< 1 Kongebok 15 >
1 I det attande styringsåret åt Jerobeam Nebatsson vart Abiam konge yver Juda.
१नबाटाचा पुत्र यराबाम इस्राएलवर राज्य करत होता. त्याच्या राजेपणाच्या कारकिर्दीचे अठरावे वर्ष चालू असताना, रहबामाचा पुत्र अबीयाम यहूदाचा पुढचा राजा झाला.
2 Tri år styrde han i Jerusalem; mor hans heitte Ma’aka Abisalomsdotter.
२अबीयाने तीन वर्षे यरूशलेमेत राज्य केले. याच्या आईचे नाव माका ही अबीशालोमाची कन्या.
3 Og han fylgde far sin i alle dei syndar som han hadde gjort fyre honom, og hjarta hans var ikkje heilt med Herren, hans Gud, som hjarta åt David, far hans, hadde vore.
३आपल्या वडिलांच्याच पापांची उजळणी याने केली. आपले आजोबा दावीद यांच्याप्रमाणे तो परमेश्वर देवाशी एकनिष्ठ नव्हता.
4 Men for David skuld gav Herren, hans Gud, honom ei lampa i Jerusalem, med di han lyfta upp son hans etter honom og let Jerusalem få standa,
४दाविदावर परमेश्वराचे प्रेम होते. त्याच्याखातर त्याने त्याचा दीप यरूशलेमेत कायम राहू दिला. त्यानंतर त्याच्या पुत्राला उभारले, व यरूशलेम सुरक्षित ठेवले.
5 for di David hadde gjort det som rett var i Herrens augo og ikkje vike ifrå noko av det han hadde bode honom, so lenge han livde, so nær som i saki med hetiten Uria.
५दाविदाचे वर्तन परमेश्वराच्या इच्छेनुसार, योग्य असेच होते. त्याने परमेश्वराच्या आज्ञांचे नेहमीच पालन केले. उरीया हित्तीबद्दल घडलेले चुकीचे वर्तन एवढाच काय तो अपवाद.
6 Millom Rehabeam og Jerobeam var det ufred so lenge han livde.
६रहबाम आणि यराबाम नेहमीच एकमेकांविरुध्द लढत असत.
7 Det som elles er å fortelja um Abiam og um alt det han gjorde, det er uppskrive i krønikeboki åt Juda-kongarne. Abiam og Jerobeam låg i ufred med kvarandre.
७अबीयामाने आणखी जे काही केले त्याची नोंद, यहूदाच्या राजांचा इतिहास या पुस्तकात आहे. अहीयाच्या संपूर्ण कारकिर्दींत अहीया आणि यराबाम यांच्यात लढाई चालू असे.
8 Og Abiam lagde seg til kvila hjå federne sine, og dei gravlagde honom i Davidsbyen; og Asa, son hans, vart konge i staden hans.
८अबीयामाला त्याच्या मृत्यूनंतर दावीद नगरात पुरले. त्याचा पुत्र आसा राज्य करु लागला.
9 I tjugande året åt Jerobeam, kongen i Israel, vart Asa konge i Juda.
९यराबामाच्या इस्राएलवरील राज्याच्या विसाव्या वर्षी आसा यहूदाचा राजा झाला,
10 Han styrde eitt og fyrti år i Jerusalem. Hans mor heitte Ma’aka Abisalomsdotter.
१०आसाने यरूशलेमेवर एक्केचाळीस वर्षे राज्य केले. त्याच्या आजीचे नाव माका. ती अबीशालोमाची कन्या.
11 Og Asa gjorde det som rett var i Herrens augo, liksom David, far hans.
११आपला पूर्वज दावीद याच्या प्रमाणेच परमेश्वराच्या मते जे योग्य तेच आसाने केले.
12 Han jaga utukt-sveinarne ut or landet, og fekk burt alle dei skarnsgudarne som far hans hadde laga.
१२त्याकाळी दैवतांच्या नावाखाली शरीरविक्रय करणारे पुरुष वेश्या होते. आसाने त्यांना देशत्याग करायला लावले. तसेच त्याने आपल्या वाडवडिलांनी केलेल्या मूर्ती पूर्णपणे हलवल्या.
13 Og jamvel mor si, Ma’aka, sette han ifrå hennar dronningrang, for di ho hadde late gjera eit styggjelegt bilæte for Asjera; Asa hogg ned det stygge bilætet hennar og brende det i Kidronsdalen.
१३आपली आजी माका हिला आसाने राणीच्या पदावरून दूर केले. अंमगळ दैवत अशेरा हिची एक मूर्ती या आजीनेही केली होती. आसाने त्या मूर्तीची मोडतोड केली. किद्रोन खोऱ्यात ती जाळून टाकली.
