< Esekiel 32 >
1 I det tolvte år, i den tolvte måned, på den første dag i måneden, kom Herrens ord til mig, og det lød så:
१मग बाबेलातील बंदिवासाच्या बाराव्या वर्षी, बाराव्या महिन्याच्या, पहिल्या दिवशी, परमेश्वराचे वचन मजकडे आले व म्हणाले,
2 Menneskesønn! Stem i en klagesang over Farao, Egyptens konge, og si til ham: En ung løve blandt folkene vilde du være lik, og så var du som sjøuhyret i havet, og du fór frem i dine elver og gjorde vannet grumset med dine føtter og gjorde dets strømmer mudret.
२मानवाच्या मुला, मिसराचा राजा फारोविषयी मोठ्याने विलाप कर. त्यास म्हण, राष्ट्रांमध्ये मी तुला तरुण सिंहाची उपमा दिली होती, तरी तू समुद्रातील मगर असा आहेस. तू पाणी घुसळून काढतोस, तू आपल्या पायाने पाणी ढवळून काढतो आणि त्यांचे पाणी गढूळ करतोस.
3 Så sier Herren, Israels Gud: Derfor vil jeg utspenne mitt garn over dig ved skarer av mange folk, og de skal dra dig op i min not.
३प्रभू परमेश्वर असे म्हणतो, मी पुष्कळ लोकांच्या समुदायाकडून आपले जाळे तुझ्यावर पसरीन आणि ते तुला माझ्या जाळीने वर ओढून काढतील.
4 Jeg vil kaste dig på land og slenge dig bort på marken, og jeg vil la alle himmelens fugler slå ned på dig og dyrene på hele jorden mette sig med dig.
४मी तुला जमिनीवर सोडून देईन. मी तुला शेतांत फेकून देईन आणि आकाशातील सर्व पक्षी येऊन तुझ्यावर बसतील असे करीन. मी तुझ्याकडून पृथ्वीवरील सर्व जिवंत प्राण्याची भूक तृप्त करीन.
5 Jeg vil kaste ditt kjøtt op på fjellene og fylle dalene med din store kropp.
५कारण मी तुझे मांस पर्वतावर ठेवीन, आणि किड्यांनी भरलेली तुमची प्रेते दऱ्यांत भरीन.
6 Jeg vil vanne landet med strømmer av ditt blod helt op til fjellene, og bekkeleiene skal fylles med dig.
६मग मी तुझे रक्त पर्वतावर ओतीन, तुझ्या रक्ताने प्रवाह भरून वाहतील.
7 Og når jeg utslukker dig, vil jeg tildekke himmelen og klæ dens stjerner i sort; solen vil jeg tildekke med skyer, og månen skal ikke la sitt lys skinne.
७मग जेव्हा मी तुझा दिवा विझवून टाकीन तेव्हा मी आकाश झाकीन व त्यातले तारे अंधारमय करीन. मी सूर्याला ढगाने झाकीन आणि चंद्र प्रकाशणार नाही.
8 Alle skinnende lys på himmelen vil jeg klæ i sort for din skyld, og jeg vil legge mørke over ditt land, sier Herren, Israels Gud.
८मी आकाशातील चमकणारा सर्व प्रकाश तुझ्यावर अंधार करीन आणि तुझ्या देशाला अंधारात ठेवीन. असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
9 Jeg vil vekke sorg i mange folkeslags hjerter, når jeg lar tidenden om din undergang komme ut iblandt folkene, i land som du ikke kjenner.
९जेव्हा मी तुझा नाश करून तुला राष्ट्रांमध्ये, जे देश तुझ्या ओळखीचे नाहीत त्यामध्ये आणीन तेव्हा मी पुष्कळ लोकांचे हृदय घाबरून सोडील.
10 Jeg vil gjøre mange folk forferdet over dig, og deres konger skal gyse av redsel over dig, når jeg svinger mitt sverd for deres åsyn, og de skal beve hvert øieblikk, hver for sitt liv, på den dag du faller.
१०मी खूप लोकांस तुझ्याविषयी विस्मित करीन. जेव्हा मी आपली तलवार त्यांच्यापुढे परजीन, तेव्हा त्यांचे राजे दहशतीने थरथरतील. तुझ्या पतनाच्या दिवशी प्रत्येक मनुष्यास आपल्या जिवाच्या भीतीने त्यांचा क्षणोक्षणी थरकाप होईल.
11 For så sier Herren, Israels Gud: Babels konges sverd skal komme over dig.
११कारण प्रभू परमेश्वर असे म्हणतो, बाबेलाच्या राजाची तलवार तुमच्याविरुध्द येईल.
12 For kjempers sverd vil jeg la din larmende hop falle - de er alle sammen de grusomste blandt folkene; de skal ødelegge Egyptens stolthet, og hele dets larmende hop skal tilintetgjøres.
