< Salmenes 67 >

1 Til sangmesteren på strengelek; en salme, en sang. Gud være oss nådig og velsigne oss, han la sitt åsyn lyse hos oss, (sela)
देवाने आमच्यावर दया करावी आणि आम्हांस आशीर्वाद द्यावा. आणि त्याने आमच्यावर आपला मुखप्रकाश पाडावा.
2 forat man på jorden må kjenne din vei, blandt alle hedninger din frelse.
याकरिता की, तुझे मार्ग पृथ्वीवर माहित व्हावेत, तुझे तारण सर्व राष्ट्रामध्ये कळावे.
3 Folkene skal prise dig, Gud! Folkene skal prise dig, alle tilsammen.
हे देवा, लोक तुझी स्तुती करोत; सर्व लोक तुझी स्तुती करोत.
4 Folkeslagene skal fryde sig og juble; for du dømmer folkene med rett, og folkeslagene på jorden leder du. (Sela)
राष्ट्रे हर्ष करोत आणि हर्षाने गावोत, कारण तू लोकांचा न्याय सरळपणे करशील आणि राष्ट्रावर राज्य करशील.
5 Folkene skal prise dig, Gud! Folkene skal prise dig, alle tilsammen.
हे देवा, लोक तुझी स्तुती करोत; सर्व लोक तुझी स्तुती करोत.
6 Landet har gitt sin grøde; Gud, vår Gud, velsigner oss.
भूमीने आपला हंगाम दिला आहे आणि देव, आमचा देव, आम्हास आशीर्वाद देवो.
7 Gud velsigner oss, og alle jordens ender skal frykte ham.
देव आम्हास आशीर्वाद देवो आणि पृथ्वीवरील सर्व सीमा त्याचा सन्मान करोत.

< Salmenes 67 >