14 Men offerhaugarne fekk dei ikkje burt; like vel var hjarta åt Asa heilt med Herren, so lenge han livde.
१४त्याने उच्च स्थानाची नासधूस केली नाही, मात्र आसा आयुष्यभर परमेश्वराशी एकनिष्ठ राहिला.
15 Heilaggåvorne åt far sin og heilaggåvorne sine eigne flutte han inn i Herrens hus, sylv og gull og ymse ting.
१५आसा आणि त्याचे वडिल यांनी परमेश्वरासाठी काही वस्तू करून घेतल्या होत्या. सोन्याचांदीच्या वस्तू आणि आणखी काही गोष्टी त्यामध्ये होत्या. त्या सर्व त्याने व्यवस्थित मंदिरात जमा केल्या.
16 Millom Asa og Basea, kongen i Israel, var det ufred so lenge dei livde.
१६आसा यहूदावर राज्य करीत असेपर्यंत इस्राएलचा राजा बाशा याच्याशी त्याच्या लढाया चालत.
17 Basea, Israels-kongen, drog upp imot Juda og bygde ei borg i Rama, av di han vilde hindra at nokon drog ut eller inn hjå Asa, kongen i Juda.
१७इस्राएलचा राजा बाशाने यहूदावर चढाया केल्या. आसाच्या प्रदेशातील लोकांचे येणे जाणे त्यास थांबवायचे होते. त्यामुळे रामा नगर त्याने चांगले मजबूत केले.
18 Då tok Asa alt det sylv og gull som var att i skattkammeri i Herrens hus og i skattkammeret i kongsgarden og lagde det i handi åt tenarane sine; so sende han dei til Benhadad, son åt Tabrimmon Hezjonsson, syrarkongen, som budde i Damaskus, med dei ordi:
१८आसाने मग परमेश्वराच्या मंदिराच्या खजिन्यातले आणि महालातले सोनेनाणे काढून घेतले. आपल्या सेवकांच्या हाती ते सोपवून त्यांना त्याने अरामाचा राजा बेन हदाद यांच्याकडे पाठवले. बेन-हदाद हा टब्रिम्मोनचा पुत्र आणि टब्रिम्मोन हेज्योनचा. बेनहदादची राजधानी दिमिष्क होती.
19 «Det er eit samband millom meg og deg, sameleis som millom far min og far din. Her sender eg deg ei gåva i sylv og gull. Gjer no vel og brjot sambandet ditt med Basea, Israels-kongen, so han lyt draga burt ifrå meg!»
१९आसाने आपल्या संदेशात म्हटले होते, “माझे वडिल आणि तुझे वडिल यांच्यात शांततेचा करार झाला होता. आता मला तुझ्याशी करार करायचा आहे. तुला मी हा सोन्यारुप्याचा नजराणा पाठवत आहे. इस्राएलचा राजा बाशा याच्याशी झालेल्या कराराचा तू भंग कर म्हणजे तो माझ्या प्रदेशातून निघून जाईल.”
20 Og Benhadad lydde kong Asa og sende herførarane sine imot byarne i Israel og herja Ijon, Dan, Abel-Bet-Ma’aka og heile Kinnerot umfram heile Naftalilandet.
२०राजा बेन-हदाद याने आसाशी करार केला आणि इयोन, दान, आबेल-बेथ-माका, गालिल सरोवरालगतची गावे, किन्नेरोथ आणि नफतालीचा प्रांत यांच्यावर चढाई करायला आपले सैन्य इस्राएलावर पाठवले.
21 Då Basea no høyrde det, slutta han med borgbyggjingi i Rama og heldt seg sidan i ro i Tirsa.
२१या हल्ल्याची बातमी बाशाच्या कानावर गेली. तेव्हा त्याने रामा नगराच्या मजबूतीचे काम सोडले, ते गाव सोडले आणि तिरसा या ठिकाणी तो परतला.
22 Men kong Asa baud ut heile Juda - ikkje ein var friteken - og dei tok burt steinar og trevyrke som Basea hadde bruka til byggverket i Rama; og med det gjorde no kong Asa Geba i Benjamin og Mispa til borgbyar.
२२मग आसा राजाने यहूदातील सर्व प्रजेला मदतीसाठी पाचारण केले. एकही जण त्यातून सुटला नाही. ते सर्व रामा येथे गेले. तिथून त्यांनी बाशाची दगड, लाकूड वगैरे सर्व बांधकामसामग्री आणली. बन्यामीनमधील गिबा आणि मिस्पा येथे या सर्व वस्तू त्यांनी वाहून नेल्या. आसाने ही नगरे चांगली भक्कम केली.
23 Det som elles er å fortelja um Asa, um alle storverki hans og alt han gjorde, um byarne som han bygde, det er uppskrive i krønikeboki åt Juda-kongarne. Men på sine gamle dagar fekk han ein sjukdom i føterne.
