< Apostlenes-gjerninge 26 >

1 Agrippa sa da til Paulus: Du har lov til å tale om dig selv. Da strakte Paulus sin hånd ut og sa til sitt forsvar:
अग्रिप्पा पौलाला म्हणाला, “तुला तुझी बाजू मांडायला परवानगी आहे.” यावर पौलाने आपला हात उंच करून आपल्या बचावाचे भाषण सुरू केले.
2 Mot alt det som jøder anklager mig for, kong Agrippa, akter jeg mig lykkelig at jeg idag skal forsvare mig for dig,
अग्रिप्पा महाराज, मी स्वतःला धन्य समजतो कारण यहूद्यांनी आपल्यासमोर माझ्याविरुद्ध केलेल्या आरोपांचा बचाव करण्याची संधी आज मिळाली.
3 for du kjenner best alle skikker og spørsmål iblandt jødene; derfor ber jeg dig at du vil høre tålmodig på mig.
विशेषत, यहूदी चालीरीति आणि प्रश्न इत्यादी गोष्टींची आपणांला चांगल्या प्रकारे माहिती असल्याने तर हे जास्तच खरे म्हणावे लागेल, तेव्हा आपण माझे बोलणे धीराने ऐकून घ्यावे अशी मी विनंती करतो.
4 Mitt liv fra ungdommen av, som jeg fra første stund har levd iblandt mitt folk og i Jerusalem, kjenner alle jøder,
मी माझे जीवन तरुणपणापासून माझ्या प्रांतात व यरूशलेम शहरात कशा रीतिने जगत आलो हे सर्व यहूदी लोकांस चांगले माहीत आहे.
5 da de forut vet om mig, like fra først av, om de bare vil komme frem med sitt vidnesbyrd, at jeg levde efter det strengeste parti av vår gudsdyrkelse, som fariseer.
ते मला बऱ्याच काळापासून ओळखतात आणि त्यांची इच्छा असेल तर मी एक परूशी म्हणजे आमच्या यहूदी धर्माच्या एका कट्टर गटाचा सभासद या नात्याने कसा जगत आलो याविषयी ते साक्ष देऊ शकतील.
6 Og nu står jeg her og skal dømmes for håp på det løfte som av Gud er gitt fedrene,
आता देवाने आमच्या पुर्वजांना जे वचन दिले त्याची आशा धरल्याबद्दल माझा न्याय होण्याकरता मी उभा आहे;
7 det som vårt tolvstamme-folk under uavlatelig gudstjeneste natt og dag håper å vinne frem til; for dette håp tiltales jeg av jøder, konge!
ते वचन प्राप्त होण्याची आशा बाळगून आमचे बारा वंश देवाची सेवा रात्रंदिवस एकाग्रतेने करीत आहेत, महाराज, तीच आशा बाळगल्याबद्दल माझ्यावर यहूद्यांनी आरोप ठेवला आहे.
8 Hvorfor aktes det for utrolig iblandt eder at Gud opvekker døde?
देव मरण पावलेल्यांना परत उठवितो, असे तुमच्यापैकी कित्येकांना विश्वास ठेवण्यास अयोग्य का वाटावे.
9 Jeg for min del trodde nu at jeg burde gjøre meget imot Jesu, nasareerens navn;
नासरेथच्या येशूच्या नावाविरुद्ध जे जे काही करता येईल ते ते मी करावे असे मलादेखील वाटत होते.
10 det gjorde jeg også i Jerusalem, og både kastet jeg mange av de hellige i fengsel, efterat jeg hadde fått fullmakt av yppersteprestene, og når de skulde slåes ihjel, gav jeg min stemme til det,
१०आणि नक्की हेच मी यरूशलेम शहरात केले, कारण मुख्य याजकांकडून मला तसा अधिकार मिळाला होता, म्हणून मी देवाच्या अनेक संतांना तुरुंगात टाकले आणि हे जे संतगण जिवे मारले गेले, त्यांच्याविरुद्ध मी माझे मत नोंदविले.
11 og omkring i alle synagogene tvang jeg dem ofte ved straff til å spotte, og jeg raste enn mere mot dem og forfulgte dem like til de utenlandske byer.
११अनेक सभास्थानात मी त्यांना शिक्षा केली आणि देवाविरुद्ध जबरीने वाईट भाषण करायला लावण्याचा मी प्रयत्न केला, या लोकांवरील माझा राग इतक्या पराकोटीला गेला होता की, मी त्यांचा छळ करण्याकरता इतर शहरांमध्ये देखील जात असे.
