< 5 Mosebok 3 >
1 Så tok vi på en annen kant og drog op på veien til Basan; da drog Og, kongen i Basan, og hele hans folk ut mot oss til strid, til Edre'i.
१मग आपण वळसा घेऊन बाशानच्या वाटेने निघालो. तेव्हा बाशानाचा राजा ओग आणि त्याची सेना युद्धासाठी एद्रई येथे चाल करून आली.
2 Og Herren sa til mig: Frykt ikke for ham! For jeg har gitt ham og hele hans folk og hans land i din hånd, og du skal gjøre med ham som du gjorde med Sihon, amorittenes konge, som bodde i Hesbon.
२परमेश्वर मला म्हणाला, त्यास भिऊ नका. तो, त्याची प्रजा आणि त्याची भूमी मी तुमच्या हाती दिलेली आहे. हेशबोनवर राज्य करणारा अमोऱ्यांचा राजा सीहोन ह्याचे केले तसेच याचेही करा.
3 Så gav Herren vår Gud også Og, kongen i Basan, og hele hans folk i vår hånd; og vi slo ham så vi ikke lot nogen bli tilbake eller slippe unda.
३आमचा देव परमेश्वर ह्याने बाशानाचा राजा ओग आणि त्याची प्रजा आमच्या हाती दिली. आम्ही त्यास असा मार दिला की त्यांच्यापैकी कोणीही जिवंत राहिले नाही.
4 Og vi inntok dengang alle hans byer; der var ikke en by uten at vi tok den fra dem, seksti byer, hele Argob-landet, Ogs rike i Basan.
४मग ओगच्या ताब्यातील सर्वच्या सर्व साठ नगरे म्हणजे अर्गोबाचा सारा प्रदेश घेतला, बाशानातले ओगचे राज्य ते हेच.
5 Alle disse var faste byer med høie murer, dobbelte porter og bommer, foruten en stor mengde landsbyer.
५या सर्व नगरांना भक्कम तटबंदी होती. त्यांना उंच भिंती, वेशी, मजबूत अडसर होते. याव्यतिरिक्त तट नसलेली खेडी पुष्कळच होती.
6 Og vi slo dem med bann, som vi hadde gjort med Sihon, kongen i Hesbon; hver by slo vi med bann, menn, kvinner og barn.
६हेशबोनच्या सीहोन राजाच्या नगरांप्रमाणेच येथेही आम्ही समुळ नाश केला. पुरुष, स्त्रिया, मुलेबाळे कोणालाही म्हणून शिल्लक ठेवले नाही.
7 Men alt feet og hærfanget fra byene tok vi til bytte.
७गुरेढोरे आणि नगरातील लूट मात्र घेतली.
8 Således tok vi dengang landet fra begge amoritterkongene på denne side av Jordan, fra Arnon-åen like til fjellet Hermon -
८“अशाच पद्धतीने अमोऱ्यांच्या दोन राजांच्या ताब्यातला प्रदेशही आपण घेतला, तो म्हणजे यार्देनच्या पूर्वेकडचा, आर्णोन खोऱ्यापासून हर्मोन पर्वतापर्यंतचा.
9 sidonierne kaller Hermon Sirjon, og amorittene kaller det Senir -
९(सीदोनी लोक या हर्मोन पर्वताला सिर्योन म्हणतात. पण अमोरी लोक सनीर म्हणतात.)
10 alle byene på sletten og hele Gilead og hele Basan like til byene Salka og Edre'i i Ogs rike i Basan;
१०माळावरील सर्व नगरे, सगळा गिलाद प्रांत तसेच बाशानच्या ओगच्या राज्यातील सलेखा व एद्रई सकट सर्व प्रांत आम्ही काबीज केला.”
11 for Og, kongen i Basan, var den siste som var tilbake av refa'ittene; hans seng, som er av jern, står, som alle vet, i ammonitterbyen Rabba; den er ni alen lang og fire alen bred, alnen regnet efter lengden av en manns underarm.
