< 1 Mosebok 20 >
1 Så drog Abraham derfra til sydlandet og bodde mellem Kades og Sur, og siden opholdt han sig en tid i Gerar.
१अब्राहाम तेथून नेगेबकडे प्रवास करीत आणि कादेश व शूर यांच्यामध्ये राहिला. तो गरारात परदेशी मनुष्य म्हणून राहिला होता.
2 Og Abraham sa om Sara, sin hustru: Hun er min søster. Da sendte Abimelek, kongen i Gerar, folk avsted og tok Sara.
२अब्राहाम आपली पत्नी सारा हिच्याविषयी म्हणाला, “ती माझी बहीण आहे.” गराराचा राजा अबीमलेखाने आपली माणसे पाठवली आणि ते सारेला घेऊन गेले.
3 Men Gud kom til Abimelek i en drøm om natten og sa til ham: Nu skal du dø for den kvinnes skyld som du har tatt; for hun er en annen manns hustru.
३परंतु देव रात्री अबीमलेखाच्या स्वप्नात येऊन म्हणाला, “पाहा जी स्त्री तू घेऊन आलास तिच्यामुळे तू मेलाच म्हणून असे समज, कारण ती एका मनुष्याची पत्नी आहे.”
4 Men Abimelek hadde ikke kommet henne nær, og han sa: Herre, vil du da også slå rettferdige folk ihjel?
४परंतु अबीमलेख तिच्याजवळ गेला नव्हता. तो म्हणाला, “प्रभू, तू नीतिमान राष्ट्राचाही नाश करणार काय?
5 Har han ikke selv sagt til mig: Hun er min søster? Og hun har også sagt: Han er min bror. I mitt hjertes uskyldighet og med rene hender har jeg gjort dette.
५‘ती माझी बहीण आहे,’ असे तो स्वतःच मला म्हणाला नाही काय? आणि ‘तो माझा भाऊ आहे,’ असे तिनेही म्हटले. मी आपल्या अंतःकरणाच्या शुद्धपणाने आणि आपल्या हाताच्या निर्दोषतेने हे केले आहे.”
6 Og Gud sa til ham i drømmen: Ja, jeg vet at du har gjort dette i ditt hjertes uskyldighet, og jeg har også hindret dig fra å synde mot mig; derfor har jeg ikke latt dig få røre henne.
६मग देव त्यास स्वप्नात म्हणाला, “होय! तू आपल्या अंतःकरणाच्या शुद्धतेने हे केले आहेस हे मला माहीत आहे, आणि तू माझ्याविरूद्ध पाप करू नये म्हणून मी तुला आवरले. मीच तुला तिला स्पर्श करू दिला नाही.
7 Men la nu mannen få sin hustru tilbake! For han er en profet. Og han skal bede for dig, så du får leve. Men dersom du ikke gir henne tilbake, da vit at du visselig skal dø, du og alle dine.
७म्हणून आता तू अब्राहामाची पत्नी सारा ही त्यास परत दे; कारण तो संदेष्टा आहे; तो तुझ्यासाठी प्रार्थना करील व तू वाचशील. परंतु तू तिला त्याच्याकडे परत पाठवले नाहीस, तर तू आणि तुझ्या बरोबर जे सर्व तुझे आहेत ते खात्रीने मरतील, हे लक्षात ठेव.”
8 Da stod Abimelek tidlig op om i morgenen og kalte på alle sine tjenere og fortalte dem alt dette, og mennene blev meget redde.
८अबीमलेख सकाळीच लवकर उठला आणि त्याने आपल्या सर्व सेवकांना स्वतःकडे बोलावले. त्याने सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या तेव्हा ती माणसे फारच घाबरली.
9 Og Abimelek kalte Abraham til sig og sa til ham: Hvad er det du har gjort mot oss! Hvad har jeg syndet mot dig, siden du har ført så stor en synd over mig og mitt rike? Du har båret dig slik at mot mig som ingen skulde gjøre.
