< 2 Kongebok 1 >
1 Efter Akabs død falt Moab fra Israel.
१अहाब राजाच्या मृत्यूनंतर मवाबाने इस्राएलाविरूद्ध बंड केले.
2 Akasja falt ut gjennem gitteret i sin sal i Samaria og blev syk. Da skikket han nogen sendebud avsted og sa til dem: Gå og spør Ba'al-Sebub, Ekrons gud, om jeg skal komme mig av denne sykdom!
२नंतर अहज्या आपल्या शोमरोनमधल्या त्याच्या माडीवरच्या खिडकीच्या जाळीतून खाली पडला व जखमी झाला. तेव्हा अहज्याने आपल्या सेवकांना बोलावले आणि त्यांना सांगितले. “जा, आणि एक्रोनचे दैवत बआल-जबूब याला विचारून या, मी या दुखण्यातून बरा होईन का.”
3 Men Herrens engel sa til tisbitten Elias: Gjør dig rede og gå sendebudene fra Samarias konge i møte og si til dem: Er det fordi det ingen Gud er i Israel, at I går avsted og spør Ba'al-Sebub, Ekrons gud?
३पण एलीया तिश्बी याला परमेश्वराचा दूत म्हणाला, “ऊठ, राजा अहज्याने शोमरोनाहून आपले काही दूत रवाना केले आहेत, त्यांना जाऊन भेट आणि त्यांना सांग, ‘इस्राएलात देव नाही काय, म्हणून तुम्ही एक्रोनचे दैवत बआल-जबूब याला विचारायला जात आहा?
4 Derfor sier Herren så: Du skal ikke stige ned fra den seng du er steget op i; du skal dø. Dermed gikk Elias.
४ह्यास्तव परमेश्वर असे म्हणतो, “ज्या पलंगावर तू आहेस, तेथून तू कधीच खाली उतरणार नाही. त्याऐवजी, तुला खचित मरण येईल.” मग एलीया निघून गेला.
5 Da sendebudene vendte tilbake til ham, spurte han dem: Hvorfor er I vendt tilbake?
५जेव्हा दूत परत अहज्या राजाकडे आले. तो त्यांना म्हणाला, “तुम्ही परत का आलात?”
6 De svarte: En mann kom oss i møte og sa til oss: Gå tilbake til kongen som har sendt eder, og si til ham: Så sier Herren: Er det fordi det ingen Gud er i Israel, at du sender bud for å spørre Ba'al-Sebub, Ekrons gud? Derfor skal du ikke stige ned fra den seng du er steget op i; du skal dø.
६ते त्यास म्हणाले, “एक मनुष्य आम्हास भेटला व तो असे बोलला की, ‘तुम्हास ज्या राजाने पाठवले आहे त्याच्याकडे परत जाऊन त्यास सांगा, परमेश्वर असे म्हणतो, इस्राएलात परमेश्वर नाही काय? जो तू एक्रोनचे दैवत बआल-जबूब याच्याकडे आपल्या सेवकांना विचारायला पाठवलेस? ह्यास्तव ज्या पलंगावर तू चढला आहेस, तेथून तू कधीच खाली उतरणार नाहीस. त्याऐवजी, तुला खचित मरण येईल.”
7 Han spurte dem: Hvorledes så den mann ut som kom eder i møte og talte således til eder?
७अहज्या आपल्या दूतांना म्हणाला, “ज्याने तुम्हास भेटून हे सांगितले तो दिसायला कसा होता?”
8 De svarte: Det var en mann i en lodden kjortel, med et lærbelte bundet om lendene. Da sa han: Det var tisbitten Elias.
८त्यांनी त्यास उत्तर दिले, “त्याने केसांचा बनवलेला अंगरखा घातला होता आणि कातडयाचा कंबरपट्टा बांधला होता.” तेव्हा अहज्या म्हणाला, “तो एलीया तिश्बीच आहे.”
9 Og han sendte til ham en høvedsmann over femti med sine menn; og han gikk op til ham, der han satt på toppen av fjellet, og han sa til ham: Du Guds mann! Kongen sier: Kom ned!
९नंतर अहज्याने आपला एक सरदार पन्नास मनुष्यांसह एलीयाकडे पाठवला. सरदार एलीयाकडे वर गेला, जिथे एलीया एका डोंगराच्या माथ्यावर बसला होता. सरदार एलीयाला म्हणाला, “हे देवाच्या मनुष्या (संदेष्ट्या) राजाने सांगितले, त्वरीत खाली ये.”
10 Men Elias svarte høvedsmannen over femti: Er jeg en Guds mann, så fare ild ned fra himmelen og fortære dig og dine femti mann! Da fór det ild ned fra himmelen og fortærte ham og hans femti mann.
