< 1 Mosebok 48 >
1 Nogen tid efter kom de og sa til Josef: Din far er syk. Da tok han begge sine sønner med sig, Manasse og Efra'im.
१या गोष्टीनंतर “त्याचा बाप आजारी असल्याचे” कोणी योसेफाला कळवले, म्हणून आपले दोन पुत्र मनश्शे व एफ्राईम यांना बरोबर घेऊन तो गेला.
2 Og de meldte det til Jakob og sa: Din sønn Josef er kommet til dig. Da gjorde Israel sig sterk og satte sig op i sengen.
२“योसेफ आपणास भेटावयास आला आहे” असे याकोबास कोणी सांगितले, हे कळवल्याबरोबर इस्राएलाने शक्ती एकवटली आणि बिछान्यावर उठून बसला.
3 Og Jakob sa til Josef: Den allmektige Gud åpenbarte sig for mig i Luz i Kana'ans land og velsignet mig
३मग याकोब योसेफास म्हणाला, “सर्वसमर्थ देवाने मला कनानातील लूज येथे दर्शन देऊन आशीर्वाद दिला.
4 og sa til mig: Se, jeg vil gjøre dig fruktbar og tallrik og gjøre dig til en mengde folkeslag, og jeg vil gi din ætt efter dig dette land til evig eiendom.
४देव म्हणाला, ‘मी तुला खूप संतती देईन व ती वाढवीन आणि मी तुला राष्ट्रांचा समुदाय करीन. आणि तुझ्यानंतर तुझ्या संतानाला हा देश कायमचा वतन म्हणून देईल.’
5 Og dine to sønner som du har fått i Egyptens land, før jeg kom til dig her i Egypten, de skal nu være mine; Efra'im og Manasse skal tilhøre mig likesom Ruben og Simeon.
५आणि आता, मी येथे मिसर देशास येण्यापूर्वी, मिसराच्या भूमीमध्ये जे तुझ्या पोटी जन्मलेले हे दोन पुत्र, माझे आहेत. तुझे हे दोन पुत्र मनश्शे व एफ्राईम हे आता रऊबेन व शिमोन यांच्याप्रमाणेच माझे होतील.
6 Men de barn som du har fått efter dem, skal være dine; de skal kalles efter sine brødre i deres arvelodd.
६त्यांच्यानंतर तुला जी संतती होईल ती तुझी होईल; त्यांच्या वतनात त्यांची नावे त्यांच्या भावांच्या नावांखाली नोंदवण्यात येतील.
7 For da jeg kom fra Mesopotamia, døde Rakel fra mig i Kana'ans land på reisen, da vi ennu hadde et stykke vei igjen til Efrat; og jeg begravde henne der på veien til Efrat, det er Betlehem.
७परंतु पदन येथून मी येताना तुझी आई राहेल, एफ्राथापासून आम्ही थोड्याच अंतरावर असताना कनान देशात मरण पावली, त्यामुळे मी फार दुःखी झालो. तेव्हा एफ्राथच्या म्हणजे बेथलेहेमाच्या वाटेवर मी तिला पुरले.”
8 Da Israel fikk se Josefs sønner, spurte han: Hvem er det?
८मग इस्राएलाने योसेफाच्या मुलांना पाहिले, तेव्हा इस्राएल म्हणाला, “हे कोणाचे आहेत?”
9 Josef svarte sin far: Det er mine sønner, som Gud har gitt mig her. Da sa han: Kjære, kom hit til mig med dem, så vil jeg velsigne dem.
९योसेफ आपल्या पित्यास म्हणाला, “हे माझे पुत्र आहेत. हे मला देवाने येथे दिले आहेत.” इस्राएल म्हणाला, “तुझ्या मुलांना माझ्याकडे आण म्हणजे मी त्यांना आशीर्वाद देईन.”
10 Men Israels øine var sløve av alderdom, han kunde ikke se; og Josef førte dem bort til ham, og han kysset dem og tok dem i favn.
१०इस्राएल अतिशय म्हातारा झाला होता आणि त्याची नजर मंद झाल्यामुळे त्यास चांगले स्पष्ट दिसत नव्हते. तेव्हा इस्राएलाने त्या मुलांना कवटाळून त्यांचे मुके घेतले.
11 Og Israel sa til Josef: Jeg hadde ikke tenkt å få se ditt ansikt, og nu har Gud endog latt mig få se dine barn.
११मग इस्राएल योसेफास म्हणाला, “मुला तुझे तोंड पुन्हा पाहावयास मिळेल असे वाटले नव्हते, पण देवाने तुझी व माझी भेट होऊ दिली. मला तुझी मुलेही पाहू दिली.”
12 Så førte Josef dem bort fra hans knær og bøide sig til jorden for ham.
१२मग योसेफाने आपल्या मुलांना इस्राएलाच्या मांडीवरून काढून घेतले. ते पुत्र इस्राएलासमोर उभे राहिले व त्यांनी त्यास लवून नमन केले.
