< Jeremias 1 >
1 Ord av Jeremias, Hilkias' sønn, en av prestene i Anatot i Benjamins land.
१बन्यामीन प्रांतातील अनाथोथ येथल्या याजकांपैकी हिल्कीयाचा पुत्र यिर्मया ह्याची वचने:
2 Herrens ord kom til ham i de dager da Josias, Amons sønn, var konge i Juda, i det trettende år av hans regjering,
२म्हणजे यहूदाचा राजा आमोन ह्याचा मुलगा योशीया ह्याच्या कारकिर्दीच्या तेराव्या वर्षात परमेश्वराचे वचन यीर्मयाकडे आले.
3 og siden i de dager da Jojakim, Josias' sønn, var konge i Juda, inntil enden av Judas konge Sedekias', Josias' sønns ellevte år, da Jerusalems innbyggere blev bortført i den femte måned.
३तसेच यहूदाचा राजा योशीया ह्याचा मुलगा यहोयाकीम ह्याच्या कारकिर्दीच्या दिवसात, आणि यहूदाचा राजा योशीयाचा मुलगा सिद्कीया ह्याच्या कारकिर्दीच्या अकराव्या वर्षाच्या समाप्तीपर्यंत, पाचव्या महिन्यात, जेव्हा यरूशलेमधील लोकांस पाडाव करून नेले तोपर्यंत ते त्याच्याकडे आले.
4 Herrens ord kom til mig, og det lød så:
४परमेश्वराचे वचन माझ्याजवळ आले,
5 Før jeg dannet dig i mors liv, kjente jeg dig, og før du kom ut av mors skjød, helliget jeg dig; jeg satte dig til en profet for folkene.
५“मी तुला आईच्या उदरात घडवण्यापूर्वीच, मी तुला निवडले आहे, आणि तू गर्भातून निघण्याआधीच मी तुला पवित्र केले आहे. मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा असे केले आहे.”
6 Men jeg sa: Akk, Herre, Herre! Se, jeg forstår ikke å tale; for jeg er ung.
६मी म्हणालो, “अहा! परमेश्वर देवा, मी कसे बोलावे हे मला माहीत नाही, कारण मी फार लहान आहे.”
7 Da sa Herren til mig: Si ikke: Jeg er ung! Men til alle dem jeg sender dig til, skal du gå, og alt det jeg byder dig, skal du tale.
७पण परमेश्वर मला म्हणाला, “मी लहान बालक आहे असे म्हणू नकोस. मी तुला पाठवीन तेथे सगळीकडे तुला गेलेच पाहिजे, आणि जे काही मी तुला आज्ञापीन ते तू बोलशील.
8 Frykt ikke for dem, for jeg er med dig og vil redde dig, sier Herren.
८त्यांना तू घाबरु नकोस, कारण तुला सोडवायला मी तुझ्या सोबत आहे. असे परमेश्वर म्हणतो.”
9 Og Herren rakte ut sin hånd og rørte ved min munn, og Herren sa til mig: Se, jeg legger mine ord i din munn.
९मग परमेश्वराने हात लांब करून माझ्या तोंडाला स्पर्श करून म्हणाला, “आता, मी माझी वचने तुझ्या मुखात घातली आहेत.
10 Se, jeg setter dig idag over folkene og over rikene til å rykke op og rive ned, til å ødelegge og bryte ned, til å bygge og til å plante.
१०खाली ओढण्यासाठी, फाडून टाकण्यासाठी, नष्ट करून टाकण्यासाठी, आणि उलथून टाकण्यासाठी, उभारणी करण्यासाठी आणि नवीन लागवड करण्यासाठी, आजपासून मी राष्ट्रे आणि राज्ये तुझ्या ताब्यात देत आहे.”