९मग अबीमलेखाने अब्राहामास बोलावून त्यास म्हटले, “तू हे आम्हांला काय केले? मी तुझ्याविरूद्ध काय पाप केले की तू माझ्यावर आणि माझ्या राष्ट्रावर असे मोठे पाप आणले? तू माझ्याशी करू नये ते केले आहे अशा गोष्टी तू करायच्या नव्हत्या.”
10 Og Abimelek sa videre til Abraham: Hvad mente du med å gjøre dette?
१०अबीमलेख अब्राहामाला म्हणाला, “तुला हे करण्यास कोणी सुचवले?”
11 Da sa Abraham: Jeg tenkte: Det er visst ingen gudsfrykt på dette sted, og de vil slå mig ihjel for min hustrus skyld.
११अब्राहाम म्हणाला, “या ठिकाणी देवाचे भय खात्रीने नाही, म्हणून ते माझ्या पत्नीकरीता मला ठार मारतील, असा विचार मी केला.
12 Hun er også virkelig min søster, min fars datter, men ikke min mors datter; og hun blev min hustru.
१२शिवाय ती खरोखर माझी बहीण आहे. ती माझ्या बापाची मुलगी आहे, पण माझ्या आईची ती मुलगी नाही आणि म्हणून ती माझी पत्नी झाली आहे.
13 Og da Gud bød mig å vandre om borte fra min fars hus, sa jeg til henne: Således må du vise din kjærlighet mot mig: Hvor vi så kommer, må du si om mig: Han er min bror.
१३देवाने मला माझ्या बापाचे घर सोडून देऊन जागोजागी प्रवास करायला लावले, तेव्हा मी तिला म्हणालो, तू माझी पत्नी म्हणून मला एवढा विश्वासूपणा दाखव; जेथे जेथे आपण जाऊ तेथे तेथे माझ्याविषयी हा, ‘माझा भाऊ आहे असे सांग.’”
14 Så tok Abimelek småfe og storfe og træler og trælkvinner og gav Abraham og lot ham få Sara, sin hustru, tilbake.
१४अबीमलेखाने अब्राहामाला सारा परत दिली; तसेच त्याने त्यास मेंढरे, बैल व दास-दासीही दिल्या.
15 Og Abimelek sa: Se, mitt land ligger åpent for dig; bo hvor du selv vil!
१५अबीमलेख म्हणाला, “पाहा, माझा हा सर्व देश तुझ्यासमोर आहे; तुला बरे वाटेल तेथे तू राहा.”
16 Og til Sara sa han: Se, her gir jeg din bror tusen sekel sølv; det skal være en sonegave for dig i alles øine som er sammen med dig, og for alle har du nu fått opreisning.
१६तो सारेला म्हणाला, “तुझा भाऊ अब्राहाम याला मी चांदीची एक हजार नाणी दिली आहेत. तुझ्यासोबत असलेल्या सर्व लोकांसमोर तुझी भरपाई करण्यासाठी ते आहेत, आणि या प्रकारे तू सर्वांसमोर पूर्णपणे निर्दोष ठरली आहेस.”
17 Og Abraham bad til Gud, og Gud helbredet Abimelek og hans hustru og hans tjenestekvinner, så de fikk barn.
१७अब्राहामाने देवाची प्रार्थना केली आणि देवाने अबीमलेख, त्याची पत्नी आणि त्याच्या दासी यांना बरे केले. मग त्यांना मुले होऊ लागली.
18 For Herren hadde aldeles lukket for hvert morsliv i Abimeleks hus for Abrahams hustru Saras skyld.
१८कारण परमेश्वराने अब्राहामाची पत्नी सारा हिच्यामुळे अबीमलेखाच्या घराण्यातल्या सर्व स्त्रियांची गर्भाशये अगदी बंद केली होती.