< Salmenes 11 >
1 Til sangmesteren; av David. Til Herren tar jeg min tilflukt; hvorledes kan I da si til min sjel: Fly til eders fjell som en fugl?
१मुख्य गायकासाठी; दाविदाचे स्तोत्र. परमेश्वरामध्ये मी आश्रय घेतो; पक्ष्यासारखे डोंगराकडे उडून जा, असे तुम्ही माझ्या जीवाला कसे म्हणता?
2 For se, de ugudelige spenner buen, de legger sin pil på strengen for å skyte i mørket på de opriktige av hjertet.
२कारण पाहा! सरळ हृदयाच्यांना अंधारात मारावे म्हणून, दुष्ट आपला धनुष्य वाकवतात आणि आपला तीर दोरीला लावून तयार करतात.
3 Når grunnvollene nedbrytes, hvad makter da den rettferdige?
३कारण जर पायेच नष्ट केले, तर न्यायी काय करणार?
4 Herren er i sitt hellige tempel, Herrens trone er i himmelen, hans øine skuer, hans blikk prøver menneskenes barn.
४परमेश्वर त्याच्या पवित्र स्वर्गात आहे; त्याचे डोळे पाहतात, त्याचे डोळे मनुष्याच्या संतानास पारखतात.
5 Herren prøver den rettferdige; men den ugudelige og den som elsker vold, hater hans sjel.
५परमेश्वर नितीमानाची पारख करतो. परंतू जे दुष्ट व हिंसा करतात त्यांचा तो द्वेष करतो.
6 Han lar snarer regne ned over de ugudelige; ild og svovel og glødende vind er deres begers del.
६तो दुष्टांवर जळते निखारे आणि गंधकाचा वर्षाव करील, दाहक वारा हाच त्यांचा वाटा असेल.
7 For Herren er rettferdig, elsker rettferdighet; på den opriktige ser hans åsyn.
७कारण परमेश्वर नितीमान आहे आणि त्यास न्यायीपण प्रिय आहे. सरळ असलेले त्याचे मुख पाहतील.