< 5 Mosebok 8 >
1 Alle de bud jeg gir dig idag, skal I akte vel på å holde, forat I må leve og bli tallrike og komme inn i det land Herren har tilsvoret eders fedre, og ta det i eie.
१आज मी दिलेल्या सर्व आज्ञांचे पालन करा. कारण त्याने तुम्ही जगाल, आणि बहुगुणित व्हाल व तुमच्या पूर्वजांना परमेश्वराने कबूल केलेल्या प्रदेशात प्रवेश करून तो तुम्ही ताब्यात घ्याल.
2 Og du skal komme i hu hele den vei Herren din Gud har ført dig på i disse firti år i ørkenen for å ydmyke dig og prøve dig og for å kjenne hvad som var i ditt hjerte, om du vilde ta vare på hans bud eller ikke.
२तसेच गेली चाळीस वर्षे आपल्या परमेश्वर देवाने तुम्हास रानावनातून कसे चालवले, त्या प्रवासाची आठवण ठेवा. परमेश्वर तुमची परीक्षा पाहत होता. तुम्हास नम्र करावे, तुमच्या अंत: करणातील गोष्टी जाणून घ्याव्या, तुम्ही त्याच्या आज्ञा पाळता की नाही ते बघावे म्हणून त्याने हे केले.
3 Og han ydmyket dig og lot dig hungre, og han gav dig manna å ete, en mat som hverken du eller dine fedre kjente, fordi han vilde la dig vite at mennesket ikke lever av brød alene, men at mennesket lever av hvert ord som går ut av Herrens munn.
३परमेश्वराने तुम्हास लीन केले, तुमची उपासमार होऊ दिली आणि मग, तुम्ही व तुमचे पूर्वज यांना माहीत नसलेला मान्ना तुम्हास खाऊ घातला. मनुष्य फक्त भाकरीवर जगत नाही, तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या हर एक वचनाने जगतो हे तुम्हास कळावे, म्हणून त्याने हे सर्व केले.
4 Dine klær blev ikke utslitt på dig, og din fot blev ikke hoven i disse firti år.
४गेल्या चाळीस वर्षात तुमचे कपडे जीर्ण झाले नाहीत की तुमचे पाय सुजले नाहीत. का बरे? कारण परमेश्वराने तुमचे रक्षण केले.
5 Så forstå da i ditt hjerte at likesom en mann optukter sin sønn, således optuktet Herren din Gud dig,
५तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्यासाठी या सर्व गोष्टी केल्या आहेत ह्याची आठवण तुम्ही ठेवलीच पाहिजे. बाप आपल्या मुलाला शिकवतो, त्याच्यावर संस्कार करतो तसा तुमचा देव परमेश्वर तुम्हास आहे.
6 og hold Herrens, din Guds bud, så du vandrer på hans veier og frykter ham!
६तुमचा देव परमेश्वर ह्याच्या आज्ञा पाळा, त्यास अनुसरा आणि त्याच्याबद्दल भय धरून आदर बाळगा.
7 Når Herren din Gud fører dig inn i et godt land, et land med rinnende bekker, med kilder og dype vann, som veller frem i dalene og på fjellene,
७तुमचा देव परमेश्वर तुम्हास उत्तम देशात घेऊन जात आहे. ती भूमी सुजला, सुफला आहे. तेथे डोंगरात उगम पावून जमिनीवर वाहणारे नद्या-नाले आहेत.
8 et land med hvete og bygg og vintrær og fikentrær og granatepletrær, et land med oljetrær og honning,
८ही जमीन गहू, जव, द्राक्षमळे, अंजीर, डाळिंब यांनी समृद्ध आहे. येथे जैतून तेल, मध यांची रेलचेल आहे.
9 et land hvor du ikke skal ete ditt brød i armod, hvor du intet skal mangle, et land hvor stenene er jern, og hvor du kan hugge ut kobber av fjellene,
९येथे मुबलक धान्य आहे. कोणत्याही गोष्टीची तुम्हास उणीव नाही. येथील दगड लोहयुक्त आहेत. तुम्हास डोंगरातील तांबे खोदून काढता येईल.
