< Dommernes 5 >
1 Dengang sang Debora og Barak Abinoams sønn, denne sang:
१त्यादिवशी दबोरा आणि अबीनवामाचा पुत्र बाराक ह्यानी गाइलेले गीत:
2 Lov Herren, fordi fyrstene i Israel gikk først i striden fordi folket møtte villig frem!
२“इस्राएलाचे नेते पुढे चालले, लोक स्वसंतोषाने पुढे आले, म्हणून परमेश्वराचा धन्यवाद करा.
3 Hør, I konger! Lytt til, I høvdinger! Jeg - jeg vil synge om Herren; jeg vil lovsynge Herren, Israels Gud.
३राजानो, ऐका; अधिपतींनो लक्ष द्या, मी स्वतः परमेश्वरास गाईन; इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याची स्तोत्रे गाईन.
4 Herre, da du gikk ut fra Se'ir, da du skred frem fra Edoms mark, da bevet jorden, himlene dryppet, skyene dryppet av vann.
४हे परमेश्वरा, तू सेईराहून निघालास, अदोमाच्या प्रदेशातून कूच केलीस, तेव्हा पृथ्वी कंपायमान झाली; तसेच आकाशाने जलबिंदू गाळले; मेघांनीही जलबिंदू गाळले;
5 Fjellene skalv for Herrens åsyn, Sinai der borte skalv for Herrens, Israels Guds åsyn.
५परमेश्वरासमोर डोंगर थरथरा कापले, इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्यासमोर हा सीनाय देखील थरारला.
6 I Samgars, Anats sønns dager, i Jaels dager var stiene øde, de veifarende gikk på krokete stier.
६अनाथाचा मुलगा शमगार ह्याच्या काळी, याएलेच्या काळी राजमार्ग सुने पडले; वाटसरू आडमार्गांनी प्रवास करीत.
7 Det fantes ingen fører i Israel, nei, ingen før jeg, Debora, stod frem, før jeg stod frem, en mor i Israel.
७मी दबोरा पुढे येईपर्यंत, इस्राएलात माता म्हणून मी प्रसिद्ध होईपर्यंत, इस्राएलात कोणी पुढारी उरले नव्हते;
8 De valgte nye guder, da var der kamp ved portene; ei såes skjold, ei heller spyd blandt firti tusen i Israel.
८लोकांनी नवे देव निवडले तेव्हा वेशीवेशीतून संग्राम झाला; इस्राएलातील चाळीस हजारांमध्ये एकाजवळ तरी ढाल किंवा भाला दृष्टीस पडला काय?
9 Mitt hjerte slår for Israels høvdinger og for dem som villig møtte frem blandt folket. Pris Herren!
९माझे मन इस्राएलाच्या अधिपतींकडे लागले आहे ते लोकांबरोबर स्वसंतोषाने पुढे आले; तुम्ही परमेश्वराचा धन्यवाद करा.
10 Syng, I som rider på lyse aseninner, I som sitter på eders tepper, og I som vandrer på veien!
१०पांढऱ्या गाढवावर स्वारी करणाऱ्यांनो, अमूल्य गालिच्यावर बसणाऱ्यांनो, वाटेने चालणाऱ्यांनो, त्याचे गुणगान करा.
11 Bueskytternes røst lyder ved brønnene; der priser de Herrens rettferdige verk, hans styrelses rettferdige verk i Israel. Dengang steg de ned til portene, Herrens folk.
११पाणवठ्यावर पाणक्यांच्या स्वराने परमेश्वराच्या न्यायकृत्यांचे, इस्राएलावरील सत्तेसंबंधाने त्याच्या न्यायकृत्यांचे लोक वर्णन करतात त्या वेळी परमेश्वराचे प्रजाजन वेशीवर चालून गेले.
12 Våkn op, våkn op, Debora, våkn op, våkn op, stem i en sang! Stå op, Barak, og før dine fanger i fangenskap, du Abinoams sønn!
१२जागी हो, जागी हो दबोरे; जागी हो, जागी हो, गीत गा; बाराका ऊठ; अबीनवामाच्या पुत्रा, तू आपल्या बंदिवानांना घेऊन जा.
13 Dengang lød det: Stig ned, du lille flokk, stig ned til heltene, du folk! Herre, stig ned og strid for mig blandt kjempene!
१३तेव्हा उरलेले सरदार खाली उतरले; परमेश्वराचे लोक माझ्याकरिता वीरांविरुद्ध सामना करावयास उतरले.
14 Av Efra'im steg de ned, de som har sin rot på Amaleks fjell; efter dig kom Benjamin blandt dine folk; av Makir steg høvdinger ned, og av Sebulon de som drar frem med hærførerstav,
१४अमालेकात ज्यांची पाळेमुळे पसरली आहेत ते एफ्राइमामधून आले; तुझ्यामागून बन्यामीन तुझ्या सैन्यात दाखल झाला; माखीराहून अधिपती व जबुलूनाहून दंडधारी अंमलदार उतरून आले.
15 og fyrster i Issakar med Debora, og som Issakar, så Barak; i dalen styrter de avsted i hans følge. Ved Rubens bekker holdtes store rådslagninger.
१५इस्साखाराचे सरदार दबोरेबरोबर होते; इस्साखार बाराकाशी एकनिष्ठ होता; त्याच्या पाठोपाठ ते खोऱ्यात धावले, रऊबेनाच्या पक्षामध्ये मोठी चर्चा झाली.
16 Hvorfor blev du sittende mellem fehegnene og hørte på hyrdefløitene? Ved Rubens bekker holdtes store rådslagninger.
१६खिल्लारांसाठी वाजविलेला पावा ऐकत तू मेंढवाड्यात का बसलास? रऊबेनाच्या पक्षाविषयी फार विचारविनिमय झाला.
