< Joel 2 >
1 Støt i basun på Sion og blås alarm på mitt hellige berg, alle som bor i landet, beve! For Herrens dag kommer - den er nær,
१सियोनात कर्णा फुंका, आणि माझ्या पवित्र पर्वतावरून मोठ्याने गजर करा! या देशात राहणाऱ्यांचा भीतीने थरकाप उडू द्या, कारण परमेश्वराचा दिवस येत आहे; खरोखर, तो जवळ आहे.
2 en dag med mørke og mulm, en dag med skyer og skodde, utbredt over fjellene som morgenrøde - et stort og sterkt folk, som det ikke har vært make til fra fordums tid og heller ikke siden kommer make til gjennem årene, fra slekt til slekt.
२तो काळोखाचा आणि अंधाराचा प्रकाशाचा, तो ढगाळ व दाट अंधकाराचा दिवस आहे. तो पर्वतावर पसरलेल्या पहाटेसारखा, त्याचे प्रचंड व शक्तीशाली सैन्य जवळ येत आहे. त्यांच्यासारखे सैन्य कधी झाले नाही, आणि त्यानंतरही अनेक पिढ्या, पुन्हा कधीच होणार नाही.
3 Foran det fortærer ild, og efter det brenner lue; som Edens have er landet foran det, og efter det er det en øde ørken, og det er intet som slipper unda det.
३त्यांच्यासमोर अग्नी प्रत्येक वस्तू नाश करत आहे, आणि त्याच्यामागे ज्वाला जाळीत चालली आहे, त्यांच्यासमोरची भूमी एदेनाच्या बागेसारखी आहे, पण त्यांच्यामागे निर्जन वाळवंट आहे. खरोखर, त्यांच्या तावडीतून काहीही सुटणार नाही.
4 Som hester er det å se til, og som ryttere løper de avsted.
४सैन्याचे स्वरूप घोड्यांप्रमाणे आहे आणि घोडस्वाराप्रमाणे ते धावतात.
5 Det lyder som larm av vogner når de hopper over fjelltoppene, det lyder som når ildsluen fortærer halm, de er som et sterkt folk, rustet til krig.
५त्यांच्या उड्या मारण्याचा आवाज, पर्वतावरून जाणाऱ्या रथांसारखा, धसकट जाळणाऱ्या आग्नीसारखा, युध्दासाठी सज्ज झालेल्या बलवानासारखा आहे.
6 Folkeslag skjelver for det; alle ansikter blir blussende røde.
६त्यांच्यापुढे लोक व्यथित होतात आणि त्यांचे चेहेरे पांढरेफटक पडतात.
7 Som helter løper de avsted, som krigsmenn stiger de op på murene; de drar frem hver sin vei og bøier ikke av fra sine stier.
७ते वीरासारखे धावतात, ते सैनिकासारखे तटांवर चढतात, ते प्रत्येक आपल्या मार्गात चालत जातात, आणि आपली रांग तोडीत नाहीत.
8 De trenger ikke hverandre til side; de går frem hver på sin egen vei; mellem kastespyd styrter de frem og stanser ikke i sitt løp.
८ते एकमेकांना रेटीत नाहीत. प्रत्येकजण आपल्या वाटेने जातात. ते संरक्षणातून जातात आणि ते रेषेबाहेर जात नाहीत.
9 I byen vanker de om, på muren løper de, i husene stiger de op, gjennem vinduene går de inn som tyver.
९ते नगरातून धावत फिरतात. ते तटावर धावतात. ते चढून घरात शिरतात. चोराप्रमाणे ते खिडक्यांतून आत जातात.
10 Foran dem skjelver jorden og ryster himmelen; sol og måne sortner, og stjernene holder op å lyse.
१०त्यांच्यापुढे पृथ्वी कापते, आकाश थरथरते, सूर्य आणि चंद्र काळे पडतात आणि तारे तळपण्याचे थांबतात.
11 Og Herren lar sin røst høre foran sin fylking, for hans hær er såre stor, og sterk er den som fullbyrder hans ord; for stor er Herrens dag og såre forferdelig - hvem kan utholde den?
११परमेश्वर आपल्या सैन्यापुढे आपला आवाज उंचावतो, त्याचे योद्धे खूप असंख्य आहेत, कारण जो कोणी त्याची आज्ञा आमलात आणतो तो बलशाली आहे. कारण परमेश्वराचा दिवस हा मोठा आणि फार भयंकर आहे. त्यामध्ये कोण टिकू शकेल?
