< Nehemias 4 >

1 Da nu Sanballat hørte at vi bygget på muren, optendtes hans vrede; han blev yderlig forbitret og spottet jødene
आम्ही यरूशलेमचा कोट बांधून काढत आहोत हे सनबल्लटाने ऐकले. तेव्हा तो फार संतापला आणि नाराज झाला व त्याने यहूद्यांचा उपहास करायला सुरुवात केली.
2 og sa i nærvær av sine brødre og krigsfolket i Samaria: Hvad er det disse visne jøder gjør? Skal de ha lov til slikt? Skal de få ofre? Skal tro de vil få fullført verket idag? Skal tro de vil blåse liv i stenene fra grushaugene enda de alt er forbrent?
सनबल्लटाने आपले भाऊबंद आणि शोमरोन येथील सैन्य यांच्या उपस्थितीत, तो म्हणाला, “हे दुबळे यहूदी काय करत आहेत? ते आपणासाठी नगर स्थापित करतील काय? ते यज्ञ करतील काय? एका दिवसात सगळे बांधकाम पुरे करतील काय? या उकिरड्यातून आणि घाणीतून ते पुन्हा दगडांना सजीव करतील काय?”
3 Og ammonitten Tobias, som stod ved siden av ham, sa: La dem bygge så meget de vil - bare en rev hopper op på deres stenmur, så river den den ned.
तोबीया अम्मोनीची सनबल्लटाला साथ होती आणि तो म्हणाला, “जर एक लहानसा कोल्हा त्यावर चढून गेला तरी तो ही दगडी भिंत पाडून टाकील.”
4 Hør, vår Gud, hvorledes vi er blitt foraktet! La deres spott falle tilbake på deres eget hode, og la dem bli til rov i fangenskaps land!
आमच्या देवा, ऐक कारण आमचा तिरस्कार होत आहे. त्यांचे टोचून बोलणे त्यांच्यामस्तकी उलट आण. ज्या देशात ते बंदीवासात आहेत त्यामध्ये त्यांची लूट होवो.
5 Dekk ikke over deres misgjerning, og la ikke deres synd bli utslettet for ditt åsyn! For de har krenket dig for bygningsmennenes ører.
त्यांच्या अपराधांची क्षमा करु नकोस. तसेच तुझ्या डोळयांदेखत केलेल्या पापांची क्षमा करु नकोस. कारण बांधकाम करणाऱ्यांसमोर त्यांनी तुला राग आणला आहे.
6 Så bygget vi da på muren, og hele muren blev satt i stand til sin halve høide, og folket hadde godt mot på arbeidet.
यरूशलेमचा कोट आम्ही बांधला. व सर्व कोट अर्ध्या उंचीपर्यंत तयार झाला कारण लोकांनी मनापासून काम केले.
7 Men da Sanballat og Tobias og araberne og ammonittene og asdodittene hørte at vi holdt på med å utbedre Jerusalems murer, og at revnene tok til å fylles, blev de meget vrede.
पण जेव्हा सनबल्लट, तोबीया, अरबी, अम्मोनी आणि अश्दोदी यांचा मात्र फार संताप झाला. लोकांनी यरूशलेमेच्या भिंतीचे काम सुरुच ठेवले आहे हे त्यांनी ऐकले. भिंतीला पडलेली भगदाडे ते बुजवत आहेत हे ही त्यांच्या कानावर आले.
8 Og de sammensvor sig alle om å komme og stride mot Jerusalem og hindre folket i dets arbeid.
तेव्हा या सर्वांनी एकत्र येऊन आणि यरूशलेमेविरुध्द हल्ला करण्याचा कट केला आणि तेथे गोंधळ उडवण्याचा त्यांनी बेत केला.
9 Men vi bad til vår Gud, og vi stilte ut vaktposter mot dem dag og natt av frykt for dem.
पण आम्ही आमच्या देवाची प्रार्थना केली. आणि त्यांना तोंड द्यायला सज्ज असावे म्हणून आम्ही रात्रंदिवस पहारा करण्यासाठी भिंतींवर राखणदार नेमले.
10 Da sa jødene: Bærernes kraft svikter, og grushaugene er for store; vi makter ikke lenger å bygge på muren.
१०मग त्यावेळी यहूदी लोक म्हणाले, “भार वाहकांची शक्ती कमी झाली आहे. वाटेत खूपच घाण आणि केरकचरा साचला आहे आणि कोटाचे बांधकाम आम्ही चालू ठेवू शकत नाही.”
11 Og våre motstandere sa: De må ikke få vite eller merke noget før vi står midt iblandt dem og hugger dem ned og således gjør ende på arbeidet.
११आणि आपले शत्रू म्हणतात, “यहूद्यांना काही समजायच्या किंवा दिसायच्या अगोदरच आम्ही त्यांच्यात शिरकाव केलेला असेल आणि आम्ही त्यांना मारुन टाकू म्हणजे कामच थांबेल.”
12 Da nu de jøder som bodde i nærheten av dem, kom fra alle kanter og vel ti ganger sa til oss: I må vende tilbake til oss,
१२त्यावेळी जे यहूदी त्यांच्याजवळ राहत होते ते चोहोकडून आमच्याकडे आले आणि आमच्याविरूद्ध त्यांनी जी योजना केली होती त्याविषयी इशारा देऊन दहा वेळा बोलले.
