< Esaias 21 >
1 Utsagn om Havørkenen. Som stormvinder i ørkenen farer frem, kommer det fra ørkenen, fra det forferdelige land.
१समुद्राजवळच्या राणाविषयी ही देववाणी. जसा दक्षिणेचा वादळवारा सर्व काही खरडून नेतो त्याप्रकारे तो रानांतून, भयंकर देशातून येत आहे.
2 Et hårdt syn er mig kunngjort: Røveren røver og ødeleggeren ødelegger. Dra op, Elam! Treng på, Media! Hvert sukk gjør jeg ende på.
२दु: खदायक असा दृष्टांत मला देण्यात आला आहे, विश्वासघातकी मनुष्य विश्वासघाताने करार करतो, आणि नाश करणारा नाश करतो. हे एलामा वर जा आणि हल्ला कर, हे माद्या वेढा घाल, मी तिचे सर्व उसासे थांबवीन.
3 Derfor er mine lender fulle av smerte, veer har grepet mig, som den fødendes veer; jeg vrir mig så jeg ikke kan høre; jeg er forferdet så jeg ikke kan se.
३यास्तव माझ्या कंबरेत वेदना भरल्या आहेत, प्रसुती वेदनेप्रमाणे तडफडणाऱ्या स्त्री प्रमाणे त्या वेदनांनी मला पकडले आहे. जे मी ऐकले त्यामुळे मी खाली वाकलो आहे, जे मी पाहिले त्यामुळे मी विचलीत झालो.
4 Mitt sinn er forvirret, redsel har forferdet mig; aftenen, som var min lyst, har han gjort til redsel for mig.
४माझे हृदय धडधडते, थरकाप माझ्यावर हावी होतो. रात्र मला किती सुखावह वाटे, ती आता मला भेदरून टाकणारी झाली असून.
5 De dekker bordet, vakten våker, de eter og drikker - op, I høvdinger, smør skjoldene!
५त्यांनी मेज तयार केला, त्यांनी कापड पसरवले आणि खाल्ले व प्याले, उठा, अधिकाऱ्यांनो, आपल्या ढालींना तेल लावा.
6 For så sa Herren til mig: Gå og still vaktmannen ut! Det han ser, skal han melde.
६जा, त्या ठिकाणी एक पहारेकरी ठेव असे प्रभूने मला सांगितले, तो जे काही पाहणार त्याची वार्ता सांगावी.
7 Og ser han et tog av ryttere, par efter par, et tog av asener, et tog av kameler, da skal han gi akt, gi nøie akt.
७जेव्हा तो रथ, घोडेस्वार, गाढवावर बसलेले, उंटावर बसलेले पाहील, तेव्हा त्याने सतर्क व सावधान असायला हवे.
8 Da ropte han som en løve: Herre, på vakt står jeg alltid om dagen, og på min post er jeg stilt hver en natt;
८पहारेकरी सिंहनाद करून म्हणाला, हे प्रभू, पाहाऱ्याच्या बुरूजावर मी रोज दिवसभर उभा असतो आणि पूर्ण रात्र मी आपल्या चौकीवर उभा राहतो.
9 men se der! Der kommer et tog av ridende menn, par av ryttere! - Og han tok til orde og sa: Falt, falt er Babel, og alle dets guders billeder har han knust og kastet til jorden.
९आणि जोडी जोडीने चालणाऱ्या घोडस्वारांचे एक सैन्य येत आहे. त्याने म्हटले, बाबेल पडली, पडली, आणि तिच्या सर्व कोरीव देव मूर्तींचा पूर्ण पणे नाश होऊन ते जमिनीस मिळाल्या आहेत.
10 Du mitt knuste, mitt gjennemtreskede folk! Det jeg har hørt av Herren, hærskarenes Gud, Israels Gud, har jeg kunngjort for eder.
१०हे माझ्या मळणी केलेल्या आणि खळ्यांतील धान्या! माझ्या खळ्यातील लेकरा! सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, ह्याकडून जे काही मी ऐकले, ते तुम्हास घोषीत केले.
11 Utsagn om Duma. Til mig roper de fra Se'ir: Vekter! Hvor langt er det på natten? Vekter! Hvor langt er det på natten?
११दूमाविषयीचा घोषणा, सेईर येथून मला कोणी मला हाक मारतो, पहारेकऱ्या, रात्री काय राहिल? पहारेकऱ्या, रात्री काय राहिल?
12 Vekteren svarer: Det kommer morgen, men også natt; vil I spørre, så spør - kom igjen!
१२पाहारेकरी म्हणाला, सकाळ येते व रात्रही येते, जर तुम्ही विचाराल तर विचारा आणि परत या.
13 Utsagn mot Arabia. I skogen i Arabia skal I overnatte, I karavaner av dedanitter!
१३अरेबिया विषयी घोषणा, ददानीच्या काफिल्यालो, अरबस्तानच्या रानांत तुम्ही रात्र घालवणार.
14 Ut til de tørste fører de vann; de som bor i Temas land, kommer de flyktende i møte med brød;
१४अहो तेमाच्या राहणाऱ्यांनो, तहानलेल्यांना पाणी आणा, पळून गेलेल्यांना भाकरी घेऊन भेटा.
15 for de flykter for sverdet, for det dragne sverd og den spente bue og for krigens trykk.
१५कारण ते तलवारी, वाकवलेले धनुष्य, काढलेल्या तलवारी आणि युद्धाच्या दडपणापासून पळाले आहेत.
16 For så har Herren sagt til mig: Om et år, således som en dagarbeider regner året, skal det være forbi med all Kedars herlighet.
१६कारण परमेश्वराने मला सांगितले, एका वर्षाच्या आत, जसा मोलकरी एका वर्षासाठी नियूक्त केला जातो, त्याच प्रकारे केदारचे वैभव तुम्ही संपलेले पाहाल.
17 Og tallet på de buer som levnes Kedars helter, skal bli lite; for Herren, Israels Gud, har talt.
१७फक्त थोडेच धनुर्धारी, वीर योद्धा केदार मध्ये उरतील, कारण इस्राएलाचा देव परमेश्वर हे बोलला आहे.