12 Men endog nu, sier Herren, vend om til mig med hele eders hjerte og med faste og gråt og klage,
१२“तरी आताही” परमेश्वर म्हणतो, “तुम्ही आपल्या सर्व मनापासून माझ्याकडे परत या. रडा, शोक करा आणि उपवास करा.”
13 og sønderriv eders hjerte og ikke eders klær, og vend om til Herren eders Gud! For han er nådig og barmhjertig, langmodig og rik på miskunnhet, og han angrer det onde.
१३आणि तुम्ही आपले कपडेच फाडू नका, तर आपले हृदय फाडा आणि परमेश्वर तुमचा देव याकडे वळा, कारण तो कृपाळू व दयाळू आहे, तो रागावण्यास मंद आणि विपुल प्रेम करणारा आहे, आणि त्याने लादलेल्या शिक्षेपासून तो मागे फिरेल.
14 Hvem vet? Han torde vende om og angre og la en velsignelse bli igjen efter sig, til matoffer og drikkoffer for Herren eders Gud.
१४परमेश्वर तुमचा देव याला कळवळा येऊन आणि कदाचित तो मागे वळेल, आणि त्याच्यामागे आपल्यासाठी आशीर्वादही ठेवून जाईल की, काय कोण जाणे? त्यास अन्नार्पण व पेयार्पण ही देता येतील?
15 Støt i basun på Sion, tillys en hellig faste, utrop en festforsamling!
१५सियोनात कर्णा फुंका. एक पवित्र उपास नेमा, आणि पवित्र मंडळीला बोलवा.
16 Samle folket, tillys en hellig sammenkomst, kall de gamle sammen, samle de små barn, endog dem som dier morsbryst! La brudgommen gå ut av sitt rum og bruden av sitt kammer!
१६लोकांस एकत्र जमवा, मंडळीला पवित्र करा. वडिलांना एकत्र करा, मुलांना आणि अंगावर दूध पिणाऱ्या अर्भकाना एकत्र जमवा. वर आपल्या खोलीतून आणि वधूही आपल्या मंडपातून बाहेर येवो.
17 Mellem forhallen og alteret skal prestene, Herrens tjenere, stå gråtende og si: Spar, Herre, ditt folk, og overgi ikke din arv til vanære, så hedninger får råde over den! Hvorfor skal de si blandt folkene: Hvor er deres Gud?
१७याजकांना, परमेश्वराच्या सेवकांना, द्वारमंडप व वेदी यांच्यामध्ये रडू द्या. त्यांनी म्हणावे, परमेश्वरा, आपल्या लोकांवर दया कर. आणि आपल्या वतनाची अप्रतिष्ठा होऊ देऊ नकोस. म्हणून राष्ट्रांनी त्यांच्यावर अधिकार करावा. राष्ट्रांनी आपसात असे कां म्हणावे त्यांचा देव कोठे आहे?
18 Da blir Herren nidkjær for sitt land, og han sparer sitt folk.
१८मग, तेव्हा परमेश्वराने देशासाठी, ईर्ष्या धरली, आणि त्याने आपल्या लोकांवर दया केली.
19 Og Herren svarer og sier til sitt folk: Se, jeg sender eder korn og most og olje, så I blir mette; og jeg vil ikke mere overgi eder til vanære blandt hedningene.
१९परमेश्वराने आपल्या लोकांस उत्तर देऊन म्हटले, “पाहा, मी तुमच्याकडे धान्य, नवा द्राक्षरस आणि तेल पाठवीन. तुम्ही त्यांनी तृप्त व्हाल, आणि ह्यापुढे, राष्ट्रात तुमची निंदा मी होऊ देणार नाही.
20 Og fienden fra Norden vil jeg drive langt bort fra eder og jage ham avsted til et tørt og øde land, hans fortropp til havet i øst og hans baktropp til havet i vest; og det skal stige op en stank fra ham, en motbydelig lukt; for altfor store ting har han tatt sig fore.
२०मी उत्तरेकडून हल्ला करणाऱ्यांना तुम्हापासून दूर करीन, आणि मी त्यांना रूक्ष आणि ओसाड देशात घालवून देईन. त्यांची आघाडी पूर्व समुद्रात आणि त्यांची पिछाडी पश्चिम समुद्रात जाईल. त्यांचा दुर्गध चढेल. आणि तेथे वाईट दुर्गंधी पसरेल. मी महान गोष्टी करीन.”
21 Frykt ikke, du land! Fryd dig og vær glad! For store ting har Herren gjort.
२१हे भूमी, घाबरू नकोस. आनंद कर आणि उल्हसित हो, कारण परमेश्वराने महान गोष्टी केल्या आहेत.
