< Salomos Ordsprog 6 >
1 Min sønn! Har du gått i borgen for din næste, har du gitt en fremmed ditt håndslag,
१माझ्या मुला, शेजाऱ्याच्या कर्जाला जामीनासाठी जर तू आपला पैसा बाजूला ठेवलास, ज्याला तू ओळखत नाही अशा कोणाला तू कर्जासाठी वचन दिले,
2 har du latt dig binde ved din munns ord, har du latt dig fange i din munns ord,
२तर मग तू आपल्या वचनाने पाशात अडकला आहेस, आणि तू आपल्या तोंडच्या शब्दांनीच पकडला गेला आहेस.
3 så gjør således, min sønn, og frels dig, siden du er kommet i din næstes hånd: Gå og kast dig ned for din næste og storm inn på ham,
३ह्याकरिता, माझ्या मुला, तू हे कर आणि आपला बचाव कर, कारण तू शेजाऱ्याच्या तावडीत सापडला आहेस. जा आणि आपल्याला नम्र कर आणि आपल्या शेजाऱ्याला तुला मुक्त करण्यास आग्रह कर.
4 unn ikke dine øine søvn og dine øielokk blund,
४तुझ्या डोळ्यास झोप लागू देऊ नकोस, आणि तुझ्या पापण्यास गुंगी येऊ देऊ नको.
5 frels dig som et rådyr av jegerens hånd og som en fugl av fuglefangerens hånd!
५शिकाऱ्याच्या हातातून हरीणीला; जसे फासे पारध्याच्या हातातून पक्ष्याला, तसे तू आपणाला वाचव.
6 Gå til mauren, du late, se dens ferd og bli vis!
६अरे आळशी मनुष्या, मुंगीकडे पाहा, तिचे मार्ग पाहून शहाणा हो.
7 Enda den ikke har nogen fyrste, foged eller herre,
७तिला कोणी सेनापती अधिकारी, किंवा राजा नाही.
8 sørger den dog om sommeren for sitt livsophold og sanker om høsten sin føde.
८तरी ती उन्हाळ्यात आपले अन्न तयार करते, आणि जे काय खाण्यास लागणारे कापणीच्या समयी ते जमा करून ठेवते.
9 Hvor lenge vil du ligge, du late? Når vil du stå op av din søvn?
९अरे आळशी मनुष्या, तू किती वेळ झोपून राहशील? तू आपल्या झोपेतून केव्हा उठशील?
10 Du sier: La mig ennu få sove litt, blunde litt, folde mine hender litt og hvile!
१०“आणखी थोडीशी झोप घेतो, आणखी थोडीशी डुलकी खातो. आणखी विसावा घ्यायला हात घडी करतो.”
11 Da kommer armoden over dig som en landstryker og nøden som en mann med skjold.
११असे म्हणशील तर दारिद्र्य दरोडेखोराप्रमाणे आणि तुझी गरिबी हत्यारबंद मनुष्यासारखी येईल.
12 En niding, en ugjerningsmann er den som går omkring med en falsk munn,
१२दुर्जन व वाईट मनुष्य त्याच्या कपटी बोलण्याने जगतो,
13 som blunker med øinene, skraper med føttene, gjør tegn med fingrene,
१३त्याचे डोळे मिचकावतो, आपल्या पायांनी इशारा करतो, आणि आपल्या बोटांनी खुणा करतो.
14 som har svik i sitt hjerte, som tenker ut onde ting til enhver tid og volder tretter.
१४त्याच्या हृदयात कपट असून त्याबरोबर तो दुष्ट योजना आखतो; तो नेहमी वैमनस्य पसरतो.
15 Derfor skal ulykken komme brått over ham; i et øieblikk skal han knuses, og det er ingen lægedom for ham.
१५यामुळे त्याची विपत्ती तत्क्षणी त्यास गाठेल; कोणत्याही उपचाराशिवाय एका क्षणात तो तुटेल.
16 Seks ting er det Herren hater, og syv er vederstyggeligheter for hans sjel:
१६परमेश्वर अशा या सहा गोष्टींचा द्वेष करतो, त्यास अशा सात गोष्टींचा वीट आहेः
17 Stolte øine, falsk tunge og hender som utøser uskyldig blod,
१७गर्विष्टांचे डोळे, लबाड बोलणारी जीभ, निरपराध्यांचे रक्त पाडणारे हात,
18 et hjerte som legger op onde råd, føtter som haster til det onde,
१८मन जे वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखते, पाय जे वाईट गोष्टी करायला त्वरेने धाव घेतात,
19 den som taler løgn og vidner falsk, og den som volder tretter mellem brødre.
