< Efeserne 6 >
1 I barn! vær lydige mot eders foreldre i Herren! for dette er rett.
१मुलांनो, प्रभूमध्ये आपल्या आई-वडीलांच्या आज्ञा पाळा कारण हे योग्य आहे.
2 Hedre din far og din mor - dette er det første bud med løfte -
२“आपल्या वडिलांचा व आईचा मान राख, यासाठी की तुझे सर्वकाही चांगले व्हावे व तुला पृथ्वीवर दीर्घ आयुष्य लाभावे.” अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे.
3 forat det må gå dig vel, og du må lenge leve i landet.
३
4 Og I fedre! egg ikke eders barn til vrede, men fostre dem op i Herrens tukt og formaning!
४आणि वडिलांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिडीस आणू नका पण तुम्ही त्यांना प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात वाढवा.
5 I tjenere! vær lydige mot eders herrer efter kjødet, med frykt og beven, i eders hjertes enfold, som mot Kristus,
५दासांनो, तुमच्या अंतःकरणाच्या प्रामाणिकतेने जशी ख्रिस्ताची आज्ञा पाळता तशी पूर्ण आदराने व थरथर कांपत जे देहानुसार पृथ्वीवरील मालकांशी आज्ञाधारक असा.
6 ikke med øientjeneste, som de som vil tekkes mennesker, men som Kristi tjenere, så I gjør Guds vilje av hjertet
६मनुष्यास संतोषवणाऱ्या सारखे तोंडदेखल्या चाकरीने नव्हे तर मनापासून, देवाची इच्छा साधणाऱ्या ख्रिस्ताच्या दासांसारखे आज्ञांकित असा,
7 og med villig hu tjener som for Herren og ikke som for mennesker,
७ही सेवा मनुष्याची नाही तर प्रभूची सेवा आहे अशी मानून ती आनंदाने करा,
8 da I vet at hvad godt enhver gjør, det skal han få igjen av Herren, enten han er tjener eller fri.
८प्रत्येक व्यक्ती जे काही चांगले कार्य करतो, तो दास असो अथवा स्वतंत्र असो, प्रभूकडून त्यास प्रतिफळ प्राप्त होईल.
9 Og I herrer! gjør likeså mot dem, så I lar være å true, da I vet at både deres og eders Herre er i himlene, og han gjør ikke forskjell på folk.
९आणि मालकांनो तुम्ही, त्यांना न धमकावता, तुमच्या दासाशी तसेच वागा, तुम्हास हे ठाऊक आहे की, दोघाचाही मालक स्वर्गात आहे आणि त्याच्याजवळ पक्षपात नाही.
10 For øvrig - bli sterke i Herren og i hans veldes kraft!
१०शेवटी, प्रभूमध्ये बलवान होत जा आणि त्याच्या सामर्थ्याने सशक्त व्हा.
11 Iklæ eder Guds fulle rustning, så I kan stå eder mot djevelens listige angrep;
११सैतानाच्या कट-कारस्थानी योजनांविरुद्ध उभे राहता यावे, म्हणून देवाची संपूर्ण शस्त्रसामग्री धारण करा.
12 for vi har ikke kamp mot blod og kjød, men mot makter, mot myndigheter, mot verdens herrer i dette mørke, mot ondskapens ånde-hær i himmelrummet. (aiōn )
१२कारण आपले झगडणे रक्त आणि मांसाबरोबर नाही, तर सत्ताधीशांविरुद्ध, अधिकाऱ्याविरुद्ध, या अंधकारातील जगाच्या अधिपतीबरोबर आणि आकाशातील दुष्ट आत्म्याविरुद्ध आहे. (aiōn )
13 Ta derfor Guds fulle rustning på, så I kan gjøre motstand på den onde dag og stå efter å ha overvunnet alt.
१३या कारणास्तव वाईट दिवसात तुम्हास प्रतिकार करता यावा म्हणून देवाने दिलेली संपूर्ण शस्त्रसामग्री घ्या. म्हणजे तुम्हास सर्व ते केल्यावर टिकून राहता येईल
14 Så stå da omgjordet om eders lend med sannhet, og iklædd rettferdighetens brynje,
१४तर मग स्थिर उभे राहा, सत्याने आपली कंबर बांधा, नीतिमत्त्वाचे उरस्त्राण धारण करा.
15 Og ombundet på føttene med den ferdighet til kamp som fredens evangelium gir,
१५शांतीच्या सुवार्तेसाठी तयार केलेल्या वहाणा पायात घाला.
16 og grip foruten alt dette troens skjold, hvormed I skal kunne slukke alle den ondes brennende piler,
१६नेहमी विश्वासाची ढाल हाती घ्या, जिच्यायोगे त्या दुष्टाचे सगळे जळते बाण विझवू शकाल, ती हाती घेऊन उभे राहा.
17 og ta frelsens hjelm og Åndens sverd, som er Guds ord,
१७आणि तारणाचे शिरस्राण व आत्म्याची तलवार, जी देवाच वचन आहे, ती घ्या,
18 idet I til enhver tid beder i Ånden med all bønn og påkallelse, og er årvåkne deri med all vedholdenhet og bønn for alle de hellige,
१८प्रत्येक प्रार्थना आणि विनंतीद्वारे सर्व प्रसंगी आत्म्यात प्रार्थना करा आणि चिकाटीने उत्तराची वाट पाहा व सर्व पवित्र जनांसाठी प्रार्थना करीत जागृत राहा.
19 og også for mig, at det må gis mig ord når jeg oplater min munn, så jeg med frimodighet kan kunngjøre evangeliets hemmelighet,
१९आणि माझ्यासाठी प्रार्थना करा, जेव्हा मी तोंड उघडीन तेव्हा मला धैर्याने सुवार्तेचे रहस्य कळवण्यास शब्द मिळावे,
20 for hvis skyld jeg er sendebud i lenker, at jeg må tale med frimodighet derom, således som jeg bør tale.
२०मी, त्यासाठीच बेड्यांत पडलेला वकील आहे, म्हणजे मला जसे त्याविषयी बोलले पाहिजे तसे धैर्याने बोलता यावे.
21 Men forat også I skal kjenne min tilstand, hvorledes jeg har det, skal Tykikus fortelle eder alt, han den elskede bror og tro tjener i Herren,
२१पण माझ्याविषयी, म्हणजे मी काम करीत आहे ते तुम्हास समजावे म्हणून, प्रिय बंधू आणि प्रभूमधील विश्वासू सेवक तुखिक या सर्व गोष्टी तुम्हास कळवील.
22 som jeg just derfor sender til eder at I skal få vite hvorledes det er med oss, og at han skal trøste eders hjerter.
२२मी त्यास त्याच हेतूने तुमच्याकडे धाडले आहे; म्हणजे तुम्हास माझ्याविषयी कळावे आणि त्याने तुमच्या मनाचे सांत्वन करावे.
23 Fred være med brødrene, og kjærlighet med tro, fra Gud Fader og den Herre Jesus Kristus!
२३देवपिता आणि प्रभू येशू ख्रिस्तापासून आता बंधूंना विश्वासासह प्रीती आणि शांती लाभो.
24 Nåden være med alle dem som elsker vår Herre Jesus Kristus i uforgjengelighet!
२४जे सर्वजण आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर अविनाशी प्रीती करतात, त्या सर्वाबरोबर देवाची कृपा असो.