< Salomos Ordsprog 31 >
1 Kong Lemuels ord, den lærdom som hans mor innprentet ham:
१ही लमुएल राजाची वचने आहेत त्याच्या आईने त्यास शिकवलेली देववाणीः
2 Hvad skal jeg si til dig, min sønn, du mitt livs sønn, du mine løfters sønn?
२ऐक, माझ्या मुला? ऐक, माझ्या पोटच्या मुला? ऐक, माझ्या नवसाच्या मुला?
3 Gi ikke kvinner din kraft, og gå ikke på veier som fører til ødeleggelse for konger!
३तू आपली शक्ती स्त्रियांना देऊ नको, किंवा आपले मार्ग राजांचा नाश करणाऱ्यास देऊ नको.
4 Det sømmer sig ikke for konger, Lemuel, det sømmer sig ikke for konger å drikke vin, heller ikke for fyrster å drikke sterk drikk,
४हे लमुएला, द्राक्षरस पिणे हे राजांना शोभत नाही, आणि मादक पेय कोठे आहे? असे म्हणणे अधिपतींना शोभत नाही.
5 forat de ikke skal drikke og glemme hvad der er lov, og forvende retten for alle arminger.
५ते प्याले तर कायदा काय म्हणतो ते विसरून जातील, नंतर ते गरीबांचा न्याय उलटा करतील.
6 Gi sterk drikk til den som er sin undergang nær, og vin til den som er bedrøvet i sjelen!
६जो नाशास लागला आहे त्यास मादक पेय दे. आणि खिन्न जिवाला द्राक्षरस दे.
7 La ham få drikke, så han glemmer sin fattigdom og ikke mere kommer sin møie i hu!
७त्याने पिऊन आपले दारिद्र्य विसरावे आणि त्याने आपले सर्व क्लेश विसरावे.
8 Oplat din munn for den stumme, for alle deres sak som er nær ved å forgå!
८जो कोणी स्वतःसाठी बोलू शकत नाही त्यांच्यासाठी बोल, गरीबांच्या हक्कांसाठी आपले तोंड उघड.
9 Oplat din munn, døm rettferdig og hjelp armingen og den fattige til hans rett!
९तू आपले मुख उघड आणि जे योग्य आहे त्याचा योग्य रीतीने न्याय कर, आणि ते गरीब व गरजू आहेत त्यांची बाजू मांडून त्यांना न्याय कर.
10 En god hustru - hvem finner henne? Langt mere enn perler er hun verd.
१०हुशार व कार्यक्षम पत्नी कोणाला सापडेल? पण तिचे मोल मौल्यवान खड्यांपेक्षा अधिक आहे.
11 Hennes manns hjerte liter på henne, og på vinning skorter det ikke.
११तिच्या पतीचे मन तिच्यावर भरवसा ठेवते, तो कधीही गरीब होणार नाही.
12 Hun gjør ham godt og intet ondt alle sitt livs dager.
१२ती आपल्या आयुष्याच्या सर्व दिवशी त्याच्यासाठी चांगल्या गोष्टी करते आणि अनिष्ट करत नाही.
13 Hun sørger for ull og lin, og hennes hender arbeider med lyst.
१३ती लोकर आणि ताग निवडते, आणि आपल्या हातांनी आनंदाने काम करते.
14 Hun er som en kjøbmanns skib; hun henter sitt brød langveisfra.
१४ती व्यापाऱ्याच्या जहाजासारखी आहे, ती आपले अन्न दुरून आणते.
15 Hun står op mens det ennu er natt, og gir sine husfolk brød og sine piker deres arbeid for dagen.
१५रात्र गेली नाही तोच ती उठून, आपल्या कुटुंबासाठी अन्न शिजवते, आणि नोकर मुलींना काय करायचे ते काम वाटून देते.
16 Hun tenker på en mark og får den; for det hun tjener med sine hender, planter hun en vingård.
१६ती शेताविषयी विचार करून ते विकत घेते, ती आपल्या हातांच्या श्रमाने द्राक्षाचे मळे लावते.
17 Hun omgjorder sine lender med kraft og gjør sine armer sterke.
१७ती स्वतःला बलरुप पोशाख घालते, आणि आपले बाहू बळकट करते.
18 Hun merker at det går godt med hennes arbeid; hennes lampe slukkes ikke om natten.
१८आपला उद्योग फायदेशीर आहे हे तिला कळते; सर्व रात्री तिचा दिवा विझत नाही.
19 Hun legger sine hender på rokken, og hennes fingrer tar fatt på tenen.
१९ती आपला हात चातीला लावते, आणि ती गुंडाळलेला दोरा धरते.
20 Hun åpner sin hånd for den trengende og rekker ut sine hender til den fattige.
२०ती आपला हात नेहमी गरीबांसाठी उघडते; ती गरजवंतास देण्यास आपला हात पुढे करते.
21 Hun frykter ikke sneen for sitt hus; for hele hennes hus er klædd i skarlagenfarvet ull.
२१आपल्या कुटुंबासाठी तिला बर्फाचे भय वाटत नाही, कारण तिचे सर्व कुटुंब किरमिजी वस्त्र पांघरलेले असते.
22 Hun gjør sig tepper; fint lin og purpur er hennes klædning.
२२ती आपल्या अंथरुणावर टाकायला चादरी आणि पांघरायला तलम तागाचे जांभळे वस्त्र तयार करते.
23 Hennes mann er kjent i byens porter, der han sitter sammen med landets eldste.
२३तिचा पती वेशीत, देशातल्या वडिलांमध्ये बसलेला असता त्यास लोक ओळखतात.
24 Hun gjør skjorter og selger dem, og belter leverer hun til kjøbmannen.
२४ती तागाची वस्त्रे करते आणि ते विकते, ती व्यापाऱ्यांना कमरबंध पुरवते.
25 Kraft og verdighet er hennes klædebon, og hun ler av den kommende tid.
२५बल व आदर तिचे वस्त्र आहेत, आणि ती येणाऱ्या काळामध्ये आनंदी राहू शकते.
26 Hun oplater sin munn med visdom, og kjærlig formaning er på hennes tunge.
२६तिच्या मुखातून सुज्ञतेचे बोल निघतात. आणि दयेचा नियम तिच्या जिभेवर आहे.
27 Hun holder øie med hvorledes det går til i hennes hus, og dovenskaps brød eter hun ikke.
२७ती कधीही आळशी नसते; ती आपल्या कुटुंबाच्या मार्गाकडे लक्ष देते, आणि आळसाची भाकर खात नाही.
28 Hennes sønner står op og priser henne lykkelig; hennes mann står op og roser henne:
२८तिची मुले उठतात आणि ती त्यांना जे काही आनंद देईल ते देते; तिचा पती तिची प्रशंसा करून, म्हणतो,
29 Det finnes mange dyktige kvinner, men du overgår dem alle.
२९“पुष्कळ स्त्रियांनी चांगले केले आहे, पण तू त्या सर्वांहून उत्कृष्ट आहेस.”
30 Ynde sviker, og skjønnhet forgår; en kvinne som frykter Herren, hun skal prises.
३०लावण्य फसवे आहे आणि सौंदर्य हे व्यर्थ आहे, पण तू जी स्त्री परमेश्वराचे भय धरते तिची प्रशंसा होते.
31 Gi henne av hennes arbeids frukt, og hennes gjerninger skal prise henne i byens porter.
३१तिच्या हाताचे फळ तिला द्या, आणि तिच्या कृत्यांनी भर वेशीत तिची प्रशंसा होवो.