11 Og Herrens ord kom til mig, og det lød så: Hvad ser du, Jeremias? Jeg svarte: Jeg ser en stav av det våkne tre.
११परमेश्वराचे वचन मजकडे आले, “यिर्मया, तुला काय दिसते?” मी म्हणालो, “मला बदामाच्या झाडाची एक शाखा दिसते.”
12 Da sa Herren til mig: Du har sett rett; for jeg vil våke over mitt ord, så jeg fullbyrder det.
१२परमेश्वर मला म्हणाला, “तुला उत्तम दिसत आहे. कारण मी माझे वचन साधण्यास लक्ष ठेवत आहे.”
13 Og Herrens ord kom til mig annen gang: Hvad ser du? Jeg svarte: Jeg ser en kokende gryte, og den er vendt hit fra nord.
१३मग दुसऱ्यांदा परमेश्वराचे वचन माझ्याकडे आले आणि म्हणाले, “तुला काय दिसते?” मी म्हणालो, “मला एक उकळती कढई दिसत आहे, जिचे तोंड उत्तरेकडून फिरले आहे.”
14 Og Herren sa til mig: Fra nord skal ulykken slippes løs over alle landets innbyggere.
१४परमेश्वर मला म्हणाला, “देशातील राहणाऱ्या सर्वांवर उत्तरेकडून आपत्तीचा वर्षाव होईल,
15 For se, jeg kaller på alle folkestammer i rikene mot nord, sier Herren, og de skal komme og sette hver sin stol ved inngangen til Jerusalems porter og mot alle dets murer rundt omkring og mot alle Judas byer.
१५कारण परमेश्वर म्हणतो, मी उत्तरेकडील राज्यातील सर्व कुळांना बोलावीन आणि ते येतील, ते प्रत्येक आपापले राजासन यरूशलेमेच्या वेशींच्या प्रवेशाजवळ आणि सभोवती त्याच्या सर्व कोटांच्या समोर व यहूदाच्या सर्व नगरांच्या समोर स्थापन करतील.
16 Og jeg vil avsi mine dommer over dem for all deres ondskaps skyld, fordi de forlot mig og brente røkelse for andre guder og tilbad sine henders verk.
१६आणि मी त्यांच्याविरुद्ध माझा निर्णय घोषित करीन, कारण त्यांनी मला सोडून इतर देवतांपुढे धूप जाळला, आणि आपल्या हातांच्या कामांची पूजा केली, या त्यांच्या दुष्टाईबद्दल मी त्यांच्याविरुद्ध शिक्षा सांगेन.
17 Men du skal omgjorde dine lender og stå op og tale til dem alt det jeg byder dig; vær ikke redd for dem, så jeg ikke skal gjøre dig redd for dem!
१७यास्तव, तू स्वत: ला तयार कर, उभा राहा आणि जे काही मी तुला आज्ञापीन ते त्यांना सांग, त्यांना घाबरु नकोस, जर तू त्यांना घाबरलास, तर मी तुला त्यांच्यासमोर भयभीत करेन.
18 Og se, jeg gjør dig idag til en fast borg og til en jernstøtte og til en kobbermur mot det hele land, mot Judas konger, mot dets høvdinger, mot dets prester og mot folket i landet.
१८पाहा, आज मी तुला मजबूत शहर व लोखंडी खांबाप्रमाणे आणि कांस्याच्या भिंतीप्रमाणे केले आहे, ह्यासाठी की तू या भूमीवरच्या सर्वांविरूद्ध यहूदाच्या राजांविरुध्द, त्याच्या अधीकाऱ्यांविरुध्द, तेथील याजकांविरूद्ध आणि लोकांविरूद्ध समर्थपणे उभे रहावे.
19 Og de skal stride mot dig, men ikke få overhånd over dig; for jeg er med dig, sier Herren, og vil redde dig.
१९ते सर्व लोक तुझ्याविरूद्ध लढतील, पण ते तुझा पराभव करणार नाहीत, कारण तुला सोडवायला मी तुझ्याबरोबर आहे, परमेश्वर असे म्हणतो.”