den brynja som er tru og kjærleik, og med voni um frelsa som ein hjelm!
८परत जे आपण दिवसाचे आहोत त्या आपण सावध असावे; विश्वास व प्रीती हे उरस्त्राण व तारणाची आशा हे शिरस्राण घालावे.
9 For Gud etla oss ikkje til vreide, men til å vinna frelsa ved vår Herre Jesus Kristus,
९कारण आपल्यावर क्रोध व्हावा म्हणून नव्हे तर आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे आपले तारण व्हावे म्हणून देवाने आपल्याला नेमले आहे.
10 han som døydde for oss, so me, anten me vaker eller søv, skal liva saman med honom.
१०प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी याकरिता मरण पावला की, आपण जरी मागे राहिलो किंवा मरण पावलो तरी आपण त्याच्याबरोबर जिवंत रहावे.
11 Påminn difor kvarandre, og uppbygg einannan innbyrdes, so som de og gjer!
११म्हणून तुम्ही एकमेकांचे सांत्वन करा आणि एकमेकांची उभारणी करा; हे तुम्ही करतही आहात.
12 Men me bed dykk, brør, at de skynar på deim som arbeider ibland dykk og er dykkar forstandarar i Herren og påminner dykk,
१२आणि बंधूंनो, आम्ही तुम्हास विनंती करतो की, जे तुमच्यांत परिश्रम करतात, जे प्रभूमध्ये तुमच्यांवर आहेत आणि तुम्हास बोध करतात त्यांच्याकडे लक्ष द्या;
13 og at de vyrder deim storleg høgt i kjærleik for deira gjerning skuld! Haldt fred med kvarandre!
१३आणि त्यांना त्यांच्या कामावरून प्रीतीने फार थोर माना आणि एकमेकांशी शांतीने रहा.
14 Og me legg dykk på hjarta, brør: Påminn dei uskipelege, trøysta dei vanmodige, hjelp dei veike, ver langmodige mot alle!
१४आता बंधूंनो, आम्ही तुम्हास बोध करतो की, जे अव्यवस्थीत आहेत त्यांना तुम्ही इशारा द्या, जे अल्पधीराचे आहेत त्यांना धीर द्या, अशक्त आहेत त्यांना आधार द्या; सर्वांबरोबर सहनशील असा.
15 Sjå til at ingen gjev nokon vondt att for vondt, men stræva alltid etter det som godt er, både mot kvarandre og mot alle!
१५आणि तुम्ही हे पाहा की, कोणी कोणाला वाईटाबद्दल वाईट असे भरून देऊ नये; पण तुमच्यात एकमेकांसाठी व सर्वसाठी जे चांगले आहे त्याच्या सतत मागे लागा.
18 Takka for alle ting! for dette er Guds vilje i Kristus Jesus til dykk.
१८प्रत्येक गोष्टींत उपकार माना कारण तुमच्यासंबधी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे.
१९पवित्र आत्म्याला विझवू नका.
20 Mismæt ikkje profetord!
२०संदेशाचा उपहास करू नका.
21 men prøv alt, hald fast på det gode!
२१सर्व गोष्टींची पारख करा. जे चांगले आहे ते मजबूत धरा.
22 Haldt dykk frå vondt av alle slag!
२२वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर रहा.
23 Men han sjølv, fredsens Gud, helga dykk heilt ut, og gjev at dykkar ånd og sjæl og likam må verta haldne fullkomne, ulastande når vår Herre Jesus Kristus kjem!
२३आणि स्वतः शांतीचा देव तुम्हास पूर्ण पवित्र करो; आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचे येणे होईल तेव्हा तुमचा आत्मा, जीव आणि शरीर पूर्ण निर्दोष राहो.
24 Han som hev kalla dykk, er trufast, han skal og gjera det.
२४तुम्हास जो बोलवत आहे तो विश्वासू आहे; तो हे करीलच.
२५बंधूंनो, आमच्यासाठी प्रार्थना करा.
26 Helsa alle brørne med ein heilag kyss!
२६सर्व बंधूंना पवित्र प्रीतीने नमस्कार सांगा.
27 Eg manar dykk ved Herren, at de let brevet verta lese for alle dei heilage brørne.
२७मी तुम्हास प्रभूची आज्ञा म्हणून सांगतो की, हे पत्र सर्व बंधूंना वाचून दाखवा.
28 Vår Herre Jesu Kristi nåde vere med dykk!
२८आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुमच्याबरोबर असो. आमेन.