< 5 Mosebok 23 >
1 Ingen som er gildet, enten ved knusning eller ved å skjæres, skal være med i Herrens menighet.
१जो भग्नांड किंवा ज्याचे लिंग छेदन झाले आहे त्यास परमेश्वराच्या सभेत सहभागी होण्यास मनाई आहे.
2 Ingen som er født i hor, skal være med i Herrens menighet, enn ikke hans ætt i tiende ledd skal være med i Herrens menighet.
२जारजाने परमेश्वराच्या सभेत सहभागी होऊ नये. त्याच्या दहाव्या पिढीपर्यंत ही मनाई आहे.
3 Ingen ammonitt eller moabitt skal være med i Herrens menighet; enn ikke deres ætt i tiende ledd skal nogensinne være med i Herrens menighet,
३अम्मोनी आणि मवाबी यांनी परमेश्वराच्या मेळ्यास येऊ नये व त्यांच्या पुढच्या दहा पिढ्यांनीही इस्राएलांबरोबर सभेत सामील होऊ नये.
4 fordi de ikke kom eder i møte med brød og vann på veien, da I drog ut av Egypten, og fordi han leide Bileam, Beors sønn, fra Petor i Mesopotamia imot dig til å forbanne dig.
४कारण तुमच्या मिसरपासूनच्या प्रवासात तुम्हास अन्नपाणी देण्यास त्यांनी नकार दिला होता. तसेच अराम नईराईम येथील पथोर नगराचा बौराचा मुलगा बलाम ह्याला पैसे देऊन त्यांनी त्यास तुम्हास शाप द्यायला लावले.
5 Men Herren din Gud vilde ikke høre på Bileam, og Herren din Gud vendte forbannelsen til velsignelse for dig, fordi Herren din Gud hadde dig kjær.
५तुमचा देव परमेश्वर ह्याने मात्र बलामचे ऐकले नाही. उलट त्या शापाचे रुपांतर आशीर्वादात केले. कारण तुमचा देव परमेश्वर याची तुमच्यावर प्रीती होती.
6 Du skal aldri i dine levedager søke deres velferd og lykke.
६तुम्ही जिवंत असेपर्यंत त्यांची शांती व भरभराट करायला बघू नका.
7 Men du skal ikke avsky edomitten, for han er din bror; og du skal ikke avsky egypteren, for du har levd som fremmed i hans land.
७अदोमी लोकांचा कधीही तिरस्कार करु नका. कारण ते तुमचे आप्त आहेत. तसेच मिसरी लोकांचा द्वेष करु नका. कारण त्यांच्या देशात तुम्ही उपरे होतात.
8 Deres ætt i tredje ledd kan få være med i Herrens menighet.
८त्यांच्या तिसऱ्या पिढीपासूनच्या लोकांस इस्राएलांबरोबर परमेश्वराच्या सभेत सहभागी व्हायला हरकत नाही.
9 Når du drar ut mot dine fiender og slår leir, da skal du vokte dig for alt som er usømmelig.
९युद्धावर छावणीत असताना जे जे म्हणून अशुद्धकारक त्यापासून दूर राहा.
10 Er nogen blandt eder uren efter noget som har hendt ham om natten, så skal han gå utenfor leiren, han skal ikke komme inn i leiren.
१०एखाद्याला रात्री अशुद्धता प्राप्त झाल्यास त्याने छावणीच्या बाहेर जावे. छावणीत राहू नये त्याने छावणीच्या आत येवू नये.
11 Mot aften skal han bade sig i vann, og når solen går ned, kan han komme inn i leiren.
११मग संध्याकाळ जवळ आली म्हणजे त्याने स्नान करावे. आणि सूर्यास्त झाल्यावरच परत छावणीत यावे.
12 Du skal ha et sted utenfor leiren som du skal gå ut til.
१२प्रातर्विधींसाठी छावणीच्या बाहेर एक जागा असावी.
13 Og mellem dine redskaper skal du ha en spade; med den skal du grave et hull, når du setter dig der ute, og så igjen dekke over det som er gått fra dig;
१३आपल्या शस्त्रांबरोबरच खणण्यासाठी म्हणून एक कुदळ असावी. प्रातर्विधीस बसण्यापूर्वी एक खड्डा खणावा व विधी आटोपल्यावर त्यावर माती पसरुन तो झाकून टाकावा.
14 for Herren din Gud vandrer midt i din leir for å utfri dig og gi dine fiender i din vold, og din leir skal være hellig, forat han ikke skal se noget motbydelig hos dig og vende sig bort fra dig.