10 og når du så eter og blir mett og lover Herren din Gud for det gode land han har gitt dig,
१०तेव्हा तुम्ही खाऊन तृप्त व्हावे आणि असा चांगला प्रदेश दिल्याबद्दल तुमचा देव परमेश्वर ह्याचे गुणगान गावे.
11 da vokt dig for å glemme Herren din Gud, så du ikke tar vare på hans bud og hans forskrifter og hans lover, som jeg pålegger dig idag,
११सावध असा! तुमचा देव परमेश्वर याचा विसर पडू देऊ नका! मी दिलेल्या आज्ञा नियम, विधी, यांचे कटाक्षाने पालन करा.
12 og vokt dig at du ikke, når du eter og blir mett og bygger gode hus og bor i dem,
१२त्यामुळे तुम्हास अन्नधान्याची कमतरता पडणार नाही. तुम्ही चांगली घरे बांधून त्यामध्ये रहाल.
13 og ditt storfe og ditt småfe økes, og ditt sølv og ditt gull økes, og all din eiendom økes,
१३तुमची गुरेढोरे आणि शेळ्यामेंढ्या यांची संख्या वाढेल. सोनेरुपे आणि मालमत्ता वाढेल.
14 at du da ikke ophøier dig i ditt hjerte, så du glemmer Herren din Gud, som førte dig ut av Egyptens land, av trælehuset,
१४या भरभराटीने उन्मत्त होऊ नका. आपला देव परमेश्वर याला विसरु नका. मिसरमध्ये तुम्ही गुलाम होता. परंतु मिसरमधून परमेश्वराने तुमची सुटका केली व बाहेर आणले.
15 han som ledet dig i den store og forferdelige ørken blandt giftige slanger og skorpioner og på tørre ødemarker, hvor det ikke fantes vann, han som lot vann strømme ut for dig av den hårde klippe,
१५विषारी नाग आणि विंचू असलेल्या निर्जल, रखरखीत अशा भयंकर रानातून त्याने तुम्हास आणले. त्याने तुमच्यासाठी खडकातून पाणी काढले.
16 han som i ørkenen gav dig manna å ete, en mat som dine fedre ikke kjente, for å ydmyke dig og prøve dig og så til sist gjøre vel imot dig.
१६तुमच्या पूर्वजांनी कधीही न पाहिलेला मान्ना तुम्हास खायला घालून पोषण केले. परमेश्वराने तुमची परीक्षा पाहिली. शेवटी तुमचे भले व्हावे म्हणून परमेश्वराने तुम्हास नम्र केले.
17 Si da ikke ved dig selv: Det er min kraft og min sterke hånd som har vunnet mig denne rikdom,
१७हे धन मी माझ्या बळावर आणि कुवतीवर मिळवले असे चुकूनसुद्धा मनात आणू नका.
18 men kom Herren din Gud i hu! For det er han som gir dig kraft til å vinne dig rikdom, fordi han vil holde sin pakt som han tilsvor dine fedre, således som det kan sees på denne dag.
१८तुमचा देव परमेश्वर याचे स्मरण ठेवा. त्यानेच तुम्हास हे सामर्थ्य दिले हे लक्षात ठेवा. त्याने तरी हे का केले? कारण आजच्याप्रमाणेच त्याने तुमच्या पूर्वजांशी पवित्र करार केला होता, तोच तो पाळत आहे.
19 Men dersom du glemmer Herren din Gud og følger andre guder og dyrker dem og tilbeder dem, da vidner jeg mot eder idag at I visselig skal omkomme.
१९तेव्हा आपला देव परमेश्वर ह्याला विसरु नका. इतर दैवतांना अनुसरू नका. त्यांची पूजी किंवा सेवा करु नका. तसे केलेत तर तुमचा नाश ठरलेलाच आहे, ही ताकीद मी आताच तुम्हास देऊन ठेवतो.
20 Likesom de hedninger Herren lar omkomme for eder, således skal også I omkomme, fordi I ikke hører på Herrens, eders Guds røst.
२०ज्या राष्ट्रांचा नाश परमेश्वर तुमच्यासमोर करणार आहे त्यांच्याप्रमाणेच तुम्हीही नाश पावाल, कारण तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकली नाही.