17 Gilead - hinsides Jordan blev han i ro, og Dan - hvorfor dvelte han ved skibene? Aser blev sittende ved havets bredd, og ved sine bukter blev han i ro.
१७गिलाद यार्देनेपलीकडेच राहिला; दान हा आपल्या जहाजापाशीच का बसून राहिला? आशेर समुद्रकिनाऱ्यावर बसून राहिला, आपल्या धक्क्यावर बसून राहिला.
18 Sebulon er et folk som ringeakter sitt liv inntil døden, likeså Naftali på sine fjell.
१८जबुलून व नफताली या लोकांनी आपल्या प्रांतांतील उंचवट्यांवर मृत्यूची पर्वा न करता आपला जीव धोक्यात घातला.
19 Konger kom, de stred, dengang stred Kana'ans konger ved Ta'anak, ved Megiddos vann; hærfang av sølv fikk de ikke.
१९राजे येऊन लढले, तेव्हा कनानाचे राजे मगिद्दोच्या जलप्रवाहापाशी तानख येथे लढले; त्यांना रुप्याची काहीच लूट मिळाली नाही.
20 Fra himmelen stred de, stjernene fra sine baner, de stred mot Sisera.
२०आकाशातून तारे लढले; त्यांनी आपआपल्या कक्षातून सीसराशी लढाई केली.
21 Kisons bekk rev dem bort, den eldgamle bekk, Kisons bekk. Skrid frem, min sjel, med kraft!
२१किशोन नदीने, त्या पुरातन नदीने, त्या कीशोन नदीने त्यांना वाहून नेले. हे जीवा, हिंमत धरून पुढे चाल.
22 Da trampet hestenes hover under kjempenes jagende, jagende fart.
२२तेव्हा घोडे भरधाव उधळले ते मस्त घोडे टापा आपटू लागले, त्यांच्या टापांचा आवाज झाला.
23 Forbann Meros, sa Herrens engel, forbann, forbann dets folk, fordi de ikke kom Herren til hjelp, Herren til hjelp blandt kjempene.
२३परमेश्वराचा दूत म्हणतो, मेरोजला शाप द्या त्यातल्या रहिवाश्यांना मोठा शाप द्या; कारण परमेश्वरास साहाय्य करावयास वीरांविरुद्ध परमेश्वरास साहाय्य करावयास ते आले नाहीत.
24 Priset fremfor kvinner være Jael, kenitten Hebers hustru! Fremfor kvinner i telt være hun priset!
२४केनी हेबेर यांची स्त्री याएल ही सगळ्या स्त्रियांमध्ये धन्य! डेऱ्यात राहणाऱ्या सर्व स्त्रियांमध्ये ती धन्य!
25 Vann bad han om, melk gav hun ham; i prektig skål bar hun frem fløte.
२५त्याने पाणी मागितले तो तिने त्यास दूध दिले; श्रीमंताना साजेल अशा वाटीत तिने त्यास दही आणून दिले.
26 Sin hånd rekker hun ut efter teltpluggen og sin høire hånd efter arbeidshammeren; hun slår Sisera med hammeren, knuser hans hode, sønderslår og gjennemborer hans tinning.
२६तिने आपला एक हात मेखेला आणि उजवा हात कारागिराच्या हातोड्याला घातला; तिने हातोड्याने सीसराला मारले, त्याचे डोके फोडून टाकले, त्याचे कानशील मेख ठोकून आरपार विंधले.
27 For hennes føtter seg han ned, falt han, lå han; for hennes føtter seg han ned, falt han; der han seg ned, der lå han fellet.
२७तिच्या पायाखाली तो वाकला व पडला, निश्चल झाला; जेथे तो वाकला तेथेच तो मरून पडला.
28 Gjennem vinduet skuer hun og roper, Siseras mor, ut gjennem gitteret: Hvorfor venter hans vogn med å komme? Hvorfor dveler hans traveres skritt?
२८सीसराच्या आईने खिडकीतून बाहेर डोकावले, तिने जाळीतून हाक मारली, त्याचा रथ यावयाला एवढा उशीर का झाला? त्याच्या रथाच्या चाकांना कोणी खीळ घातली?
29 De klokeste av hennes fruer svarer henne, og selv gir hun sig svar på sine ord:
२९तिच्या चतुर सख्यांनी तिला उत्तर दिले हो, स्वतः तिनेच आपणास उत्तर दिले;
30 Til visse finner de hærfang og skifter: En kvinne, to kvinner til manns, hærfang av farvede klær for Sisera, hærfang av farvede klær, utsydde klær, én farvet klædning, to utsydde halsduker for hver av de hærtatte kvinner!
३०‘त्यांना मिळालेल्या लुटीची ते वाटणी तर करून घेत नसतील ना? प्रत्येक वीराला एक एक किंवा दोन-दोन कुमारिका; सीसरासाठी रंगीबेरंगी वस्रे, भरजरी रंगीबेरंगी वस्रे लुटीत मिळालेल्या कुमारिकांच्या गळ्यांत भुषण म्हणून पांघरण्यासाठी रंगीबेरंगी वस्रे मिळाली नसतील ना?’
31 Måtte alle dine fiender omkomme således, Herre, og de som elsker ham, være som solen når den går frem i sin kraft! - Og landet hadde ro i firti år.
३१हे परमेश्वरा, तुझे सर्व शत्रू असेच नाश पावोत; पण त्याच्यावर प्रेम करणारे प्रतापाने उदय पावणाऱ्या सूर्यासमान होवोत.” मग देशाला चाळीस वर्षे विसावा मिळाला.