१२योद्ध्याच्या तलवारीने तुझे सेवक पडतील असे मी करीन, प्रत्येक योद्धा राष्ट्राचा दहशत आहे! हे योद्धे मिसराचा गौरव उद्धस्त करतील आणि तिच्यातला सर्व समुदाय नष्ट करतील.
13 Jeg vil utrydde alt dets fe, som har beitet ved de mange vann, og ingen menneskefot skal mere gjøre dem grumset, og ingen klov skal mere gjøre dem grumset.
१३कारण मी महाजलांजवळील त्यांच्या सर्व गुरांढोरांचा नाश करीन; मग मनुष्याचा पाय पुन्हा ती गढूळ करणार नाही. तसेच गुरांच्या खुरही ते गढूळ करणार नाही.
14 Da vil jeg la deres vann synke og deres strømmer flyte bort som olje, sier Herren, Israels Gud,
१४मग मी त्यांचे पाणी शांत करीन आणि त्यांच्या नद्या तेलाप्रमाणे वाहतील असे करीन, असे प्रभू परमेश्वर म्हणतो,
15 når jeg gjør Egyptens land til en ørken, så landet ligger øde og tomt, når jeg slår ned alle dem som bor der; og de skal kjenne at jeg er Herren.
१५जेव्हा मी मिसरची भूमी ओसाड करीन. म्हणजे तिच्यात जे भरले होते ते नाहीसे होऊन ती भूमी उजाड होईल, जेव्हा मी तिच्यातल्या सर्व राहणाऱ्यांस मारीन तेव्हा त्यांना समजेल की, मी परमेश्वर आहे.
16 Dette er en klagesang, og den skal bli sunget, folkenes døtre skal synge den; over Egypten og hele dets larmende hop skal de synge den, sier Herren, Israels Gud.
१६तेथे विलाप होईल. कारण तिच्यावर राष्ट्रांच्या कन्या विलाप करतील. ते मिसरासाठी विलाप करतील. ते तिच्या सर्व सेवकांसाठी विलाप करतील. असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
17 I det tolvte år, på den femtende dag i måneden, kom Herrens ord til mig, og det lød så:
१७मग बाराव्या वर्षांच्या, महिन्याच्या पंधराव्या दिवशी परमेश्वराचे वचन मजकडे आले व म्हणाले,
18 Menneskesønn! Syng en gravsang over Egyptens larmende hop og la den fare ned, den og herlige folkeslags døtre, til dødsrikets land, sammen med dem som farer ned i graven!
१८मानवाच्या मुला, मिसरातल्या लोकसमूहासाठी खेद कर आणि त्यांना, मिसर कन्येस आणि ऐश्वर्यशाली राष्ट्रांच्या कन्येस गर्तेत उतरणाऱ्यांबरोबर अधोलोकी लोटून दे.
19 Overgår du nogen i skjønnhet? Far ned og legg dig hos de uomskårne!
१९त्यांना विचार, तू खरोखर कोणापेक्षाही अधिक सुंदर आहेस? खाली जा आणि बेसुंत्याबरोबर जाऊन पड.
20 Midt iblandt dem som er drept med sverdet, skal de falle; sverdet er gitt. Dra avsted med det og med alle dets skarer!
२०जे कोणी तलवारीने वधले त्यामध्ये जाऊन ते पडतील! मिसर तलवारीला सोपून दिला आहे; व तिच्या सर्व समूहास ओढून न्या.
21 Kjempenes høvdinger taler midt ut fra dødsriket om ham og hans hjelpere: De har faret ned, de ligger der, de uomskårne, drept med sverdet. (Sheol )
२१योद्ध्यातले जे बलवान ते त्याच्याशी व त्यास सहाय्य करणाऱ्याशी अधोलोकातून बोलतील; ते खाली उतरले आहेत. हे बेसुंती तलवारीने वधले ते तेथे पडले आहेत. (Sheol )
22 Der er Assur og hele hans skare, rundt om ham er hans graver; alle sammen er drept, falt for sverdet;
२२अश्शूर तिच्या समुदायाबरोबर तेथे आहे. तिच्या कबरा तिच्यासभोवती आहेत; ते सर्व त्यांच्या तलवारीने वधलेले आहेत.
23 hans graver er lagt i hulens dypeste bunn, og hans skare er rundt omkring hans grav; alle sammen er drept, falt for sverdet, de som utbredte redsel i de levendes land.
२३ज्या कोणाच्या कबरा गर्तेच्या अगदी तळाशी आहेत, तिचा समुदाय तिच्या कबरेभोवती तेथे आहे. जे जिवंताच्या भूमीत ज्यांनी दहशत घातली ते सर्व वधलेले, तलवारीने पडले आहेत.
24 Der er Elam og hele hans larmende hop rundt omkring hans grav; alle sammen er drept, falt for sverdet, de som uomskårne fór ned til dødsrikets land, de som hadde utbredt redsel for sig i de levendes land og bar sin skam sammen med dem som farer ned i graven.
