< Jeremias 9 >
1 Gid mitt hode var vann, og mitt øie en tårekilde! Da vilde jeg dag og natt gråte over de drepte blandt mitt folk.
१जर माझे मस्तक पाण्याने भरलेले असते आणि माझे डोळे अश्रूंचे झरे असते तर मी माझ्या नाश पावलेल्या लोकांच्या कन्येसाठी अहोरात्र रडलो असतो तर किती बरे झाले असते.
2 Gid jeg i ørkenen hadde et herberge for veifarende! Da vilde jeg forlate mitt folk og gå bort fra dem; for de er alle sammen horkarler, en bande av troløse.
२जर वाळवंटात माझासाठी एक ठिकाण असते, तर मी माझ्या लोकांस सोडून त्यांच्यापासून खूप दूर गेलो असतो, कारण ते सर्व व्यभिचारी आणि विद्रोही असे आहेत.
3 De spenner sin tunge som en bue til løgn, og ikke på redelig vis er de blitt sterke i landet, men fra ondt til ondt er de gått frem, og mig kjenner de ikke, sier Herren.
३कारण ते त्यांच्या जिभेने खोटे बाण सोडतात, पण ते या पृथ्वीवर विश्वासूपणात मोठे नाहीत. ते एका पापाकडून दुसऱ्या पापाकडे जातात. ते मला ओळखत नाही, परमेश्वर असे म्हणातो.
4 Vokt eder, hver for sin venn, og stol ikke på nogen bror! For hver bror er en listig bedrager, og hver venn går omkring og baktaler.
४तुम्ही प्रत्येक आपल्या शेजाऱ्याविषयी सावध असा आणि कोणत्याही भावावर विश्वास ठेवू नका? कारण प्रत्येक भाऊ फसवणारा आहे आणि प्रत्येक शेजारी निंदा करणारा आहे.
5 Og de bruker svik, hver mot sin venn, og sannhet taler de ikke; de har lært op sin tunge til å tale løgn, de har trettet sig ut med å gjøre urett.
५प्रत्येक मनुष्य आपल्या शेजाऱ्याची थट्टा करतो आणि सत्य बोलत नाही. त्यांची जीभ खोटे बोलते. दुष्टाई करण्यासाठी ते आपणाला दमवतात.
6 Du bor midt i svik; i sin svik vil de ikke kjenne mig, sier Herren.
६तू आपल्या कपटामध्ये राहतो, त्यांच्या कपटामुळे ते मला ओळखायला नाकारतात, असे परमेश्वर म्हणतो.
7 Derfor sier Herren, hærskarenes Gud, så: Se, jeg vil smelte dem og prøve dem; for hvorledes skulde jeg gjøre annet, sådan som mitt folks datter er?
७यास्तव सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो: पाहा! मी त्यांची परिक्षा घेईल आणि त्यांना तपासून पाहीन. कारण मी आपल्या लोकांच्या कन्येकरिता आणखी काय करू?
8 Deres tunge er en drepende pil, den taler svik; med sin munn taler de vennlig med sin næste, og i sitt hjerte legger de snare for ham.
८त्यांच्या जिभा टोकदार बाणाप्रमाणे आहेत. त्या अविश्वासू गोष्टी बोलतात. प्रत्येकजण शेजाऱ्याशी वरवर चांगले बोलतो. पण गुप्तपणे ते शेजाऱ्यावर टपून असतात.
9 Skulde jeg ikke hjemsøke dem for dette? sier Herren; skulde min sjel ikke hevne sig på et folk som dette?
९या गोष्टींमुळे मी त्यांना शिक्षा करणार नाही काय? “अशा गोष्टींविषयी या राष्ट्रावर मी सूड उगवू नये का? परमेश्वर असे म्हणतो.
10 Over fjellene vil jeg opløfte gråt og klage og over ørkenens beitemarker en klagesang; for de er opbrent, så ikke nogen ferdes der, og det ikke høres lyd av fe; både himmelens fugler og dyrene har flyktet og draget bort.