13 Siden tok Josef dem begge, Efra'im i sin høire hånd mot Israels venstre og Manasse i sin venstre hånd mot Israels høire, og førte dem frem til ham.
१३योसेफाने मनश्शेला आपल्या डाव्या हाती म्हणजे तो इस्राएलाच्या उजव्या हाती येईल असे व एफ्राईमाला आपल्या उजव्या हाती म्हणजे तो इस्राएलाच्या डाव्या हाती येईल असे उभे केले.
14 Og Israel rakte ut sin høire hånd og la den på Efra'ims hode, enda han var den yngste, og sin venstre hånd på Manasses hode; han la sine hender således med vilje, for Manasse var den førstefødte.
१४परंतु इस्राएलाने आपला उजवा हात पुढे केला आणि एफ्राइमाच्या, म्हणजे जो धाकटा मुलगा होता त्याच्या डोक्यावर ठेवला आणि त्याचा डावा हात थोरल्याच्या म्हणजे मनश्शेच्या डोक्यावर ठेवला. त्याने त्याच्या हातांची अदलाबदल करून ते उजवेडावे केले.
15 Og han velsignet Josef og sa: Den Gud for hvis åsyn mine fedre Abraham og Isak vandret, den Gud som var min hyrde, fra jeg blev til og til denne dag,
१५इस्राएलाने योसेफाला आशीर्वाद देऊन म्हटले, “ज्या देवासमोर माझे वडील, अब्राहाम व इसहाक चालले, ज्या देवाने माझ्या सर्व आयुष्यभर मला चालवले आहे,
16 den engel som forløste mig fra alt ondt, han velsigne guttene, så de må kalles med mitt navn og med mine fedre Abrahams og Isaks navn, og bli meget tallrike i landet.
१६तोच मला सर्व संकटातून सोडवणारा माझा देवदूत होता, तोच या मुलांना आशीर्वाद देवो. आता या मुलांना माझे नाव व वडील अब्राहाम व इसहाक यांचे नाव देण्यात येवो. ते वाढून त्यांची पृथ्वीवर अनेक कुटुंबे, कुळे व राष्ट्रे होवोत.”
17 Da Josef så at hans far la sin høire hånd på Efra'ims hode, syntes han ille om det, og han grep sin fars hånd for å føre den fra Efra'ims hode bort på Manasses hode.
१७आपल्या वडिलाने एफ्राईमाच्या डोक्यावर आपला उजवा हात ठेवला असे योसेफाने पाहिले तेव्हा त्यास ते आवडले नाही. तो हात एफ्राईमाच्या डोक्यावरून काढून मनश्शेच्या डोक्यावर ठेवावा म्हणून योसेफाने आपल्या बापाचा हात घेतला.
18 Og Josef sa til sin far: Ikke så, far! For denne er den førstefødte; legg din høire hånd på hans hode!
१८योसेफ आपल्या पित्यास म्हणाला, “असे नाही बाबा, कारण हा प्रथम जन्मलेला आहे. तुमचा उजवा हात याच्या डोक्यावर ठेवा.”
19 Men hans far vilde ikke det, og han sa: Jeg vet det, min sønn, jeg vet det. Han skal og bli et folk, han skal og bli stor; men enda skal hans yngre bror bli større enn han, og hans ætt skal bli en mengde folkeslag.
१९परंतु त्याचा वडिलाने नकार दिला आणि म्हटले, “माझ्या मुला, मला माहीत आहे. होय, मला माहीत आहे की, तोसुद्धा महान होईल. परंतु धाकटा भाऊ त्याच्यापेक्षाही अधिक महान होईल आणि त्याची कुळे वाढून त्यांचा मोठा राष्ट्रसमूह निर्माण होईल.”
20 Så velsignet han dem samme dag og sa: Ved dig skal Israel velsigne og si: Gud gjøre dig som Efra'im og som Manasse! Og han satte Efra'im foran Manasse.
२०त्या दिवशी इस्राएलाने त्या मुलांना या शब्दांत आशीर्वाद दिला, तो म्हणाला, “इस्राएल लोक आशीर्वाद देताना तुमची नावे उच्चारितील, ते म्हणतील, ‘देव तुम्हास एफ्राईमासारखा, मनश्शेसारखा आशीर्वाद देवो.’”
21 Og Israel sa til Josef Se, jeg dør, men Gud skal være med eder og føre eder tilbake til eders fedres land.
२१मग इस्राएल योसेफाला म्हणाला, “पाहा, मी आता मरणार आहे. परंतु देव तुमच्या बरोबर राहील, तो तुम्हास तुमच्या पूर्वजांच्या देशात घेऊन येईल.
22 Og jeg gir dig fremfor dine brødre et stykke land som jeg tar fra amorittenes hånd med mitt sverd og min bue.
२२तुझ्या भावांपेक्षा तुला एक भाग अधिक देतो, मी स्वतः तलवारीने व धनुष्याने लढून अमोरी लोकाकडून जिंकलेला डोंगरउतार तुला देतो.”