११रेफाई लोकांपैकी बाशानाचा राजा ओग तेवढा अजून जिवंत होता. त्याचा पलंग लोखंडाचा होता. तो पलंग तेरा फूट लांब आणि सहा फूट रुंद होता. अम्मोन्यांच्या राब्बा नगरात तो अजूनही आहे.
12 Dette land inntok vi dengang: Bygdene fra Aroer, som ligger ved Arnon-åen, og halvdelen av Gileadfjellene med byene der gav jeg til rubenittene og gadittene,
१२“तेव्हा ती जमीन आम्ही काबीज केली. रऊबेनी आणि गादी यांना त्यातील काही भाग मी दिला. तो असाः आर्णोन खोऱ्यातील अरोएर नगरापासून गिलादाच्या डोंगराळ प्रदेशाचा अर्धा भाग व त्यातील नगरे.
13 og resten av Gilead og hele Basan, Ogs rike, gav jeg til den halve Manasse stamme, hele Argob-landet, hele Basan; det er det som kalles refa'ittenes land.
१३गिलादाचा उरलेला अर्धा भाग आणि संपूर्ण बाशान मनश्शेच्या अर्ध्या वंशाला दिले.” बाशान म्हणजे ओगचे राज्य त्याच्या एका भागाला अर्गोब म्हणतात (ह्यालाच रेफाईचा देशही म्हणतात.
14 Ja'ir, Manasses sønn, inntok hele Argob-landet like til gesurittenes og ma'akatittenes landemerker, og dette land - Basan-landet - kalte han efter sitt eget navn Ja'irs byer, og så har det hett til denne dag.
१४मनश्शेचा मुलगा याईर याने गशूरी आणि माकाथी यांच्या सीमेपर्यंत अर्गोबाचा सर्व प्रदेश हस्तगत केला. आणि बाशानाला आपले नाव दिले म्हणून आजही लोक त्यास हव्वोथ-याईराची नगरेच म्हणतात.)
15 Og til Makir gav jeg Gilead.
१५आणि गिलाद प्रदेश मी माखीर याला दिला.
16 Og til rubenittene og gadittene gav jeg landet fra Gilead til Arnon-åen, til midt i åen, og landet langsmed den, og til Jabbok-åen, Ammons barns grense,
१६त्याचा पुढचा प्रदेश रऊबेनी आणि गादी ह्यांना गिलादापासून आर्णोन खोऱ्याच्या मध्यभागापासून अम्मोन्यांच्या सीमेवरील यब्बोक नदीपर्यंत त्याची सरहद्द ठरवली.
17 og ødemarken og Jordan og landet langsmed den, fra Kinnerets sjø til Ødemarks-havet - Salthavet - nedenfor Pisga-liene, mot øst.
१७तसेच किन्नेरेथापासुन अरबाचा समुद्र म्हणजेच क्षार समुद्र ईथपर्यंतचा पिसगाची उतरण व त्याच्या तळाशी असलेला अराबा व यार्देनेच्या पुर्वेकडील प्रदेश मी त्यांना दिला.
18 Dengang bød jeg eder og sa: Herren eders Gud har gitt eder dette land til eie; væbnet skal I, alle som er krigsdyktige menn, dra frem foran eders brødre, Israels barn.
१८त्यावेळी मी त्या सर्वांना आज्ञा दिली की यार्देन नदीच्या अलीकडचा हा प्रदेश “तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्या हवाली केला आहे. पण तुमच्यापैकी सर्व लढाऊ पुरुषांनी पुढाकार घेऊन, हत्यारबंद होऊन आपल्या इस्राएली भाऊबंदाना पलीकडे घेऊन जावे.
19 Bare eders hustruer og barn og eders fe - jeg vet at I har meget fe - skal bli igjen i de byer jeg har gitt eder,
१९तुमच्या स्त्रिया, मुलेबाळे आणि गुरेढोरे (ती बरीच आहेत हे मला माहीत आहे) इथेच मी दिलेल्या नगरात राहतील.