१०मी डोंगरासाठी आकांत व विलाप करीन आणि मी कुरणांसाठी शोकगीत गाईन. कारण ती जाळून टकली आहे, तेथून आता कोणीही प्रवास करीत नाही. त्यांना गुरांचा आवाजही ऐकू येत नाही. आकाशातील पक्षी आणि प्राणी दूर निघून गेले आहेत.
11 Og jeg vil gjøre Jerusalem til grusdynger, til en bolig for sjakaler, og Judas byer vil jeg gjøre til en ørken, så ingen bor i dem.
११म्हणून मी यरूशलेम नगरी कचऱ्याचा ढीग करीन. ते कोल्ह्यांचे वसतिस्थान होईल. मी यहूदातील नगरे नष्ट करीन. मग तेथे कोणीही राहणार नाही.”
12 Den mann som er vis, han skjønne dette, og den som Herrens munn har talt til, han forkynne det: Hvorfor er landet gått til grunne? Hvorfor er det opbrent som ørkenen, så det ikke er nogen som ferdes der?
१२या गोष्टी समजण्याइतका सुज्ञ कोणी आहे का? परमेश्वराच्या मुखाने जे काही घोषीत केले, म्हणजे ते तो कळवू शकेल काय? या भूमीचा नाश का झाला? जेथे कोणीही जात नाही अशा वाळवंटासारखी ती का केली गेली.
13 Og Herren sa: Fordi de forlot min lov, som jeg la frem for dem, og ikke hørte på min røst og ikke fulgte den,
१३परमेश्वर म्हणाला, “हे असे झाले कारण, त्यांनी माझ्या शिकवणुकीला सोडून दिले, जे मी त्यांच्या समोर ठेवली होती, आणि त्यांनी माझी वाणी ऐकाण्यास आणि त्यावर चालण्यास नकार दिला.
14 men fulgte sitt hårde hjerte, og fulgte Ba'alene, slik som deres fedre hadde lært dem,
१४हे असे झाले कारण ते आपल्या दुराग्रही हृदयाच्या मर्जी प्रमाणे वागले आणि त्यांच्या वडिलांनी त्यांना शिकवल्या प्रमाणे, बालदेवास अनुसरले.”
15 derfor sier Herren, hærskarenes Gud, Israels Gud, så: Se, jeg gir dette folk malurt å ete og beskt vann å drikke,
१५यास्तव सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव असे म्हणतो, “मी या लोकांस कडू दवणा खायला लावीन आणि विषारी पाणी प्यायला लावीन.
16 og jeg vil sprede dem blandt hedningefolk som de ikke kjente, hverken de eller deres fedre, og jeg vil sende sverdet efter dem, til jeg får gjort ende på dem.
१६नंतर मी त्यांना आशा राष्ट्रांमध्ये विखरुन टाकीन त्यांनी किंवा त्यांच्या वडिलांनी पूर्वी कधीही ज्यांच्याबद्दल ऐकले नव्हते. आणि मी सर्व लोकांचा नाश होईपर्यंत त्यांच्या मागे तलवार पाठवीन.”
17 Så sier Herren, hærskarenes Gud: Gi akt og kall på klagekvinnene at de skal komme, og send bud til de kyndige kvinner at de skal komme
१७सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “या गोष्टींचा विचार करा. प्रेतयात्रेच्या वेळी रडणाऱ्यांना बोलवा, त्यांना येऊ द्या. आक्रंदणात कुशल असलेल्या स्त्रियांना बोलवा, त्यांना येऊ द्या.
18 og skynde sig og opløfte en klagesang over oss, så våre øine kan rinne med gråt og våre øielokk flyte med vann!
१८त्यांनी घाईने आमच्यासाठी विलाप करवा. म्हणजे आमचे डोळे भरुन येतील आणि अश्रूंचा पूर येईल.