१०एलीयाने या सरदाराला उत्तर दिले, “जर मी देवाचा मनुष्य (संदेष्टा) असेल, तर आकाशातून अग्नी प्रकट होऊन तुला आणि या पन्नास जणांना भस्म करून टाको.” तेव्हा आकाशातून अग्नी खाली उतरला व त्या सरदारासह त्याच्या पन्नास जणांना भस्म केले.
11 Så sendte han til ham en annen høvedsmann over femti med sine menn; og han tok til orde og sa til ham: Du Guds mann! Så sier kongen: Kom straks ned!
११अहज्याने दुसऱ्या सरदाराला पन्नास जणांसह पाठवले. तो सरदार देखील एलीयाला म्हणाला, “हे देवाच्या मनुष्या, राजाने सांगितले, त्वरीत खाली ये.”
12 Men Elias svarte dem: Er jeg en Guds mann, så fare ild ned fra himmelen og fortære dig og dine femti mann! Da fór Guds ild ned fra himmelen og fortærte ham og hans femti mann.
१२एलीयाने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “जर मी देवाचा मनुष्य (संदेष्टा) असेल, तर आकाशातून अग्नी प्रकट होऊन तुला आणि या पन्नास जणांना भस्म करो.” पुन्हा आकाशातून अग्नी खाली उतरला व त्या सरदारासह त्या पन्नास मनुष्यांना भस्म केले.
13 Så sendte han igjen en tredje høvedsmann over femti med sine menn; og denne tredje høvedsmann gikk op til Elias og falt på kne for ham og bønnfalt ham og sa til ham: Du Guds mann! La mitt liv og disse dine femti tjeneres liv være dyrt i dine øine!
१३अहज्याने आणखी तिसऱ्या सरदारला पन्नास जणांसह पाठवले. तो सरदार एलीयाकडे वर आला, व गुडघे टेकून एलीयाला विनवणी करून म्हणाला, “हे देवाच्या मनुष्या, माझा आणि माझ्याबरोबरचे हे तुझे पन्नासदास, ह्यांचा जीव तुझ्या दृष्टीने मोलवान असो.
14 Ild fór ned fra himmelen og fortærte begge de første høvedsmenn over femti med sine menn; men la nu mitt liv være dyrt i dine øine!
१४खरोखरच, आधीचे दोन सरदार आणि त्यांच्या बरोबरची माणसे आकाशातून आलेल्या अग्नीत नष्ट झाली, पण आता माझा जीव तुझ्या दृष्टीने मोलवान असो.”
15 Da sa Herrens engel til Elias: Gå ned med ham, og vær ikke redd ham! Så stod han op og gikk med ham ned til kongen.
१५तेव्हा परमेश्वराचा दूत एलीयाला म्हणाला, “त्याला भिऊ नकोस, तर त्याच्याबरोबर खाली जा.” तेव्हा एलीया त्या सरदाराबरोबर राजा अहज्याला भेटायला खाली गेला.
16 Og han sa til ham: Så sier Herren: Fordi du skikket sendebud og vilde spørre Ba'al-Sebub, Ekrons gud, som om det ingen Gud var i Israel som du kunde spørre derom - derfor skal du ikke stige ned fra den seng du er steget op i; du skal dø.
१६एलीया अहज्याला म्हणाला, परमेश्वर असे म्हणतो, “इस्राएलात विचारायला परमेश्वर नाही काय? म्हणून तू ‘एक्रोनचा देव बआल-जबूबकडे विचारायला माणसे पाठवलीस? म्हणून आता, ज्या पलंगावर तू चढला आहेस, तेथून तू कधीच खाली उतरणार नाही. त्याऐवजी, तुला खचित मरण येईल.”
17 Og han døde efter det Herrens ord som Elias hadde talt, og Joram blev konge i hans sted i Judas konge Jorams, Josafats sønns annet år; for han hadde ikke nogen sønn.
१७परमेश्वराचे जे वचन एलीयाने सांगितले होते त्याप्रमाणे राजा अहज्या मरण पावला. अहज्याला मुलगा नव्हता, याकारणामुळे अहज्यानंतर यहोराम राजा झाला. यहूदाचा राजा यहोशाफाट याचा मुलगा योराम याच्या दुसऱ्या वर्षी हे झाले.
18 Hvad som ellers er å fortelle om Akasja og det han gjorde, det er opskrevet i Israels kongers krønike.
१८इस्राएलाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात अहज्याने केलेली बाकीची कृत्ये लिहिलेली नाहीत काय?