< Nehemias 3 >
1 Ypperstepresten Eljasib og hans brødre og prestene gjorde sig rede og bygget Fåreporten; de helliget den og satte inn dørene; så bygget de videre til Mea-tårnet, som de helliget, og videre frem til Hananel-tårnet.
१मग मुख्य याजक एल्याशीब आपल्या याजक भावांबरोबर उठला आणि त्यांनी मेंढेवेस बांधली. त्यांनी ती पवित्र करून दरवाजे त्याच्याजागी बसवले. हमेआ बुरुजापर्यंत आणि हनानेल बुरुजापर्यंत ती त्यांनी पवित्र केली.
2 Ved siden av dem bygget mennene fra Jeriko og ved siden av dem Sakkur, Imris sønn.
२त्यानंतर यरीहोच्या लोकांनी बांधले आणि त्यानंतर इम्रीचा पुत्र जक्कूर याने बांधकाम केले.
3 Fiskeporten blev bygget av Sena'as barn; de tømret den op og satte inn dører, låser og slåer.
३हस्सनाच्या मुलांनी मत्स्यवेस बांधली. तुळया घातल्या व दरवाजे बसवले, या दरवाजांना कड्या आणि अडसर घातले.
4 Ved siden av dem arbeidet Meremot, sønn av Uria, Hakkos' sønn, ved siden av ham Mesullam, sønn av Berekja, Mesesabels sønn, og ved siden av ham Sadok, Ba'anas sønn.
४हक्कोस उरीयाचा पुत्र मरेमोथ याने या तटबंदीच्या पुढच्या भागाची डागडूजी केली. उरीया हा हक्कोस याचा पुत्र. बरेख्याचा पुत्र मशुल्लाम याने त्याच्या पुढच्या भागाचे काम केले. बरेख्या मशेजबेलचा पुत्र बानाचा पुत्र सादोक याने त्यापुढील भागाची दुरुस्ती केली.
5 Ved siden av ham arbeidet folkene fra Tekoa; men de fornemme blandt dem bøide ikke sin nakke under arbeidet for sin Herre.
५तकोवाच्या लोकांनी भिंतीच्या त्यापुढच्या भागाची डागडूजी केली, पण तकोवाच्या नेत्यांनी मात्र आपला राज्यपाल नहेम्या याच्यासाठी काम करायला नकार दिला.
6 Den gamle port blev satt i stand av Jojada, Paseahs sønn, og Mesullam, Besodjas sønn; de tømret den op og satte inn dører og låser og slåer.
६यहोयादा आणि मशुल्लाम यांनी जुन्या वेशीची दुरुस्ती केली. यहोयादा पासेहाचा पुत्र आणि मशुल्लाम बसोदयाचा पुत्र. यांनी तुळया बसवल्या आणि दरवाजे बिजागऱ्यांनी जोडले, नंतर कड्या व अडसर बसवले.
7 Ved siden av dem arbeidet gibeonitten Melatja og meronotitten Jadon med mennene fra Gibeon og Mispa, som hørte under stattholderens domstol hinsides elven.
७गिबोन आणि मिस्पा येथील लोकांनी भिंतीच्या पुढील भागाचे काम केले. गिबोन मधला मलत्या आणि मेरोनोथ येथला यादोन आणि गिबोन आणि मिस्पा येथील लोकांनी हे काम केले. गिबोन आणि मिस्पा हा भाग फरात नदीच्या पश्चिमेकडील भागाच्या अधिकाऱ्याच्या सत्तेखाली होता.
8 Ved siden av dem arbeidet Ussiel, Harhajas sønn, en gullsmed, og ved siden av ham Hananja, en av salvelagerne. Det næste stykke av Jerusalems mur lot de være like til den brede mur.
८हरह याचा पुत्र उज्जियेल याने पुढच्या भागाची डागडुजी केली, उज्जियेल सोनार होता आणि हनन्या हा सुगंधी द्रव्ये करणाऱ्यांपैकी होता. या लोकांनी रुंद कोटापर्यंत यरूशलेमेची मजबुती केली.
9 Ved siden av dem arbeidet Refaja, Hurs sønn, høvdingen over den ene halvdel av Jerusalems distrikt.
९हूरचा पुत्र रफाया याने भिंतीचा पुढील भाग बांधून काढला. यरूशलेमेच्या अर्ध्या भागाचा हा राज्यपाल होता.
10 Ved siden av ham arbeidet Jedaja, Harumafs sønn, midt imot sitt eget hus, og ved siden av ham Hattus, Hasabnejas sønn.
१०हरूमफाचा पुत्र यदाया याने भिंतीच्या पुढच्या भागाचे काम केले. आपल्या स्वत: च्या घरालगतच्या भिंतीची डागडुजी त्याने केली. त्याच्या पुढचा भाग हशबन्याचा पुत्र हत्तूश याने डागडुजी केली.
11 Et annet stykke blev satt i stand av Malkia, Harims sønn, og Hassub, Pahat-Moabs sønn, og dessuten Ovnstårnet.
११हारीमचा पुत्र मल्कीया आणि पहथ-मवाबचा पुत्र हश्शूब यांनी पुढच्या भागाची दुरूस्ती केली तसेच भट्टी बुरुज ही बांधला.
