< 2 Mosebok 1 >
1 Dette er navnene på Israels sønner som kom til Egypten; med Jakob kom de, hver med sitt hus:
१याकोबाबरोबर जे इस्राएलाचे पुत्र व त्यांची कुटुंबे मिसर देशात गेली, त्यांची नावे हीः
2 Ruben, Simeon, Levi og Juda,
२रऊबेन, शिमोन, लेवी, यहूदा
3 Issakar, Sebulon og Benjamin,
३इस्साखार, जबुलून, बन्यामीन;
4 Dan og Naftali, Gad og Aser.
४दान, नफताली, गाद व आशेर.
5 De som nedstammet fra Jakob, var i alt sytti sjeler; men Josef var allerede i Egypten.
५याकोबाच्या वंशाचे एकूण सत्तरजण होते. योसेफ हा आधीच मिसर देशात होता.
6 Og Josef døde og alle hans brødre og hele den slekt.
६नंतर योसेफ, त्याचे भाऊ व त्या पिढीतील सर्व मरण पावले.
7 Men Israels barn var fruktbare og tok sterkt til og blev mange og overmåte tallrike, og landet blev fullt av dem.
७इस्राएल लोक फार फलदायी होऊन त्यांची संख्या अतिशय वाढत गेली; ते महाशक्तीशाली झाले आणि सर्व देश त्यांनी भरून गेला.
8 Da kom det en ny konge over Egypten, som ikke visste noget om Josef.
८नंतर मिसर देशावर नवीन राजा राज्य करू लागला. त्यास योसेफाच्या स्मरणाची काही काळजी नव्हती.
9 Og han sa til sitt folk: Se, israelittenes folk er større og tallrikere enn vi.
९तो आपल्या लोकांस म्हणाला, “इस्राएली वंशाच्या लोकांकडे पाहा, ते पुष्कळ अधिक आहेत व आपल्यापेक्षा शक्तीमानही झाले आहेत;
10 Nu vel, la oss gå klokt til verks mot dem, forat de ikke skal ta mere til, og forat de ikke, om det kommer krig, skal slå sig i lag med våre fiender og føre krig mot oss og dra ut av landet.
१०चला, आपण त्यांच्याशी चतुराईने वागू, नाहीतर त्यांची निरंतर अधिक वाढ होईल आणि जर एखादा युद्धाचा प्रसंग आला तर हे लोक आपल्या शत्रूला जाऊन मिळतील; आणि मग ते आपल्याविरुद्ध लढतील आणि देशातून निघून जातील.”
11 Så satte de arbeidsfogder over dem til å plage dem med tvangsarbeid; og de måtte bygge for Farao to byer til oplagssteder, Pitom og Ra'amses.
११म्हणून त्याने त्यांना कामाच्या ओझ्याने जाचण्यासाठी त्यांच्यावर मुकादम नेमले. त्यांनी फारोकरता पिथोम व रामसेस ही दोन शहरे इस्राएल लोकांकडून बांधून घेतली;
12 Men jo mere de plaget dem, dess mere tok de til, og dess mere bredte de sig ut, så egypterne begynte å grue for Israels barn.
१२पण मिसऱ्यांनी त्यांना जसजसे जाचले तसतसे ते संख्येने अधिकच वाढत गेले व अधिकच पसरले, म्हणून इस्राएल लोकांची त्यांना भीती वाटू लागली.
13 Og egypterne tvang Israels barn til å træle for sig,
१३आणि मग मिसऱ्यांनी इस्राएल लोकांवर अधिक कष्टाची कामे लादली.
14 og de forbitret livet for dem med hårdt trælarbeid i ler og tegl og med alle slags trælarbeid på marken, alt det trælarbeid som de tvang dem til å gjøre.
१४अशाप्रकारे त्यांनी इस्राएल लोकांचे जीवन फारच कठीण काबाडकष्टांचे व हाल अपेष्टांचे केले; त्यांनी त्यांना विटा बनविण्याची, बांधकामासाठी चुना बनविण्याची तसेच शेतीची व इतर अतिशय कठीण व कष्टाची कामे बळजबरीने करायला लावली.
15 Og kongen i Egypten sa til de hebraiske jordmødre - den ene av dem hette Sifra og den andre Pua -:
१५मग मिसराचा राजा इब्री सुइणींशी बोलला. त्यांच्यातल्या एकीचे नाव शिप्रा व दुसरीचे पुवा असे होते.
16 Når I hjelper de hebraiske kvinner til å føde, så skal I se efter i jordmorstolen; er det da en sønn, sa drep ham, men er det en datter, da kan hun leve.
१६तो म्हणाला, “तुम्ही इब्री स्त्रियांचे बाळंतपण करत असता, त्या प्रसूत होण्याच्या जागी त्या बसल्या म्हणजे नीट पाहा, आणि त्या स्त्रियांना मुलगी झाली तर तिला जिवंत ठेवा; परंतु त्यांना मुलगा झाला तर त्यास अवश्य मारून टाका.”
17 Men jordmødrene fryktet Gud og gjorde ikke som kongen i Egypten bød dem, men lot guttebarna leve.
१७परंतु त्या इब्री सुइणी देवाचे भय व आदर धरून त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या होत्या, म्हणून त्यांनी मिसरी राजाची आज्ञा मानली नाही; तर त्यांनी जन्मणाऱ्या मुलांनाही जिवंत ठेवले.
18 Da kalte kongen i Egypten jordmødrene til sig og sa til dem: Hvorfor gjør I dette og lar guttebarna leve?
१८तेव्हा मिसराच्या राजाने त्या सुइणींना बोलावून विचारले, “तुम्ही असे का केले? तुम्ही जन्मलेल्या मुलांना का जिवंत ठेवले?”
19 Jordmødrene svarte Farao: De hebraiske kvinner er ikke som de egyptiske, de er sterkere; før jordmoren kommer til dem, har de født.
१९त्या सुइणी फारोला म्हणाल्या, “या इब्री स्त्रिया मिसरच्या स्त्रियांपेक्षा फार ताकदवान आहेत; आम्ही सुइणी त्यांच्याकडे जाऊन पोहचण्यापूर्वीच त्या प्रसूत होतात.”
20 Og Gud gjorde vel imot jordmødrene; og folket tok til og blev overmåte tallrikt.
२०त्याबद्दल देवाने त्या सुइणींचे कल्याण केले. इस्राएल लोक तर अधिक वाढून फार बलवान झाले.
21 Og fordi jordmødrene fryktet Gud, gav han dem avkom.
२१त्या सुइणी देवाचे भय बाळगणाऱ्या होत्या म्हणून त्याने त्यांची घराणे वसवली.
22 Da bød Farao alt sitt folk og sa: Hver sønn som fødes, skal kastes i elven, men hver datter skal I la leve.
२२तेव्हा फारोने आपल्या सर्व लोकांस आज्ञा दिली, “जो प्रत्येक इब्री मुलगा जन्मेल त्यास तुम्ही नाईल नदीमध्ये फेकून द्या, पण प्रत्येक मुलगी मात्र जिवंत ठेवा.”