१४कारण तुमच्या संरक्षणासाठी आणि तुमच्याद्वारे शत्रूचा पराभव करण्यासाठी तुमचा देव परमेश्वर तुमच्यासोबतच राहणार आहे. तेव्हा छावणी पवित्र असावी. नाहीतर काही किळसवाण्या गोष्टी पाहून तो तुम्हास सोडून जायचा.
15 Du skal ikke sende en træl tilbake til hans herre når han er rømt fra sin herre og har flyktet til dig.
१५एखादा गुलाम कधी त्याच्या मालकाकडून पळून जाऊन तुमच्याकडे आला तर त्यास मालकाच्या स्वाधीन करु नका.
16 Han skal bli hos dig i ditt land på det sted han utvelger sig i en av dine byer, hvor det tykkes ham best; du skal ikke være hård imot ham.
१६त्यास आपल्या निवडीनुसार त्यास तुमच्या वेशीमध्ये हव्या त्या गावात राहू द्या. त्यास जाच करु नका.
17 Der skal ikke være nogen tempelskjøge blandt Israels døtre, og der skal ikke være nogen tempelboler blandt Israels sønner.
१७इस्राएलाच्या स्त्रीयांपैकी कोणीही वेश्या होऊ नये आणि इस्राएली पुत्रापैकी कोणासही पुमैथुनास वाहू नये.
18 Du skal ikke komme med skjøgelønn eller hundepenger inn i Herrens, din Guds hus, om du skulde ha gjort noget sådant løfte; for begge deler er en vederstyggelighet for Herren din Gud.
१८पुरुष किंवा स्त्रीवेश्येच्या कमाईचा पैसा तुमचा देव परमेश्वर ह्याच्या पवित्र निवासस्थानी, नवस फेडण्याच्या कामासाठी वापरला जाणार नाही याची दक्षता घ्या. कारण तुमचा देव परमेश्वरास अशा व्यक्तीचा विट आहे.
19 Du skal ikke ta rente av din bror, hverken av penger eller av matvarer eller av nogen annen ting som der tas rente av.
१९आपल्या इस्राएल बांधवांपैकी कोणाला काही उसने दिल्यास त्यावर व्याज लावू नका. पैसा, अन्नधान्य किंवा कोणत्याही व्याज लावता येण्यासारख्या गोष्टीवर व्याज आकारू नका.
20 Av utlendingen kan du ta rente; men av din bror må du ikke ta rente; da skal Herren din Gud velsigne dig i alt det du tar dig fore i det land du kommer inn i for å ta det i eie.
२०परक्याकडून व्याज घेतले तरी चालेल. पण आपल्याच बांधवाला व्याज लावू नका. हे नियम पाळलेत तर, ज्या देशात तुम्ही राहणार आहात तेथे हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यात तुम्हास तुमचा देव परमेश्वर ह्याचा आशीर्वाद मिळेल.
21 Når du gjør Herren din Gud et løfte, da skal du ikke vente med å holde det; for Herren din Gud vil kreve det av dig, og du vil få synd på dig.
२१तुमचा देव परमेश्वर ह्याला नवस बोललात तर तो फेडायला उशीर करु नका. कारण तुमचा देव परमेश्वर तुम्हास त्याचा जाब विचारील. नवस फेडला नाहीत तर पाप लागेल.
22 Men om du lar være å gjøre noget løfte, vil du ikke få synd på dig.
२२पण नवस बोललाच नाहीत तर पाप लागणार नाही.
23 Hvad dine leber har talt, skal du holde og gjøre, fordi du frivillig og med egen munn har gitt Herren din Gud ditt løfte.
२३जे वचन तुम्ही देता ते पाळत जा. तुमचा देव परमेश्वर तुम्हास काही नवस बोला असे म्हणत नाही. तुम्ही स्वखुशीने तो बोलता तेव्हा त्याप्रमाणे वागा.
24 Når du kommer inn i din næstes vingård, da kan du ete druer, så meget du vil, til du er mett; men du må ikke sanke noget i ditt spann.
२४दुसऱ्याच्या द्राक्षमळ्यातून जात असताना वाटल्यास हवी तितकी द्राक्षे खा पण टोपलीत घालून बरोबर घेऊन जाऊ नका.
25 Når du kommer inn i din næstes kornaker, da kan du plukke aks med din hånd; men sigd må du ikke bruke på din næstes kornaker.
२५आपल्या शेजाऱ्याच्या शेतातून जाताना धान्याची कणसे खुडून खाऊ शकता पण आपल्या शेजाऱ्याच्या उभ्या पिकास विळ्याने कापून नेऊ नका.