12 Ved siden av ham arbeidet Sallum, sønn av Hallohes, høvdingen over den andre halvdel av Jerusalems distrikt, og sammen med ham hans døtre.
१२हल्लोहेशचा पुत्र शल्लूम याने त्यापुढचा भाग दुरुस्त केला. या कामात त्याच्या कन्यांनी त्यास मदत केली. शल्लूम यरूशलेमेच्या अर्ध्या भागाचा अधिकारी होता.
13 Dalporten blev satt i stand av Hanun og innbyggerne i Sanoah; de bygget den og satte inn dører, låser og slåer; de bygget også tusen alen av muren, til Møkkporten.
१३हानून नावाचा एकजण आणि जानोहा येथे राहणारे लोक यांनी खोऱ्याच्या वेशीची दुरुस्ती केली. ही वेस बांधून त्यांनी दारे बिजागाऱ्यांवर उभी केली. मग या दारांना त्यांनी कड्या व अडसर घातले. त्यांनी उकिरडा वेशीपर्यंत एक हजार हात लांबीची दुरुस्ती केली.
14 Og Møkkporten blev satt i stand av Malkia, Rekabs sønn, høvdingen over Bet-Hakkerems distrikt; han bygget den op og satte inn dører og låser og slåer.
१४रेखाबाचा पुत्र मल्कीया याने ही उकिरड्याची वेस बांधली, मल्कीया बेथ-हक्करेम या जिल्ह्याचा राज्यपाल होता. त्याने वेस दुरुस्त केली आणि दरवाजे बिजागऱ्यांसह लावले, या दरवाजांना कड्या, अडसर घातले.
15 Kildeporten blev satt i stand av Sallun, Kol-Hoses sønn, høvdingen over Mispas distrikt; han bygget den, la tak på den og satte inn dører, låser og slåer; likeledes bygget han muren ved Selah-dammen ved kongens have helt frem til de trapper som går ned fra Davids stad.
१५मिस्पा जिल्ह्याचा अधिकारी कोलहोजेचा पुत्र शल्लून याने झरावेशीची डागडुजी याने केली. त्याने वेस बांधून तिला छप्पर केले आणि वेशीचे दरवाजे बिजागऱ्यांसह लावले. मग दारांना कड्या व अडसर बसवले. शिवाय त्याने राजाच्या बागेलगतच्या शेलह तळयाची भिंतही बांधली. दावीद नगरातून पायऱ्या उतरण्याच्या जिन्यापर्यंत त्याने डागडुजी केली.
16 Efter ham arbeidet Nehemias, Asbuks sønn, høvdingen over den ene halvdel av Betsurs distrikt, til midt imot Davids graver og til den gravde dam og til heltenes hus.
१६अजबूकचा पुत्र नहेम्या याने पुढचा भाग दुरुस्त केला. नहेम्या बेथ-सूरच्या अर्ध्या जिल्ह्याचा अधिकारी होता. दावीदाच्या कबरेसमोरच्या भागापर्यंत त्याने डागडुजी केली. तसेच बांधून काढलेला तलाव आणि वीरगृह इथपर्यंत त्याने काम केले.
17 Efter ham arbeidet levittene under Rehum, Banis sønn; ved siden av ham arbeidet Hasabja, høvdingen over den ene halvdel av Ke'ilas distrikt, for sitt distrikt.
१७लेवी घराण्यातील लोकांनी पुढचे काम केले. बानीचा पुत्र रहूम याच्या हाताखाली या लोकांनी काम केले. हशब्याने पुढच्या भागाची डागडुजी केली. नहेम्या कईला जिल्ह्याचा अधिकारी होता. त्याने आपल्या जिल्ह्यातर्फे दुरुस्त्या केल्या.
18 Efter ham arbeidet deres brødre under Bavvai, Henadads sønn, høvdingen over den andre halvdel av Ke'ilas distrikt.
१८त्याच्या भावांनी हेनादादचा पुत्र बवाई, कईलाच्या अर्ध्या भागाचा अधिकारी व भाऊबंधानी डागडुजी केली.
19 Ved siden av ham arbeidet Eser, Josvas sønn, høvdingen over Mispa, på et annet stykke, fra plassen midt imot opgangen til våbenhuset i Vinkelen.
१९नंतर येशूवाचा पुत्र एजेर याने पुढचे दुरुस्तीचे काम पार पाडले. एजेर मिस्पाचा राज्यपाल होता. शस्त्रागारापासून भिंतीच्या कोपऱ्यापर्यंतच्या भिंतदुरुस्तीचे काम त्याने केले.
20 Efter ham arbeidet Baruk, Sabbais sønn, med stor iver på et annet stykke, fra Vinkelen og til døren på ypperstepresten Eljasibs hus.
२०जब्बईचा पुत्र बारुख याने पुढची दुरुस्ती केली. बारुखने खूप मेहनत घेऊन कोपऱ्यापासून पुढे एल्याशीबाच्या घराच्या प्रवेशद्वारापर्यंतचे काम केले. एल्याशीब हा मुख्य याजक होता.