19 For en klagerøst høres fra Sion: Hvor vi er ødelagt! Vi er blitt storlig vanæret; vi har måttet forlate landet fordi de har brutt ned våre boliger.
१९सियोनमधून विलापाचा आवाज ऐकायला येतो आहे. आम्ही कसे उद्ध्वस्त झालो आहोत, कारण आमची खरोखरच अप्रतिष्ठा झाली. आम्ही आपली भूमी सोडली आहे, कारण त्यांनी आमची घरे पाडून टाकली आहेत.”
20 Ja, hør, I kvinner, Herrens ord, la eders øre fornemme hans munns tale, og lær eders døtre klagesang, og den ene lære den andre sørgesang!
२०तर स्त्रियांनो, परमेश्वराचे वचन ऐका, त्याच्या मुखातील निघणाऱ्या संदेशाकडे चित्त लावा. नंतर तुमच्या मुलींना मोठ्याने विलाप करण्यास शिकव आणि शेजारील प्रत्येक स्त्रीला शोकगीत शिकवा.
21 For døden stiger op i våre vinduer, kommer inn i våre palasser, den vil utrydde de små barn på gatene, de unge menn på torvene.
२१कारण बाहेर असलेली मुले आणि चौकात तरुणांना नाहीसे करण्यास मृत्यू आमच्या खिडक्यातून चढून आला आहे. तो आमच्या राजवाड्यांमध्ये शिरला आहे.
22 Si: Så sier Herren: Menneskenes døde kropper skal ligge som gjødsel på marken og som kornbånd efter høstfolkene, og det er ingen som samler dem.
२२असे सांग: परमेश्वर असे म्हणतो, जसे उघड्यावर खत पडते आणि कापणाऱ्या मागे पेंढीतून गळण पडते, तशी मनुष्याची प्रेते पडतील, आणि ती कोणी गोळा करणार नाहीत.
23 Så sier Herren: Den vise rose sig ikke av sin visdom, og den sterke rose sig ikke av sin styrke, den rike rose sig ikke av sin rikdom!
२३परमेश्वर म्हणतो, “शहाण्यांनी त्यांच्या शहाणपणाबद्दल, बलवानांनी त्यांच्या बळाबद्दल व श्रीमंतांनी त्यांच्या पैशाबद्दल अभिमान बाळगू नये.”
24 Men den som vil rose sig, han rose sig av at han er forstandig og kjenner mig, at jeg er Herren, som gjør miskunnhet, rett og rettferdighet på jorden; for i det har jeg velbehag, sier Herren.
२४पण जर कोणाला अभिमान बाळगायचा असेल या गोष्टीत बाळगावा, की तो मला समजतो आणि मला ओळखोतो, कारण मी परमेश्वर आहे, जो प्रामाणिकपणा व न्याय आणि नितीमानता या पृथ्वीवर चालवतो, कारण या गोष्टींमध्ये मला हर्ष वाटतो, परमेश्वर असे म्हणतो.
25 Se, dager kommer, sier Herren, da jeg vil hjemsøke alle omskårne som er uomskårne.
२५परमेश्वर असे म्हणतो, ज्यांची फक्त शारीरिक सुंता झाली आहे, अशांना शिक्षा करण्याचे दिवस येत आहेत.
26 Egypten og Juda og Edom og Ammons barn og Moab og alle med rundklippet hår som bor i ørkenen, vil jeg hjemsøke; for alle hedningefolkene er uomskårne, og hele Israels hus er uomskåret på hjertet.
२६मिसर, यहूदा, अदोम, अम्मोन, मवाब यातील व वाळवंटात राहणारे, ज्यांनी आपल्या डोक्यावरचे केस कापले त्यांना शासन करीन. कारण ही सर्व राष्ट्रे बेसुनत आहेत, आणि इस्राएलाचे सर्व घराणे बेसुनत हृदयाचे आहेत.