< Salmenes 102 >
1 En bønn av en elendig, når han vansmekter og utøser sin sorg for Herrens åsyn. Herre, hør min bønn og la mitt rop komme til dig!
१परमेश्वराजवळ प्रार्थना हे परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक; माझ्या आरोळीकडे लक्ष दे.
2 Skjul ikke ditt åsyn for mig på den dag jeg er i nød! Bøi ditt øre til mig! På den dag jeg roper, skynd dig å svare mig!
२मी संकटात असताना माझ्यापासून तोंड लपवू नकोस. माझ्याकडे लक्ष दे. जेव्हा मी तुला हाक मारतो, मला त्वरेने उत्तर दे.
3 For mine dager er faret bort som en røk, og mine ben er forbrent som en brand.
३कारण माझे आयुष्य धुराप्रमाणे निघून जात आहे, आणि माझी हाडे अग्नीसारखी जळून गेली आहेत.
4 Mitt hjerte er stukket som en urt og fortørket; for jeg har glemt å ete mitt brød.
४माझे हृदय चिरडून गेले आहे आणि मी गवताप्रमाणे कोमेजून गेलो आहे. मी जेवण खाण्यास असमर्थ आहे.
5 For mine lydelige sukks skyld henger mine ben ved mitt kjøtt.
५माझ्या सततच्या कण्हण्यामुळे, मी फार क्षीण झालो आहे.
6 Jeg ligner pelikanen i ørkenen, jeg er som uglen på øde steder.
६मी अरण्यातल्या घुबडाप्रमाणे झालो आहे. मी ओसाड ठिकाणातल्या गरुडाप्रमाणे झालो आहे.
7 Jeg våker og er blitt som en enslig fugl på taket.
७मी जागरण करीत आहे; धाब्यावर एकटे राहणाऱ्या एकाकी पक्ष्याप्रमाणे मी आहे.
8 Hele dagen spotter mine fiender mig; de som raser mot mig, sverger ved mig.
८माझे शत्रू सर्व दिवस मला टोमणे मारतात; ते माझी चेष्टा करतात माझे नाव वापरून शाप देतात.
9 For jeg eter aske som brød og blander min drikk med gråt
९मी राख भाकरीप्रमाणे खाल्ली आहे, आणि माझ्या पाण्यात माझे अश्रू मिसळले आहेत.
10 for din vredes og din harmes skyld; for du har løftet mig op og kastet mig bort.
१०कारण तुझ्या भयंकर क्रोधामुळे, तू मला वर उचलून घेऊन खाली फेकून दिलेस.
11 Mine dager er som en hellende skygge, og selv visner jeg som en urt.
११माझे दिवस उतरत्या सावलीप्रमाणे झाले आहेत, आणि गवतासारखा मी कोमेजून गेलो आहे.
12 Men du, Herre, du troner til evig tid, og ditt minne varer fra slekt til slekt.
१२पण हे परमेश्वरा, तू सर्वकाळ राजासनारूढ आहेस, आणि तुझी कीर्ती सर्व पिढ्यांसाठी सर्वकाळ राहील.
13 Du vil reise dig, du vil forbarme dig over Sion; for det er tiden til å være det nådig, timen er kommet.
१३तू उठून उभा राहशील आणि सियोनेवर दया करशील. तिच्यावर दया करण्याची वेळ आता आली आहे; नेमलेला वेळ आला आहे.
14 For dine tjenere elsker dets stener, og de ynkes over dets støv.
१४कारण तुझे सेवक तिच्या दगडांची आवड धरतात, आणि तिच्या नासधूसाची धूळ पाहून त्यांना कळवळा येतो.
15 Og hedningene skal frykte Herrens navn, og alle jordens konger din herlighet.
१५हे परमेश्वरा, राष्ट्रे तुझ्या नावाचा आदर करतील, आणि पृथ्वीवरील सर्व राजे तुझ्या वैभवाचा सन्मान करतील.
16 For Herren har bygget Sion, han har åpenbaret sig i sin herlighet.
१६परमेश्वर सियोन पुन्हा बांधेल, आणि तो आपल्या गौरवाने प्रगट होईल.
17 Han har vendt sig til de hjelpeløses bønn, og han har ikke foraktet deres bønn.
१७आणखी तो अनाथाच्या प्रार्थनेला प्रतिसाद देईल. तो त्यांची प्रार्थना नाकारणार नाही.
18 Dette skal bli opskrevet for den kommende slekt, og det folk som skal skapes, skal love Herren.
१८पुढील पिढीसाठी हे लिहून ठेवले जाईल, आणि अजून ज्या लोकांचा जन्म झाला नाही ते परमेश्वराची स्तुती करतील.
19 For han har sett ned fra sin hellige høide, Herren har fra himmelen skuet til jorden
१९कारण परमेश्वराने आपल्या उच्च पवित्रस्थानातून खाली पाहीले आहे. परमेश्वराने स्वर्गातून खाली पृथ्वीकडे पाहीले,
20 for å høre den fangnes sukk, for å løse dødens barn,
२०तो बंदिवानाचे कण्हणे ऐकेल, ज्यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठरवली होती त्यास सोडविले.
21 forat de i Sion skal forkynne Herrens navn og hans pris i Jerusalem,
२१नंतर सियोनेतील लोक परमेश्वराचे नाव सांगतील, आणि यरूशलेमेत त्याची स्तुती करतील.
22 når de samler sig, folkeslagene og rikene, for å tjene Herren.
२२जेव्हा परमेश्वराची एकत्र सेवा करण्यासाठी सगळी राष्ट्रे एकत्र येतील.
23 Han har bøiet min kraft på veien, han har forkortet mine dager.
२३त्याने माझी शक्ती जीवनाच्या मध्येच काढून घेतली. त्याने माझे दिवस कमी केले.
24 Jeg sier: Min Gud, ta mig ikke bort midt i mine dager! Dine år varer fra slekt til slekt.
२४मी म्हणालो, “हे माझ्या देवा, माझ्या जीवनाच्या मध्येच मला काढून घेऊ नकोस; तू येथे सर्व पिढ्यानपिढ्यातून आहेस.
25 Fordum grunnfestet du jorden, og himlene er dine henders gjerning.
२५तू प्राचीन काळी पृथ्वीचा पाया घातला; आकाश तुझ्या हातचे कार्य आहे.
26 De skal forgå, men du blir stående; de skal alle eldes som et klæde, som et klædebon omskifter du dem, og de omskiftes,
२६ते नाहीसे होईल, पण तू राहशील; ते सर्व कापडाप्रमाणे जीर्ण होतील; कपड्यांसारखे तू त्यांना बदलशील आणि ते नाहीसे होतील.
27 men du er den samme, og dine år får ingen ende.
२७पण तू सारखाच आहे, आणि तुझ्या वर्षांना अंत नाही.
28 Dine tjeneres barn skal bo i ro, og deres avkom skal stå fast for ditt åsyn.
२८तुझ्या सेवकांची मुले इथे कायम राहतील, आणि त्यांचे वंशज तुझ्या उपस्थितीत इथे राहतील.”