21 Efter ham arbeidet Meremot, sønn av Uria, Hakkos' sønn, på et annet stykke, fra døren på Eljasibs hus og til enden av hans hus.
२१हक्कोसचा पुत्र उरीया. उरीयाचा पुत्र मरेमोथ याने एल्याशीबाच्या घराच्या दारापासून सरळ घराच्या शेवटपर्यंत भिंतीचे काम केले.
22 Efter ham arbeidet prestene, mennene fra Jordan-sletten.
२२भिंतीच्या पुढच्या भागाची दुरुस्ती यरूशलेमभोवती राहणाऱ्या याजकांनी केली.
23 Efter dem arbeidet Benjamin og Hasub midt imot sitt eget hus; efter dem arbeidet Asarja, sønn av Ma'aseja, Ananjas sønn, ved siden av sitt hus.
२३बन्यामीन आणि हश्शूब यांनी आपापल्या घरासमोरील भिंत दुरुस्त केली अनन्याचा पुत्र मासेया. मासेयाचा पुत्र अजऱ्या. याने आपल्या घरालगतच्या भिंतीचे दुरुस्तीचे काम केले.
24 Efter ham arbeidet Binnui, Henadads sønn, på et annet stykke, fra Asarjas hus til Vinkelen og til det sted hvor muren bøier av.
२४हेनादादचा पुत्र बिन्नुई याने अजऱ्याच्या घरापासून, भिंतीचे वळण आणि पुढचा कोपरा येथपर्यंतचे काम केले.
25 Palal, Usais sønn, arbeidet fra stedet midt imot Vinkelen og det tårn som springer frem fra kongens øvre hus ved fengselsgården; efter ham arbeidet Pedaja, Paros' sønn.
२५उजई याचा पुत्र पलाल याने बुरजालगतच्या भिंतीच्या वळणापासूनची दुरुस्ती केली. हा बुरुज राजाच्या वरच्या घराजवळ होता. म्हणजेच राजाच्या पहारेकऱ्यांच्या चौकालगत होता. त्यानंतर परोशाचा पुत्र पदाय याने दुरुस्ती केली.
26 - Tempeltjenerne bodde på Ofel, til plassen midt imot Vannporten mot øst og det fremspringende tårn -.
२६ओफेल टेकडीवर राहणारे मंदिराचे सेवेकरी (नथीमीम) यांनी जलवेशीच्या पूर्वेपर्यंत आणि तिच्या नजीकच्या बुरुजापर्यंतचे भिंतदुरुस्तीचे काम केले.
27 Efter ham arbeidet folkene fra Tekoa på et annet stykke, fra plassen midt imot det store fremspringende tårn og til Ofel-muren.
२७पुढे तकोवाच्या लोकांनी मोठ्या बुरुजापासून ते सरळ ओफेल टेकडीपर्यंतचा उरलेला भाग दुरुस्त केला.
28 Ovenfor Hesteporten arbeidet prestene, hver av dem midt imot sitt eget hus.
२८घोडा वेशीवरचा भाग याजकांनी दुरुस्त केला. प्रत्येक याजकाने आपापल्या घरापुढच्या भागाची दुरुस्ती केली.
29 Efter dem arbeidet Sadok, Immers sønn, midt imot sitt eget hus, og efter ham Semaja, Sekanjas sønn, som hadde vaktholdet ved den østre port.
२९इम्मेराचा पुत्र सादोक याने आपल्या घरापुढच्या भिंतीची डागडुजी केली. शखन्याचा पुत्र शमाया याने पुढचा भाग दुरुस्त केला. शमाया हा पूर्ववेशीचा राखणदार होता.
30 Efter ham arbeidet Hananja, Selemjas sønn, og Hanun, Salafs sjette sønn, på et annet stykke, og efter dem Mesullam, Berekjas sønn, midt imot sitt kammer.
३०शलेम्याचा पुत्र हनन्या याने आणि सालफचा सहावा पुत्र हानून याने भिंतीची पुढची दुरुस्ती केली. बरेख्याचा पुत्र मशुल्लाम याने आपल्या घरापुढची भिंत दुरुस्त केली.
31 Efter ham arbeidet Malkia, en av gullsmedene, frem til tempeltjenernes og kremmernes hus, midt imot Mønstringsporten og frem til Hjørnesalen.
३१मंदिराचे सेवेकरी आणि व्यापारी यांच्या घरापर्यंतच्या भिंतीच्या भागाची दुरुस्ती सोनारांपैकी मल्कीया याने केली. हा भाग तपासणी वेशीसमोर येतो. भिंतीच्या कोपऱ्यावरील खोलीपर्यंतच्या भिंतीची दुरुस्ती मल्कीयाने केली.
32 Og mellem Hjørnesalen og Fåreporten arbeidet gullsmedene og kremmerne.
३२कोपऱ्यावरील खोली आणि मेंढरांची वेस यांच्या दरम्यानच्या भिंतीची दुरुस्ती सोनार आणि व्यापारी यांनी केली.