12 Under dette drog jeg da også til Damaskus med makt og myndighet fra yppersteprestene;
१२एकदा दिमिष्क शहराला जाण्यासाठी मुख्य याजकांनी मला अधिकार व परवानगी दिली तेव्हा महाराज.
13 og midt på dagen så jeg på veien, konge, et lys fra himmelen, klarere enn solen, stråle omkring mig og dem som reiste med mig,
१३वाटेत भर दुपारच्या वेळी मी माझ्या व माझ्यासमवेत असणाऱ्यांच्या भोवती स्वर्गीय प्रकाश फाकलेला पाहिला, तो प्रकाश सूर्यापेक्षाही जास्त प्रखर होता.
14 og da vi alle falt til jorden, hørte jeg en røst si til mig på det hebraiske mål: Saul! Saul! hvorfor forfølger du mig? det blir hårdt for dig å stampe mot brodden.
१४आम्ही सर्व खाली जमिनीवर पडलो आणि इब्री भाषेत माझ्याशी बोलताना एक वाणी मी ऐकली, ती वाणी म्हणाली, “शौला, शौला, माझा छळ तू का करतोस? अणकुचीदार काठीवर लाथ मारणे तुला हानिकारक आहे.”
15 Jeg sa da: Hvem er du, Herre? Og Herren sa: Jeg er Jesus, han som du forfølger.
१५आणि मी म्हणालो, ‘प्रभू, तू कोण आहेस?’ प्रभूने उत्तर दिले, “मी येशू आहे, ज्याचा तू छळ करीत आहेस.
16 Men reis dig op og stå på dine føtter! for derfor åpenbarte jeg mig for dig: for å utkåre dig til tjener og vidne både om det som du har sett, og om det for hvis skyld jeg vil åpenbare mig for dig,
१६आता ऊठ आणि उभा राहा! या कारणांसाठी मी तुला दर्शन दिले आहे तुला सेवक म्हणून नेमावे व जे काही तुला दाखविले व जे दाखवीन त्याचा साक्षीदार म्हणून तुला नेमावे.
17 idet jeg frir dig ut fra folket og hedningene, som jeg sender dig til
१७या लोकांपासून व परराष्ट्रीयांपासून मी तुझे रक्षण करीन.
18 for å oplate deres øine, så de kan vende sig fra mørke til lys og fra Satans makt til Gud, forat de kan få syndenes forlatelse og arvelodd blandt dem som er helliget ved troen på mig.
१८मी तुला त्यांच्याकडे पाठवतो, ह्यासाठी की, त्यांनी अंधारांतून निघून उजेडाकडे व सैतानाच्या अधिकारातून देवाकडे वळावे, म्हणून तू त्यांचे डोळे उघडावे आणि त्यांना पापाची क्षमा व्हावी व माझ्यावरील विश्वासाने पवित्र झालेल्या लोकांमध्ये वतन मिळावे.”
19 Derfor, kong Agrippa, blev jeg ikke ulydig mot det himmelske syn;
१९यासाठी, अग्रिप्पा महाराज मला जो स्वर्गीय दृष्टांत झाला, त्याचा मी आज्ञाभंग केला नाही.
20 men både for dem i Damaskus først og for Jerusalem og i hele Judeas land og for hedningene forkynte jeg at de skulde omvende sig og komme tilbake til Gud og gjøre gjerninger som er omvendelsen verdige.
२०उलट पहिल्यांदा दिमिष्कातील आणि नंतर यरूशलेम शहरातील, यहूदीया प्रांतातील सर्व आणि परराष्ट्रीय लोकांससुद्धा प्रभूच्या वचनाची साक्ष दिली, त्यांनी पश्चात्ताप करावा, देवाकडे वळावे आणि पश्चात्तापाला साजेल अशी कामे करावी असे मी त्यांना सांगितले.
21 For disse tings skyld grep nogen jøder mig i templet og søkte å slå mig ihjel.
२१या कारणांमुळे मी परमेश्वराच्या भवनात असताना काही यहूदी लोकांनी मला धरले आणि जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
22 Så har jeg da fått hjelp fra Gud og står til denne dag og vidner både for liten og for stor, idet jeg ikke sier noget annet enn hvad profetene og Moses har sagt skulde skje:
२२परंतु देवाने मला मदत केली म्हणून मी आज येथे उभा राहून समाजातील लहानथोरांना साक्ष देत आहे, जे काही पुढे होणार होते, त्याविषयी संदेष्ट्यांनी व मोशेने जे सांगितले त्यापेक्षा दुसरे मी सांगत नाही.