20 inntil Herren gir eders brødre ro likesom eder, og de og har tatt det land i eie som Herren eders Gud gir dem på hin side Jordan; da kan I vende tilbake, hver til den eiendom jeg har gitt eder.
२०आणि तुमच्याचप्रमाणे तुमच्या भाऊबंदांना परमेश्वर विसावा देईल, व तुमचा देव परमेश्वर ह्याने त्यांना देऊ केलेला यार्देनेपलीकडचा देश तेही ताब्यात घेतील; त्यानंतर जो प्रदेश मी तुम्हास दिलेला आहे तेथे तुम्ही सर्व आपापल्या वतनावर परत या.”
21 På samme tid bød jeg Josva og sa: Du har med egne øine sett alt det Herren eders Gud har gjort med disse to konger; således vil Herren gjøre med alle de riker du drar over til.
२१मग मी यहोशवाला असे सांगितले की, “या दोन राजांचे तुमचा देव परमेश्वर ह्याने काय केले हे तू पाहिलेच. पुढेही ज्या ज्या राज्यात तू जाशील त्या सर्वांचे परमेश्वर असेच करील.
22 I skal ikke være redde for dem; for Herren eders Gud vil selv stride for eder.
२२तेथील राजांना घाबरु नका. कारण युद्धात तुमचा देव परमेश्वर तुमच्या बाजूने लढणार आहे.”
23 For jeg bønnfalt dengang Herren og sa:
२३मग त्या वेळी मी परमेश्वरास विनंती करून म्हणालो,
24 Herre, Herre! Du har begynt å la din tjener se din storhet og din sterke hånd; for hvor er det en gud i himmelen og på jorden som kan gjøre sådanne gjerninger og storverk som du?
२४“हे प्रभू परमेश्वरा, तू तुझ्या दासास आपला महान व सामर्थ्यशाली हात दाखवत आहेस. तुझ्यासारखे थोर प्रताप करणारा देव स्वर्गात किंवा पृथ्वीवर दुसरा कोण आहे?
25 La mig nu få dra over og se det gode land på hin side Jordan, dette gode fjell-land og Libanon!
२५तेव्हा कृपाकरून मला यार्देन नदी पलीकडची सुपीक भूमी, चांगला डोंगराळ प्रदेश आणि लबानोन पाहू दे.”
26 Men Herren var vred på mig for eders skyld, og han hørte ikke på mig, men han sa til mig: La det nu være nok, tal ikke mere til mig om dette!
२६पण तुमच्यापायी परमेश्वर माझ्यावर रुष्ट झाला होता. त्याने माझे म्हणणे ऐकले नाही. तो म्हणाला, “पुरे, आता एक शब्दही बोलू नको.
27 Gå op på Pisgas topp og løft dine øine mot vest og mot nord og mot syd og mot øst, og se vidt omkring dig! For over Jordan her skal du ikke komme.
२७पिसगाच्या शिखरावर जा. आणि तेथून पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशा चारी दिशांना बघ. तेथून तुला सर्वकाही दिसेल पण यार्देनच्या पलीकडे तू पाऊल ठेवू शकणार नाहीस.
28 Og gi Josva befaling og gjør ham frimodig og sterk! For han skal føre dette folk over, og han skal gi dem til arv det land du skal skue.
२८यहोशवाला मात्र तू सूचना दे. त्यास उत्तेजन देऊन समर्थ कर. कारण तोच लोकांस पलीकडे नेईल. तू तो देश पाहशील पण यहोशवाच त्यांना ती जमीन राहण्यासाठी मिळवून देईल.”
29 Så blev vi da i dalen midt imot Bet-Peor.
२९“आणि आम्ही बेथ-पौराच्या समोरच्या खोऱ्यात राहिलो.”