१९लबाड बोलणारा खोटा साक्षी, आणि जो कोणी भावाभावामध्ये वैमनस्य पेरणारा मनुष्य, ह्या त्या आहेत.
20 Bevar, min sønn, din fars bud og forlat ikke din mors lære!
२०माझ्या मुला, तुझ्या वडिलांची आज्ञा पाळ, आणि तुझ्या आईची शिकवण विसरु नकोस.
21 Bind dem alltid til ditt hjerte, knytt dem fast om din hals!
२१ती नेहमी आपल्या हृदयाशी कवटाळून धर; ती आपल्या गळ्यात बांधून ठेव.
22 Når du går, skal de lede dig; når du ligger, skal de verne dig, og når du våkner, skal de tale til dig.
२२जेव्हा तू चालशील, ते तुला मार्गदर्शन करील; जेव्हा तू झोपशील, तेव्हा ते तुझे रक्षण करील; आणि जेव्हा तू उठशील तेव्हा ते तुझ्याशी बोलेल.
23 For budet er en lykte og læren et lys, og tilrettevisninger til tukt er en vei til livet,
२३कारण ती आज्ञा दिवा आहेत आणि शिक्षण प्रकाश आहे; शिस्तीचा दोषारोप जीवनाचा मार्ग आहे.
24 så de bevarer dig fra en ond kvinne, fra en fremmed kvinnes glatte tunge.
२४ते तुला अनितीमान स्त्रीकडे जाण्यापासून परावृत्त करते, व्यभिचारी स्त्रीच्या गोडबोल्या जिभेपासून तुझे रक्षण करते.
25 Attrå ikke hennes skjønnhet i ditt hjerte? og la henne ikke fange dig med sine øiekast!
२५तू आपल्या हृदयात तिच्या सुंदरतेची लालसा धरू नकोस, आणि ती आपल्या पापण्यांनी तुला वश न करो.
26 For en skjøge armer en mann ut like til siste brødleiv, og annen manns hustru fanger en dyr sjel.
२६वेश्येबरोबर झोपल्याने भाकरीच्या तुकड्याची किंमत चुकवावी लागते, पण दुसऱ्याच्या पत्नीची किंमत म्हणून तुला तुझ्या स्वतःचे जीवन द्यावे लागेल.
27 Kan nogen hente ild i sitt fang uten hans klær brennes op?
२७मनुष्याने आपल्या छातीशी विस्तव धरून ठेवला तर, त्याचे कपडे जळल्याशिवाय राहतील काय?
28 Eller kan nogen gå på glør uten hans føtter blir svidd?
२८जर एखादा मनुष्य निखाऱ्यांवर चालला, तर त्याचे पाय भाजल्याशिवाय राहतील काय?
29 Slik blir det med den som går inn til sin næstes hustru; ingen blir ustraffet som rører henne.
२९जो कोणी आपल्या शेजाऱ्याच्या पत्नीबरोबर जातो तो असाच आहे; जो कोणी तिच्याबरोबर संबंध ठेवतो त्यास शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही.
30 Blir ikke tyven foraktet, når han stjeler for å stille sin sult?
३०जर चोर चोरी करताना पकडला तर लोक त्यास तुच्छ मानत नाही; तो भुकेला असताना त्याची भूक शमविण्यासाठी त्याने चोरी केली.
31 Og hvis han blir grepet, må han betale syvfold; alt det han eier i sitt hus, må han gi.
३१पण तो पकडला गेला, तर त्याने चोरी केली त्याच्या सातपट परत देईल, तो आपल्या घरचे सर्वच द्रव्य देईल.
32 Den som driver hor med en kvinne, er uten forstand; den som vil ødelegge sin sjel, han gjør slikt.
३२जो व्यभिचार करतो तो बुद्धिहीन आहे; जो आपल्या जिवाचा नाश करू इच्छितो तो असे करतो.
33 Hugg og skam får han, og hans vanære slettes aldri ut.
३३जखमा व अप्रतिष्ठा त्यास प्राप्त होतील, आणि त्याची लज्जा कधीही धुतली जाणार नाही.
34 For nidkjær er mannens vrede, og han sparer ikke på hevnens dag;
३४कारण ईर्ष्या मनुष्यास संतप्त करते; सूड उगविण्याच्या दिवशी तो गय करणार नाही.
35 han tar ikke imot bøter og lar sig ikke formilde, om du gir ham store gaver.
३५तो काही खंडणी स्वीकारणार नाही, आणि त्यास खूप दाने दिली तरी तो शांत राहणार नाही.