23 at Messias skulde lide, og at han som den første av de dødes opstandelse skulde forkynne lys for folket og for hedningene.
२३त्यानुसार देवाचा अभिषिक्त जो ख्रिस्त तो दुःखसहन करील आणि मरण पावलेल्यातून उठविला जाणाऱ्यांत तो पाहिला असेल, यहूदी लोकांस तसेच परराष्ट्रीयांनाही देव प्रकाशाची घोषणा करील.
24 Men da han forsvarte sig således, sier Festus med høi røst: Du er vanvittig, Paulus! din megen lærdom driver dig til vanvidd.
२४पौल आपल्या बचावासंबंधी बोलत असताना फेस्त त्यास मोठ्याने म्हणाला, “पौला, तू वेडा आहेस, जास्त ज्ञानामुळे तुला वेड लागले आहे.”
25 Men han sier: Jeg er ikke vanvittig, mektigste Festus! men jeg taler sanne og sindige ord.
२५पौलाने उत्तर दिले, “फेस्त महाराज, मी वेडा नाही; तर ज्या गोष्टी खऱ्या आहेत आणि अगदी योग्य आहेत, त्यांच्याविषयीच मी बोलत आहे.
26 For kongen kjenner til disse ting, og til ham taler jeg også frimodig; for jeg kan ikke tro at noget av dette er ukjent for ham; dette er jo ikke skjedd i en avkrok.
२६येथे हजर असलेल्या महाराजांना याविषयी चांगली माहिती आहे आणि यामुळे मी त्यांच्याशी उघडपणाने बोलू शकतो, त्याच्या ध्यानातून काही सुटले नसेल, असे मला खात्रीने वाटते, मी हे म्हणतो, कारण ही गोष्ट एखाद्या कानाकोपऱ्यात झाली नाही.
27 Tror du, kong Agrippa, profetene? Jeg vet at du tror.
२७अग्रिप्पा महाराज, संदेष्ट्यानी जे लिहिले त्यावर तुमचा विश्वास आहे काय? तुमचा त्यावर विश्वास आहे.” हे मला नक्की माहीत आहे.
28 Men Agrippa sa til Paulus: Det mangler lite i at du overtaler mig til å bli en kristen.
२८यावर अग्रिप्पा म्हणाला, “एवढ्या थोड्या वेळात ख्रिस्ती होण्यासाठी तू माझे मन वळवू शकशील असे तुला वाटते काय?”
29 Paulus sa da: Jeg vilde ønske til Gud, enten det mangler lite eller meget, at ikke alene du, men også alle som hører mig idag, måtte bli slik som jeg er, bare uten disse lenker.
२९पौलाने उत्तर दिले, “थोड्या वेळात म्हणा अगर जास्त वेळात म्हणा, मी जसा आहे तसे केवळ तुम्हीच नव्हे तर आज जे जे येथे बसून माझे बोलणे ऐकत आहेत त्या सर्वांनी माझ्यासारखे या साखळदंडाखेरीज, विश्वास ठेवणारे व्हावे, अशी माझी देवाला नम्र विनंती आहे.”
30 Da stod kongen op, og landshøvdingen og Berenike og de som satt der med dem,
३०यानंतर राजा, बर्णीका, राज्यपाल आणि त्यांच्याबरोबर इतर जे तेथे बसले होते, ते सर्व उठले.
31 og de gikk til side og talte med hverandre og sa: Denne mann gjør ikke noget som fortjener død eller lenker.
३१ते न्यायालयातून बाहेर पडल्यावर एकमेकांशी बोलत होते, ते म्हणाले, “ज्यामुळे तुरुंगवास किंवा मरणदंड द्यावा असे काहीही या मनुष्याने केले नाही.”
32 Og Agrippa sa til Festus: Denne mann kunde være løslatt, om han ikke hadde innanket sin sak for keiseren.
३२अग्रिप्पा फेस्ताला म्हणाला, “या मनुष्याने कैसराकडे न्याय मागितला नसता, तर त्यास सोडून देता आले असते.”

< Apostlenes-gjerninge 26 >