२३आसाबद्दलच्या इतर गोष्टी, त्याचे पराक्रम, त्याने बांधलेली नगरे या सगळ्यांची माहिती यहूदाच्या राजांच्या इतिहास या पुस्तकात लिहिलेली आहे. म्हातारपणी आसा पायाच्या दुखण्याने बेजार झाला.
24 Og Asa lagde seg til kvile hjå federne sine og vart gravlagd hjå federne sine i byen åt David, far sin. Og Josafat, son hans, vart konge i staden hans.
२४आसाचे निधन झाल्यावर त्याच्या पूर्वजांच्या दावीद याच्या नगरात त्याचे दफन झाले. त्यानंतर त्याचा पुत्र यहोशाफाट राज्य करु लागला.
25 Nadab Jerobeamsson vart konge i Israel i det andre styringsåret åt Juda-kongen Asa og rådde yver Israel i tvo år.
२५यहूदाचा राजा म्हणून आसाचे दुसरे वर्ष चालू असताना यराबामाचा पुत्र नादाब इस्राएलचा राजा झाला. त्याने इस्राएलवर दोन वर्षे राज्य केले.
26 Han gjorde det som vondt var i Herrens augo og stemnde fram på vegen til far sin og i den synd som han hadde fenge Israel til å gjera.
२६नादाबने परमेश्वरविरोधी कृत्ये केली. आपले वडिल यराबाम यांच्यासारखीच दुष्कृत्ये केली यराबामाने इस्राएल लोकांसही पाप करायला लावले होते.
27 Men Basea Ahiason av Issakars hus fekk til ei samansverjing imot honom, og Basea slo honom i hel ved Gibbeton, som høyrde filistarane til; Nadab med heile Israel heldt då på å kringsette Gibbeton.
२७बाशा हा अहीयाचा पुत्र. हे इस्साखाराच्या वंशातले. बाशाने नादाब राजाला मारायचा कट केला. नादाब आणि इस्राएल लोक गिब्बथोन या पलिष्ट्यांच्या नगराला वेढा घालत होते तेव्हाची ही गोष्ट आहे. बाशाने या ठिकाणी नादाबला ठार केले.
28 Basea drap honom i det tridje styringsåret åt Juda-kongen Asa, og han vart so konge i staden hans.
२८आसाचे हे यहूदाचा राजा म्हणून तिसरे वर्ष होते. मग बाशा इस्राएलचा राजा झाला.
29 Og då han var konge vorten, slo han i hel heile Jerobeams hus; han let det ikkje vera att ei livande sjæl av Jerobeams hus, men gjorde ende på, etter det ord som Herren hadde tala ved tenaren sin, siloniten Ahia;
२९बाशा राजा झाल्यावर त्याने यराबामाच्या कुळातील सर्वांना ठार केले. कोणाचीही त्याने गय केली नाही. शिलोचा संदेष्टा अहीया यांच्यामार्फत परमेश्वराने जी भविष्यवाणी केली होती तसेच हे झाले.
30 det var for dei synder skuld som Jerobeam hadde gjort, og som han hadde fenge Israel til å gjera, og for di han soleis hadde harma Herren, Israels Gud.
३०राजा यराबामाने बरीच पापे केली होती, तसेच इस्राएल लोकांसही ती करायला लावली म्हणून हे घडले. इस्राएलचा परमेश्वर देव याचा यराबामावर कोप झाला
31 Det som elles er å fortelja um Nadab og um alt det han gjorde, det er uppskrive i krønikeboki åt Israels-kongarne.
३१इस्राएलाच्या राजांचा इतिहास या पुस्तकात नादाबचे इतर पराक्रम नोंदलेले आहेत.
32 Millom Asa og Basea, kongen i Israel, var det ufred so lenge dei livde.
३२बाशा इस्राएलवर राज्य करत असताना यहूदाचा राजा आसा याच्याशी त्याचे सर्वकाळ युध्द चालले होते.
33 I det tridje styringsåret åt Juda-kongen Asa vart Basea Ahiason konge yver heile Israel i Tirsa, og det var han i fire og tjuge år.
३३यहूदाचा राजा आसाच्या कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षी अहीयाचा पुत्र बाशा हा इस्राएलचा राजा झाला. तिरसामध्ये राहून त्याने चोवीस वर्षे राज्य केले.
34 Han gjorde det som vondt var i Herrens augo, og stemnde fram på Jerobeams veg og i den synd som han hadde fenge Israel til å gjera.
३४पण परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले. आपले वडिल यराबाम यांनी केली तीच पातके बाशानेही केली. यराबामाने इस्राएल लोकांसही पापे करायला लावली होती.