22 Frykt ikke, I markens dyr! For ørkenens beitemarker grønnes, trærne bærer sin frukt, fikentreet og vintreet gir sin kraft.
२२रानातल्या प्राण्यांनो, घाबरू नका. कारण रानातील कुरणांत हिरवळ उगवेल, झाडे त्यांचे फळे देतील, आणि अंजिराची झाडे व द्राक्षवेली आपले पूर्ण पीक देतील.
23 Og I, Sions barn, fryd og gled eder i Herren eders Gud! For han gir eder læreren til rettferdighet; og så sender han regn ned til eder, høstregn og vårregn, først.
२३म्हणून सियोनवासीयांनो, आनंदीत व्हा. आणि परमेश्वर तुमच्या देवामध्ये उल्हासित व्हा. कारण तुम्हास हितकर होईल इतका आगोटीचा पाऊस तो देतो, तो पहिली पर्जन्यवृष्टी योग्य प्रमाणाने देतो, आगोटीचा व वळवाचा पाऊस पाडतो.
24 Treskeplassene blir fulle av korn, og persekarene flyter over av most og olje.
२४खळी गव्हाने भरून जातील, आणि पिंपे द्राक्षरसाने व जैतूनाच्या तेलाने भरून वाहतील.
25 Og jeg godtgjør eder de år da vrimleren åt op alt, og slikkeren og skaveren og gnageren, min store hær, som jeg sendte mot eder.
२५मी, माझे सैन्य तुमच्याविरुध्द पाठवले. तुमचे जे काही होते ते, नाकतोडे, टोळ, कुसरूड व घुले यांनी खाल्ले. मी, तुमच्या संकटाच्या वर्षाची भरपाई करीन.
26 Og I skal ete og bli mette og prise Herrens, eders Guds navn, han som har stelt så underfullt med eder, og mitt folk skal aldri i evighet bli til skamme.
२६मग तुम्हास भरपूर खायला मिळेल. तुम्ही तृप्त व्हाल. आणि तुम्ही, तुमच्या परमेश्वर देवाची, स्तुती कराल. त्याने तुमच्यासाठी आश्चर्यकारक गोष्टी केल्या आहेत. माझ्या लोकांस पुन्हा कधीही लज्जित व्हावे लागणार नाही.
27 Og I skal kjenne at jeg bor midt i Israel, og at jeg er Herren eders Gud, og ingen annen; og mitt folk skal aldri i evighet bli til skamme.
२७मी इस्राएलाच्या बाजूने आहे हे तुम्हास समजेल. आणि मी परमेश्वर म्हणजे तुमचा देव आहे, आणि दुसरा कोणीच नाही. माझ्या लोकांस पुन्हा कधीही लज्जित व्हावे लागणार नाही.
28 Og derefter skal det skje at jeg vil utgyde min Ånd over alt kjød, og eders sønner og eders døtre skal tale profetiske ord; eders oldinger skal ha drømmer, eders unge menn skal se syner;
२८ह्यानंतर मी माझा आत्मा सर्व देहावर ओतीन, आणि तुमची मुले आणि तुमच्या मुली भविष्य सांगतील. तुमच्यातील वृद्धांना स्वप्न पडतील. तुमच्यातील तरूणांना दृष्टांत होतील.
29 ja, endog over trælene og over trælkvinnene vil jeg i de dager utgyde min Ånd.
२९आणि त्या दिवसात मी माझा आत्मा दासांवर व स्त्री दासीवरसुद्धा ओतीन.
30 Og jeg vil gjøre underfulle tegn på himmelen og på jorden: blod og ild og røkstøtter.
३०मी आकाशात आणि पृथ्वीवर आश्चर्यकारक चिन्हे आणि तेथे रक्त, अग्नी व दाट धुराचे खांब दाखवीन.
31 Solen skal omskiftes til mørke, og månen til blod, før Herrens dag kommer, den store og forferdelige.
३१परमेश्वराचा महान आणि भयंकर दिवस उगवण्यापूर्वी सूर्य बदलून अंधकारमय आणि चंद्र रक्तमय असा होईल.
32 Og det skal skje: Hver den som påkaller Herrens navn, skal bli frelst; for på Sions berg og i Jerusalem skal det være en flokk av undkomne, således som Herren har sagt, og blandt de undslopne skal de være som Herren kaller.
३२जसे परमेश्वराने म्हटले, जो कोणी परमेश्वराच्या नावाने हाक मारील तो प्रत्येकजण वाचेल. जे कोणी बचावतील ते सियोन पर्वतावर व यरूशलेमेत राहतील, आणि ज्यांना परमेश्वर बोलावतो, ते बाकी वाचलेल्यात राहतील.