13 da stilte jeg folket op på de laveste steder bak muren, på de åpne plasser; jeg stilte dem op efter deres ætter med sine sverd og spyd og buer.
१३तेव्हा मी कोटाभोवतालच्या सर्वात सखल जागांच्या मागे काहीजणांना ठेवले. प्रत्येक कुटुंबाला ठराविक जागेवर नेमले. त्यांच्याजवळ तलवारी, भाले आणि धनुष्य ही शस्त्रे होती.
14 Og da jeg så dem opstilt, gikk jeg frem og sa til de fornemme og forstanderne og til hele folket: Vær ikke redd dem, tenk på Herren, den store og forferdelige, og strid for eders brødre, eders sønner og døtre, eders hustruer og eders hjem!
१४सगळी परिस्थिती मी डोळ्यांखालून घातली. आणि मग उभा राहून मी महत्वाची घराणी, अधिकारी आणि इतर लोक यांना म्हणालो, “आपल्या शत्रूंची भीती बाळगू नका. आमचा प्रभू, परमेश्वर जो महान आणि सामर्थ्यशाली आहे, त्याचे स्मरण करा. आपले भाऊबंद, मुले, मुली, आपल्या स्त्रिया आणि घरेदारे यांच्यासाठी लढा.”
15 Da våre fiender hørte at vi hadde fått vite det, og at Gud hadde gjort deres råd til intet, vendte vi alle sammen tilbake til muren, hver til sitt arbeid.
१५आपले बेत आम्हास कळून चुकले आहेत हे आमच्या शत्रूंनी ऐकले आणि देवाने त्यांचे बेत धुळीला मिळवले हे त्यांना समजले. तेव्हा आम्ही पुन्हा कोटाच्या कामाला लागलो. जो तो आपापल्या ठिकाणी जाऊन आपल्या वाट्याचे काम करु लागला.
16 Fra den dag arbeidet bare den ene halvdel av mine unge menn på verket, mens den andre halvdel av dem stod der med sine spyd, skjold, buer og brynjer, og høvdingene stod bakenfor hele Judas folk.
१६त्यादिवसापासून माझे निम्मे सेवक फक्त तटबंदीचे काम करत होते आणि उरलेले निम्मे लोक भाले, ढाली, धनुष्य, यासह चिलखत घालत, सर्व यहूदी लोकांच्या पाठीमागे अधिकारी उभे होते.
17 De som bygget på muren, og bærerne med sine byrder, de arbeidet med sin ene hånd på verket, og med den andre holdt de sitt våben;
१७बांधकाम करणारे आणि त्यांचे मदतनीस यांच्या एका हातात बांधकामाची अवजारे तर दुसऱ्या हातात शस्त्रे होती.
18 hver av bygningsmennene hadde sitt sverd spent om sine lender mens de bygget; og basunblåseren stod ved siden av mig.
१८तलवार कमरेला बांधूनच प्रत्येकजण बांधकाम करत होता. सावधगिरीच्या इशाऱ्याचे रणशिंग वाजवणारा मनुष्य माझ्या शेजारीच होता.
19 Og jeg sa til de fornemme og forstanderne og til hele folket: Arbeidet er stort og vidløftig, og vi er spredt på muren langt fra hverandre.
१९मग मी प्रमुख घराणी, अधिकारी आणि इतर लोक यांच्याशी बोललो. त्यांना मी म्हणालो “ही एक प्रचंड कामगिरी आहे आणि आपण भिंतीलगत विखुरलेलो आहोत. एकमेकापासून लांब अंतरावर आहोत.
20 På det sted hvor I hører basunen lyder, der skal I samle eder hos oss. Vår Gud vil stride for oss.
२०तेव्हा कर्ण्याचा आवाज कानी पडताच त्या ठिकाणी धावत या. तेथे एकत्र गोळा व्हा. आपला देवच आपल्यासाठी लढेल.”
21 Så arbeidet vi da på verket mens halvdelen stod der med sine spyd, fra morgenrøden rant op til stjernene kom frem.
२१अशाप्रकारे आम्ही यरूशलेमेच्या कोटाचे काम चालूच ठेवले. अर्धे लोक हाती भाले घेऊन पहाटेपासून ते सरळ रात्री आकाशात चांदण्या दिसेपर्यंत उभे असत.
22 På samme tid sa jeg også til folket: Hver mann med sin tjener skal bli natten over inne i Jerusalem, så vi kan ha dem til vakt om natten og til arbeid om dagen.
२२त्यावेळी मी लोकांस असेही म्हणालो, “प्रत्येक बांधकाम करणाऱ्याने आपल्या मदतनीसासह रात्री यरूशलेमेच्या आत राहिले पाहिजे. म्हणजे रात्री ते राखणदार म्हणून आणि दिवसा कामगार म्हणून काम करतील.”
23 Og hverken jeg eller mine brødre eller mine tjenere eller vaktmennene, som fulgte mig, kom av klærne; hver mann hadde sitt våben hos sig og vann.
२३मी, माझे बंधू, माझे सेवक, आणि माझ्यामागून चालणारे राखणदार कोणीही आपले कपडे बदली करत नसत आणि पाण्याला जातानासुद्धा आम्ही प्रत्येकजण आपले शस्त्र धारण करीत असे.

< Nehemias 4 >