२४तेथे एलाम आहे व तिच्या सर्व समुदाया बरोबर तिच्या कबरेभोवती आहे. ते सर्व वधलेले, तलवारीने पडलेले आहेत. ते बेसुंती असताना पृथ्वीच्या खालच्या स्थानात गेले आहेत. ते जिवंताच्या भूमीत दहशत घालीत ते सर्व वध पावले आहेत.
25 Midt iblandt drepte menn er det redet et leie for ham med hele hans larmende hop, rundt omkring ham er hans graver; alle sammen er uomskårne, drept med sverdet, fordi redsel for dem var utbredt i de levendes land, og de bar sin skam sammen med dem som farer ned i graven; midt iblandt drepte menn blev han lagt.
२५त्यांनी एलाम व त्याच्या सर्व समुदायासाठी वधलेल्यामध्ये शय्या तयार केली. त्याच्याभोवती त्यांच्या कबरा आहेत. ते सर्व बेसुंती तलवारीने मारलेले आहेत. कारण त्यांनी जिवंताची भूमी दहशतीने भरली आहे. म्हणून गर्तेत उतरणाऱ्यांबरोबर ते लज्जित झाले आहेत. वधलेल्यामध्ये त्यांना ठेवले आहे.
26 Der er Mesek-Tubal og hele hans larmende hop, rundt omkring ham er hans graver; alle sammen er uomskårne, drept med sverdet, fordi de hadde utbredt redsel for sig i de levendes land.
२६तेथे मेशेख, तुबाल आणि त्यांचा सर्व समूह आहे. त्यांच्या कबरा त्यांच्या सभोवती आहेत. ते सर्व बेसुंती तलवारी मारलेले आहेत. कारण त्यांनी जिवंताच्या भूमीत आपली दहशत आणली.
27 Skulde de da ikke ligge hos kjemper, hos dem som er falt blandt de uomskårne, som fór ned til dødsriket med sine krigsvåben, og hvis sverd blev lagt under deres hoder, og hvis misgjerning tynget på deres ben, fordi det hadde vært redsel for kjempene i de levendes land? (Sheol )
२७बेसुंती लोकांपैकी जे योद्धे पडून आपल्या सर्व लढाईच्या शस्रांसह अधोलोकी गेले व ज्यांच्या तलवारी त्यांच्या डोक्याखाली ठेवण्यात आल्या अशांबरोबर हे पडून राहीले नाहीत काय? कारण जिवंताच्या भूमीत ते योद्ध्यास दहशत घालत म्हणून त्यांची पातके त्यांच्या हाडांवर आहे. (Sheol )
28 Og du, midt iblandt uomskårne skal du bli knust og ligge hos dem som er drept med sverdet.
२८म्हणून हे मिसरा, बेसुंतीमध्ये तुझा नाश होईल. आणि तलवारीने वधलेल्यांबरोबर पडून राहशील.
29 Dit er Edom kommet, hans konger og alle hans fyrster, som tross sitt velde er lagt hos dem som er drept med sverdet; de skal ligge hos uomskårne og hos dem som farer ned i graven.
२९तेथे अदोम तिचा राजा आणि तिच्या सर्व अधिपतीबरोबर आहे. ते सर्व शक्तीशाली होते, पण आता ते तलवारीने वधलेल्याबरोबर पडले आहे, बेसुंतीबरोबर, जे कोणी खाली गर्तेत गेले आहेत त्यांच्याबरोबर ठेवले आहेत.
30 Dit er Nordens fyrster kommet alle sammen, og alle sidonierne, som fór ned med de drepte og blev til skamme tross den redsel folk hadde hatt for dem for deres veldes skyld, og uomskårne fikk de sitt leie hos dem som var drept med sverdet, og de bar sin skam sammen med dem som farer ned i graven.
३०उतरेकडचे सर्वच्या सर्व अधिकारी व वधलेल्याबरोबर खाली गेलेले सर्व सीदोनी हे तेथे आहेत. ते शक्तीशाली होते आणि ते दुसऱ्यांना घाबरून सोडत, पण आता ते लज्जेने, जे तलवारीने वधले गेले त्या बेसुंतीबरोबर पडून राहिले आहेत.
31 Dem skal Farao se, og han skal trøste sig over hele sin larmende hop; drept med sverdet er Farao og hele hans hær, sier Herren, Israels Gud.
३१फारो त्यांना पाहील तेव्हा तो आपल्या सर्व समूहाविषयी समाधान पावेल. फारो व त्याचे सर्व सैन्य यांस तलवारीने वधले आहे असे प्रभू परमेश्वर म्हणतो,
32 For jeg har utbredt redsel for ham i de levendes land, og han skal legges midt iblandt de uomskårne, hos dem som er drept med sverdet, Farao selv og hele hans larmende hop, sier Herren, Israels Gud.
३२मी फारोला जिवंताच्या भूमीवर दहशत घातली तरी तो व त्याचा समुदाय हे तलवारीने वधलेल्याबरोबर बेसुंतीमध्ये पडून राहतील, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.