< Esekiel 19 >

1 Og du, stem i en klagesang over Israels fyrster
मग तू इस्राएलाच्या पुढाऱ्यांच्या आक्रोशा विरुध्द विलाप कर.
2 og si: Hvad er din mor? En løvinne. Mellem løver hvilte hun; blandt unge løver opfødde hun sine unger.
आणि म्हण तुझी आई कोण? सिंहीण, आपल्या छाव्यासोबत राहते तरुण सिंहाच्यामध्ये ती आपल्या छाव्याचे पालनपोषण करते.
3 Og hun opfostret en av sine unger; han blev en ung løve, og han lærte å rane og røve, han åt mennesker.
आणि ती आपल्या छाव्याचे पोषण करून त्यास तरुण सिंह बनवते जो आपल्या शिकारीला फाडून टाकतो. तो मनुष्यास खाऊन टाकते.
4 Men hedningefolk fikk høre om ham; i deres grav blev han fanget, og de førte ham med neseringer til Egyptens land.
मग राष्ट्रांना त्याची वार्ता ऐकू येते, तो त्याच्याच पाशात अडकला जातो, आणि त्यास आकडीने धरुन मिसरात घेऊन गेले.
5 Da hun så at hun hadde ventet forgjeves, at hennes håp var gått til grunne, tok hun en annen av sine unger og gjorde ham til en ung løve.
मग जरी तिने हे पाहिले तरी त्याची परतण्याची ती वाट बघते, तिची आशा आता निघून गेली, मग तिने आपल्या दुसऱ्या छाव्याला घेतले आणि त्याची वाढ तरुण सिंह होण्यास केली.
6 Han gikk omkring blandt løver; han blev en ung løve, og han lærte å rane og røve, han åt mennesker.
हा तरुण सिंह इतर सिंहाच्यामध्ये हिंडू फिरु लागतो, तो तरुण सिंह असता त्याने आपल्या शिकारीला फाडून टाकणे शिकला, त्याने मनुष्यांना खाऊन टाकले.
7 Han voldtok deres enker og ødela deres byer, og landet og alt det der var, blev forferdet ved lyden av hans brøl.
मग त्याने विधवांवर बलात्कार केले आणि शहराला देशोधडीला लावले, त्याची भूमी पूर्णपणे बेबंदशाहीने भरली कारण त्याच्या गर्जनेचा आवाज दुमदुत होता.
8 Da satte folkene fra landskapene rundt omkring sitt garn op imot ham og spente det ut over ham; han blev fanget i den grav de hadde gravd.
सर्व प्रांतातून एकवटून सर्व देशाचे लोक त्याच्या विरोधात जमले; त्यांनी त्याच्या भोवती जाळे टाकले. त्यास पाशात पकडले.
9 Så satte de ham med krok i nesen i et bur og førte ham til kongen i Babel; der satte de ham i en fast borg, forat hans røst ikke mere skulde høres på Israels fjell.
त्यास पिंजऱ्यात कोंडून ताळेबंद केले आणि बाबेलाच्या राज्यापुढे आणले, त्यांना त्यास तटबंदी असलेल्या डोंगरावर नेले यास्तव त्याचा स्वर इस्राएलाच्या घराण्याला आता ऐकू जाणार नाही.
10 Mens du levde i ro, var din mor som et vintre plantet ved vann; fruktbart og fullt av grener var det, fordi det hadde meget vann.
१०तुझी आई पाण्याजवळ लावलेली द्राक्षाच्या झाडासारखी होती ती फलद्रुप व फांद्यांनी बहरलेली अशी होती कारण तेथे भरपूर पाणी होते.
11 Og det fikk sterke grener, tjenlige til herskerspir, og hevet sig høit op mellem skyene, og det falt i øinene ved sin høide og sine mange ranker.
११तिच्याकडे न्यायाचा बळकट राजदंड आहे आणि तिची उंची दाट रानाच्या फांद्यांच्या वर गेलेली होती.
12 Da blev det rykket op i harme og kastet til jorden, og østenvinden tørket bort dets frukt; dets sterke grener blev revet av og tørket bort; ild fortærte dem.
१२पण द्राक्षाच्या झाडाला मुळासकट त्वेषाने उपटून टाकले आणि भूमीवर फेकून दिले, पूर्वेकडील वाऱ्याने तिच्या फळांना सुकून टाकले.
13 Og nu er det plantet i ørkenen, i et tørt og tørstende land.
१३मग तिला ओसाड प्रदेशात लावले जेथे पाऊस नाही आणि तहान आहे.
14 Og det gikk ut ild fra dets kvistede gren; den fortærte dets frukt, og det er ikke mere nogen sterk gren på det til herskerspir. Dette er en klagesang, og til en klagesang skal det bli.
१४तिच्या दाट फांद्यांना अग्नीने होरपळले आणि फळे खाऊन टाकीली, तेथे आता बळकट फांदी उरली नाही, न्यायाचा राजदंड नाही, तेथे आक्रोश आणि रडगाणे आहे.

< Esekiel 19 >